मी व १५० लेख !

दशानन's picture
दशानन in जनातलं, मनातलं
19 Aug 2009 - 2:22 pm

जेव्हा मिपा चालू झाले तेव्हा पासून आजपर्यंत आपण काय काय लिहले हे पाहू हा विचार करताना दोन दिवसात मला स्वतःलाच नवल वाटले की मी मिपावर जवळ जवळ १५० च्यावर लेख / कथा /अनुभव /कविता /विडंबने /चर्चा लिहल्या.... बाप रे ! शालेय जिवनात कधीही धड बसून एक पान व्यवस्थीत लिहलेले आठवत नाही व येथे येवढे लेखन....

माझी सफरचे मी वीस भाग व बाहुबली हॉस्टेलचे दिवस चे मी सात भाग असे दोन मोठे अनुभव लेखन मी केले... मी आधी मनोगतवर हलके फुलके लिहण्याचा प्रयत्न केला होता पण माझ्या लेखामधील अशुध्द भाषा व हिंदी शब्द ह्यामुळे मला तेथे नेहमीच खडे बोल वाचावे लागत ;) पण मिपावर माझे शुध्द-अशुध्द.. हिंदी शब्दाची भरमार असलेले सर्व लेख वाचले गेले व एकदोन काका मंडळींनी व कधी कधी काही मित्रांनी एक दोनदा च त्याबदल सुचना केलेली आठवते... पण मिपावर शुध्द लेखन ह्या प्रकाराचा जास्त बाऊ नव्हता शक्यतो ह्या मुळे मी लेखन करायला तयार झालो.. व लिहता झालो... व लिहता लिहता आज जरा मागे वळून पाहीले तर १५० लेख ! असे नाही की माझे सर्वच लेखन मिपाकरांना आवडले काही आवडले ही नाही... तर काही लेखन एवढे आवडले की लोकांच्या फॉरवर्ड मधून फिरु लागले व फिरता फिरता कधी कधी माझ्याच इमेल वर मला भेटले... ;)

मिपाकरांच्या स्वभावाचा अनुभव मला माझी सफर चे वीस भाग लिहताना झाला... जेव्हा मी लेखामध्ये सुखावलो तेव्हा... मिपावर प्रतिसादामध्ये सुखावले... जेव्हा मी दुखी वाटलो.. तर मिपाकर दुखःवर फुंकर घालण्यासाठी हजर... तो अनुभवच वेगळा होता... जे जगलो ते वीस भागात लिहणे मला जवळ जवळ अशक्य होते पण हळुहळु लिहीत गेलो व कधी लेखन पुर्ण झालं कळालेच नाही... मनातील दुखः येथे लिहल्यावर कमी होते ह्याचा अनुभव मला झाला व त्यामुळे मी खुप सुखावलो... माझे काही लेखन पुर्ण पणे लाताडले गेले तर कधी अक्षरशः प्रतिसादांचा ढिग.... महाजालावर काही खरं नसतं... हे माझं ठाम मत होते.. पण मराठी महाजालावर तो नियम लागू होत नाही.. हे पाहून आनंद झाला..

येथे मराठी भाषेपासून दुर राहून व दुर देशी राहून मराठी बोलायला ही ज्याकाळात मी व्याकुळ होत होतो तेव्हा मला हा प्लेटफॉर्म सापडला लिहण्याचा.... लिहीत गेलो... त्यातुनच एवढे मित्र गोळा झाले व मराठीचा वापर एवढा वाढला की मी माझ्याच ऑफिस मध्ये कळत न कळत मराठी बोलून जातो... व समोरचा माझे तोंड बघत उभा राहतो.. :D

मी लिहलेले काही असेच.... अनुभववर्णन !
पाप येवढे आहेत डोक्यावर...
माझी सफर.. भाग -१
माझी सफर - अयोध्या - कानपूर वारी --- भाग -२माझी सफर... हरिद्वार मध्ये - भाग ३ माझी सफर... दिल्ली सफर - भाग ४माझी सफर... मैहरोली ते करोलबाग - भाग ५माझी सफर... कार्य सिध्दी ... भाग - ६माझी सफर... नोकरीपर्व ... भाग - ७माझी सफर... पुन्हा प्रवास ... भाग - ८माझी सफर... निर्णय भाग - ९माझी सफर... माझा स्वयंपाक व विचार चक्र- १०माझी सफर... सत्व-परिक्षा.. भाग - ११माझी सफर.... मैत्री !!! --- भाग - १२मागील भाग भाग - १३मागील भाग....भाग -१४.माझी सफर........परतीचा प्रवास .... भाग-१५माझी सफर........ कोल्हापुर.. भाग-१६मागील भाग -१७मागील भाग - १८माझी सफर .....मनाली ट्रीप ... १९

माझी सफर भाग -२०
बाहूबली हॉस्टेलचे दिवस- भाग ७
बाहूबली हॉस्टेलचे दिवस -भाग -१
दिल्ली ते दिल्ली -भाग १
दिल्ली ते दिल्ली ! भाग - २
दिल्ली ते दिल्ली - भाग ३
नातं...

माझी भटकंती
भटकंती - पहीला स्टॉप - गुडगांव ! (गुरुगांव)
भटकंती - दुसरा स्टॉप - मनाली (हिमाचल प्रदेश)
भटकंती तिसरा स्टॉप - दिल्ली -११०००६
भटकंती ४ था स्टॉप - नैनीताल
बेंगलुरु ट्रिप - बाणेरघट्टा नॅशनल पार्क

शेयर मार्केट विषयी असेच काहीतरी
शेयर मार्केट - एक अंदाज
रात्र वैर्‍याची... दिवस शैतानाचा ;)
आवशीचा घो ह्या बजटच्या ;)
शेयर मार्केट (बेसिक) भाग -१
शेयर मार्केट (बेसिक) भाग -२
फाइनांशियल क्राइसिस
७०० बिलियन डॉलर !

आमचे प्रेम-विषयक लेखन ;)
माय व्हॅलंटाईन
तो व मी - लफडा अनलिमिटेड.
वहां कौन है तेरा मुसाफिर जायेगा कहां
अस्तित्व
जगणं !
ए-दिले-नादान
तु !
तो-ती व मी - लिमिटेड लफडा !!!
लफडा
काही क्षण...
ती व मी !
ती व मी ! - २
ती व मी ! - ३
तु राजा की राजदुलारी मै....

स्टोरीज !

अंत...

अंत... भाग-२
अंत... भाग-३
अंत... भाग- ४
हत्या !!!

टाईमपास
आम्ही जातो हिमालया.... पार्ट-१
आम्ही जातो हिमालया.... पार्ट-२
माझं थोबाड... भाग- ०
माझे महान प्रयोग - १
माझे महान प्रयोग - २
कृष्ण
दुनियादारी - माझ्या नजरेने !
(आज तुझा वाढदिवस )

यालाकमो हिदा श्यादि
मुंबई - गोवा आमची देखील फोटोग्राफी भाग - १
कॉकटेल - सोमरस संबधी... !

वाव क्या बात है राज !

हे माझे काही लेखन जे मिपाकरांना ही आवडले व मला स्वतःला ही.... ;)

धन्यवाद मिपाकर... & धन्यवाद तात्या... तुमच्यामुळे / तुम्हा सर्वांमुळे मला येवढं लेखन करता आले व मी लिहता झालो.... व राज जैन हे नाव मराठी महाजालावर कमीत कमी लोकांना माहीत तरी झाले ;)

आता राहिला क्रमशः लेखना बद्द्ल.... तर मित्रों हो थोडा टाईम द्या... रोज कामातून वेळ काढून काढून लिहतो... लॅपटॉप जरा खराब आहे... त्यामुळे ऑफिसमधून जेवढा वेळ मिळेल त्या मध्ये मी माझे क्रमशः लेखन पुर्ण करतो... !

मंगलमुर्ती मोरया !!!!

धोरणमांडणीवावरप्रकटनविचारप्रतिक्रिया

प्रतिक्रिया

सूहास's picture

19 Aug 2009 - 2:25 pm | सूहास (not verified)

सर्वात खाली क्रमश लिहीलेले नाही हे पाहुन अतिशय देव आनंद झाला....

सू हा स...

नंदन's picture

19 Aug 2009 - 2:30 pm | नंदन
टारझन's picture

19 Aug 2009 - 6:32 pm | टारझन

राजेंच्या खरडवहीत आल्यासारखेच वाटले !
बाकी सामंतांकाका आणि कोदाकाकांनतर णंबर राजेंचाच :)

- (काय अन् किती लिहीलंय ह्याचा हिशेब नसलेला) अचानक नातलग

अवलिया's picture

19 Aug 2009 - 6:37 pm | अवलिया

सामंतकाका आणि कोदाकाका यांना एकाच पारड्यात ठेवल्याबद्दल टारझनचा निषेध.

--उगाचच प्रतिसाद

पर्नल नेने मराठे's picture

19 Aug 2009 - 2:26 pm | पर्नल नेने मराठे

महाजालावर मिळालेला राजेचा फोटो
;)
चुचु

छोटा डॉन's picture

19 Aug 2009 - 2:32 pm | छोटा डॉन

राज्या, लिहीत रहा बे.
आम्ही वाचतो आहोत, फक्त मायला ते क्रमशःचे भुत डोक्यावरुन काढुन टाक आता ...

बाकी तुझ्या १५१ व्या लेखाला शुभेच्छा ...!!! :)

------
छोटा डॉन

दशानन's picture

19 Aug 2009 - 2:45 pm | दशानन

क्रमशः लिहणे माझा जन्मसिध्द अधिकार आहे व तो मी वापरणारच :D

***

तुझ सम नाही दुसरा ध्वज
तुझ सम नाही दुसरा देश
तुझ्यासाठीच जगणे हेच ध्येय
स्वप्न माझे अर्पावा तुझसाठी हा देह !

प्रभो's picture

19 Aug 2009 - 2:36 pm | प्रभो

राजे.... तुमचे विचार वाचून ......चांगलं वाटलं....
मी तसा गेले ५-६ महीने मिपा वाचत होतो.....तुमचं लिखाण वाचायला जाम मजा आली....

-(नव्याचे नऊ दिवस) प्रभो -

टारझन's picture

19 Aug 2009 - 6:38 pm | टारझन

ही सही नऊ दिवसंच ठेवा प्रभो ! नऊ महिणे टिमके वाजवत बसु नका !

- (वर्षातले काही दिवस) टर्बो +

परिकथेतील राजकुमार's picture

19 Aug 2009 - 3:00 pm | परिकथेतील राजकुमार

च्यायला काय काय सहन केलय मिपाकरांनी ! आणी अजुन करावे लागणार आहे ....

राजेचा अहितचिंतक
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला.
आमचे राज्य

सहज's picture

19 Aug 2009 - 3:07 pm | सहज

>मनातील दुखः येथे लिहल्यावर कमी होते ह्याचा अनुभव मला झाला व त्यामुळे मी खुप सुखावलो.

आशा आहे की आपले जास्त लेखन येणार नाही कारण आता आपण सुखी असाल. पण धन्यवाद काही लोक इतके का लिहतात ते कळले, दु:खी असणार बिचारे :-)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Aug 2009 - 3:09 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

सहजकाका, राजेच्या खांद्यावरून गोळी चालवून काही फायदा नाही हो!

अदिती

अवलिया's picture

19 Aug 2009 - 4:22 pm | अवलिया

परंतु, सहजरावांनी स्पष्ट नाव घेवुन बोलावे कुणी लेखन करु नये ते... उगाचच वैचारिक बुरखे घेवुन सुखी दु:खी अशा मानीव कल्पनांवर आधारीत वर्गीकरण करुन फार मोठा तीर मारल्याचा आव आणु नये.

--अवलिया

ऋषिकेश's picture

19 Aug 2009 - 3:15 pm | ऋषिकेश

हे फारसे खरे नसावे.. आता तुम्ही कुठे लिहिता ? .. ;)
बाकी राजे तुमचे अभिनंदन

ऋषिकेश
------------------
दुपारचे ३ वाजून १५ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया संतवाणी "जगी सर्वसुखी असा कोण आहे...."

अवलिया's picture

19 Aug 2009 - 3:40 pm | अवलिया

सहजकाका लिहित का नाहीत ते आज कळले.
एक सदरा पाठवुन देता का?

--अवलिया

दशानन's picture

19 Aug 2009 - 3:41 pm | दशानन

मला पण एक पाठवा हो.. काका ;)

समंजस's picture

19 Aug 2009 - 3:11 pm | समंजस

अभिनंदन राजे!तुमच्या लिखाणा बद्दल
माझ्या सारख्या वाचकांना भरपूर आनंद मिळाला!!
लिहीने सुरुच ठेवा. :)
(राजे! तुम्ही न मोजता लिहावे, आम्ही न मोजता वाचावे! काय? :D )

अवलिया's picture

19 Aug 2009 - 3:38 pm | अवलिया

अभिनंदन राजे :)

बाकी तुमचा वाचकवर्ग कसा आहे? तुमच्या कोणत्या लेखाला किती प्रतिसाद मिळाले, वाचने किती वगैरे विदा आला असता तर तुलना करायला बरे झाले असते.

--अवलिया

स्वाती२'s picture

19 Aug 2009 - 3:58 pm | स्वाती२

अभिनंदन राजे!

दिपक's picture

19 Aug 2009 - 4:32 pm | दिपक

राजे आत्ता फक्त १५० झाले आहेत. लिवत रावा. तुम्ही १५००००००० लेख होतील हो... तोपर्यंत पळून पळून मंगळ ग्रहावर पोचला असाल. आहात कुठे? ;)

तो पर्यंत तात्याला माझ्यासाठी एक सर्वर घ्यावा लागेल त्याचे काय =))

सूहास's picture

19 Aug 2009 - 4:57 pm | सूहास (not verified)

ते तात्या बघुन घेतील तु बघ्...१५००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००कसे पुर्ण करायचे ते .....

सू हा स...

मदनबाण's picture

19 Aug 2009 - 5:44 pm | मदनबाण

अभिनंदन राजे !!! :)

मदनबाण.....
चट्यागो चझीमा चवडतीआ चलिकामा चतीहो. :)
http://www.youtube.com/watch?v=z3z6limgwMo

लवंगी's picture

19 Aug 2009 - 6:45 pm | लवंगी

क्रमशःला शुभेच्छा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Aug 2009 - 6:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

'माझे शब्द' च्या माजी संस्थळचालकाच्या लेखाच्या लेखनाचे अज्याबात आश्चर्य नाही. खरं तर ! विविध अनुभवांचे लेखन राजेंकडून व्हायला पाहिजे. वाढत्या वयातील ( काय लिहायची गरज होती) लेखनात-अनुभवात अधिक समृद्धपणा आला पाहिजे, (म्हणजे तो आहेच) तेव्हा भरभरुन लेखनासाठी हार्दिक शुभेच्छा...!!!

अवांतर : आपल्या मराठी लेखनात हिंदी शब्दाचे प्रमाण बरेच कमी झाले आहे. :)

-दिलीप बिरुटे
(उंटावरुन शेळ्या हाकणारा राज जैन यांचा मित्र)

अवलिया's picture

19 Aug 2009 - 7:02 pm | अवलिया

वाढत्या वयातील ( काय लिहायची गरज होती) लेखनात-अनुभवात अधिक समृद्धपणा आला पाहिजे,

सहमत आहे. हाच सल्ला आमच्या वयोवृद्ध ज्ञानतपस्वी रिडर मित्राला दिला होता, त्याने दुर्लक्ष केले आणि स्वतःच्या लेखनात संस्कृत शब्दांचा वापर वाढवला.

--अवलिया
(रिमोटवरुन चॅनेल बदलणारा प्रा डॉ यांचा मित्र)

विकास's picture

19 Aug 2009 - 7:08 pm | विकास

१५० लेख? एक पुस्तक करून टाका. फायदा: त्यात कुणाला प्रतिसाद देता येणार नाही, अर्थात one way communication आणि "संभाव्य" तोटा: जर कोणी विकत घेतले नाही तर? :? संभाव्य तोटा जर "क्रमशः" लिहीले तर नक्की होईल ;)

धन्यवाद मिपाकर... & धन्यवाद तात्या...

वरील शब्द वाचले आणि मला क्षणभर वाटले तुम्ही मिपाचा निरोप घेता की काय? :)

पाषाणभेद's picture

20 Aug 2009 - 2:41 am | पाषाणभेद

अभिनंदन. लवकरच १००० व लेख पहायला मिळो.

वा वा. छान छान. असेच लिहीत रहा.

- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या

llपुण्याचे पेशवेll's picture

20 Aug 2009 - 2:43 am | llपुण्याचे पेशवेll

हार्दीक अभिनंदन
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

धनंजय's picture

20 Aug 2009 - 3:25 am | धनंजय

या लेखाने १५१ झालेत!

टुकुल's picture

20 Aug 2009 - 3:31 am | टुकुल

सही हे भिडु !!
अभिणंदन... अजुन येवु द्या

--टुकुल.

काळा डॉन's picture

20 Aug 2009 - 6:52 am | काळा डॉन

राजा, तरी मधे एकदोनदा सरपंचावर रुसून पळून गेलास...नाहीतर २०० नक्की होते!! ह्या यादीत 'जैनाचं कार्ट not vefied' ह्या आयडीतले लेखही धरले आहेस ना?

दशानन's picture

20 Aug 2009 - 1:48 pm | दशानन

हो !

झकासराव's picture

20 Aug 2009 - 11:23 am | झकासराव

मग राजे द्वीशतक लावा लवकरच. :)
ते शेअर मार्केट प्रायारिटीवर घ्या. आणि ते क्रमशः आधी संपवा बघु.

अभिज्ञ's picture

20 Aug 2009 - 5:26 pm | अभिज्ञ

अभिनंदन राजे,

अभिज्ञ.

--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

विनायक प्रभू's picture

20 Aug 2009 - 7:13 pm | विनायक प्रभू

असे म्हणावे की काय?
आयला राजे आणि शिंव्ह लय भारी उपमा

लिखाळ's picture

20 Aug 2009 - 7:18 pm | लिखाळ

वा .. अभिनंदन आणि शुभेच्छा !
माझी सफर आणि बाहुबली या लेखमाला छान होत्या. :)

-- लिखाळ.
'वाटते आहे', 'कुठेतरी वाचले आहे', अशी संदिग्ध विधाने करणार्‍याला म. संकेतस्थळांवरच्या चर्चेत मानाचे पान असते असे वाटते ;)

क्रान्ति's picture

20 Aug 2009 - 8:47 pm | क्रान्ति

राजे, हार्दिक अभिनंदन!

क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी

प्राजु's picture

21 Aug 2009 - 7:57 am | प्राजु

अरे व्वा!
सह्ही!!
कोल्हापूरकरांचा वि़जय असो...! :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Aug 2009 - 8:06 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कोल्हापूरकरांचा वि़जय असो...!

प्रादेशिक मतभेद करणार्‍या प्राजू यांचा निषेध करुन कोल्हापूरकडील कोणत्याही लेखक/ लेखिकेला दोन दिवस प्रतिसाद लिहिणार नाही. (ह.घे)

-दिलीप बिरुटे

विजुभाऊ's picture

21 Aug 2009 - 5:45 pm | विजुभाऊ

प्रादेशिक मतभेद करणार्‍या प्राजू यांचा निषेध करुन कोल्हापूरकडील कोणत्याही लेखक/ लेखिकेला दोन दिवस प्रतिसाद लिहिणार नाही. (ह.घे)

-दिलीप बिरुटे
प्राजू लक्षात घे हा मराठवाडा/विदर्भातील लेखकांचा आपल्या पश्चीम महाराष्ट्रावर नेहमीच असा आकस असतो ;)
( चला सुरु झाली आणखी एका सनातन मुद्द्यावर मारामारी)

पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे

एकलव्य's picture

21 Aug 2009 - 9:49 am | एकलव्य

अभिनंदन राजे!