क्विक गन मुरूगन -माईंड ईट

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जनातलं, मनातलं
1 Sep 2009 - 3:08 pm

क्विक गन मुरूगन हा एक ईंडियन काऊबॉय असतो ज्याचा जिवनाचा उद्देश हा गाईंना वाचवण्याचा असतो. क्विक गन मुरूगन ची लॉकेट लव्हर ही गेल्या जन्मीची प्रेयसी असते. राईसप्लेट रेड्डी हा गाईंना मारून त्यांना डोशात घालून सगळे व्हेज हॉटेल नॉन व्हेज करण्याचा त्याचा डाव असतो. क्विक गन मुरूगनला राईसप्लेट रेड्डी मारतो. मुरूगन स्वर्गात जातो. चित्रगुप्ताकडे तो गाईंना वाचवण्यासाठी पुन्हा प्रूत्थीवर जाण्यासाठी अ‍ॅप्लिकेशन करतो. तो नंतर परत मुबंईला येतो.

राईसप्लेट रेड्डी ईकडे डोसा बनवण्यासाठी मॅक डोसा नावाची कंपनी टाकतो. त्यात डोशाची आर अँन्ड डी स्थापन करून सायंटीस्ट लोकांना नोकरीला ठेवतो. चांगला डोसा बनवण्यासाठी तो मुरूगन च्या वहिनीला पळवतो. त्याची असिस्टंट असणारी मँगो (रंभा) ही सेक्रेटरी क्विक गन मुरूगन ला मदत करते. राईसप्लेट रेड्डी ला राऊडी एम. बी. ए. सामील असतो. क्विक गन मुरूगन शेवटी राईसप्लेट रेड्डी ला मारतो.

एकदम वेगळा अनूभव देणारा चित्रपट.

यात नायक झालेले डॉ. राजेंद्र्कुमारांनी अनेकांची खिल्ली उडवलेली आहे. त्यानी मुद्दाम साउथ सारखे उच्चार केलेले आहेत. चित्रपटात कोकोनट क्लायबींग ईंन्स्टीट्यूट आहे. रजनीकांतसारखे सिगारेट उडवणारे शॉट आहे. सटासट सुटणार्‍या गोळ्या क्विक गन मुरूगन मारतो. गोळ्या कमरपट्ट्याला लागून कॅरमच्या गोटीसारखी फिरते. त्याच्या घरात त्याचा भाऊ व तो नेमबाजी खेळतो. त्याची वहीनी कौतूकाने ते पाहते. राईसप्लेट रेड्डीची डोशाची लॅब आहे. अगदी बाळासाहेब ठाकरे यांचे पोस्टर व वोट फॉर राज ठाकरे हे देखील आहे. मुबंईतले डबेवाले आहेत. अमीताभ च्या जास्त जाहीराती मिळवण्याची खिल्ली आहे. द मॅट्रीक्स सारखे गोळ्या सोडण्याचे शॉट आहेत. रंभा उर्वशीचे डान्स क्लासेस आहेत.

चित्रपटात गाणीही धमाल आहेत.

हा लेख म्हणजे माझे चित्रपट परीक्षण होवू शकणार नाही. चित्रपट परीक्षण देण्यासाठी तो चित्रपट कमीतकमी २/३ वेळेस बघावा लागतो. मी तर ज्या ठिकाणी चित्रपट पाहिला तेथे काही काटछाट झालेली होती. थेटरच्या बाजूला तर गणपतीच्या बाजूचे स्पिकर जोरात वाजत होते. असो. नंतर पुन्हा पाहीनच.

डॉ. राजेंद्र्कुमारांनी क्विक गन मुरूगन बनून धमाल केलेली आहे. मँगोवर तात्यांचा जीव जडण्याचा घनदाट संभव आहे. ती दिसतेही फटाका.

ईतर कलाकार ही जीव ओतून काम करतात. एकूणच शशांक घोश चा हा चित्रपट डोक्याला ताप न देता भरपूर मनोरंजन करतो. हा चित्रपट चित्रपटग्रूहातच पहावा. (पायरेटेड पाहू नये. जेणे करून आपण ईंडस्टीला काहीतरी मदत करू.)

मिपाच्या स्वभावासारख्या लोकांना हा चित्रपट आवडेलच व तो त्यांनी जरूर पहावा.

तांत्रीक बाबी : उत्तम
फोटोग्राफी : सफाईदार
म्युझिक : आनंददाई
अ‍ॅक्टींग : पेलवणारी

चित्रपट का बघावा: पैसा वसूल. डोक्याला ताप नाही.
चित्रपट का बघू नये : हा प्रश्नच येत नाही. बघावाच.

रेटींग: ***** (५ स्टार)

माईंड ईट.

विनोदचित्रपटशिफारसअनुभवआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

1 Sep 2009 - 3:16 pm | मदनबाण

दफोराव या चित्रपटाबद्धल बरेच ऐकले आहे...पाहावयास जरुर आवडेल. :)

मदनअण्णा.....

Stride 2009 :---
http://www.southasiaanalysis.org/%5Cpapers34%5Cpaper3354.html

धमाल मुलगा's picture

1 Sep 2009 - 3:26 pm | धमाल मुलगा

रविवारीच पाहिला...अगदी चक्क तिकीट काढून पाहिला....
=)) =)) =))
जे मुरुगनचं भूत डोक्यावर चढलंय अजुन उतरलं नाहीय्ये!!!
घरी बायकोशी बोलतानासुध्दा "ऐय्य..डिय्यर, गिव्व मी सम मोऽऽर काऽऽपी आय से!" असं काहीसं होतंय रे !!!

*वैधानिक इशारा: पिच्चर स्वतःच्या जबाबदारीवर पहावा.

हॉटशॉट-२ ही जर फक्त रँबोची पॅरोडी असेल तर क्वि.ग.मु. निरनिराळ्य चित्रपटांची अक्षरशः भेळ आहे.
शशांक घोषचं डिटेलिंग केवळ ज ह ब ह र्‍या आहे!!!
फक्त, चित्रपट पहाताना त्यातले सीन्स ज्या मुळ चित्रपटांवरुन बेतले आहेत त्याचे रेफरन्स लागणं महत्वाचं आहे..ते लागले की झालाच तुमचं "ठ्या:"

व्यक्तिशः मला आवडला...खुळ्यागत आवडला.. दिड तासात डोक्यातले सगळे ताण बिण विसरुन फ्रेश झालो!!!

एंजॉय माडी...आय से!

-(मैन्डिट्ट!) क्विकगन धमालन!

पाषाणभेद's picture

1 Sep 2009 - 5:54 pm | पाषाणभेद

माझ्या मुलाला अनंतला हा चित्रपट फार आवडला. आम्ही सगळे खालच्या रुम मध्ये असतांना हा गडी वरच्या रुममध्ये जावून क्विक गन मुरूगन सारखा तयार झाला. त्याचा हा फोटो.
Anant as Quick Gun Murugan, I say

त्याच्या बरोबर माझीही थोडा मुरूगन होण्याची ईच्छा झाली. तो फोटो मी अ‍ॅटो टायमर मोड वर जवळपास कोणी नसतांना काढून घेतला.
I as Quick Gun Murugan, I say

माईंन्ड ईट्ट

-----------------------------------
"मिपा खेळून घरी जावू नका. घरी आपली कोणीतरी वाट पाहत आहे."

"ऑफिसातल्या कंटाळ्याला उध्वस्त करी मिपा... मिपा मिपा खेळत बसा."

- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या

ऋषिकेश's picture

1 Sep 2009 - 3:29 pm | ऋषिकेश

मिपाच्या स्वभावासारख्या लोकांना हा चित्रपट आवडेलच व तो त्यांनी जरूर पहावा.

एकूणच मजेशीर प्रकार दिसतोय.. जरूर बघेन
परिचयाबद्दल धन्यु!

बाकी कोणाकडे चांगले (भरपूर सीडचे) टोरेंट असेल तर लिंक द्या

ऋषिकेश
------------------
दूपारचे ३ वाजून २८ मिनीटे झालेली आहेत. आता वेळ आहे जाहिरातींची "आंद.. एळ.. नाळ.. चार चार... चार चार!!!....;) "

पाषाणभेद's picture

4 Sep 2009 - 6:15 am | पाषाणभेद

भावा, थेटरातली मजा घरी नाय र.

-----------------------------------
"मिपा खेळून घरी जावू नका. घरी आपली कोणीतरी वाट पाहत आहे."

"ऑफिसातल्या कंटाळ्याला उध्वस्त करी मिपा... मिपा मिपा खेळत बसा."

- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या

जिवाणू's picture

1 Sep 2009 - 3:58 pm | जिवाणू

आम्ही पण रविवारीच पाहिला, थेटरात जाउन, मस्त मनोरन्जन करतो हा चित्रपट.
विशेषकरुन, हा डायलॉग...."सभी Indian mummies को Egyptian mummy कर दुन्गा." :)

ज्ञानोबाचे पैजार's picture

1 Sep 2009 - 4:11 pm | ज्ञानोबाचे पैजार

इडली अप्पम सांबार खाओ, क्विक गन मुरुगन के गुन गाओ
_______________________
बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम,
बोला पंढरीनाथ महाराजकी जय

हरकाम्या's picture

2 Sep 2009 - 1:29 am | हरकाम्या

आम्हि घरातील सर्व मंडळी या सिनेमाचे "फ्यान "झालेलो आहोत्.फक्त आता सर्वांना एकत्र वेळ कधी मिळतो ते बघ्तोय.