आजकाल फास्टनॉलेज चा जमाना तेजीत आहे. कुठलीही माहीती हवी असली तर गुगलवर लगेच त्यासंदर्भातील शब्द टाकून पाहीले जाते. कधीकधी ऐतिहासीक/सामाजीक/राष्ट्रीय माहीती शोधायला या शोधामधे बहुतांशी येणार्या विकीपिडीयाचा उपयोग होतो. तरी देखील कधीकधी याहून अधिक माहीती हवी असते.
अशी वेळ जशी काही कामानिमित्त संशोधन करताना येते तशीच ती मिपा अथवा इतरत्र काही चर्चा करताना योग्य संदर्भ करताना पण येते. अशा वेळेस नेहमीच्या गुगलच्या उपयोगापेक्षा अधिक काहीतरी हवे असते. जिथे ठाम संदर्भ मिळू शकतील. त्याला परत उत्तर तेच आहे - गुगल! फक्त नुसते गुगल नसून ते गुगलबुक्स म्हणून आहे. त्याचा दुवा आहे: http://books.google.com/
(परत) विकीवरील माहीती प्रमाणे सुरवातीस हार्वर्ड, मिशिगन, ऑक्सफर्डम स्टॅनफर्ड विद्यापिठे तसेच न्यूयॉर्क पब्लीक लायब्रररीशी करार करून गुगलने हा प्रकल्प चालू केला. त्यात ज्या पुस्तकांचे कॉपिराईट्स उरलेले नाहीत अथवा काही सरकारी प्रकाशने यांना स्कॅन करून पुर्ण उपलब्धता, ज्यांचे कॉपिराईट्स आहेत पण लेखकांशी करार झाला आहे त्यांची काही पाने दाखवण्याची सोय (पण कुठल्याही प्रकारे कॉपि करायची सोय नाही!) आणि ज्यांच्याशी करार झाला नाही ती नुसतीच स्कॅन करून, पण त्यातील अगदी एखादे वाक्य (स्नीपेट्स) दाखवणे इतकेच उपलब्ध करणे असे तीन प्रकार असतात. त्यात ती पुस्तके कुठे विकत मिळतील फे देखील बाजूस दाखवले जाते. बहुतांशी पुस्तके ही इंग्रजीतच आहेत. पण फ्रेंच विद्यापिठाबरोबर आता फ्रेंच पुस्तके पण स्कॅन करणे चालू आहे. आणि भारतातील भुर्जपत्रे पण स्कॅन केली जात आहेत. त्यांचे स्कॅनिंगचे तंत्रज्ञान अगदी गोपनीय ठेवले आहे.
जर एखादी माहीती, ही (जाला ऐवजी) पुस्तक या माध्यमात शोधायची असेल तर http://books.google.com/ या संकेतस्थळावर जाऊन नेहमी प्रमाणे शब्द देयचे लगेच मोठी जंत्री येईल. पण त्यात नुसते स्नीपेट्स दाखवणार्या पुस्तकांचा उपयोग होत नाही. म्हणून मग ड्रॉपडाऊन मेन्यू मधून "लिमिटेड प्रिव्ह्यू अँड फूल व्ह्यू" निवडायचे. मग त्यातील ज्या पानावर तो शब्द येत असेल त्यात माहीती मिळत जाते. फूल व्ह्यू ची पुस्तके तुम्ही पीडीएफ करून डाऊनलोड करून घेऊ शकता. अथवा फ्रेम वापरून तुमच्या ब्लॉगमधे पण वापरू शकता.
मधल्या काळात दादोजी कोंडदेवांवरून जोरदार चर्चा चालू असताना अशी पुस्तके आणि त्यातील संदर्भ मिळाले होते. तेच काल पेशव्यांच्या चर्चेत खर्याखोट्याची शहानिशा करताना सरकारी गॅझेट मिळून झाले. तेच शोधत असताना एक मराठी म्हणींचे एक पुस्तक एका गोर्या रेव्हरंडने १८९९ साली लिहीले होते, ते देखील मिळाले! खूप मजेशीर म्हणी त्यात मराठीत, इंग्रजीत (ट्रान्सलीटरेशन) आणी अर्थ अशा पद्धतीने दिल्या आहेत. खाली त्याची प्रतिमा दिली आहे.
त्या व्यतिरीक्त अजून काही गोष्टी तयार करू शकता: एक म्हणजे यातील कुठलाही भाग (मोफत पुस्तकांचा) हा विशिष्ठ पद्धतीने इतर संकेत स्थळावर चिकटवण्याची सोय केली आहे. एखादे पुस्तक आवडले/रोचक वाटले तर ते "अॅड टू माय लायब्ररी" ही कळ वापरून स्वत:च्या गुगल अकांऊटमधे साठवून ठेवता येते. मग ते कधीही बघता येते अथवा इतरांशी शेअर करता येते.
एकंदरीत ऐतिहासिक गोष्टींबद्दल माहीती करून घेयची असेल तर तसेच अधुनिक विज्ञानासंदर्भात पण येथे भरपूर पुस्तके मिळू शकतील. अशी पुस्तकातील विद्या वापरली तर उत्तम , नाहीतर "पुस्तकस्था तु या विद्या..." हे आहेच!
प्रतिक्रिया
11 Jul 2009 - 9:57 am | अवलिया
वा! मस्त माहिती!!
विकासराव, धन्यवाद.
( मी तुम्हाला ओळखत आहे म्हणुन प्रतिसाद दिला)
--अवलिया
दुनिया चाहे कुछ भी बोले बोले
दुनिया चाहे कुछ भी बोले
हम कुछ नहीं बोलेगा
हम बोलेगा तो ...
हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है
14 Jul 2009 - 12:35 pm | A1April
chan mahiti aahe ......yashivay.....scribd.com / esnip.com sudhdha pustakanchy sites aahe
AJIT
11 Jul 2009 - 10:13 am | प्रकाश घाटपांडे
प्रथम विरंगुळा सदरात नाही ना? अशी खात्री केली. माहिती यासदरात दिल्याने जीव भांड्यात पडला. उत्तम माहिती. ही ज्ञानवाहिनी च आहे.
आता खाण तशी माती. हे आलेल्या प्रतिसादातुन समजेलच अशी आशा करतो
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
11 Jul 2009 - 10:26 am | सहज
विकासराव. पुस्तके वाचणे हा एक चांगला विरंगुळा आहे.
11 Jul 2009 - 10:35 am | प्रमोद देव
अतिशय उपयुक्त माहिती.
धन्यवाद विकासराव!
हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!
11 Jul 2009 - 11:53 am | परिकथेतील राजकुमार
हेच म्हणतो.
धन्यवाद :)
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला.
आमचे राज्य
11 Jul 2009 - 10:47 am | ऋषिकेश
(हा प्रतिसाद अनोळखी व्यक्तीने वाचल्यास हरकत नाही)
मस्त माहिती.. गुगल बुक्स माहित होतेच.. आणि वापरतो देखील!
म्हणींचे पुस्तक वरवर चाळले.. मजेशीर आहे :)
ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
11 Jul 2009 - 10:10 pm | टारझन
वा !! कर मेल्या .. वांझोटे धंदे कर !!! =)) =)) =)) =)) =))
गुगल बुक्स काळजाला भिडले बरं का !!
(प्र-टा-आ) टारझन
11 Jul 2009 - 11:02 am | सुनील
उत्तम माहिती.
माहिती मिळविणे हा उत्तम विरंगुळा आहेच, पण विरंगुळ्यातूनही उत्तम माहिती मिळते!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
11 Jul 2009 - 12:27 pm | मिसळभोक्ता
खि खि सुनीलशेठ !!!
आधीच चाचपणी केली, हल्ली विकासशेठ विरंगुळा म्हणून माहिती द्यायला लागले. ह्या लेखाचा विषय विरंगुळा नसल्याने खूप हसलो.
-- मिसळभोक्ता
12 Jul 2009 - 4:36 am | विकास
माहिती मिळविणे हा उत्तम विरंगुळा आहेच, पण विरंगुळ्यातूनही उत्तम माहिती मिळते!
धन्यवाद! :-)
11 Jul 2009 - 4:19 pm | inoba mhane
Virangulyasathi 'tasali' pustake miltil ka ho?
(tasalach)- inoba
11 Jul 2009 - 9:50 pm | प्राजु
उत्तम माहिती. :)
धन्यवाद विकासदादा.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
12 Jul 2009 - 6:31 am | धनंजय
गूगलमधून काही दुर्मिळ संस्कृत पुस्तके मी माझ्या संगणकावर उतरवून घेतली आहेत.
ती तिथल्या तिथे ठेवून वर्गीकरण करून सहज परत मिळवता आलीत, तर लवकर मिळवता येतील, माझी स्वतःची हार्डडिस्क गजबजणार नाही.
फारच छान.
12 Jul 2009 - 6:47 am | विकास
ती तिथल्या तिथे ठेवून वर्गीकरण करून सहज परत मिळवता आलीत, तर लवकर मिळवता येतील, माझी स्वतःची हार्डडिस्क गजबजणार नाही.
त्या साठी एखादे पुस्तक गुगलवरच उघडे केले की डावीकडे सर्च विंडोच्या खाली रिव्ह्यू आणि त्याच्या खाली "अॅड टू माय लायब्ररी" अशी खूण असते. तिच्यावर टिचकी मारली की तुमच्या खात्यात ते पुस्तक जमा होते. अशी लायब्ररी वाढत गेली तर नंतर त्याच्यामधून पण पुस्तके अथवा उतारे शोधता येतात.
13 Jul 2009 - 11:31 am | आशिष सुर्वे
फूल व्ह्यू ची पुस्तके तुम्ही पीडीएफ करून डाऊनलोड करून घेऊ शकता.
ते कसे काय ब्वा?
आम्ही प्रयत्न केला पण पुस्तक संगणकावर उतरले नाही.
कॄपा करुन मदत करा..
-
कोकणी फणस
13 Jul 2009 - 7:07 pm | सागर
येथे भेट द्या
http://books.google.com/advanced_book_search?rview=1
येथे सर्च या पर्यायापुढे फुल व्ह्यू ओन्ली असा पर्याय निवडून नंतर दिसणार्या यादीतून हवे असलेल्या पुस्तकावर क्लिक करा
मग उजव्या बाजूच्या वरच्या कोपर्यात तुम्हाला""PDF" असा पर्याय दिसेन. त्यावर क्लिक केले की हवे ते पुस्तक PDF मधे उतरवून घेता येते
या सूचनांचा उपयोग झाला तर अवश्य कळवा :)
- सागर
13 Jul 2009 - 7:11 pm | दशानन
उपयोगी माहीती.
आवडली.
13 Jul 2009 - 9:32 pm | आशिष सुर्वे
धन्यवाद सागर भाऊ..
आपली मदत लक्शात राहील...
-
कोकणी फणस
13 Jul 2009 - 9:45 pm | चतुरंग
बुद्धीबळाबरची एकाहून एक सुरेख पुस्तके मिळाली मला!
मज्जानुं लाईफ!! :D
विकासराव, हा दुवा दिल्याबद्दल धन्यवाद! :)
(वजीर)चतुरंग
14 Jul 2009 - 8:07 am | शाहरुख
जगातली कोणत्याही स्वरूपातील माहिती आपल्याकडे घेऊन (सध्यातरी) मोफत लोकांपर्यंत पोहचवणे हे गुगलचे ध्येय आहे..
(गुगल लॅब्जवर लक्ष ठेवुन असलेला) शाहरूख
14 Jul 2009 - 8:11 am | सहज
गुगल इज द न्यु मायक्रोसॉफ्ट [बिग ब्रदर] :-)
----------------------------
यु हॅव्ह नो प्रायव्हसी, गेट ओव्हर इट लेखाची अजुन आठवण येते व लेखक मात्र सगळे नष्ट करत चालला आहे.
14 Jul 2009 - 4:43 pm | सूहास (not verified)
सुहास
14 Jul 2009 - 6:09 pm | लिखाळ
छान माहिती. आभार.
अधुनमधुन काही शोध गुगल पुस्तकांकडे घेऊन जातात. तेव्हा ती पुस्तके पाहतो. पण त्या खजिन्यामध्ये इतर काही शोधून पाहिले नव्हते. आता पाहिन.
-- लिखाळ.