✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

निरिक्षणाशा ...

३ — ३_१४ विक्षिप्त अदिती, Sun, 05/17/2009 - 22:03

प्रतिक्रिया द्या
5457 वाचन

💬 प्रतिसाद (28)

!!!

बिपिन कार्यकर्ते
Sun, 05/17/2009 - 22:15 नवीन
तुला नक्की काय झालंय? तब्येत बरी आहे ना? नाही म्हणजे आजकाल लै विडंबनं पाडायला कागली आहेस ना.... बाकी विडंबन छान आहे.
नयनांच्या भोकांसमोर दिसणारे हिरवे बिंदू रक्तवारूणीच्या अंमलाखालचे विसंवादी बोल खुळा रे खुळा, खुळा रे खुळा...
फोटो पण टाकू शकली असतीस रक्तवारुणीचा.... सचित्र कविता असा पायंडा पाडलाच आहे धनंजयने (पहा: धुकट सकाळ) अवांतर: माझं ऋण कसं चुकवायचं ते तुला माहितच आहे. ;) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

अतिशय

३_१४ विक्षिप्त अदिती
Sun, 05/17/2009 - 22:17 नवीन
अतिशय सुरेख असं 'खोबार' लिहिणार्‍या बिका यांनी नवकवितेचं विडंबन वाचून असे व्यक्तीगत प्रश्न विचारावेत याचा खेद वाटला. पण तरीही तुमच्या प्रतिसादाबद्दल आभार. काही ऋणं न फिटलेली चांगली असं म्हणतात. तुमच्या सल्ल्याबद्दलचं माझ्यावर असलेलं ऋण हे अशाच प्रकारचं आहे असं मी मानते. अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

प्रतिसाद राखून ठेवतो ! :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 05/17/2009 - 22:13 नवीन
समिक्षात्मक बरेच लिहिणे जमेल असे वाटते, प्रतिसाद राखून ठेवतो. :) अवांतर : शेवटच्या फोटूमुळे जरा रसभंग होतो ! अशा परंपरा पाडू नयेत. (असे म्हटल्यामुळे प्रतिसादाला एक वजन येते) -दिलीप बिरुटे (गंभीर समीक्षक)
  • Log in or register to post comments

सर,

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 05/18/2009 - 10:28 नवीन
सर, आपल्याकडून समीक्षेची वाट पहात आहे. फोटोमुळे आपला रसभंग झाला याबद्दल क्षमस्व, पण जनतेच्या मागणीच्या रेट्यासमोर शेवटी मी झुकले. (क्षमांकित) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माझे आभार

लिखाळ
Sun, 05/17/2009 - 22:19 नवीन
माझे आभार मानत मला आणि माझ्या जुन्या कवितेला प्रसिद्धी दिल्याबद्द्ल मी आपला आभारी आहे! आपल्या वरील लेखनाला आपण स्वतःच काव्य म्हटल्याने इतर अनेकांना हुरुप येऊन ते सुद्धा 'जे न देखे रवी' या प्रातांत मुशाफिरी करु शकतील, त्यामुळे ते लोक सुद्धा आपले आभारी असतील. अदितीच्या दुर्बिणीसाठी आणि रक्तवर्णी वारुणीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत :) -- लिखाळ. या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
  • Log in or register to post comments

लिखाळ, आपण

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 05/18/2009 - 10:27 नवीन
लिखाळ, आपण प्रतिसाद दिल्याबद्दल मी आपली अनंत आभारी आहे. टाळ्या पोहोचल्या, पुन्हा एकदा आभार. आपल्याला माझे लेखन कविता वाटले नाही याचे दु:ख झाले, पण पुढच्या वेळेस मी सुधारण्याचा प्रयत्न करेन. पुन्हा एकदा धन्यवाद. (ऋणी) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ

वा वा!

ब्रिटिश टिंग्या
Sun, 05/17/2009 - 22:30 नवीन
उच्च! रसग्रहण : +१ - (खुळा रे खुळा) टिंग्या
  • Log in or register to post comments

धन्यवाद

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 05/18/2009 - 10:26 नवीन
धन्यवाद टिंगोजीराव! अवांतरः टिंगोजीरावांनीच कवितेचा पहिला ड्राफ्ट पाहून रक्तवारूणीसंबंधी एक ओळ टाकण्याची सूचना केली. त्यांचेही अनेक आभार. मै.अ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या

हुच्च

नितिन थत्ते
Sun, 05/17/2009 - 23:40 नवीन
हुच्च कविता आणि समीक्षण. (अवांतरः चित्र पाहून मला आधी ती दुर्बिण वाटली होती. दुर्बिटणे बैंची कविता असल्याने तसे झाले असावे किंवा थोड्यावेळापूर्वीच्या द्रवपदार्थाच्या सेवनाने तसे झाले असावे) खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments

खराटाशेट,

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 05/18/2009 - 10:25 नवीन
खराटाशेट, आपल्याला कविता आणि रसग्रहण आवडलेले पाहून आनंद झाला. आपल्याला प्रकाशचित्रं आवडलं नाही का? (प्रश्नांकित) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

प्रकाशचित

नितिन थत्ते
Mon, 05/18/2009 - 11:27 नवीन
प्रकाशचित्र आवडलंच. फक्त पहिल्या झटक्यात ती बाटली न वाटता दुर्बिण वाटली होती. (खरी रेडिओ दुर्बिण पाहिलेली नाही. काही चित्रपटांत जहाजावरील कप्तानाच्या हातात अशा आकाराची दुर्बिण पाहिली होती.) खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

ही बघा एक

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 05/18/2009 - 11:57 नवीन
ही बघा एक रेडीओ दुर्बिण! Image removed. (अवांतरः जी.एम.आर.टी.त अशा ४५ मीटर व्यासाच्या ३० दुर्बिणी आहेत. या चित्रातच त्यापैकी दोन दिसत आहेत.) आपल्याला आधीचं प्रकाशचित्रंही आवडलं तसं हेही आवडेल ही अपेक्षा. अदिती (हौशी प्रकाशचित्रकार)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

ज्ञानामृत

नितिन थत्ते
Mon, 05/18/2009 - 12:10 नवीन
ज्ञानामृताबद्दल धन्यवाद. (बधीर) खराटा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

खूप आवडले.

शरदिनी
Mon, 05/18/2009 - 02:34 नवीन
माझ्या कवितेचे हे सर्वोच्च विडंबन आह असे मला वाटते.... .. अर्थपूर्ण विडंबन... खरंतर स्वतंत्र कवितेचीच ताकद आहे यात...
  • Log in or register to post comments

शरदिनीताई,

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 05/18/2009 - 10:24 नवीन
शरदिनीताई, आपण विडंबन हलकेच घेतलं एवढंच नाही तर कौतुकही अगदी दिलखुलासपणे केलंत. बास! आता आणखी काही नाही मिळालं तरी चालेल. (कृतकृत्य) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शरदिनी

उतारा..!

चन्द्रशेखर गोखले
Mon, 05/18/2009 - 07:00 नवीन
ओरिजिनल कवितेमुळे तीन पेग मारल्या सारखी चढली (हा माझा कोटा ).. होती ! तुमच्या या कवितेने उतरली.. आताकुठे डोकं जागेवर आलं !!! धन्यवाद !!!
  • Log in or register to post comments

अरे वा,

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 05/18/2009 - 10:23 नवीन
अरे वा, गोखले साहेब, आपल्यासारख्या प्रथितयश आंतरजालीय कवीने माझ्या कवितेचा आणखी एक गुण शोधून काढला. यापुढे व्यसनमुक्तीसाठीही मी कविता लिहीत जाईन, आपल्यासारख्या प्रतिसादकांमुळेच मला हुरूप येतो. -- (ऋणी) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चन्द्रशेखर गोखले

विडंबन

सहज
Mon, 05/18/2009 - 07:05 नवीन
विडंबन म्हणण्यापेक्षा खरे तर अतिशय सत्यकथन कविता आहे ना? काव्य उच्च, रहग्रहण त्याहुन बहारदार व फोटो म्हणजे कमाल!
  • Log in or register to post comments

सहजकाका,

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 05/18/2009 - 10:21 नवीन
सहजकाका, आपल्याला कविता, रसग्रहण आणि फोटो या तिन्ही माध्यमातली माझी व्यक्तता आपल्याला आवडली; हीच खरी गुणग्राहकता. मी आपली आभारी आहे. -- अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

वा ! मस्त !!

अवलिया
Mon, 05/18/2009 - 07:07 नवीन
वा ! मस्त !! --अवलिया
  • Log in or register to post comments

अवलिया,

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 05/18/2009 - 10:20 नवीन
अवलिया, आपल्याला माझी कविता आवडली हे वाचून बरे वाटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

आवाज

विनायक प्रभू
Mon, 05/18/2009 - 07:09 नवीन
शांततेच्या ओळीला आवाज का नाही बॉ? गुच्छ कविता. लय भारी
  • Log in or register to post comments

विप्रकाका,

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 05/18/2009 - 10:20 नवीन
विप्रकाका, शांततेच्या ओळीचा आवाज असतो, पण तो शांत असतो हा कवितेचा भावार्थ आहे असं म्हणायला हरकत नाही. गुच्छ कविता म्हणजे काय? -- अदिती काका मला वाचवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

शांत

विनायक प्रभू
Mon, 05/18/2009 - 14:49 नवीन
झोपलेला घोरतो. ज्यामुळे गुच्छ देउन सत्कार करावासा वाटला ती गुच्छ कविता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

वा! ही

Nile
Mon, 05/18/2009 - 07:25 नवीन
वा! ही कविता जर त्या "डेटा" ला कळली तर तुझा रोमँटीकपणा पाहुन तो तुझ्याबरोबर डेट ला येईल! ;)
  • Log in or register to post comments

नील, आपला

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 05/18/2009 - 10:18 नवीन
नील, आपला प्रतिसाद पाहून आनंद झाला. माझा डेटाबद्दलचा रोमँटीकभाव समजून घेतल्याबद्दल धन्यवाद. शिवाय एका डेटची सोय केल्याबद्दल मी आपली मनःपूर्वक आभारी आहे. -- अदिती दुर्बिटणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

समयोचित

नंदन
Mon, 05/18/2009 - 12:07 नवीन
काल जागतिक दूरसंचार दिवस असण्याच्या पार्श्वभूमीवर कविता विशेष आवडली :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

अदितीताई, प

लिखाळ
Mon, 05/18/2009 - 15:06 नवीन
अदितीताई, प्रत्येक नव्या प्रतिसादाला आपण दिलेले यथायोग्य प्रतिसाद नम्रतेची ग्वाही देत लिहिले गेले आहेत. अश्या तर्‍हेने 'प्रतिसाद गुणीले दोन' हिशेबाने येत राहिलेले प्रतिसाद आपले लेखन नक्कीच प्रतिसादभरपूर मंडित करतील अशी आशा वाटते. आपल्या प्रतिसादांसाठी एकदा जोरदार टाळ्या !! -- लिखाळ. या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

नवीन सदस्य

  • सदस्य: चिनू१९८५
    नोंदणी: Wed, 03/25/2026 - 09:02
  • सदस्य: साधक भूषण
    नोंदणी: Mon, 03/23/2026 - 19:02
  • सदस्य: दीपक चकवे
    नोंदणी: Mon, 03/23/2026 - 11:07
  • सदस्य: भूषण तळवेलकर
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 23:18
  • सदस्य: Jayashree15
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 18:55
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा