निरिक्षणाशा ...
प्रेरणा
शरदिनीताईंची माफी मागून, माझी निरीक्षणाशा...
एका निरीक्षणाचा कचराग्रस्त डेटासेट
अभ्यासकाच्या पारख्या नजरेची कात्री
कर्र कर्र कर्र
उरलेल्या डेटाचे गायलेले भारूड
अन डेटाचा म्यापकडे चुकतमाकत होणारा प्रवास
लब डब लब डब
नयनांच्या भोकांसमोर दिसणारे हिरवे बिंदू
रक्तवारूणीच्या अंमलाखालचे विसंवादी बोल
खुळा रे खुळा, खुळा रे खुळा...
एका ऑब्झर्व्हेशनमधून निघणारा पेपर
त्यावर होणारा अभिनंदनाच्या इमेल्सचा वर्षाव
धो धो धो...
अन मग सगळंच तुलनेने शांत ...
पुढच्या जी.एम.आर.टी. फेरीपर्यंत ...
१७ मे २००९, पुणे
रसग्रहण: एका रेडीओ ऍस्ट्रॉनॉमरचे मनोगत असं या कवितेचं वर्णन करता येईल. जशी मूळ कविता अनेक रसिक मिपावाचकांना समजली नाही, तसंच हे विडंबनही समजणार नाही याची खात्री आहे, हे मूळ कवितेशी विडंबनाचं असलेलं साधर्म्य ही विडंबन आणि कवयित्रीची जमेची बाजू आहे. शिवाय काही ठिकाणी उपयोजिलेले महाविचित्र शब्द हे आणखी एक साधर्म्यस्थळ!
कवियित्री (/विडंबिका) ही एक रेडीओ ऍस्ट्रॉनॉमर आहे. तिचं मुख्य काम काही प्रोजेक्टचा विचार करणे, त्यासाठी लागणार्या डेटासाठी एखाद्या रेडीओ टेलिस्कोपकडे प्रपोजल टाकणे, मग तो डेटा मिळवणे, डेटा मिळाला की त्यातला कचरा (इंटरफेरन्स) काढणे आणि नंतर त्याचा म्याप बनवणे. यानंतर हा म्याप असाच का दिसतो यावरून स्वतःचं डोकं खाऊन नंतर ते काम 'पेपर'रुपात प्रकाशित करून इतरांच्या डोक्याला शॉट लावणे हे आहे. या कामाबद्दल अनेक मिपाकर वाचकांनी अनेक प्रकारे चौकशी केली आहे. त्या सर्वांना काव्यरूपात उत्तर देणे हे कवयित्रिच्या लेखनायुष्यातले एक प्रमुख उद्दीष्ट. ते पूर्ण करतानाच कवयित्री एका न समजलेल्या कवितेचे विडंबन लिहून आपली अतिक्षुद्र साहित्यिक कुवत प्रकट करते.
(लिखाळ यांनी स्वतःच्याच कवितेचं रसग्रहण करण्याचा पायंडा पाडून दिल्याबद्दल मी त्यांची शतशः ऋणी आहे.)
बिका यांच्या फोटो टाकण्याच्या सूचनेबद्दल मी त्यांची आजीवन ऋणी असेन.
हीच ती बाटली जिच्यामधल्या द्रव्याच्या अंमलाखाली कुणाला काही दोन अपशब्द बोलले गेले!
हीच ती बाटली जिच्यामधल्या द्रव्याच्या अंमलाखाली कुणाला काही दोन अपशब्द बोलले गेले!
वाचने
5467
वाचनखूण
प्रतिक्रिया
28
!!!
In reply to !!! by बिपिन कार्यकर्ते
अतिशय
प्रतिसाद राखून ठेवतो ! :)
In reply to प्रतिसाद राखून ठेवतो ! :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सर,
माझे आभार
In reply to माझे आभार by लिखाळ
लिखाळ, आपण
वा वा!
In reply to वा वा! by ब्रिटिश टिंग्या
धन्यवाद
हुच्च
In reply to हुच्च by नितिन थत्ते
खराटाशेट,
In reply to खराटाशेट, by ३_१४ विक्षिप्त अदिती
प्रकाशचित
In reply to प्रकाशचित by नितिन थत्ते
ही बघा एक
In reply to ही बघा एक by ३_१४ विक्षिप्त अदिती
ज्ञानामृत
खूप आवडले.
In reply to खूप आवडले. by शरदिनी
शरदिनीताई,
उतारा..!
In reply to उतारा..! by चन्द्रशेखर गोखले
अरे वा,
विडंबन
In reply to विडंबन by सहज
सहजकाका,
वा ! मस्त !!
In reply to वा ! मस्त !! by अवलिया
अवलिया,
आवाज
In reply to आवाज by विनायक प्रभू
विप्रकाका,
In reply to आवाज by विनायक प्रभू
शांत
वा! ही
In reply to वा! ही by Nile
नील, आपला
समयोचित
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
अदितीताई, प