प्रेरणा
शरदिनीताईंची माफी मागून, माझी निरीक्षणाशा...
एका निरीक्षणाचा कचराग्रस्त डेटासेट
अभ्यासकाच्या पारख्या नजरेची कात्री
कर्र कर्र कर्र
उरलेल्या डेटाचे गायलेले भारूड
अन डेटाचा म्यापकडे चुकतमाकत होणारा प्रवास
लब डब लब डब
नयनांच्या भोकांसमोर दिसणारे हिरवे बिंदू
रक्तवारूणीच्या अंमलाखालचे विसंवादी बोल
खुळा रे खुळा, खुळा रे खुळा...
एका ऑब्झर्व्हेशनमधून निघणारा पेपर
त्यावर होणारा अभिनंदनाच्या इमेल्सचा वर्षाव
धो धो धो...
अन मग सगळंच तुलनेने शांत ...
पुढच्या जी.एम.आर.टी. फेरीपर्यंत ...
१७ मे २००९, पुणे
रसग्रहण: एका रेडीओ ऍस्ट्रॉनॉमरचे मनोगत असं या कवितेचं वर्णन करता येईल. जशी मूळ कविता अनेक रसिक मिपावाचकांना समजली नाही, तसंच हे विडंबनही समजणार नाही याची खात्री आहे, हे मूळ कवितेशी विडंबनाचं असलेलं साधर्म्य ही विडंबन आणि कवयित्रीची जमेची बाजू आहे. शिवाय काही ठिकाणी उपयोजिलेले महाविचित्र शब्द हे आणखी एक साधर्म्यस्थळ!
कवियित्री (/विडंबिका) ही एक रेडीओ ऍस्ट्रॉनॉमर आहे. तिचं मुख्य काम काही प्रोजेक्टचा विचार करणे, त्यासाठी लागणार्या डेटासाठी एखाद्या रेडीओ टेलिस्कोपकडे प्रपोजल टाकणे, मग तो डेटा मिळवणे, डेटा मिळाला की त्यातला कचरा (इंटरफेरन्स) काढणे आणि नंतर त्याचा म्याप बनवणे. यानंतर हा म्याप असाच का दिसतो यावरून स्वतःचं डोकं खाऊन नंतर ते काम 'पेपर'रुपात प्रकाशित करून इतरांच्या डोक्याला शॉट लावणे हे आहे. या कामाबद्दल अनेक मिपाकर वाचकांनी अनेक प्रकारे चौकशी केली आहे. त्या सर्वांना काव्यरूपात उत्तर देणे हे कवयित्रिच्या लेखनायुष्यातले एक प्रमुख उद्दीष्ट. ते पूर्ण करतानाच कवयित्री एका न समजलेल्या कवितेचे विडंबन लिहून आपली अतिक्षुद्र साहित्यिक कुवत प्रकट करते.
(लिखाळ यांनी स्वतःच्याच कवितेचं रसग्रहण करण्याचा पायंडा पाडून दिल्याबद्दल मी त्यांची शतशः ऋणी आहे.)
बिका यांच्या फोटो टाकण्याच्या सूचनेबद्दल मी त्यांची आजीवन ऋणी असेन.
हीच ती बाटली जिच्यामधल्या द्रव्याच्या अंमलाखाली कुणाला काही दोन अपशब्द बोलले गेले!
प्रतिक्रिया
17 May 2009 - 10:15 pm | बिपिन कार्यकर्ते
तुला नक्की काय झालंय? तब्येत बरी आहे ना? नाही म्हणजे आजकाल लै विडंबनं पाडायला कागली आहेस ना.... बाकी विडंबन छान आहे.
फोटो पण टाकू शकली असतीस रक्तवारुणीचा.... सचित्र कविता असा पायंडा पाडलाच आहे धनंजयने (पहा: धुकट सकाळ)
अवांतर: माझं ऋण कसं चुकवायचं ते तुला माहितच आहे. ;)
बिपिन कार्यकर्ते
17 May 2009 - 10:17 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
अतिशय सुरेख असं 'खोबार' लिहिणार्या बिका यांनी नवकवितेचं विडंबन वाचून असे व्यक्तीगत प्रश्न विचारावेत याचा खेद वाटला. पण तरीही तुमच्या प्रतिसादाबद्दल आभार.
काही ऋणं न फिटलेली चांगली असं म्हणतात. तुमच्या सल्ल्याबद्दलचं माझ्यावर असलेलं ऋण हे अशाच प्रकारचं आहे असं मी मानते.
अदिती
17 May 2009 - 10:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
समिक्षात्मक बरेच लिहिणे जमेल असे वाटते, प्रतिसाद राखून ठेवतो. :)
अवांतर : शेवटच्या फोटूमुळे जरा रसभंग होतो ! अशा परंपरा पाडू नयेत. (असे म्हटल्यामुळे प्रतिसादाला एक वजन येते)
-दिलीप बिरुटे
(गंभीर समीक्षक)
18 May 2009 - 10:28 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
सर, आपल्याकडून समीक्षेची वाट पहात आहे. फोटोमुळे आपला रसभंग झाला याबद्दल क्षमस्व, पण जनतेच्या मागणीच्या रेट्यासमोर शेवटी मी झुकले.
(क्षमांकित) अदिती
17 May 2009 - 10:19 pm | लिखाळ
माझे आभार मानत मला आणि माझ्या जुन्या कवितेला प्रसिद्धी दिल्याबद्द्ल मी आपला आभारी आहे!
आपल्या वरील लेखनाला आपण स्वतःच काव्य म्हटल्याने इतर अनेकांना हुरुप येऊन ते सुद्धा 'जे न देखे रवी' या प्रातांत मुशाफिरी करु शकतील, त्यामुळे ते लोक सुद्धा आपले आभारी असतील.
अदितीच्या दुर्बिणीसाठी आणि रक्तवर्णी वारुणीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत :)
-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
18 May 2009 - 10:27 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
लिखाळ, आपण प्रतिसाद दिल्याबद्दल मी आपली अनंत आभारी आहे. टाळ्या पोहोचल्या, पुन्हा एकदा आभार.
आपल्याला माझे लेखन कविता वाटले नाही याचे दु:ख झाले, पण पुढच्या वेळेस मी सुधारण्याचा प्रयत्न करेन. पुन्हा एकदा धन्यवाद.
(ऋणी) अदिती
17 May 2009 - 10:30 pm | ब्रिटिश टिंग्या
उच्च!
रसग्रहण : +१
- (खुळा रे खुळा) टिंग्या
18 May 2009 - 10:26 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
धन्यवाद टिंगोजीराव!
अवांतरः टिंगोजीरावांनीच कवितेचा पहिला ड्राफ्ट पाहून रक्तवारूणीसंबंधी एक ओळ टाकण्याची सूचना केली. त्यांचेही अनेक आभार.
मै.अ.
17 May 2009 - 11:40 pm | नितिन थत्ते
हुच्च कविता आणि समीक्षण.
(अवांतरः चित्र पाहून मला आधी ती दुर्बिण वाटली होती. दुर्बिटणे बैंची कविता असल्याने तसे झाले असावे किंवा थोड्यावेळापूर्वीच्या द्रवपदार्थाच्या सेवनाने तसे झाले असावे)
खराटा
(रंग माझा वेगळा)
18 May 2009 - 10:25 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
खराटाशेट, आपल्याला कविता आणि रसग्रहण आवडलेले पाहून आनंद झाला. आपल्याला प्रकाशचित्रं आवडलं नाही का?
(प्रश्नांकित) अदिती
18 May 2009 - 11:27 am | नितिन थत्ते
प्रकाशचित्र आवडलंच. फक्त पहिल्या झटक्यात ती बाटली न वाटता दुर्बिण वाटली होती.
(खरी रेडिओ दुर्बिण पाहिलेली नाही. काही चित्रपटांत जहाजावरील कप्तानाच्या हातात अशा आकाराची दुर्बिण पाहिली होती.)
खराटा
(रंग माझा वेगळा)
18 May 2009 - 11:57 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
ही बघा एक रेडीओ दुर्बिण!

(अवांतरः जी.एम.आर.टी.त अशा ४५ मीटर व्यासाच्या ३० दुर्बिणी आहेत. या चित्रातच त्यापैकी दोन दिसत आहेत.)
आपल्याला आधीचं प्रकाशचित्रंही आवडलं तसं हेही आवडेल ही अपेक्षा.
अदिती (हौशी प्रकाशचित्रकार)
18 May 2009 - 12:10 pm | नितिन थत्ते
ज्ञानामृताबद्दल धन्यवाद.
(बधीर) खराटा
18 May 2009 - 2:34 am | शरदिनी
माझ्या कवितेचे हे सर्वोच्च विडंबन आह असे मला वाटते....
.. अर्थपूर्ण विडंबन... खरंतर स्वतंत्र कवितेचीच ताकद आहे यात...
18 May 2009 - 10:24 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
शरदिनीताई, आपण विडंबन हलकेच घेतलं एवढंच नाही तर कौतुकही अगदी दिलखुलासपणे केलंत. बास! आता आणखी काही नाही मिळालं तरी चालेल.
(कृतकृत्य) अदिती
18 May 2009 - 7:00 am | चन्द्रशेखर गोखले
ओरिजिनल कवितेमुळे तीन पेग मारल्या सारखी चढली (हा माझा कोटा ).. होती !
तुमच्या या कवितेने उतरली.. आताकुठे डोकं जागेवर आलं !!! धन्यवाद !!!
18 May 2009 - 10:23 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
अरे वा, गोखले साहेब, आपल्यासारख्या प्रथितयश आंतरजालीय कवीने माझ्या कवितेचा आणखी एक गुण शोधून काढला. यापुढे व्यसनमुक्तीसाठीही मी कविता लिहीत जाईन, आपल्यासारख्या प्रतिसादकांमुळेच मला हुरूप येतो.
-- (ऋणी) अदिती
18 May 2009 - 7:05 am | सहज
विडंबन म्हणण्यापेक्षा खरे तर अतिशय सत्यकथन कविता आहे ना?
काव्य उच्च, रहग्रहण त्याहुन बहारदार व फोटो म्हणजे कमाल!
18 May 2009 - 10:21 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
सहजकाका, आपल्याला कविता, रसग्रहण आणि फोटो या तिन्ही माध्यमातली माझी व्यक्तता आपल्याला आवडली; हीच खरी गुणग्राहकता. मी आपली आभारी आहे.
-- अदिती
18 May 2009 - 7:07 am | अवलिया
वा ! मस्त !!
--अवलिया
18 May 2009 - 10:20 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
अवलिया, आपल्याला माझी कविता आवडली हे वाचून बरे वाटले.
18 May 2009 - 7:09 am | विनायक प्रभू
शांततेच्या ओळीला आवाज का नाही बॉ?
गुच्छ कविता. लय भारी
18 May 2009 - 10:20 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
विप्रकाका, शांततेच्या ओळीचा आवाज असतो, पण तो शांत असतो हा कवितेचा भावार्थ आहे असं म्हणायला हरकत नाही. गुच्छ कविता म्हणजे काय?
-- अदिती
काका मला वाचवा.
18 May 2009 - 2:49 pm | विनायक प्रभू
झोपलेला घोरतो.
ज्यामुळे गुच्छ देउन सत्कार करावासा वाटला ती गुच्छ कविता.
18 May 2009 - 7:25 am | Nile
वा! ही कविता जर त्या "डेटा" ला कळली तर तुझा रोमँटीकपणा पाहुन तो तुझ्याबरोबर डेट ला येईल! ;)
18 May 2009 - 10:18 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
नील, आपला प्रतिसाद पाहून आनंद झाला. माझा डेटाबद्दलचा रोमँटीकभाव समजून घेतल्याबद्दल धन्यवाद. शिवाय एका डेटची सोय केल्याबद्दल मी आपली मनःपूर्वक आभारी आहे.
-- अदिती दुर्बिटणे
18 May 2009 - 12:07 pm | नंदन
काल जागतिक दूरसंचार दिवस असण्याच्या पार्श्वभूमीवर कविता विशेष आवडली :)
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
18 May 2009 - 3:06 pm | लिखाळ
अदितीताई,
प्रत्येक नव्या प्रतिसादाला आपण दिलेले यथायोग्य प्रतिसाद नम्रतेची ग्वाही देत लिहिले गेले आहेत. अश्या तर्हेने 'प्रतिसाद गुणीले दोन' हिशेबाने येत राहिलेले प्रतिसाद आपले लेखन नक्कीच प्रतिसादभरपूर मंडित करतील अशी आशा वाटते.
आपल्या प्रतिसादांसाठी एकदा जोरदार टाळ्या !!
-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)