मिसळपाव हे सतत बदलत जाणारं संकेतस्थळ आहे. नव्याने आवश्यकता भासलेल्या सोई येथे जोडल्या जात असतात. नवीन सोईंची घोषणा, ओळख करून देण्यासाठी हा धागा दुसर्या भागात सुरू करीत आहोत. या आधीचा धागा येथे आहे.
सदस्यांना काही अडचणी असतील तर त्या येथे मांडू शकतात.
प्रतिक्रिया
11 Jul 2009 - 11:36 am | सरपंच
मिसळपाव वर कविता प्रकाशित करतांना आता तुमची कवीता ज्या काव्यरसाची आहे तो निवडण्याची सोय करून देण्यात आलेली आहे.
काव्यरस निवड आवश्यक केलेली नाही. तुम्ही ही निवड न करता सुध्दा कविता प्रकाशित करू शकता.
या विषयी काही सूचना असतील तर स्वागतच आहे.
11 Jul 2009 - 11:42 am | परिकथेतील राजकुमार
सरपंच साहेब धाग्याच्या खाली 'स्वगृह | चर्चा | काव्य | साहित्य | छंदशास्त्र | पाककृती | कलादालन | कौल | संपादकीय | प्रवेश | वाविप्र' हे सर्व आणल्याबद्दल सर्वात आधी धन्यवाद.
आता फक्त तेव्हडा टेक्स्ट बॉक्स मोठा करुन द्याहो प्लिज प्लिज प्लिज.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला.
आमचे राज्य
11 Jul 2009 - 6:13 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मला नाही दिसत आहे ही सोय!
हे मात्र जरूर करा हो सरपंच!
(हा प्रतिसादाही सहजरावांना सादर समर्पण)
11 Jul 2009 - 11:45 am | Nile
पान १, २ ची लिंक पानाच्या वर व खाली अशी दिलीत तर बरीच सोय होईल. धन्यवाद.
11 Jul 2009 - 11:52 am | अवलिया
एका पानावर जास्तीत जास्त ५० च्या ऐवजी १०० प्रतिक्रिया असा बदल केला तर बरे होईल... १००च्या वर प्रतिक्रिया जाणारे धागे कमी असतात. ५० च्यावर प्रतिक्रिया असणारे धागे बरेच असतात.
--अवलिया
दुनिया चाहे कुछ भी बोले बोले
दुनिया चाहे कुछ भी बोले
हम कुछ नहीं बोलेगा
हम बोलेगा तो ...
हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है
11 Jul 2009 - 7:01 pm | बिपिन कार्यकर्ते
वर्जिनल टेक्स्टबॉक्स आणि एका पानावर १०० प्रतिसाद. लवकरात लवकर, प्लीज!!!
बिपिन कार्यकर्ते
11 Jul 2009 - 7:17 pm | श्रावण मोडक
वर्जिनल टेक्स्टबॉक्स आणि एका पानावर १०० प्रतिसाद. लवकरात लवकर, प्लीज!!!
?????? काहीच्या काहीच.
11 Jul 2009 - 9:10 pm | स्वप्नयोगी
प्रत्येक धाग्यानंतर धाग्याच्या वर आणि खाली पुढील आणि मागील धाग्यासाठी 'पुढील धागा'आणि 'मागील धागा' अशी लिंक दिलीत तर बरे होईल
म्हणजे आपल्या ई-मेल मध्ये 'Next' आणि 'Previous' अशी असते तशी
म्हणजे चालू धाग्यावरुन एकदम पुढील धाग्यावर जाता येइल. त्यासाठी पुन्हा 'नवीन लेखन' वर क्लिक करायची आवश्यकता पड्णार नाही.
पंखांना क्षितीज नसते,
त्यांना फक्त झेपेच्या कक्षेत मावणारे
आभाळ असते.
12 Jul 2009 - 9:06 am | विसोबा खेचर
अरे नीलकांता, पब्लिक काय म्हणतं ते बघ रे बाबा प्लीज..
तात्या.
12 Jul 2009 - 10:39 am | नीलकांत
त्यांच्या मतांसाठीच तर हा धागा. अर्थात ही मते निवडणूकीची नाहीत तरी येथे महत्वाचे आहे. :)
लवकरच शक्य तेवढ्या सोई देण्याचा प्रयत्न करतो.
- नीलकांत
12 Jul 2009 - 1:12 pm | श्रावण मोडक
सदस्याशी संबंधित खरडवही, पोष्ट वगैरे तपशील वर आणता येणार नाही का? लिहिण्याची भाषा हे खाली गेलं तरी चालेल की.
12 Jul 2009 - 1:20 pm | मदनबाण
मुख्य पानावर उजवीकडे खाली जिथे "अधिक" लिहले आहे त्यावर टिचकी मारल्यावर सरळ दुसरे पान दिसायला हवे,सध्या तिथे टिचकी मारल्यावर तेच पान दिसते.
मदनबाण.....
Success is never permanent, and failure is never final.
Mike Ditka
14 Jul 2009 - 2:38 pm | Nile
७० च्या वर लोक ऑनलाईन आलेकी गंडतय! काही करता येईल काय?
16 Jul 2009 - 3:39 pm | घाशीराम कोतवाल १.२
७० च्या वर लोक ऑनलाईन आलेकी गंडतय! काही करता येईल काय?
+१ नाईलशी सहमत
जर मिपा वर ७० पेक्षा जास्त सभासद लॉगईन झाले तर मिपा खुप हळु हळु चालत राव आणी तेव्हा हजर सभासद असतात जास्तीत जास्त ५०च्या वर पन कधी कधी मुख्य पानावर दिसतात १३० हजर सभासद आणी ५० पाहुणे
**************************************************************
नकार देण ही कला असेल पण
होकार देऊन काम न करण हिच खरी कला !!! ;)
27 Jul 2009 - 10:52 am | राधा१
खरड सुविधा कशी सुरु करायची?
तसेच काही लेखामध्ये प्रतिक्रिया देता येत नाही आहेत.
राधा
27 Jul 2009 - 3:28 pm | मधु मलुष्टे ज्य...
खरडवहीसुवीधा बंद आहे. चालु करुन मिळेल का?
--मधु मलुष्टे ज्यु.बी.ए.
5 Oct 2009 - 10:25 am | मधु मलुष्टे ज्य...
खरडवहीसुवीधा बंद आहे. :(
--मधु मलुष्टे ज्यु.बी.ए.
19 Nov 2009 - 11:11 am | मधु मलुष्टे ज्य...
तात्या माझी खरडवही चालु करा.. :(
--मधु मलुष्टे ज्यु.बी.ए.
20 Nov 2009 - 1:55 am | प्राजु
सध्या स्वगृह वर गेलं की, तिथला फॉन्ट साईज प्रचंड बटबटीत आणि ढोबळा दिसतो आहे.. अंगावर येतो आहे.
- प्राजक्ता
http://www.praaju.com/
20 Nov 2009 - 2:45 am | उमराणी सरकार
मालक, कोणाच्याच खरडवहीत खरडता येत नाहीये. बघा काय करता येईल का?
उमराणी सरकार