नमस्ते चायना !! - (३)

अनिल हटेला's picture
अनिल हटेला in जनातलं, मनातलं
29 Jul 2009 - 1:11 am

नमस्ते चायना !! - (१)

नमस्ते चायना !! - (२)


ते शहर जीथं मी अशा रीतीने जगलो की वाटलं की ह्यालाच जीवन ऐसे नाव !!

निंगबो.....
चेच्यांग प्रांतातील दुसर्‍या क्रमांकाचं आणी चायनाचं सहाव्या क्रमांकाचं शहर.
मध्य-पूर्व चायनाचं महत्त्वाचं बंदर.
NingBo city
NingBo city
NingBo Map

माझी मलाच गंमत वाटत होती.पिंपरी पुणे टू चायना, देखा ना तुने कभी आइना...:-)
पून्हा एकदा मागचे दिवस पूढे.नवा स्टाफ,नवा बॉस्,लोक नवे,रस्ते नवे....
आणी ह्या नवलाइत मी!!

पहील्याच दिवशी एक मित्र झाला.ऑफीसच्या बिल्डींगचा बावान (सीक्युरीटी गार्ड) !!!
त्याला बॉलीवूड पटाचं विलक्षण वेड. 'आवाला हु' असं गायचा....आणी हसुन हसुन आम्ही दमायचो..
''आखे खुली हो या हो बंद'' असं म्हणत नाचायचा.साधारण माझ्याच वयाचा.त्याच्या सोबत नंतर बर्‍याच चायनीज डीश फस्त केलेल्या. आणी त्याला वरण-भातापासून ते हल्दीराम च्या सोन पापडी पर्यंत सारं चाखायला दिलेलं.
कधी पट्ठ्याने आपला चहा मात्र पीला नाही.अगदी आलं-विलायची घालून केलेला 'हटेला' पद्धतीचा चहा सुद्धा त्याने नाक मुरडून नको केला.

मला जो कलीग होता,तो सुद्धा नवीण.चायनीज बोलता येत नाही किंवा फार काही माहिती नाही.पण एक झालं.त्यामुळे आम्ही सार्‍या गोष्टी झीरो पासून शिकलो.सुरुवातीला काम एके काम चालू होत्ं.नंतर शहरात फेरफटका मारायला सुरुवात केली.बघता-बघता पीएमटीला सरावलेलो,अगदी तीतकाच इथल्या सीटीबसची सवय होत गेली.

पहिल्या दिवसापासुन निंगबो शहराने वश केलेलं.अगदी पुण्यात रहात असल्या प्रमाणेच मी इथे वास्तव्यास होतो.मुळात ऑफीस आणी घर दोन्हीही मुख्य शहरापासून किंचीतसं बाहेर.त्यामुळे शहरी गडबड-गोंधळ नसला तरी अगदीच शांतताही जाणवायची नाही.

महीन्याभरातच बॉस सोबत सुद्धा मस्त गट्टी जमली,अगदी विश्वासाने लांब -लांबची काम बॉस मला सांगायचा.६ - ७ तासाचा प्रवास म्हणजे सवयच झालेली.त्यामुळे अनहुयी,च्यांगसु प्रोव्हीयंस ला माझ्या भेटी वाढत गेल्या.
(मध्यंतरी आलेल्या मंदीमुळे भरपूर आराम दिला म्हणा!)
पण वेगवेगळ्या शहरांच्या बोली भाषेत असणारा फरक भरपूर जाणवायचा.
आपली मराठीच प्रत्येक गावाबरोबर थोडीशी बदलते,किमान उच्चारामध्ये तरी थोडासा फरक होतोच,तो साधारण आपणास जाणवतो,समजतो.... कारण ती आपली मातॄभाषा आहे.आणी ह्याच नियमाने चायनीज सुद्धा गावोगावी (म्हणण्यापेक्षा दर प्रोव्हीयंसमध्ये/शहरात बदलते) इतकी की नवीण शिकणार्‍याची फूल्टूस दुर्गती होउन जाते.अशाच पद्धतीने चायनीज खाद्य सुद्धा प्रोव्हीयन्स नुसार बदलत जाते.समुद्राच्या जवळपास रहाणारे द.चायना मध्ये सी फूड खाण्यावर भर दिला जातो.तर दक्षिण-पूर्वेमध्ये सी फूड बरोबरच मांस आणी काही प्रमाणात भाज्या खाल्ल्या जातात.ह्याउलट मध्य-चायना मध्ये मांस आणी उपलब्ध असणार्‍या भाज्या (नदीत मिळणारे जलचर) ई.वर गुजराण होते.ही सारी माझी ऐकीव माहीती आहे.कारण मला कुणी गप्पा मारणारा भेटला की त्याला मी पीडलाच म्हणुन समजा!!!

आधीच माझं चायनीज बेक्कार.त्यात मला माहीत असलेल्या शब्दा व्यतीरीक्त वेगळा शब्द कुणी बोललं की माझ्या डोक्या वरुन जायचं.
हक्काच ह्त्यार म्हणुन "थींगपूतूंग" सोबत असायचंच.(नाय समजलं!)
फॅक्टरीमध्ये तर माझ्याशी संवाद साधू इच्छीणारे वेडे होता-होता रहायचे,इतका त्यांच्यावर अत्याचार व्हायचा..
(आपला फंडा:-टेन्शन लेनेका नै, सीर्फ देणेका!! ;-) )

चायनात पोचण्यापूर्वी त्या देशाविषयी माझी काही आग्रही मत,अनुमान होती.पण इथे पोचल्यावर,इथे वावरल्यावर त्यात बदल होत गेले.
वाटलं नव्हतं की इतक्या झपाट्याने स्वतःची प्रगती केलेला देश असेन म्हणुन.इतकच काय,त्यांच्या ऑलींपीकचं यजमानपद अशा रीतीने भुषवलं की सार्‍या जगाने अगदी तोंड भरून त्यांच कौतुक केलेलं.
ह्याठीकाणी चायनाचा उदो-उदो करण्याचा कुठलाच हेतु नाही.पण जे पाह्यलं,जे आवडलं ते सांगावसं वाटतये..
बाकी मेड इन चायना मालाबद्दल आणी बीजींग ऑलींपीकच्या यजमानपदाविषयी अगदी सुंदर रीतीने मीनलताईने ह्या ,ह्या आणी ह्या ठीकाणी मांडलच आहे.(आपली ती कुवत नोहे!!)

मोजुन तेरा महीने मी इथे वास्तव्यास होतो,पण ते दिवस मी अगदी खर्‍या अर्थाने जगलो.बक्कळ मेहेनत करणं,आणी भरपूर भटकणे,हे माझे आवडीचे उद्योग असायचे.एक प्रकारचा विश्वास,दिलासा मिळाला मला इथे.स्वतःला आजमावलं मी इथेच...आणी इथे आल्यावर,राह्यल्यावर मला समजलं की घुम फीरके दुनीया गोल है !! ;-)
आपल्या प्रमाणेच ही सुद्धा माणसे आहेत!आणी भाव भावना,सुख दुख ह्या लोकाना आपल्या इतकेच महत्त्वाचे आहेत.व्यक्त करायची,सांगायची ह्यांची फारतर पद्धत वेगळी असू शकते.

एका चायनीज मित्राच्या विवाह सोहळ्याला उपस्थीत राह्यलेलो.हॉलीवूडच्या चित्रपटात शोभतील अशी सरबराई होती.आणी खरं सांगायचं झालं तर साराच सोहळा पाश्चात्य पद्धतीने झालेला.त्यानंतर चायनीज देवतेच्या वेषात आलेल्या कलाकाराने केलेली जादुगरीसुद्धा बघण्यासारखी झालेली.तो अनुभव सुद्धा मनाच्या कुपीत जपलेला आहे....;-)
Chinese God
Chinese God

बर्‍याच गोष्टी आयुष्यात साठवणीच्या असतात,ज्या कायम आपल्या सोबत असतात.कधीच न विसरण्यासाठी.प्रत्येक अनुभव व्यक्त करता येत नाही,तो अनुभवावाच लागतो.
मुळात माझं काम पाट्या टाकण्याचं.साहेबी थाट आपल्याला कधी जमलाच नाही,जमणारही नाही.
प्रत्येक ठीकाणी कामगार ड्रायव्हर ईत्यादीशी आधी मैत्री झाली.

नाही म्हटलं तरी एक दोन वाइट अनुभव आलेच.
एकदा बस-स्टॉपच्या स्कॅन मशीनीतुन माझी बॅग लंपास झाली.विशेष म्हणजे त्यात माझा पासपोर्ट,एम्प्लॉयमेंट कार्ड सारं होतं.
मोजुन अकराव्या मिनिटाला माझी बॅग माझ्या हातात होती.जागोजागी लावलेल्या कॅमेर्‍यांची कमाल किंवा पोलीसांची तत्परता.पण त्या अकरा मिनिटात माझी हालत खराब झालेली.तुटक्या फुटक्या चायनीज मध्ये तीथल्या सीक्युरीटी वाल्याला 'माझी बॅग चोरी झालीये हे सांगताना,आणी त्यात काय-काय आहे ,बॅगेचं वर्णन' कसं कुणास ठाउक मराठी-मिक्स भाषेत त्याला लगेच समजलं.आणी तत्परतेने त्यानेही हालचाली केल्या.बरं ह्या गदारोळात माझी बस निघण्याची वेळ झालेली,आता शेजारच्या चौकीत जाउन मला बॅग क्लेम करावी लागणार होती आणी त्यात माझी बस जाणार होती.पण त्यांनी माझं तीकीटही बदलून दिलं आणी पाच मिनीतात बॅगही क्लेम करून दिली.

दुसरी घटना थोडीशी आगळी वेगळीच.
शांघाय पासुन काही अंतरावरच असलेल्या एका फॅक्टरीत लोडींगसाठी गेलेलो.सारं काही व्यवस्थीत चालू असताना मध्येच कंटेनरचा ड्रायव्हर आला.थोड्या इकडच्या-तीकडच्या गप्पा झाल्यावर त्याने 'भारतात पूरूष दोन-दोन लग्न करतात' आणी अशाच प्रकारच्या बर्‍याच अफवा (बोलबच्चनगीरी करायला) सुरुवात केली.तीबेट प्रश्न सुद्धा त्याने ऐरणीवर आणला.अशा वेळी रक्तातली "ब्लॅक लेबल" उसळून बाहेर आली.पहीलं तर त्याचं भारताविषयी असलेले गैरसमज दूर केले.
विषय तीब्बेटचा निघाला!!
म्हटलं बाबारे तुला कितपत माहिती आहे तिबेटविषयी.म्हणे तीबेट चायनाचा हिस्सा आहे,इतकं पूरेसं आहे.
मग असा काय पीसला त्याला की सांगता सोय नाही.तीबेटच्या सर्व शीलांमध्ये, गुफांमध्ये संस्कॄत भाषेत श्लोक कोरलेले आहेत.इतकच काय बर्‍याच ठीकाणी हिंदु देवतांच्या मुर्त्या आहेत अशी बरीच खडाजंगी झाल्यावर जरा लायनीवर आला.

मुळात निव्वळ भारतदेशा विषयी आणी भारतीयाविषयी मनात विष असलेले बरेचशे साप पाकीस्तान प्रमाणे इकडेही आहेत असा नवा शोध त्या दिवशी लागला.

साधारण १३ महीने निंगबो शहरात वास्तव्यास होतो.
रात्र-रात्र बाहेर भटकलो.कधी कसलीच काळजी वाटली नाही.
शहर तसं भलं मोठं.कित्येकदा बीनकामी पायपीट करायची सुप्त इच्छा बळवायची.अशा वेळी कुठलीही एक दिशा पकडून सरळ निघायचो.कुणाशी एक नाही,दोन नाही.जमेल तीतकं चालत रहायचं.तास-दोन तास भटकुन झाल्यावर,टांगांनी शेवटचा सुस्कारा सोडल्यावर एखादी मोकळी जागा पकडून दिसणारी दॄष्ये बघत बसायचं!किती वेळ कुणास ठाउक!दिसणार्‍या प्रत्येक घटना काही ना काही आनंद नक्कीच देउन जातात.बराच वेळ असा गेल्यावर मग आपल्यालाच खबर नसायची की नेमका शहराच्या कुठल्या भागात आलो आहोत.आणी आता परतायची नक्की वाट कुठली.अशा वेळी एखाद्याला पकडून 'बाबारे मला ह्या ह्या ठीकाणी जायचय.कसं जायचं ते सांग?'
(वि सु.:- इतक्या दिवसाच्या वास्तव्यात कुठल्याही चीन्याला मदत मागीतली तर त्याने मदत केलीचये.आजच्या तारखेत जगातला सर्वात मैत्रीपूर्ण देश अशी यांची ख्याती झालीये!!)
मग कुठल्या सीटी-बसने कुठपर्यंत जायचं,कुठल्या स्टॉपला उतरून पूढे कोणत्या नंबरची बस पकडायची वगैरे कळायचं.जास्त मचमच वाटली तर सरळ टॅक्सी पकडायची,असा बेत असायचा.

आठवड्यातुन दोन-तीन वेळेस सिचुआन पद्धतीचं डीनर व्हायचं.त्या ठीकाणी हॉटेलच्या मालका पासून ते वेट्रेस आणी आतील अगदी कूक पर्यंत ओळखी झालेल्या.ऑर्डर सुद्धा प्रत्येक वेळेस द्यायची गरज नसायची.फक्त ''यांद'' (सेम) म्हटलं तरी जमून जायचं.

बर्‍याचदा रस्त्यात सेल्समन भेटायचे.मार्केटींग करणारे.गरज नसताना मंडई करायचे.पण त्यांच्याशी संवाद साधताना सुद्धा गंमत व्हायची.तीन-चार शहरात तर महीन्यातुन किमान एकदा जावं लागायचं आणी रात्रीचा मुक्कामसुद्धा ठरलेला असायचा.त्यामुळे तीकडे सुद्धा मॅनेजर पासुन ते एखाद दुसर्‍या स्टाफसोबत ओळखी झालेल्या.पण रात्रीच्या त्या मुक्कामात रूम मधील टेलीफोनची वायर सॉर्कीट मधुन काढायला कधी विसरायचो नाही.
(नाही-तर अपरात्री फोन वाजायचा आणी एखादी चायनीज शकुनीया डोक्याची मंडई करायची)

कदाचीत असं ही असु शकतं की सारं पहील्यांदाच अनुभवत असलल्याने माझ्यासाठी आठवणीचा ठेवा आहे ..
पण हा मेवा फार काळ टीकला नाही.

परचेस मधुन आमचं प्रमोशन झालं,सेल्स मध्ये .....

पोलंड आणी युक्रेन असे दोन ऑप्शन होते....
पोलंडचा व्हीसा नाय मिळाला...
आणी युक्रेनचा मिळाला...

जगातल्या सर्वात बोल्ड आणी ब्युटीफुल सुंदर्‍याच्या देशात...रशीयन फेडरेशन्च्या एका देशात ..आमची रवानगी झालेली...

३० एप्रिल २००९ शांघाय विमानतळावरुन कुच केलं ..नव्या मोहीमेसाठी,नव्या अनुभवांसाठी,नव्या वारीसाठी.....

(समाप्त)

समाजजीवनमानतंत्रअनुभवमत

प्रतिक्रिया

kid 4
kid 1

बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)

टुकुल's picture

29 Jul 2009 - 1:24 am | टुकुल

अन्या !! लय मस्त लिहिल आहे.. एका दमात वाचुन काढल.. (हापिसात असल्याने फोटो नाही पाहता आले..)

>>>जगातल्या सर्वात बोल्ड आणी ब्युटीफुल सुंदर्‍याच्या देशात...रशीयन फेडरेशन्च्या एका देशात ..आमची रवानगी झालेली... <<
येवु दे आता तिथले अनुभव..

अवांतरः "तो अनुभव सुद्धा मनाच्या कुपीत जपलेला आहे...." हे वाक्य काळजाला लागले.. जुन्या आठवणी जाग्या केल्यास. :-)

--टुकुल.

सूर्य's picture

29 Jul 2009 - 8:10 am | सूर्य

बर्‍याच दिवसांनी भाग टाकला तोही शेवटचा. आता युक्रेनची ष्टोरी येउद्या राव.

-सूर्य.

प्रसन्न केसकर's picture

29 Jul 2009 - 3:11 pm | प्रसन्न केसकर

पण तुमची लिहिण्याची शैली भारी आहे. आता युक्रेनबाबत येऊ दे

---

Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr

विसोबा खेचर's picture

29 Jul 2009 - 9:11 am | विसोबा खेचर

चित्रदर्शी लेख क्लासच!

तात्या.

पाषाणभेद's picture

29 Jul 2009 - 9:19 am | पाषाणभेद

वा वा. छान छान. असेच लिहीत रहा.
- पाषाणभेद

स्वाती दिनेश's picture

29 Jul 2009 - 11:37 am | स्वाती दिनेश

शेवटचा भागही आवडला, आता युक्रेनचे अनुभव येऊ देत..
स्वाती

सहज's picture

29 Jul 2009 - 3:25 pm | सहज

मस्त रे! हाही भाग उत्तम व आता युक्रेनची लेखमाला होउन जाउ दे.

यशोधरा's picture

29 Jul 2009 - 11:58 am | यशोधरा

स्वातीताईसारखेच म्हणते. निरनिराळ्या देशांच्या वार्‍या करायला मिळताहेत, नशीबवान आहात! :) निरनिराळे अनुभव, माणस, देशप्रदेश.. खूप काही अनुभवयाची संधी आहे..

परिकथेतील राजकुमार's picture

29 Jul 2009 - 1:11 pm | परिकथेतील राजकुमार

वाह अन्याभौ ! एकदाचा वेळ मिळाला म्हणायचा.

भावा हा ही लेख ज ह बर्‍या च ! अनुभवांचे तुझ्या शैलीत केलेले वर्णन भारीच.

आता नवीन देशाच्या माहितीला कधी सुरुवात करतो आहेस ?

आणी हो "एक प्रकारचा विश्वास,दिलासा मिळाला मला इथे.स्वतःला आजमावलं मी इथेच...आणी इथे" हे वाक्य हृदयात घुसुन आरपार गेले.

चायनामन
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला.
आमचे राज्य

संदीप चित्रे's picture

29 Jul 2009 - 7:34 pm | संदीप चित्रे

आता 'युक्रेन'बद्दल वाचायला आवडेल.

मस्त कलंदर's picture

29 Jul 2009 - 8:31 pm | मस्त कलंदर

आता 'युक्रेन'बद्दल वाचायला आवडेल.
खरंच येऊदेत तिथलेही अनुभव.... मॅक्झिम गॉर्कींच्या "आई" मध्ये युक्रेनबद्दल वाचलं होतं....
युक्रेनियन भाषेत आईला "नेनको" म्हणतात या पलीकडं आता त्यातलं काहीच आठवत नाही....

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

धमाल मुलगा's picture

29 Jul 2009 - 8:48 pm | धमाल मुलगा

भारी लिहिलंयस चिनी लोकांच्या अनुभवाबद्दल :)

आता वाट पाहतो....
अन्या बैल चाल्ला युक्रेनला अर्थात : राम राम युक्रेन!! -१ :)

प्राजु's picture

29 Jul 2009 - 9:02 pm | प्राजु

लिहित रहा इतकेच म्हणेन.
नमस्ते युक्रेन च्या प्रतिक्षेत. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

चेर्नोबील जवळच आहे तिथून . केवळ ६० कि.मी. त्यामुळे रस्त्यावर मिळणार्या भाज्या अगदी मेनका जरी विकयला असली तरी विश्वामित्र होवून खाउ नयेत.

अनिल हटेला's picture

30 Jul 2009 - 6:05 am | अनिल हटेला

प्र का आ..
बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)

अनिल हटेला's picture

30 Jul 2009 - 6:04 am | अनिल हटेला

स्पासीबा द्रुग्स.........(धन्यवाद मित्रहो ) :-)

किएव मध्ये असालात तर भाज्या वगैरे जपून खा
--->नाही मी ओडेसा मध्ये आहे.....

चेर्नोबील जवळच आहे तिथून . केवळ ६० कि.मी. त्यामुळे रस्त्यावर मिळणार्या भाज्या अगदी उर्वशी जरी विकयल असली तरी विश्वामित्र होवून खाउ नयेत.
--->काळजी करु नका...
त्याबाबतीत आम्ही द्रवीड आहोत....(डीफेन्सर)

:-)
बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)

हवालदार's picture

30 Jul 2009 - 3:26 pm | हवालदार

--->नाही मी ओडेसा मध्ये आहे.....

अरे वा ओडेसा आणि जीवघेणा ऊन्हाळा म्हणजे मजाच मजा . तुमचे म्हणजे जीवचे युक्रेन चालू आहे तर. मजा करून घ्या :-)

हवालदार's picture

30 Jul 2009 - 3:27 pm | हवालदार

--->नाही मी ओडेसा मध्ये आहे.....

अरे वा ओडेसा आणि जीवघेणा ऊन्हाळा म्हणजे मजाच मजा . तुमचे म्हणजे जीवचे युक्रेन चालू आहे तर. मजा करून घ्या :-)

पाषाणभेद's picture

30 Jul 2009 - 7:14 am | पाषाणभेद

पह्यला फोटो गाडीतून काढला काय?

वा वा. छान छान. असेच लिहीत रहा.

- पाषाणभेद

बिपिन कार्यकर्ते's picture

30 Jul 2009 - 3:32 pm | बिपिन कार्यकर्ते

अन्या, लेका किती दिवसांनी लिहिलंयस? आणि एकदम शेवटच!!! छान लिहिलंयस. चीन बद्दल बरेच कळले. आता युक्रेन येउंद्या, नाही तर आम्ही आहोतच ओरडायला.... अन्याच्या बैलालाऽऽऽ...... ;)

आणि चीनमधे तिबेट हा अतिशय संवेदनशील विषय आहे ना रे? मग इतकं उघडपणे बोलणं म्हणजे रिस्कच रे...

बिपिन कार्यकर्ते

अनिल हटेला's picture

30 Jul 2009 - 7:58 pm | अनिल हटेला

अरे वा ओडेसा आणि जीवघेणा ऊन्हाळा म्हणजे मजाच मजा . तुमचे म्हणजे जीवचे युक्रेन चालू आहे तर. मजा करून घ्या
--> चालायचं मालक...नवीण आहे अजुन...मजा करायला भरपूर वेळ आहे ...

पह्यला फोटो गाडीतून काढला काय?

--->डोक्यात बडवाईजर होतीसं आठवतये,बाकी ब्लँक....नाय सांगता येणार...

वा वा. छान छान. असेच लिहीत रहा.

-->स्वाक्षरी बदला की राव..इनंती हाये..:-)

आणि चीनमधे तिबेट हा अतिशय संवेदनशील विषय आहे ना रे? मग इतकं उघडपणे बोलणं म्हणजे रिस्कच रे...
--->हो तीबेट विषय संवेदानशील आहेच..पण इतकही घाबरून कसं चालेल..
वाघ म्हटलं तरी खातो.वाघोबा म्हटलं तरी..
लाख मोलाची गोष्ट वादात आम्ही दोघं आणी एक फॅक्टरीची स्टाफ लेडी होती,जी आमच्यात अडल्यास दुभाषाचं काम सुद्धा करत होती. बाकी कुणीच नव्हतं ऐकायला.. ;-) आणी मी ईम्पोर्टर होतो,माझ्याशी कोण पंगा करणार ... :-)

टुकुलभाउ,सुर्यराव्,पुणेरी,तात्या,स्वतीताई,सहजराव्,यशोताई,पर्‍या,संदीपदा,मस्त कलंदर्,धम्या,प्राजुताई,हवालदार,दगडू आणी बीप्सदा...
धन्यवाद........पून्यांदा....:-D

बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)

टारझन's picture

30 Jul 2009 - 9:45 pm | टारझन

झकास !! दोस्ता जियो ... तुझे लेख वाचताना मज्जा येते ..
कधी तरी द्राक्षासवाच्या अंमलाखालीही लिहीत जा :)

मदनबाण's picture

30 Jul 2009 - 10:23 pm | मदनबाण

अन्या,तुझे अनुभव वाचायला फार मजा येते. :)
तू लिहलेली २री घटना फार आवडली.

(फक्त ग्रीन लेबल चहा पिणारा);)
मदनबाण.....

Try And Fail, But Don't Fail To Try
Stephen Kaggwa

अभिज्ञ's picture

30 Jul 2009 - 10:45 pm | अभिज्ञ

तीनहि भाग आवडले रे.
अन्याबा,और भी आने दो.
"चाफेकर चौक टु चायना" हे शीर्षक पण चालले असते.
;)

अभिज्ञ.

--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

आकाशी नीळा's picture

1 Aug 2009 - 5:52 am | आकाशी नीळा

सुंदर प्रकटन झालये...नीन्ही भाग एकदम वाचले...
आणी तुमची लिहण्याची स्टाइल जाम आवदली.
थोडंसं उरकल्यासारखे वाटतये.अजुण थोडा सविस्तर वाचायला आवडेल..

दशानन's picture

1 Aug 2009 - 10:43 am | दशानन

मस्त लिहले आहेस रे बैला.. ;)

I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today

ह्यासाठी तुला +१ व मला पण :D

+++++++++++++++++++++++++++++

भोचक's picture

1 Aug 2009 - 6:02 pm | भोचक

अनिलदा मजा आला. तिन्ही भाग वाचून. आता युक्रेनविषयी वाचायला उत्सुक आहे. बाकी ओडेसा फाईल नावाची फ्रेडरिक फोरसिथची नोव्हेल आहे. त्याचा ओडेसाशी काही संबंध आहे काय? नाझी अत्याचारावरच आहे ती. अधिक काही आठवत नाही.

(भोचक)
आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो...
http://bhochak.mywebdunia.com/