राम राम मंडळी,
आजचा दिस अंमळ विलक्षण योगायोगाचाच गेला. सांगतो कसा ते. एक म्हणजे आज मिपाकर दिपाली पाटील यांनी पेढ्यां-मोदकांची सुरेख पाककृती टाकली. दुसरं म्हणजे मला आज 'मथुरानगरपती काहे तुम गोकूल..' या एका अतिशय सुरेख गाण्यावर लिहावसं वाटलं. खरं तर सकाळी दिपालीची पेढ्याची पाककृती वाचूनच मला सतत मथुरापेढ्याची आठवण येत होती. त्यातच मथुरानगरपती.. या गाण्याबद्दल मनात विचार घोळू लागले आणि मी अचानक १४-१५ वर्ष मागे गेलो, जुन्या स्मृती चाळवल्या.
शेठ गोविंदश्रीदास हा मूळचा मथुरेचा, परंतु मुंबईच्या झवेरीबाजारातल्या एका पेढीचा मालक. आजही त्याची पेढी मुंबैत आहे. तो आणि त्याचे सगळे कुटुंबीय हे माझे अशील. तो राहणारा मुंबैतल्या घाटकोपरचा. कामधंद्याच्या निमित्ताने त्याची माझी नेहमी गाठभेठ व्हायची. शेठ गोविंदश्रीदास वृत्तीने तसा टिप्पीकल कंजूष व्यापारी, हाडाचा सोनार! परंतु माझ्याशी अगदी मनमोकळा वागे. त्याच्या घरातली मंडळीही माझ्या अगदी घरोब्याची. शेठचा धाकटा भाऊही पेढीचं काम पाहात असे.
१९९४ की १९९५ सालातला श्रावण महीना. गप्पांच्या ओघात शेठ मला म्हणाला,
"केम तात्यासेठ, मथुरा चलोगे? जन्माष्टमी का त्योहार है!"
गंमत अशी झाली होती की शेठचाच एक भाचा की पुतण्या, तोही शेठसोबत मथुरेला जायचा होता. परंतु काही कामानिमित्त त्याचं जाणं रहीत झालं होतं आणि राजधानी एक्सपेसचं एक तिकिट मोकळं होतं. आलेल्या संधीचा फायदा घेऊन मी मथुरेला जायला तयार झालो, राजधानी एक्सप्रेसने मथुरेत डेरेदाखल झालोदेखील!
काय वर्णावी ती बृजभूमी! अतिशय सुंदर..! जन्माष्टमीची रात्र म्हणजे जणू मथुरेत दिवाळीच! मथुरेतल्या घराघरात, गल्ल्यागल्ल्यात, मोहल्ल्यामोहल्ल्यात सगळीकडे जन्माष्टमीचा अतिषय देखणा उत्सव. डोळे दिपवणारा, तृप्त करणारा! मथुरेतल्या श्रीकृष्ण मंदिरात मी कृष्णाची जशी मूर्ती पाहिली तशी अन्यत्र कुठेच पाहिली नाही. अत्यंत आखीव-रेखीव देखणी अशी ती संगमरवरी मूर्ती आहे. कारागिराच्या कलेला मनमोकळी दाद द्यावी लागेल इतके अप्रतीम भाव त्या मूर्तीच्या चेहेर्यावर आहेत! एक अप्रतीम कलाकृती पाहून दिल खुश झाला!
जन्माष्टमीच्या त्या रात्री मथुरा-वृंदावनातल्या सबंध वातावरणात उत्साह उतू जात होता, मनसोक्त मिठाई वाटली जात होती. मंडळी, एकंदरीत तीन दिवस मी मथुरेत होतो. त्या तीनही दिवसात रोज एक-दोन मिठायांवर मनसोक्त ताव मारून मी यथेच्छ खादाडी केली ते सांगण्यासाठीच हा लेखनप्रपंच! :)
पहिल्या दिवशी अगदी यथेच्छ गरमागरम सामोसे आणि रबडी! जन्माष्टमीची ती रात्र होती. मथुरेतल्या बृजवासी मिष्टान्न भांडार कम होटेलात मी रात्री दहा वाजता शिरलो. एका द्रोणात भरलेली ती लालबुंद रबडी! विलक्षण सुरेख आटलेली. नुसते सायीचे तुकडे लागत होते. साखर अगदी ठिक्क पडली होती. रबडीच्या त्या स्वर्गीय चवीत मी डुबक्या खात होतो. पाऊणएक किलो रबडी चाप चाप चापली! :)
दुसर्या दिवशी शेठच्या घरी मस्त मजेत आराम करून पुन्हा मथुरा भटकायला बाहेर पडलो. मथुरा अजून कालच्या जन्माष्टमीच्या वातावरणातून बाहेर पडायची होती. भटकता भटकता मथुरेतल्या जुन्या कोतवाली समोर आलो. तिथे एक टपरीवजा हाटेल होतं. आत शिरलो. एक कुणी मस्तवाल मजेदार इसम कालाजामूनचं पातेलं घेऊन समोरच बसला होता. झालं! आज आमची धाड कालाजामूनवर होती. खमंग-खुमासदार चवीचा, पाकाने भरलेला सीजनच्या बॉलैतका मोठा तो कालाजामून! ओहोहो..! तोंडात टाकल्याक्षणीच विरघळत होता! एकामागून एक असे किती कालाजामून मी खाल्ले ते मला आता आठवत नाही! इतकंच आठवतं की त्या कालाजामूनमुळे मला अक्षरश: नशा आल्यासारखं झालं होतं, डोकं सुस्त/सुन्न झालं होतं! आहाहा..! असे अप्रतीम नशीले कालाजामून फार कमी वेळेला खायला मिळतात!
तिसरा दिवस!
आज आमची धाड मथुरा पेढ्यांवर होती. तिसर्या दिवशी वृंदावनात गेलो होतो. तिथे मनसोक्त द्रोण भरून मथुरापेढे आणि वरती तीन -चार गिल्लास आटीव दूध! बस! म्होरलं काही आठवत नाही. त्या आटीच दुधाने आणि मथुरा पेढ्यांनी माझ्या मेंदूचा ताबा घेतला होता! एका विलक्ष्ण मस्तीत तेव्हा होतो इतकंच आता आठवतंय!
आज अनेक वर्षांनी मनानं पुन्हा एकदा त्या मथुरानगरीत गेलो आणि तिथे मनसोक्त खादाडी केली होती ते आठवलं म्हणून ते आपल्यासोबत शेअर करतो आहे! उत्तर हिंदुस्थानल्या अनेक ठिकाणी अशीच अगदी मनमुराद खादाडी केली आहे. इतकी की त्यावर एक छोटेखानी लेखमालाच लिहू शकेन! टाईम भेटला तर सवडीने अगदी नक्की लिहीन केव्हातरी...! :)
तेव्हा वय तरूण होतं, जे खाईन ते पचत होतं! अजूनही ईश्वराच्या कृपेने खाल्लेलं सगळं पचतं आहे तोवर पुन्हा एकवार मथुरेची ट्रीप करीन म्हणतो..!
येताय काय माझ्यासोबत?! :)
आपला,
(एक तृप्त जीव!) मिठाईप्रेमी तात्या! :)
प्रतिक्रिया
10 Jun 2009 - 12:37 am | प्राजु
निषेध!! ;)
तात्या, मथुरेच्या माझ्या आठ्वणी जाग्या केल्यात. लेख आवडला.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
10 Jun 2009 - 12:38 am | बिपिन कार्यकर्ते
साला, त्रास झाला रे. काय मस्त खादाडी. पूर्वी इंदौरला खाल्लेली रबडी, कालाजामुन, मावाबाटी... इ.इ.इ. सगळं आठवलं. रबडीचा आणि कालाजामुनचा फोटो मस्तच.
बिपिन कार्यकर्ते
10 Jun 2009 - 1:51 am | टारझन
हल्ली कोणी खायचं नाव काढलं की ह्यांना भारी तरास होतो .. तरी सांगत होतो .. माझी बरोबरी करू नका !! नाय म्हणे "अभी तो मै जवाण हूं" .. घ्या हे धौतीयोग घ्या आता ..
तात्या .. लेख आवडला !! बर्याच दिवसांनी लिहीलंत ... :) ... असे चार शब्द लिहा राव ... मजा येते ..आम्ही पामर तर काय आजुन बाहेर कुढं फिरू शकलो नाय
-(*****) टारझन
** **** *** ***** ** !!
10 Jun 2009 - 1:16 am | टिउ
तात्या के तब्येतीका राज अभी समझमे आया...
10 Jun 2009 - 2:32 am | रेवती
तात्यांचा त्रिवार निषेध!!!
का आम्हाला असं जळवताय?
एकदम मथुरेत रहायलाच जावं असं वाटायला लागलं.
पण कसं जाणार? उपाय एकच.... हे पदार्थ आपल्याला जमतील तसे घरी करणे.;)
रेवती
10 Jun 2009 - 5:37 am | चित्रा
पाऊण एक किलो रबडी? :)
छान आहे मथुरेची तुमची खाद्ययात्रा. पण मला कालाजामुन आणि पेढे विशेष आवडत नाहीत. पण रबडीसाठी जावेसे नक्की वाटते आहे.
10 Jun 2009 - 5:53 am | विसोबा खेचर
पाऊण एक किलो रबडी?
तेव्हा जोर होता अंगात! आता एवढी खाऊ शकेन असं वाटत नाही. कदाचित त्यानंतर रात्रभर रेघोट्या ओढत धावावं लागेल! :)
पण मला कालाजामुन आणि पेढे विशेष आवडत नाहीत.
इतर पेढे आवडत नसतील, परंतु मथुरा-पेढा खाल्ला आहे काय? तो एकवार खाऊन पाहा, नक्की आवडेल. अगदी खमंग असतो.. :)
खवा चांगला लालसर, खमंग होईस्तोवर परतून घेतात व पेढे बनवतात. त्यानंतर सर्व्ह करतांनादेखील ते पेढे छानसे साखरेत घोळवून देतात. अगदी मथुरेपर्यंत जायची आवश्यकता आहे असंही नाही. मुंबैला आलात कधी तरी खिलवीन. फोर्टमधल्या पी एम रोडवरील मथुराभवन या दुकानात. त्याचा मालक रामलाल हा खुद्द मथुरेचाच! माझ्या चांगल्या परिचयाचा आहे. दोस्तच आहे म्हणा ना! कधी तिथे गेलो की प्रेमाने रबडी, आटीव दूध, मथुरा-पेढे वगैरे खाऊ घालतो! :)
अर्थात, खुद्द मथुरेत जाऊन खाण्याची मजाच वेगळी! :)
आपला,
मथुरादास तात्या! :)
10 Jun 2009 - 7:15 am | लवंगी
रव्याचे लाडू, दिपालीचा पेढा कम मोदक आणि आता हा लेख.. आता कसचा कन्ट्रोल खाण्यावर राहायतोय.. काजुबर्फि खावीच लागली.
10 Jun 2009 - 8:21 am | विसोबा खेचर
काजुबर्फि खावीच लागली.
अरे वा! ती कुठे खाल्लीत? दिल्लीला फार छान मिळते! :)
आपला,
(दिल्लीप्रेमी) तात्या.
11 Jun 2009 - 3:57 am | लवंगी
देवाक्रुपेने एक छान मिठाईच दुकान उघडलय नविन. छान ताजी वेग्वेगळी मिठाई मिळते. तिथलीच काजुबर्फी.
10 Jun 2009 - 5:51 am | दिपाली पाटिल
मस्त लेख आहे , हे सगळं वाचल्यावर काहीतरी गोड खावंसं वाटलं, पण इकडे काय मिळणार यातलं, रबडी बनवायला घेतली तर ४-५ दिवस तरी लागतील दुध आटायला. :D
मला तर सुपर भुक लागलीये हा लेख वाचुन आणि माझं नाव टाकल्याबद्द्ल धन्यु. ;;) 8>
दिपाली :)
10 Jun 2009 - 6:03 am | अवलिया
लै भारी रे तात्या ! :)
--अवलिया
तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु
10 Jun 2009 - 8:24 am | सहज
पेढ्याचा फोटो पाहून कधी एकदा खातो असे झाले आहे.
:-)
10 Jun 2009 - 8:34 am | क्रान्ति
हा लेख म्हणजे रबडी+काला जामुन+मथुरा पेढा!
क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
11 Jun 2009 - 12:58 pm | सायली पानसे
+१
10 Jun 2009 - 8:37 am | संदीप चित्रे
मथुरेतली जन्माष्टमी मात्र अनुभवायलाच हवी एकदा.
तात्या,
मुंबईला येताना हातात काही दिवस ठेवून यायला पाहिजे म्हणजे तुझ्या खास खास ठिकाणचए मिसळ, बिर्याणी, मासे, पेढे असे (आणि अजून बरेच) पदार्थ खाता येतील :)
लेख एकदम चविष्ट झालाय हे वे सां न ल :)
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com
10 Jun 2009 - 8:57 am | विसोबा खेचर
तात्या,मुंबईला येताना हातात काही दिवस ठेवून यायला पाहिजे म्हणजे तुझ्या खास खास ठिकाणचए मिसळ, बिर्याणी, मासे, पेढे असे (आणि अजून बरेच) पदार्थ खाता येतील
नक्की जाऊ. कधी येतोस बोल?! :)
तुला मुंबै दाखवतो. दुपारची, संध्याकाळची आणि म्हणशील तर अगदी मध्यरात्रीची सुद्धा! ;)
जाऊ एखाद्या कोठ्यावर! तिकडच्या गाणार्या बायका, बाजिंदे-साजिंदे, मावश्या, आपा, सगळी आपली लै इज्जत करतात बॉस! तिथे बसून तुला बाकायदा 'बाबूलमोरा', किंवा 'मोहे पनघट पे' ऐकवीन! नायतर अजमेरच्या ख्वाजा मोईउद्दीन चिस्ती करता गायला जाणारा पुरियाधनाश्री ऐकवेन!
कधी येतोस बोल?! :)
आपला,
(कोठेवाला गवई) तात्या.
10 Jun 2009 - 11:20 am | नीधप
>>जाऊ एखाद्या कोठ्यावर! तिकडच्या गाणार्या बायका, बाजिंदे-साजिंदे, मावश्या, आपा, सगळी आपली लै इज्जत करतात बॉस! तिथे बसून तुला बाकायदा 'बाबूलमोरा', किंवा 'मोहे पनघट पे' ऐकवीन! नायतर अजमेरच्या ख्वाजा मोईउद्दीन चिस्ती करता गायला जाणारा पुरियाधनाश्री ऐकवेन!<<
हे अजून चालतं? अस्सल गायकी मुंबईतल्या कोठ्यावर अजून ऐकायला मिळते? माझ्या केवळ ऐकीव माहीतीप्रमाणे ते सगळं इतिहासजमा झालं.
काश.. हे खरंच ऐकायची संधी घेणं मलाही शक्य असतं!!!
असो!
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
10 Jun 2009 - 9:10 am | डॉ.प्रसाद दाढे
लई भारी तात्या! मी यायला तयार आहे तुमच्याबरोबर! आपण एक खाद्य-यात्राच काढूया.. प्लॅन असा
१) दिवस पहिला: स्थळः मुंबई- माटुंग्याला मणीजमध्ये गरम्-गरम इडली, मग दुपारी 'राजधानीत भरपेट जेवण, संध्याकाळी फोर्टमधील मिठाई, कॅननची पावभाजी,खाऊगल्लीत टाईमपास रात्रौ: लिओपोल्ड्ची बिअर, बडेमियांकडे खिमा (मग जमल्यास एखादं गाणं..तात्या म्हणतील तिथं..)
२) दिवस दुसरा: नाश्त्याला ठाण्याची मामलेदार मिसळ, गाडी पुढे हाकून वाटेत लोणावळ्याला गोल्डनचा बटाटवडा आणि फज (पोटात जागा असेल तर मनशक्तीची मिसळही), एक राजमाचीवर चक्कर (खाल्लेलं पचवायला!) मग पुढे कार्ल्याला एकविरा देवीला दंडवत घालून पुण्यात आगमन!
तिथे खाद्य-भ्रमणमंडळाच्या सन्मानार्थ रात्रौ धमू-आयोजित जंगी कट्टा!
३) दिवस तिसरा: सकाळी पुण्यातील काटा-किर्र किंवा रामनाथची मिसळ, मिपाचे दैवत भीमण्णंच्या प्रकृतीची चौकशी, दुपारी डॉ. दाढे किंवा पेठकरकाकांकडे उकडीच्या मोदकाचे जेवण, त्यानंतर मस्त पांघरूण घेऊन, खोलीत अंधार करून, मस्त पंखा (किंवा एसी) लावून झोप!
संध्याकाळी एफ.सी रोडवर एक निरिक्षण फेरफटका, वाडेश्वरची इडली किंवा (किंवा आणि!) पेशवेपार्काजवळच्या 'कल्पना' मध्ये डोसा! रात्री कपिलाचे काठी-कबाब आणि ग्रेट पंजाबमध्ये पतियाळा चिकन ! (सोबत एखादा 'पतियाळा')
४) दिवस चौथा: कोल्हापूरकडे प्रस्थान! वाटेत वनपत्रेची भेळ तोंडात टाकत कर्हाडच्या 'संगम' मध्ये जेवण. कोल्हाप्रात पोचल्यावर विश्रांतीनंतर रंकाळ्यावर फेरफटका, रात्री पर्लमध्ये खास मेजवानी!
५) दिवस पाचवा: फडतरे मिसळीने सुरूवात करून पन्हाळ्यास प्रयाण! तिथे बाजीप्रभूंना मुजरा करून अंबा घाटातल्या पावनखिंड रिसॉर्टमध्ये मुक्काम. शिरगावकरसाहेब (रिसॉर्टचे मालक) रसिक असल्याने तबला-पेटी असतेच.. रात्री उशिरापर्यंत मैफल..
पुढे इतर रसिक खवैय्यांनी भर घालावी.. हे लिहितांना प्रचंड भूक लागल्याने खाद्य-भ्रमणमंडळाच्या सन्माननीय सदस्यांना घाईघाईने स्वैपांकघर गाठावे लागत आहे..
10 Jun 2009 - 9:29 am | विसोबा खेचर
संपलो...!
दाढेसाहेब, आपण केवळ प्रतिसाद नाही लिहिलात, तर सुखासमाधानाची एक छोटेखानी व्याख्याच सांगितलीत!
सुख म्हणजे तरी अजून दुसरं काय असतं हो?! :)
जियो दाढेसाहेब, जियो..!
आपल्याला मानाचा मुजरा करतो..!
आपला,
तात्या.
10 Jun 2009 - 11:59 am | छोटा डॉन
दाढेसाहेबांना सलाम असेच म्हणतो ...
फारच अचाट आणि लै लै लै भारी आयडिया आहे खादाडीची, पाहु केव्हा आणि कशी जमतीये ती ....
मंडळी, जेव्हापण असा कट्टा होईल तेव्हा आमचे नाव जरुर घ्या, आम्ही नक्की हजर होऊ ;)
बाकी तात्या, लेख आणि महत्वाचे म्हणजे लेखातला "रबडीचा" फोटो फारच अप्रतिम हो ...
गाढवासारखी सकाळी इडली खाल्यावर आणि त्यावर पँट्रीतला बेचव चहा पिल्यावर असा फोटो पहाणे ह्याने किती वेदना होतात ते काय सांगावे ?
असो, चालु द्यात ...
उत्तम धागा आणि कल्पना असेच म्हणतो ...
------
छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
10 Jun 2009 - 11:58 pm | विसोबा खेचर
गाढवासारखी सकाळी इडली खाल्यावर आणि त्यावर पँट्रीतला बेचव चहा पिल्यावर असा फोटो पहाणे ह्याने किती वेदना होतात ते काय सांगावे ?
अरे चलता है यार! गरमागरम इडलीचीही मजा वेगळी! तिची रबडी, वा कालाजामूनसोबत तुलना का करा?
मधुबालेसारख्या रबडीवर जसं प्रेम करावं तसंच ते नाजूक अमृता राव सारख्या नाजूक इडलीवरही करावं! :)
प्रेम कुणावरही करावं! :)
आपला,
तात्या शिरवाडकर! :)
आदरणीय तात्यासाहेब शिरवाडकर,
क्षमा करा प्लीज. हा धागा तसा मौजमजा-विरंगुळा सदरात मोडणारा आहे म्हणूनच केवळ आपले आडनांव उधार घेतले आहे! :)
10 Jun 2009 - 12:08 pm | नंदन
खल्लास. या प्रतिक्रियेचा प्रिंटआऊट काढून ठेवीन म्हणतो, पुढच्या फेरीत नक्कीच कामी येईल :). बाकी खाद्य-सप्ताहच करू की. कोल्हापूर झालं की गगनबावड्याचा घाट उतरून पुढचा दिवस तळकोकणात/गोव्यात. :)
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
10 Jun 2009 - 7:12 pm | संदीप चित्रे
अशक्य प्रतिसाद आहे हा... नुसता वाचूनच भूक खवळलीय :)
11 Jun 2009 - 2:12 am | संदीप चित्रे
संपूर्ण खाद्ययात्रेत भेळेला वगळल्यामुळे त्रिवार निषेध !
म्हणजे खाद्ययात्रेत सहभागी होऊ पण 'संतोष' / 'पूनम' / 'गणेश' अशा एखाद्या स्पॉटला भेळ खाऊ :)
11 Jun 2009 - 2:27 am | रेवती
हेच म्हणते.
भेळ तर हवीच, नाहीतर खाद्ययात्रा परीपूर्ण झाल्यासारखं वाटणार नाही. भेळेचा त्रिवार विजय असो!!!
रेवती
10 Jun 2009 - 9:37 am | सचीन जी
लई भारी तात्या! मी यायला तयार आहे तुमच्याबरोबर! आपण एक खाद्य-यात्राच काढूया..
अजून एक ठीकाण अॅड करा राव!
पुणे - सोलापुर रस्त्यावर भीगवण गावी ज्योती नामक हॉटेलात जगातली सगळ्यात फंडु मिसळ मिळती! तीही चापुयात!
10 Jun 2009 - 10:07 am | विशाल कुलकर्णी
तात्या, कशाला जळवताय? ;-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...
आमचं नवीन पाडकाम : बोलावणे आले की.... अंतीम : http://www.misalpav.com/node/8120
10 Jun 2009 - 11:06 am | नंदन
मस्त तात्या. मला समर्थ - ग्रँट - बादशाही कोल्ड्रिंक अशा त्रिस्थळीची आठवण झाली :). यंदाच्या फेरीत राहून गेलं, आता पुढच्या वेळी मथुराभवन ऍड करायला हवं या यादीत.
मात्र या खेपेला दिल्लीच्या पराठेवाली गलीत जाऊन आलो. एकीकडे लाल किल्ला आणि दुसरीकडे चांदनी चौक अशा रस्त्याची - खरं तर बोळकांडीची - तारीफ किती करावी. पं. गयाप्रसाद शिवचरण अशा खानदानी नावाच्या दुकानात तब्ब्येतीत तीन-चार पराठे खाल्ल्यावर रबडी, जाड नळीची 'जलेबी' किंवा खुर्चन रिचवले की साधारण 'गॉड इज इन हिज हेवन, ऑल्ज राईट विथ द वर्ल्ड' सारखे वाटू लागते :). वानगीदाखल हे फोटू.
कामात मग्न पंडितजी -
![Pune_Delhi_Feb09 120](http://farm4.static.flickr.com/3653/3613313374_0ef29d3eec.jpg)
बिनभानगडीचा सुटसुटीत मेनू :) -
![Pune_Delhi_Feb09 125](http://farm4.static.flickr.com/3622/3612497725_313dc60880.jpg)
अखंड पापड प्राठा -
![Pune_Delhi_Feb09 129](http://farm4.static.flickr.com/3629/3613314782_e1fe663a1d.jpg)
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
10 Jun 2009 - 11:41 am | विसोबा खेचर
यंदाच्या फेरीत राहून गेलं, आता पुढच्या वेळी मथुराभवन ऍड करायला हवं या यादीत.
नक्की जाऊ रे, मजा येईल! :)
पुढल्या वेळेला तुला आमच्या मेरवानकडे नेईन. सक्काळच्या सात-साडेसातच्या वेळात जरा लौकर भेटू आणि मेरवान इराण्याकडे पावमस्का, ब्रूममस्का, डब्बल आमलेट, मावानी केक आणि कडक मिठी चाय असा भरभक्कम नाष्टा करू! :)
पं. गयाप्रसाद शिवचरण अशा खानदानी नावाच्या दुकानात तब्ब्येतीत तीन-चार पराठे खाल्ल्यावर रबडी, जाड नळीची 'जलेबी' किंवा खुर्चन रिचवले की साधारण 'गॉड इज इन हिज हेवन, ऑल्ज राईट विथ द वर्ल्ड' सारखे वाटू लागते
दिल्लीची पराठा गल्ली! ओहोहो! आपने भी क्या याद दिलाई! अरे मीदेखील एकेकाळी तिथे मनपसंत खादाडी केली आहे! :)
तात्या.
11 Jun 2009 - 12:32 pm | प्रमोद देव
१९८० साली मी महिनाभरासाठी दिल्लीला गेलो होतो तेव्हा पहिल्यांदा पराठेवाली गल्लीत पराठा खाल्ला होता तेव्हा केवळ १रुपयात एक पराठा मिळायचा. बाकी साजुक तुपातला पराठा आणि त्यावर रबडी...म्हणजे सुखाची परमावधी म्हटली पाहिजे.
आताचा किमान २५रुपये भाव वाचून अक्षशः हादरलो.
हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!
12 Jun 2009 - 12:29 am | स्वातीदेव
काय सुंदर लेख आहे. गोड पदार्थ तसेही मला फारच आवडतात. मथूरेचे हे गोड पदार्थ वाचून आणी बघून तर आता फारच भूक लागली आहे.
बाकीचे पण छान माहीती देत आहेत. मी तर लिस्टच बनवतीए पुण्या मुंबईत कुठे काय खायचे त्याची.
10 Jun 2009 - 1:26 pm | परिकथेतील राजकुमार
तात्या खाद्ययात्रा मस्तच. वर्णन वाचुनच पदार्थाची चव घेतल्यासारखे वाटत आहे.
डॉक्टरसाहेबांना आजकाल फारच उच्चभ्रु आयडीया सुचताहेत, आज संध्याकाळी धाड मारलीच पाहिजे क्लिनिकवर.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
10 Jun 2009 - 4:21 pm | चतुरंग
आणि आज पहातो तर हा धागा सरसरत कुठच्याकुठे पोचला!
दाढे साहेबांनी खाद्यसंस्कृतीचं भरजरी वस्त्रच उलगडण्याचा घाट घतलाय. मस्त आयडिया. ज्यांना जमेल त्यांनी जरुर करा. आम्ही तिथे असलो तर नक्कीच यायचा प्रयत्न राहील.
माणसाच्या मनाचा प्रवास पोटातून असतो म्हणतात ते अजिबात खोटं नाही! :)
(पं.खाया प्रसाद)चतुरंग
10 Jun 2009 - 5:34 pm | स्वाती दिनेश
मथुरेतल्या श्रीकृष्ण मंदिरात मी कृष्णाची जशी मूर्ती पाहिली तशी अन्यत्र कुठेच पाहिली नाही. अत्यंत आखीव-रेखीव देखणी अशी ती संगमरवरी मूर्ती आहे. कारागिराच्या कलेला मनमोकळी दाद द्यावी लागेल इतके अप्रतीम भाव त्या मूर्तीच्या चेहेर्यावर आहेत!
अगदी रे, फार सुंदर, सजीव वाटावी अशी राधाकृष्णाची मूर्ती आहे,
मथुरेच्या आठवणी तुझ्या लेखाने ताज्या झाल्या.
स्वाती
10 Jun 2009 - 7:24 pm | ऋषिकेश
वा वा वा वा!!!
मस्त चविष्ट लेख झालाय
ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
10 Jun 2009 - 7:41 pm | श्रीयुत संतोष जोशी
तात्या,
एकदा आपण सगळे जमून खास रबडी कट्टा करुयाच.
हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
10 Jun 2009 - 11:15 pm | पिवळा डांबिस
वर फोटोज दिलेल्या सर्वांच्या (आणि फोटो न देताही दाढेडॉक्टरांच्या!!) बैलाला डबल-टिबल घो!!!!!!!!!!!!!!!!!
:)
11 Jun 2009 - 7:34 pm | संदीप चित्रे
वापरून एकदम पुण्यात नेल्याबद्दल =D> =D>