९ मार्च ,२००८..
सकाळपासुनच लगबग होती घरात.आस्मादीक नेहेमीप्रमाणे शांत आणी स्थिर होते.कपडे पॅक करण्यापासुन ते काय -काय लागेल ,काय-काय हवं नको ते आई आणी ताईच बघत होते.आणी आम्ही आरामात रीलायन्सच्या डब्यावरुन सर्व मित्राना उद्या जाणारे बरं का सांगत होतो.वैतागुन आईने कर लो दुनिया मुट्ठीमे ला ड्रॉवर मध्ये कोंबला आणी 'एकदा बघ अजुन काय हव असेल तर सांग' असा आदेश दिला.आता गत्यंतर नव्हतं.पाह्यलं तर बाप रे! दुनियाभरच्या वस्तु त्या ट्रॉली मध्ये अक्षरशः कोंबलेल्या.
"अगं आई काय हे इतके कपडे नकोयत.आणी हे काय ब्लँकेट शॉल.असलं काही नकोरे !"
"तु गप्प रे थंडी असते तीकडे खुप !'
तुला कसं काय महिती, असं विचारायची हिंमत होत नाही म्हणा आमची.२० किलो फक्त लगेज मध्ये अलाउड होतं.बॅगेचं वजन केलं साधारण २५ किलो आलेलं.मग त्यातुन खाण्याच सामान्,थोडे कपडे ब-याच वस्तु कमी करुन २० किलो केलं आणी कुलुप लावलं.
तर आजचा दिवस होता आम्ही परदेशी निघालेलो.रीतसर पासपोर्टावर चायनाचा व्हीसा लागलेला आणी १० मार्च ला ४.१५ ला आम्ही हवाईयात्रा करणार होतो.आधी ४.१५ म्हणजे दुपारचे असावेत असा समज झालेला आणी त्यानुसार सर्व मित्राना कळवुन टाकले होते (समस हो रीलायन्सची ५० रुपयात ५००० समस ची इस्कीम).नंतर एजंटाकरवी कळालं की सोन्या, ४.१५ म्हणजे पहाटेचे.आणी मग डोक्यात प्रकाश पडला.
तर मंडळी आयुष्यात फार-फार तर १०-१५ दिवस पुण्यातुन बाहेर,आई-बापा पासून दुर राहीलेलो,आणी आज तर डायरेक्ट साता-समुद्रापार (असं म्हणायचं असतं वास्तवीक भारत आणी चीन दरम्यान फक्त हिमालय पर्वतच आहे,समुद्र-बिमुद्र काहीही नाही.) पण अजिबात मनात चल-बिचल नाही,किंतु-परंतु नाही.मला जायचये वर्षभर का होइना पण सर्वापासून दुर रहायचये,असं पक्क मनी ठासलेलं.छोट्या-छोट्या गोष्टीसाठी आईवर परावलंबी असलेला आपला शहाणा बाळ कसा काय एकटा राहील ह्याची माझ्या माउलीला कोण काळजी.नाय-नाय म्हणता आज तरी तुला रागावणार नाही हे व्रत तोडलं तीने.वैतागच तसा दिलेला.सकाळपासुन फक्त अंघोळ केली.आणी हाफ बर्म्युडावर लोळत पडलेलो.कसलं सख-दुख नाही,काय नाही.मग मात्र आई आणी ताईने मस्त पैकी राशन घेतलं.त्यानंतर सलून गाठलं.नेहेमीचा कारागीर.म्हटलं बाबारे माणुस बनव.
"काय शेठ आज कुठें मुलगी बघायला की काय?" म्हटलं "आरे बाहेर चाललोये चीनला!"म्हणे "कुणी भेटलं नाय का सकाळपासुन ?" आणी खी-खी करुन हसायला लागलेलं.
च्या मायला! काय जोक सांगतोये की काय मी? असा राग अलेला,पण नेमका वस्तरा आणी माझी मान दोन्ही त्याच्या हातात्,मग गप्प बसलो.तासाभराने डोक्यावरच आणी चेहेर्यावरचं अर्धा-एक किलो वजन कमी करून झाल्यावर परतलो.
एक -एक करत मावशी ,मावस बहिणी,मामा ,मामी आणी बरीचशी मंडळी घरी जमू लागली.मग आणी सतराशे साठ सुचना प्रत्येक जण देउ लागलं.तीकडे असं असतं,तमुक असतं,असं कर,तसं करु नको.बरं एकच सुचना प्रत्येकानी द्यायलाच पायजे का.दीड -दोन तास फुल पीडलं.मी सुधा आज्ञाधाअरक बालकाप्रमाणे सारं अगदी मन लावुन ऐकत होतो.माझ थोबाड बघुन मावशीच्या मुली अजुन चिडवत होत्या.
संध्याकाळ झाली.बापूस आला.शेजारी बसला.एका शब्दानी आमचा संवाद नाय झाला.(आमच्या दोघाची राशी कधीच जुळली नाय्..बाप आणी पोराचा सुसंवाद कधी झालाच नाही.)
"जेउन घ्या " ताई.
"दीदी अगं अजिबात भूक नाहीये.शिवाय रात्रभर जागरण होइन मी नाय जेवत"
"दोन घास खा बेटा"-बापूस.
बर्याच दिवसानी बापाचा शब्द ऐकला.बसलो शेजारी.पूरी-श्रीखंड वगैरे.
मामेभाउ टपकला."अनिल पण जायचये कसं ?"
आणी आता आठवलं सकाळपासुन आपण कसं जाणारे ह्याचा विचारच नाय केलेला.मित्राला फोन लावला.
"मन्या, गाडी पाहीजे आज.मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ."
"आरे दोन्ही गाड्या बूक आहेत,दुस-याची चालेल का?"
"झक मार! काय पण कर! अर्जंट आहे,समजलं!"
"जॉर्ज बुशला रीसीव्ह करायला निघालास की काय?"
"आबे मीच चाललोये चीनला! "
"थोबाड पाह्य्लं का आरशात!ह्या ह्या ह्या !
असा राग आलेला,पण म्हटलं बरये कुणीच विश्वास नाय ठेवत ते.उद्या जेव्हा खरच मी गेलोये हे कळेन ना,तेव्हा सुधरतील साले.
"एक काम कर १५ मिनीटात फोन कर सुमो अरेंज करतो!"-मन्या.
देवपूजा कर्,सर्वाच्या पाया पड ,वगैरे सोपस्कार करता-करता ९.०० झालेले.
थोड्या वे़ळात सुमो पण पोचली.पून्हा सर्वाना येतो हं वगैरे केलं.बापूस एकटाच घरात बसलेला.म्हटलं काय झालं,तुम्ही नाय येत काय?२८ बर्षात पहिल्यांदा बापाला रडताना पाह्यलं,अगदी माझ्या गळ्यात पडून! "अहो पपा, मी काय नांदायला नाय चाललेलो,दोन एक वर्षात परतीन आणी एवढं काय टेंशन घेताये!वगैरे समजावलं.
मी-मी करत सारी फॅमीली मला सोडायला निघालेली.
"ज्याला जायचये ,तो आहे ना गाडीत!"-इती ड्रायव्हर.
"आहे आहे मी आहे !"
"बोला !पूंडलीक वरदे हरी विट्ठल!
श्री ज्ञानदेव ,तुकाराम "
च्या गजरात गाडी निघाली.एक्सप्रेस-वे साठी.अजुनही मी अगदीच शांत होतो.
१२.३० च्या सुमारास विमानतळावर पोचलो.ट्रॉली आणी हॅण्ड-कॅरी घेउन मेनडोर पाशी आलो.अर्थात सारे सोबत होतेच.पण हे तर EXIT आहे.आत कुठुन जायचं,इथुन सुरुवात.
सापडली एकदाची एन्ट्री गेट.दुसर्या मजल्यावर पोचलो आणी आता इथुन आत मला एकट्याला जायचं होतं.सर्वाना शेवटाचा नमस्कार केला.आणी एकदाही मागे वळून न पाहता आत प्रवेशलो.
काय गंमत असते नाही.दरवाज्याच्या पलीकडे सारे माझे आप्त,नातेवाईक्,माझी लोकं आहेत.आणी दरवाज्याच्या इकडे मी एकटाच आहे,एका वेगळ्या विश्वात.इथही खुप लोकं आहेत्,पण माझ्यासाठी फक्त लोकं आहेत.कुणीच आपलं नाही.
स्कॅन मशीनीत माझी बॅग आणी ट्रॉली टाकली.तीथुन पूढे कॅथे पॅसीफीकचा काउंटर शोधत गेलो.रात्री दीड च्या सुमारास प्रसन्न ,हसर्या चेहेर्याने काउंटरवर माझं स्वागत केलं गेलं.काही क्षणासाठी का होइना पण आपण फारच कुणीतरी ग्रेट आहोत असं वाटलं.बोर्डींग पास घेउन इमीग्रेशन नावाच्या परीक्षेसाठी सज्ज झालो.फॉर्म घेतला,नेमका कसा भरायचा,हे बघायला पाहीजे.इकडे तीकडे पाह्यलं.तर दोन जण माझ्या शेजारी, मी कसा भरतोये ते बघायला थांबलेली.शेवटी मीच माझाही भरला आणी त्या दोघानाही मदत केली.आता स्वारी इमीग्रेशनच्या लायनीत आली.
माझा नंबर आला.
"कुठे निघाले हुले साहेब?"
"गाँझौ चायना!!" -मी.
"अवघड आहे तुमचं जाणं?"
"का हो साहेब?"-मी.
"धावपट्तीचं काम चालू आहे.तुमची कॅथेची भलीमोठी विमान छोट्या धावपट्टी वरुन उडतील की नाही शंका आहे,म्हणुन म्हटलं!!"
माझा जीव भांड्यात पडला.....
पासपोर्टावर शिक्का मारल्यावर आस्मादीक आत प्रवेशले.
सगळ वातावरण वेगळं-वेगळच भासत होतं.कुठी विमानतळाची डागडुजी चाललेली तर कुठे काय.आतमध्ये सुद्धा मला घाम येत होता.बोर्डींग गेटपाशी अलो.तासभार लागेल तुमच्या बोर्डींगसाठी असं समजलं.आता करायचं काय.अंबानी सोबतच होता.भावजीला फोन करुन मी आत पोचलोये तुम्ही निघा म्हणुन सांगीतलं. पून्हा सर्वाशी बोलणं झालं.काय कर आणी काय करु नको ची परत एकदा उजळणी झाली.आत जीतु भेटला,जो माझ्या सोबत येणार होता.
नमस्कार-चमत्कार करत एका ठीकाणी बसलो.त्याची सुद्धा पहीलीच वेळ होती.इकडच्या तीकडच्या गप्पा मारत-मारत ४५ रु.ची एक कॉफी पीण्यातला आनंद (?) घेत होतो.काही फॉरीनर्स उगाच इकडुन तीकडे भटकत होते.अनोळखी लोकही हसुन हाय हॅलो करत होती.
सगळ्यात असुन देखील एकटा आहे की काय असं वाटत होतं.
अनाउन्समेंट झाली.बोर्डींग नावाचा तो फार्स देखील पार पडला.आणी आता १० मिनिटात उंच आभाळाला गवसणी घालणार होतो. कॅथेच्या हवाई सुंदरीने पास घेत आत सोडलं,हवाई सुंदर्याना हवाई सुंदरी का म्हणतात,ते आज मला समजत होतं.त्या अंधार्या गुहेतुन डायरेक्ट आत विमानात प्रवेशलो.माझ्या आणी जीतुच्या सीट्स मध्ये बरच अंतर होतं (बधीर १२.०० लाच येउन बसलेला) आत सीटवर येउन बसलो.शेजारी अजुन दोघे होते.
काही म्हणा मी मात्र थोडासा भारावलेलाच होतो.आयुष्यात कधी विचारही नव्हता केलेला की आपण चीन नावाच्या देशी जाउ.
लगेच 'कर लो दुनिया मुट्ठी मे 'तुन सर्व मित्राना अखेरचा समस केला "गुड बाय!फ्लायींग फॉर चायना !!"
मोबाईल वगैरे स्वीच ऑफ करा ची अनाउन्समेंट झाली. आणी निर्धारीत वेळेपेक्षा २० मिनीट उशीराने का होइना विमानाने सुक्ष्मगतीने चालायला सुरुवात केली.अंधारात काही दिसत नव्हतं,धावपट्टीच्या लाइट्स दिसु लागल्या.इकडे कप्तानाने आता विमान टेकऑफ करणार आहे ची अनाउन्समेंट दिली.आणी इंजीनाचा आवाज वाढला.काही समजण्या आधी अतिशय वेग घेत थोडावेळ धावपट्टीवर असलेलं विमान आकाशात भरारी घेउ लागलं.पहील्यांदाच सारं अनुभवत असल्याने थोडासा भांबावलोच म्हणा.शेजारचे दोन नमुने तर अगदी जीव मुठीत धरुन बसल्या सारखे भासले.त्यांच्या कडे बघत स्मित हास्य केलं तर.दोघानाही बरं वाटलं.आता आकाशातुन दिसणारं मुंबई शहर दुर दुर जाणारे दिवे दिसत होते.थोड्या वेळाने फक्त धुरकट अंधार दिसु लागला.क्षितीजावर सुर्यदेव जगावर राज्य गाजवायला सात घोड्या च्या रथावर स्वार होउन येतोयेतसं वाटत होतं.थोडावेळ अवकाशातुन त्याचा दिसणारा लालसर तांबुस रंग डोळे भरुन पाहुन घेतला.आत सारी मंडळी मस्त पेंगु लागलेली.मी सुद्धा मान टाकली.आणी डोळा लागला.
जाग आली तेव्हा सारी मंडळी नाश्ता करण्यात मग्न.
च्यामारी मला विसरलेले दिसताहेत.
जाउदे ! इतक्या सकाळी चरण्या पेक्षा थोडावेळ अजुन डुलकी मारणे मला जास्त योग्य वाटले.
कप्तानाने दिलेली सुचना ऐकुन जाग आली.विमान लँड होत होते,समोर स्क्रीनवर विमानाची सध्याची स्थिती वगैरे दाखवत होते.पहीला बँकॉक मध्ये स्टॉप घेउन नंतर हाँगकाँग साठी टेकऑफ होनार होतं.आणी तीथुन कनेक्टेड फ्लाईट ने गाँझौ चायना ला जायचं होत.विमान लँड होताच मी उठलो आणी जीतु शी गप्पा मारत बसलो.बरीचशी मंडळी बँकॉक ला उतरली आणी हाउसकिपींग वाले येउन त्यांची कामे करु लागले.
मला मस्त चहाची तल्लफ झालेली.
एअर होस्ट (जेंट्स बरं का) शोधला आणी 'अ कप ऑफ टी!' सांगीतलं.
(आपलं हींग्लीष मंजे लै भारी! :D)
त्या शहाण्याने ब्लॅक टी दिली .
फॉरीन कंट्रीज मध्ये ब्लॅक टी जास्त चालत असावा असा समज करुन आम्ही घेतला आणी लक्ष्यात आलं शाण्यानी साखर घातलीच नाही.इतक्यात बँकॉक वरुन येणारे प्रवासी यायला सुरुवात झालेली.गप्प डोळे बंद करुन ढोसला तो कडवट चहा!!
म्हटलं बेट्या पहीला कडवट अनुभव आहे,विसरु नकोस.
पून्हा एकदा विमानाने आकाशात भरारी घेतली आणी तासाभरात हाँगकाँग ला पोचवले.
आता कनेक्टेड फ्लाईट शोधणे आले.पून्हा सगळ्या फॉर्मॅलीटीज पूर्ण करुन आत पोचलो २ तास सारं होंगकाँग एअर्पोर्ट पायी फिरण्यात काय मज्जा असते ते अनुभवले.
दिसली कोणी सुंदरी( हवाई सुंदरी) की तीला विचारणे की आमची फ्लाईट कुठुल्या गेटवर आहे.पण अजुन डीक्लेयर च नव्हती केलेली.एका शॉप मध्ये पून्हा एकदा चहा पीण्यासाठी ४० HK डॉलर खर्च केले.
आणी घोडं गंगेत न्हालं.
एकदाची फ्लाईट डिक्लेयर झाली.आम्ही आसन ग्रहण केलं.दीड तासाने चायनाच्या गाँझौ नामक शहरात आमच आगमण झालं.
(क्रमशः) :-D
प्रतिक्रिया
10 Apr 2009 - 3:40 pm | अवलिया
आणी घोडं गंगेत न्हालं.
+१
पुढचा भाग चटकन येवु दे !!
--अवलिया
10 Apr 2009 - 11:10 pm | टारझन
झकाआआआस ... आण्या बैला .... मेल्या .. मला माझ्या परदेशवारीची आठवण झाली रे ... शेम टू शेम हियर .. :)
फक्त आपण कडवट च्या णाय पेलो .. आपण डाएट कोक सांगतो ... काय ?
पुढचा भाग पटकन टाक .. पुण्हा मुंबै ला गेलो की आठवडा भर वाचाय नाय मिळत मग
10 Apr 2009 - 3:51 pm | परिकथेतील राजकुमार
अन्या भाउ एकदम जबरदस्त सुरुवात :)
शेवटी एकदाचे तुम्ही लिहायचे मनावर घेतलेत हे बघुन बरे वाटले. आता आळस न करता पटापटा पुढचे भाग येउ द्या.
अवांतर :- आजुबाजुला हवाईसुंदर्या असताना अन्या भाउला झोप लागली, 'ये बात कुच हजम नही हुई.'
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
10 Apr 2009 - 3:53 pm | दशानन
हेच म्हणतो !
जबरदस्त सुरवात !
11 Apr 2009 - 3:45 am | विनायक प्रभू
येय्च्च्च्च बोल्ताय.
11 Apr 2009 - 7:32 am | घाशीराम कोतवाल १.२
अन्याभौ इज ब्याक इन ऍक्शन!!!
लगे रहो अन्याबाप्पू
आता पुढचे भाग येउ दे पटापट बर लय येळ नग लावुस
**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
11 Apr 2009 - 11:22 am | दवबिन्दु
कथे पाशिफिकच्या हवाय सुंद्र्या खरोखरच्या सुंद्र्या असतात आपल्या एयर इंड्या वाल्या काकुबाय नसतात.
10 Apr 2009 - 4:07 pm | भडकमकर मास्तर
छान सुर्वात..
"ज्याला जायचये ,तो आहे ना गाडीत!"-इती ड्रायव्हर
खिखिखि :)
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
10 Apr 2009 - 4:09 pm | निखिल देशपांडे
मस्त सुरवात झालीये रे.... पुढचा भाग लवकर येवु दे
==निखिल
आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर
10 Apr 2009 - 4:18 pm | धमाल मुलगा
भारी लिहिलंयस :)
बापूस शब्द लै लै दिवसांनी वापरलेला पाहिला यार!
=)) =))
लय भारी!
अन्याभौ इज ब्याक इन ऍक्शन!!!
लगे रहो अन्याबाप्पू
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
10 Apr 2009 - 10:28 pm | chipatakhdumdum
ड्रायव्हर पुण्याचा हाये ना भाउ......
10 Apr 2009 - 8:45 pm | मराठमोळा
पुढचा भाग येऊ द्या लवकर (पण तिकडच्या जेवणाबद्दल काही लिहु नका हो.. ;) )
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
10 Apr 2009 - 9:41 pm | पिवळा डांबिस
अन्याभाव,
नी हाव!!
:)
मस्त सुरुवात आहे, अजून येऊद्या!!!
10 Apr 2009 - 10:05 pm | मीनल
हा रूट कॅथे एअरवेज चा आहे.बरोबर?
एकूण ८-९ तास विमान प्रवास + वेटींग पिरेड.
बर आहे तस.पण सलग झोप होत नाही.
तूला एक जाणवल असेल की ईंडिया टू हाँगकाँग हे विमान इन्फिरिअर होते आणि पुढील तुलनेत आरामदायी.
हाँगकाँग सारख दुसर बिमानतळ नाही. ह्युज आहे. शिवाय सर्व बजून निळा समुद्र. त्यातल्या त्या पांढ-या बोटी.क्लास दृश्य दिसते.
अजून लिही. खूप आठवणी येताहेत.
मीनल.
11 Apr 2009 - 3:44 am | मदनबाण
काय गंमत असते नाही.दरवाज्याच्या पलीकडे सारे माझे आप्त,नातेवाईक्,माझी लोकं आहेत.आणी दरवाज्याच्या इकडे मी एकटाच आहे,एका वेगळ्या विश्वात.इथही खुप लोकं आहेत्,पण माझ्यासाठी फक्त लोकं आहेत.कुणीच आपलं नाही.
परफेक्ट असचं वाटत... :)
अन्या लिव बाबा लवकर लवकर.
मदनबाण.....
I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.
11 Apr 2009 - 5:48 am | रेवती
दीड तासाने चायनाच्या गाँझौ नामक शहरात आमच आगमण झालं.
मग पुढे .....?
(ते क्रमश: मेलं वाईट्ट आहे.)
रेवती
12 Apr 2009 - 7:38 pm | प्राजु
पुढे काय झालं??
(आवांतर : या राजेंनी सगळ्यांना क्रमशः चा संसर्गजन्य रोग दिला आहे..)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
11 Apr 2009 - 7:37 am | रामदास
क्रमशाची लागण वाईट.
11 Apr 2009 - 12:54 pm | दशानन
सहमत.
क्रमशः सारखे सारखे नको वाटते ;)
जरा लवकर लिही रे अन्या !
11 Apr 2009 - 10:26 am | अभिरत भिरभि-या
वाचतोय ..
पुढचं बिगी बिगी लिव्हा
11 Apr 2009 - 1:46 pm | पर्नल नेने मराठे
काय गंमत असते नाही.दरवाज्याच्या पलीकडे सारे माझे आप्त,नातेवाईक्,माझी लोकं आहेत.आणी दरवाज्याच्या इकडे मी एकटाच आहे,एका वेगळ्या विश्वात.इथही खुप लोकं आहेत्,पण माझ्यासाठी फक्त लोकं आहेत.कुणीच आपलं नाही.
मी हि अनुभवलय हे............:)
चुचु
11 Apr 2009 - 2:19 pm | टारझन
जरा त्याची डझन भर चित्र चिटकवा ना कर्नल ... =))
11 Apr 2009 - 3:03 pm | पर्नल नेने मराठे
तारझन आय आम सिरिअस..:|
चुचु
11 Apr 2009 - 2:16 pm | सर्वसाक्षी
वर्षभराच्या समग्र हकिकती येउद्यात हो!
मे महिन्यात भेटु की, कुठे नि कसे ते ठरवु. (नाहीतर थेट बाईयुन विमानतळावरच ये, येताना मस्त मामि बांधुन आणतो तुझ्यासाठी)
11 Apr 2009 - 3:40 pm | घासू
काय भाऊ, कसं चाललयं चीनला?
आमची ही फॉरेनची पहिली वेळ नाही, पण चीन मात्र प्रथमच. मी आधीच दुबईला असल्यामुळे पॅकींगसाठी मदत करायला सुद्धा कोणीही नाही.
मी सुद्धा "कॅन्टॉन फेअर"च्या निमीत्ताने १५ दिवसांसाठी तिकडे येणार आहे १३ एप्रिलला, तर तुमचा काही अनुभव असेल तर सांगा जेणेकरून आम्हीही आधीच तयारी करु.
बाकी तुमचा अनुभव छान आहे. मीही असाच भेदरलो होतो पहिल्यांनदा.
घासू
11 Apr 2009 - 4:33 pm | बिपिन कार्यकर्ते
भारी हो, मिष्टर हुले!!! पुढचे भाग लवकर टाका.
मला वाटलं की, त्या इमिग्रेशनवाल्याने तुला धरून हाणला की काय त्या नंतर, अपशब्द वापरल्याबद्दल... ;)
बिपिन कार्यकर्ते
12 Apr 2009 - 2:14 pm | अनिल हटेला
>>>आजुबाजुला हवाईसुंदर्या असताना अन्या भाउला झोप लागली, 'ये बात कुच हजम नही हुई.'
--> गलतीसे गलती हो जाता है भाई !! ;-)
>>>ड्रायव्हर पुण्याचा हाये ना भाउ......
--> चालायचंच !!
>>>(पण तिकडच्या जेवणाबद्दल काही लिहु नका हो.. )
--> जशी आज्ञा सायबा !! :-D
>>>हाँगकाँग सारख दुसर बिमानतळ नाही. ह्युज आहे
--> सहमत !!
>>>शिवाय सर्व बजून निळा समुद्र. त्यातल्या त्या पांढ-या बोटी.क्लास दृश्य दिसते.
--> खरच एकदम सुंदर दॄष्य ,मला तर खुप आवडलेलं विमानतळ.दोन तास नुसता भटकत होतो इकडुन तीकडे आणी तीकडुन इकडे!! :-)
>>>(ते क्रमश: मेलं वाईट्ट आहे.)
>>>क्रमशाची लागण वाईट.
>>>क्रमशः सारखे सारखे नको वाटते
-->एकदम सहमत .पण सवय लावली कुणी? ;-)
>>>वर्षभराच्या समग्र हकिकती येउद्यात हो!
--> नक्कीच प्रयत्न करीन. :-)
>>>काय भाऊ, कसं चाललयं चीनला?
--> फुलटू मौजा ही मौजा !!! :-D
>>>मला वाटलं की, त्या इमिग्रेशनवाल्याने तुला धरून हाणला की काय त्या नंतर, अपशब्द वापरल्याबद्दल...
-->=)) =)) बिपीनदा ,तुम्ही धन्य आहात राव !!
पूढचा भाग लिहतोचये,पण टंकायचा जाम वैताग आलाये.लवकरात लवकर टाकतो !!
पून्हा एकदा दोस्तहो धन्यवाद !! :-)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
14 Apr 2009 - 6:19 am | केदार_जपान
मस्त लेख आहे अनिल भाउ....कॅथे पॅसेफिक चा अनुभव कसा होता?
मी करणार आहे प्रवास कॅथेने या मंथ एंड ला....
कसे आहे मग चायना ?.. लवकर येउदे पुढचा लेख...
-------------
केदार जोशी
12 Apr 2009 - 5:34 pm | स्वाती दिनेश
१ला भाग मस्त झाला आहे, पुढचा भाग टंकायचा कंटाळा करू नको रे ,लवकर लिव, वाट बघताहेत सगळे.
स्वाती
12 Apr 2009 - 6:06 pm | अभिज्ञ
हेच म्हणतो.
पुढचा भाग लवकर येउ द्यात.
अभिज्ञ.
12 Apr 2009 - 7:12 pm | सुधीर कांदळकर
झकास. मजा आली.
सुधीर कांदळकर.
14 Apr 2009 - 6:46 am | चतुरंग
लईच्च्च छान लिवलं आहेस.
पुढचा भाग लगेच टाकला नाहीस तर बेडकाचे सूप पिण्याची शिक्षा दिली जाईल! ;)
चतुरंग
15 Apr 2009 - 6:51 pm | शितल
मस्त लिहिले आहे..
मला ही टार्या ने पहिला त्याचे प्रवास वर्णन केले होते त्याची आठवण आली. :)
16 Apr 2009 - 6:27 am | संदीप चित्रे
ड्रायवर भौ पुण्याचेच असले पाहिजेत.
च्यायला अनिल पण गंमतच असते हे चायना ट्रीप म्हणजे... आपले लोक पैलेछूट विश्वास ठेवतच नाहीत की माणूस कामानिमित्त चायनालाही जातो :)
बर्याच वर्षांपूर्वी मी छोट्या दौर्यावर तियानजिनला गेलो होतो तेव्हा मित्र विश्वास ठेवायला तयार नव्हते.