जडणघडण

सरपंच's picture
सरपंच in जनातलं, मनातलं
7 Feb 2008 - 12:19 pm

नमस्कार,

मिसळपाव वर अधिकाधिक सोयी उपलब्ध करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. अनेकांच्या ते लक्षात आले असेलही. तरीही येथे नव्या सोयी बद्दल माहिती दिली जाईल. तसेच काही अडचणी असल्यास त्या सुद्धा येथे मांडल्यास हरकत नाही.

सदस्य व्यवस्थापनासाठी सदस्यं संरचनेत थोडा बदल केलेला आहे. त्यामुळे तुमच्या काही सोई ज्या तुम्ही आधी वापरत होतात आणि आता त्या दिसत नाहीत असा काहिसा प्रकार असेल तर येथे तसे नमुद करावे. सोई पुर्ववत करण्यात येतील.

हे ठिकाणधोरणमांडणीतंत्रप्रकटनसंदर्भमाहिती

प्रतिक्रिया

सृष्टीलावण्या's picture

18 Feb 2008 - 8:25 am | सृष्टीलावण्या

मिपावर चित्र टाकायचे म्हणजे ते कुठेतरी अधोरभारित (upload) करा आणि तिथून त्याचा दुवा इथे द्या असा द्रविडीप्राणायाम करावा लागतो. त्याऐवजी मिपावर ब्राऊझची सोय असती तर बरे झाले असते.

अनंता's picture

8 May 2009 - 7:32 am | अनंता

माझी खव व व्यनि सुविधा बंद आहे. कृपया मदत करा.

प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, तर अयशस्वी पुरुषाच्या मागे दोन असतात ;) तंगडी खेचायला ;) ;)

डॉ.प्रसाद दाढे's picture

19 Feb 2008 - 10:37 am | डॉ.प्रसाद दाढे

'acting' or 'action' ह्यातील पहिले अक्षर मराठीतून लिहिताना 'अ' वर अर्धच॑द्राकृती मात्रा देता येत नाही..तरी योग्य ती सुधारणा करावी..

विसोबा खेचर's picture

19 Feb 2008 - 1:36 pm | विसोबा खेचर

दाढेसाहेब,

E = ऍ

Ekshan = ऍक्शन

EkTiMg = ऍक्टिंग

सरपंच's picture

25 Mar 2008 - 7:41 pm | सरपंच

एखाद्या विषयावर लेखन करायचे असेल आणि वेळे अभावी लेख अर्धवट राहत असेल तर नवीन सोय आहे.
लेखन चौकटीच्या खाली अप्रकाशित ठेवा नावाची चौकट आहेत. त्यावर टिचकी मारून तो पर्याय निवडा व लेख पुर्वपरिक्षण झाल्यावर प्रकाशित करा.

त्यानंतर त्या पानावर एक पिवळ्या चावीचं चित्र येईल. तुम्हाला हा लेख प्रकाशित झालेला दिसेलही पण काळजी नको हा लेख फक्त तुम्हालाच दिसतोय , इतर सदस्यांना नाही. ह्याची खात्री तुम्ही गमन करून अतिथी म्हणून वाचून करू शकता.

नेहमी प्रमाणे काही त्रुटी असतील किंवा अडचणी , सुचना आदींचे स्वागत आहे.

बेसनलाडू's picture

26 Mar 2008 - 8:43 am | बेसनलाडू

सदस्यांनी स्वतःचे सदस्यत्त्व काही काळापुरते निलंबित किंवा केवळ वाचनमात्र ठेवणे, रद्द करणे यासंबंधी प्रणालीत सोई उपलब्ध आहेत का?
(जिज्ञासू)बेसनलाडू

विसोबा खेचर's picture

26 Mar 2008 - 8:59 am | विसोबा खेचर

किंवा केवळ वाचनमात्र ठेवणे,

लॉगईन करूनदेखील फक्त 'वाचनमात्र राहणे' हे सभासदांच्याच हातात आहे. दरम्यानच्या काळात पोष्टहापिस आणि खरडीचा लाभही त्याला मिळतच राहील. त्याबाबतही कुणशी काही संपर्क न ठेवता केवळ अन् केवळ वाचनमात्र रहायचं असेल तर लॉगईन करायचीदेखील गरज नाही. पाहुणे स्वरुपात इथे येऊनदेखील वाचनमात्र राहता येईल!

रद्द करणे यासंबंधी प्रणालीत सोई उपलब्ध आहेत का?

सभासदत्व रद्द करयच्या बाबतीत दोन गोष्टी करता येतील,

१) सभासदत्व तात्पुरते रद्द करावयाचे असल्यास,

सरपंचाना, विसोबा खेचरांना किंवा जनरल डायर यांना व्य नि पाठवून किंवा खरड पाठवून तसे कळवावे म्हणजे संबंधित खाते 'ब्लॉक' होईल!

२) सभासदत्व कायमचे रद्द करावयाचे असल्यास,

सरपंचाना, विसोबा खेचरांना किंवा जनरल डायर यांना व्य नि पाठवून किंवा खरड पाठवून तसे कळवावे म्हणजे संबंधित खाते डिलीट होईल!

मिपावर लिहिण्यार्‍यांचे, प्रतिसाद देऊन सक्रीय सहभागी होणार्‍यांचे, फक्त वाचनमात्र राहू इच्छिणार्‍यांचे, लॉगईन न करता पाहुणे म्हणून येऊ इच्छिणार्‍यांचे, सभासदत्व तात्पुरते रद्द करू इच्छिणार्‍यांचे, सभासदत्व कायमस्वरुपी बंद करू इच्छिणार्‍यांचे, थोडक्यात सर्वांचेच सहर्ष आणि मनापासून स्वागत आहे!

तात्या.

बेसनलाडू's picture

26 Mar 2008 - 9:10 am | बेसनलाडू

यात तात्पुरते 'ब्लॉक' केलेले खाते त्याच सदस्याच्या विनंतीवरून पुन्हा चालू करणे अंतर्भूत आहे, असे गृहीत धरतो.
माहितीबद्दल अनेक आभार.
(आभारी)बेसनलाडू

संजयक्षीरसागर's picture

30 Mar 2009 - 2:46 pm | संजयक्षीरसागर

३०/०३/२००९

श्री तात्या
कृपया माझे सदस्यत्व कायमचे रद्द करावे आणि तसे कळवावे

संजय क्षीरसागर

संजयक्षीरसागर's picture

10 Apr 2009 - 10:34 pm | संजयक्षीरसागर

श्री तात्या/निलकांत

कृपया कार्यवाही व्हावी

अप्रकाशित करून साठवलेलं साहित्य, सरपंच आणि अधिकार दिल्यास संपादकांना पाहता येतं.

हे मुद्दमहून सांगण्याचं कारण असं की ज्यांना ते साहित्य प्रकाशित व्हायच्या आधी सरपंचाने सुध्दा पाहू नये असं वाटतं त्यांनी ही सोय वापरू नये.

तसेच आपला महत्वाची व्यक्तीगत माहिती सुध्दा येथे अप्रकाशित आहे म्हणून ठेऊ नये. ही सुचना.

अप्रकाशित साहित्याबाबत नाही का करता येणार?
नाहीतर ही सोय वापरली जाणे अवघड आहे.
कोणालातरी आपले अप्रकाशित साहित्य दिसते आहे हे, कोणीतरी आपली दैनंदिनी परवानगीविना वाचते आहे, हे समजण्यासारखे अस्वस्थ करणारे आहे.

चतुरंग

सरपंच's picture

18 Apr 2008 - 11:58 am | सरपंच

नमस्कार,
आज मिसळपाव वर नव्याने कौल सुविधा देण्यात येत आहे. याचा फायदा घेऊन तुम्ही इतर लोकांचं एखाद्या विषयावर मत घेऊ शकता.

कौल बनवतांना तुम्हाला एक प्रश्न देणे आवश्यक आहे सोबतच काही संभाव्य उत्तर पर्याय द्यावे लागतील.
काही अडचण असल्यास येथे विचारावे.

ही कौल सुविधा रंगलेल्या विषयांसाठी वापरल्यास उत्तम मात्र कुठलाही कौल संपादनाचे हक्क व्यवस्थापनाला आहेत हे ध्यानी असावे.

सरपंच's picture

22 Apr 2008 - 1:06 pm | सरपंच

आता मिसळपाव वर खरडवही मधून आपल्याला खरड लिहीणार्‍या सदस्याच्या खरडवही पर्यंत सहज जाता येईल व प्रतिसाद देता येईल.

यासाठी खरडीखाली प्रतिसाद द्या वर टिचकी मारा.

शशांकने स्वतः ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्याबद्दल मिसळपाव परिवारा तर्फे त्याला धन्यवाद.

सरपंच's picture

23 Apr 2008 - 11:26 pm | सरपंच

मिसळपाव वर आता अक्षररंग व पार्श्वरंग देण्याची सोय करण्यात आलेली आहे.

ज्या अक्षराला रंग द्यायचा असेल त्याला निवडून मग बटनावर टिचकी द्या , हवा तो रंग निवडा म्हणजे अक्षरे रंगीत होतील.

काही अडचणी असतील तर नक्की लिहा.

चतुरंग's picture

25 Apr 2008 - 6:57 am | चतुरंग

वाट बघत असलेली सुविधा मिळाली.
नीलकांत आणि सरपंच धन्यवाद!;))

चतुरंग

सरपंच's picture

26 Apr 2008 - 2:03 pm | सरपंच

मिसळपाव वर आता स्माईलीज चा वापर करता येईल.
यासाठी वेगळे काही करण्याची गरज नाहीये. फक्त लेखात आधी जसे स्माईलीज टाकायचे तसे टाकले की त्याचे जागी चित्र दिसेल.

;) :) :(

विसोबा खेचर's picture

26 Apr 2008 - 3:54 pm | विसोबा खेचर

नीलकांता,

खूप मेहनत घेतो आहेस रे. 'धन्यवाद' म्हणून परकं करत नाही...

तात्या.

सरपंच's picture

26 Apr 2008 - 6:30 pm | सरपंच

मिसळपाव वर उपलब्ध असलेल्या सगळ्या स्माईलीज आता ड्रॉपडाऊन बॉक्स च्या रूपात उपलब्ध आहेत.
त्यामुळे कुठला कोड माहिती नाही ची कटकट नाही.
जेव्हा लेख लिहीतो किंवा प्रतिक्रिया देतो तेव्हा
प्रतिक्रिया द्या
च्या खाली लाल रंगांत
Smileys आहे त्यावर टिचकी दिल्यावर खाली एक चौकोन उघडेल, ज्यात सर्व हसमुखं आहेत. हवं त्यावर टिचकी द्या व वापरा.

खरडवही व व्यक्तीगत निरोपात ही ड्रॉपडाऊन सोय नाहिये. तेथे मात्र कोड लिहावा लागेल. हा कोड शोधण्यासाठी टेक्स्ट बॉक्सच्या खाली Input format लिहीलेलं आहे त्यावर टिचकी द्या. तेथे
Full HTML

* Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
* Lines and paragraphs break automatically.
* Textual smileys will be replaced with graphical ones.

या लाल रंगाच्या दूव्यावर टिचकी दिल्यास सगळ्या स्माईलीज चे कोड मिळतील.

धमाल मुलगा's picture

26 Apr 2008 - 9:09 pm | धमाल मुलगा

विश्वकर्मा निलकांता,
भो मित्र, अरे किती करतोस रे आमच्या आनंदासाठी?
आम्ही म्हणालो अक्षररंग दे..दिलेस!
म्हणालो खरडवह्या सोप्या करुन दे...दिल्यास!
म्हणालो स्मायलीज हव्या...दिल्यास!

कसे आभार मानायचे रे तुझे?
:) :D ;)

-(हस्सरा नाच्चरा) ध मा ल.

देवदत्त's picture

26 Apr 2008 - 9:47 pm | देवदत्त

एवढ्या कमी वेळात एवढ्या सोयी दिल्याबद्दल धन्यवाद.
आणि पुढील वाटचालींकरीता शुभेच्छा :)

प्रभाकर पेठकर's picture

26 Apr 2008 - 10:24 pm | प्रभाकर पेठकर

मिपा दिवसेंदिवस बाळसे धरीत आहे हे पाहून खूप आनंद होतो आहे. हार्दीक शुभेच्छा....!

सरपंच's picture

10 May 2008 - 4:30 pm | सरपंच

मिसळपाव वर नवीन पाककृती नावाचा साहित्य प्रकार तयार करण्यात आलेला आहे. आता आपल्या पाककृती प्रकाशित करण्यासाठी त्याचा वापर करावा.

ऍडीजोशी's picture

10 Jun 2008 - 4:23 am | ऍडीजोशी (not verified)

ह्या काही वेळात घडलेल्या मानसीक परीश्रमाबद्दल श्रामपरीहार म्हणून मिपा तर्फे सकाळी सात्वीक ओसरी आणि संध्याकाळी ढोसरी भरवण्यात यावी.

आपला,

ऍडी जोशी
ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

नीलकांत's picture

10 Jun 2008 - 5:57 am | नीलकांत

आज अचानक रोजच्या पेक्षा ५ पट ओघ वाढल्यामुळे सर्व्हरवर ताण आला. सर्व्हर शेअर्ड असल्यामुळे साहजीकच मिपा ला रेशनिंग झाले.

मला ह्या ५ पट मागणीचं कुतुहल वाटतंय. आज सर्वांनाच बेंच वर ठेवलंय की काय? आणि दुसरी शंका अशी की ही मागणी मानवीच आहे की नाही.

असो. मिसळपावला काही अडचण नाही. ते थोड्या वेळात पुर्ववत होईल.

अवांतर : आजचा प्रकार इतरत्र घडलाय कधी की नाही याचा शोध घेतला असता, उबंटू लिनक्स च्या संकेतस्थळाला सुध्दा नुकताच नव्या आवृत्तीच्या प्रकाशना नंतर असा अनुभव आल्याचे वाचले. येथे उबंटूचा उल्लेख करण्याचे कारण एवढेच की उबंटू आणि मिसळपाव संकेतस्थळासाठी एकच प्रणाली वापरतात आगदी आवृत्ती सुध्दा एकच आहे.

नीलकांत

राजे's picture

10 Jun 2008 - 4:26 pm | राजे (not verified)

निलकांत माझा माझा खफ परत दे ;)

जीव गमत नाही आहे रे त्याच्यावाचून !

स्वगतः-- दारु, सिगरेट व अता खफची नशा.... अवघड आहे गड्या तुझं !!

राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

छोटा डॉन's picture

10 Jun 2008 - 4:31 pm | छोटा डॉन

राजे, ऍड्रेस बार वर ही लिंक टाका, खफ दिसेल ...
http://www.misalpav.com/guestbook/0

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

छोटा डॉन's picture

10 Jun 2008 - 4:27 pm | छोटा डॉन

च्यायला आज एकदम पांगळ्यासारखं झालं ना ...
बाकीच्या पब्लिकने विचारले सुद्धा "क्यो बे, तेरा वो मिसलपाव ब्लोक कर दिया क्या ? आज नही दिख रहा जादा" ...
आता चालू आहे ....

पण अजूनसुद्धा "खरडवही, पोष्टहापीस, वाचनखुणा व खरडफलक " दिसत नाहीत ...
त्याच्या लिंक वर गेले तरी "पेज नॉट फाउंड" असा संदेश येतो ...

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

नीलकांत's picture

10 Jun 2008 - 4:28 pm | नीलकांत

राजे माफी असावी, थोड्या वेळात खरडफळा पुर्ववत करतो.

यशोधरा, थोडं थांबा हळूहळू पुर्ववत होतय सारं

हुश्य ! #:S

नीलकांत

आंबोळी's picture

10 Jun 2008 - 4:49 pm | आंबोळी

ह्या काही वेळात घडलेल्या मानसीक परीश्रमाबद्दल श्रामपरीहार म्हणून मिपा तर्फे सकाळी सात्वीक ओसरी आणि संध्याकाळी ढोसरी भरवण्यात यावी.

या बंगळुरवासियांच्या सात्वीक ओसर्‍यान्च्या महापूरामुळेच बहुतेक मिपा काही वेळ ध्यानस्त बसले असावे. (ह.घ्या.)
असो.
आज पर्यंत आलेली सगळी संकटे झेलुन मिपा पहाडा सारखे उभे आहे. आणि इथुन पुढेही असेच उभे राहील असा विश्वास वाटतो.
काही वेळातच पुर्ववत झाल्याबद्दल मिपाचे त्याच्या चालकांचे आणि मालकांचे अभिनंदन!!!

आंबोळी

सरपंच's picture

12 Jun 2008 - 3:13 pm | सरपंच

हजर सभासदांची वाढती संख्या लक्षात घेता डाव्या बाजूच्या समासातील १० सभासदांची सूची कमी पडत असल्याचं जाणवलं. त्यामुळे आता डाव्या समासातच खरडफळ्याच्या खाली एक नवा मेन्यु दिलेला आहे. हजर सभासदांचे एक पान तयार केलेले आहे. त्यामुळे सध्या कोण कोण सदस्य आलेले आहेत ते पाहता येईल व त्यांच्याशी संपर्क साधता येईल.

धन्यवाद.

चतुरंग's picture

12 Jun 2008 - 7:29 pm | चतुरंग

नीलकांत, तात्या ह्या सोयीबद्दल धन्यवाद!

तुम्ही लोक ज्या इमाने इतबारे मिपा वर मेहेनत घेताय, सर्व सभासदांच्या योग्य अपेक्षा पूर्ण करण्यासाठी धडपडताय ते पाहून खरंच खूप बरं वाटतं. तुमचं कौतुक आहे! :)

चतुरंग

नाखु's picture

13 Jun 2008 - 2:02 pm | नाखु

मिसळ प्रेमी आम्हा सोयरी सह "चरी"

नीलकांत's picture

25 Aug 2008 - 2:59 pm | नीलकांत

नमस्कार,
लवकरच मिसळपाव १ वर्षाचे होईल. या निमीत्ताने मिसळपाव वर काही बदल करायचे ठरले आहेत.

हे असेच बदल करत असतांना तुमच्या काही अपेक्षा असतील तर नीलकांतला व्यक्तिगत निरोपाने कळवा.

नीलकांत

आपला अभिजित's picture

1 Sep 2008 - 5:45 pm | आपला अभिजित

`नकटीच्या लग्नाला' हा विषय चुकून दोनदा प्रकाशित झाला आहे. क्रुपया, एक काढून टाकावा.

-अभिजित पेंढारकर.

नमस्कार,
मिसळपाव वर छायाचित्रे आणि रेखाटनांसाठी नवीन साहित्यप्रकार सुरू केलेला आहे. त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा.
एक विनंती आहे की या आधी इतर प्रकारात प्रकाशित झालेले साहित्यांचे दूवे जर एकत्रित करून देता आले तर ते कलादालन या विभागाखाली एकत्रित करता येतील. यासाठी सरपंचना व्य. नि. तून हे दूवे पाठवावे.

सध्या मिसळपावचे पोष्टहापिस नवीन सुविधांसहित देण्यात आले आहे. यातील काही नवीन सुविधा खालील प्रमाणे.

१) एकापेक्षा अधीक लोकांना एकाच वेळी एकच पत्र पाठवण्याची सोय.
२)आलेले संदेश वेगवेगळ्या कप्प्यात हलवण्याची सोय.
३)कप्पा व्यवस्थापन अधिक सोईस्कर.
४)कुठल्याही सदस्याकडून व्य. नि. स्विकारण्याची अथवा नस्विकारण्याची मुभा.
५)वारंवार वापरले जाणार्‍या व्यक्तिंची सूची.
६)अनेक संदेशांपैकी वाचलेले, न वाचलेले अशी गाळणी लावून हवे ते संदेश निवडण्याची मुभा.
७)संदेश वाचलेले किंवा न वाचलेले अशी नोंद करण्याची सोय.
८) नवीन सुबक ठेवण.
९)आपण कुठल्या कप्प्यात किती संदेश साठवलेले आहेत त्याची संख्या सहज दिसते.

या सोईंचा सर्वांनी वापर करावा. काही सूचना/ अडचणी असतील तर संपर्क साधावा.

धन्यवाद.

सर्किट's picture

4 Sep 2008 - 2:07 pm | सर्किट (not verified)

एक सर्वसाधारण सदस्य म्हणून ह्या सुविधांचा मला काहीही उपयोग नाही. कलादालन वेगळे केले ते चांगले झाले.

त्यापेक्षा हे सगळे लालभडक गडद रंगसंगती सोडून सोपी साधी निळी, काळी माझ्या वार्धक्यामुळे क्षीण झालेल्या डोळ्यांना, सुखावणारी थीम का निवडली नाही ? निळे पाहिले की लोकांना प्रसन्न वाटते, आणि संपादकमंडळावरचे काम कमी होते.

-- सर्किट

अवलिया's picture

4 Sep 2008 - 7:29 pm | अवलिया

निळे पाहिले की लोकांना प्रसन्न वाटते, आणि संपादकमंडळावरचे काम कमी होते.

सहमत

नाना

देवदत्त's picture

4 Sep 2008 - 7:27 pm | देवदत्त

अरे वा,
पोष्टहापिसात काहीतरी बदल झाल्याचे काल रात्री पाहिले होते पण त्याचा पूर्ण आढावा घेता आला नाही. आता घेतो.
कलादालन हा लेखनप्रकार संध्याकाळीच वापरात आलेला पाहिला. जमल्यास नक्की वापरीन :) ह्या आधीचे काही लेखन शोधतो.

सरपंच's picture

8 Sep 2008 - 3:17 pm | सरपंच

सध्या साहित्य अप्रकाशित करण्याची सोय योग्यरित्या चालत नसल्याचे दिसते आहे. त्यामुळे लेखकांनी काही काळ त्या सुविधेचा वापर करू नये अशी विनंती आहे. लवकरच ही त्रुटी दूर करून त्याबद्दल सुचना दिल्या जाईल.
धन्यवाद.

सरपंच's picture

20 Sep 2008 - 3:07 pm | सरपंच

काही विषयांवर कौल घेतांना त्या प्रश्नाची काही पार्श्वभूमी देणे गरजेचे असते. यासाठी आता कौल तयार करतांना त्या प्रश्नाची/ विषयाची पार्श्वभूमी देता येईल अशी सोय केलेली आहे. त्याचा वापर करावा.

धन्यवाद.

मला दोन प्रश्न पडले आहेत ...
१. 'ई ' वर अनुस्वार दिलेला का दिसत नाही ?
२. माझ्या सुचनांचे काय झाले ?

सही /-

आगरी बोली - आगरी बाना.

विसोबा खेचर's picture

7 Mar 2009 - 3:49 pm | विसोबा खेचर

माझ्या सुचनांचे काय झाले ?

काम सुरू आहे. होईल हळूहळू.

कृपया घाई करू नका...

तात्या.

सरपंच's picture

7 Mar 2009 - 3:54 pm | सरपंच

इंग्रजी ईंग्रजी असे दोन्ही अनुस्वार दिसतात.

सोनम's picture

8 Mar 2009 - 12:55 pm | सोनम

हे अस काय दिसतय? :? :? :? :?
http://www.misalpav.com/

एक नवीन सभासद "ओसा ....देन" हे नाव घेऊन इंग्लिश मधे लॉग्-ईन करत आहे मिपावर.

या नावाने कुठल्याही साईटवर कोणी असल्यास ... एफ्.बी.आय्./सी.आय्.ए. च्या "वॉचलीस्ट" वर येतो आपण. काही प्रॉब्लेम नाही पण कशाला उगीच मिपाची साईट त्यांना उपलब्ध करून द्यायची "मॉनिटर" करण्यासाठी ...

विचार व्हावा .......

विकि's picture

14 Mar 2009 - 11:37 am | विकि

मिसळपाव हे संकेतस्थळ मला मोझीला फायर फॉक्सवर दिसत नाही आहे.असे का?
कळावे.

विंजिनेर's picture

14 Mar 2009 - 11:38 am | विंजिनेर

व्यवस्थित दिसते आहे

विकि's picture

14 Mar 2009 - 11:45 am | विकि

आता अचानक मिपा मला मोझीलावर दिसू लागले.

वामनसुत's picture

17 Mar 2009 - 11:44 pm | वामनसुत

मी मिसळपावचा नवीनच सभासद झालो आहे. माझ्या खात्यात पोस्टहापिसची सुविधा मला दिसत नाही.तसेच आलेल्या खरडींना मी उत्तर देऊ शकत नाही, तरी कृपया मार्गदर्शन करावे.
धन्यवाद.

श्रीकृष्ण सामंत's picture

18 Mar 2009 - 10:09 am | श्रीकृष्ण सामंत

अहो सरपंच साहेब,
माझे लेखन
ह्यावर टिचकी मारल्यावर
प्रकार शीर्षक लेखक वेळ प्रतिक्रिया
असे कॉलम येतात.त्यामधे प्रतिक्रिया नंतर किंवा मधे कुठेही वाचने हा एक आणखी कॉलम टाकता येईल काय? वाचनेमधे प्रतिक्रियेप्रमाणे होत असलेली वाढही दाखवावी.
माझे लेखन असल्याने लेखक हा कॉलम "रिडंडंट" वाटतो.कारण माझ्या लेखनाचा लेखक मी आहे हे उघडच आहे.कदाचीत माझं म्हणणं चूकीचं असेल.
आपल्या प्रत्येक पोस्टची किती वाचनं झाली हे समजण्यासाठी त्या त्या पोस्टवर टिचकी मारून ती वाचने पाहावी लागतात.तो व्याप कदाचीत वाचेल.
हे सुविधा करावी -शक्य होत असेल तर-असं मी यापूर्वी दोनदां सुचवलं होतं. आपली त्यावर प्रतिक्रिया न पाहिल्याने किंवा माझी नजरचूक झाली असल्यास पुन्हा लिहित आहे.

www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

नीलकांत's picture

18 Mar 2009 - 5:06 pm | नीलकांत

सामंत काकांनी केलेल्या दुरुस्त्या झालेल्या आहेत. आता माझे लेखन मध्ये लेखक पर्याय नाही आणि वाचने नावाचा पर्याय जोडण्यात आलेला आहे.

श्रीकृष्ण सामंत's picture

19 Mar 2009 - 10:31 am | श्रीकृष्ण सामंत

नीलकांत,
आपण तत्परतेने माझ्या सुचने प्रंमाणे सोय केलीत याबद्दल आपले आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

ताल भास्कर's picture

18 Mar 2009 - 4:07 pm | ताल भास्कर

मी मिसळपावचा नवीन सभासद झालो आहे. आलेल्या खरडींना मी उत्तर देऊ शकत नाही : कृपया मार्गदर्शन करावे.

आभार,
ताल भास्कर

नीलकांत's picture

18 Mar 2009 - 5:07 pm | नीलकांत

नवीन सदस्यांना थोड्या वेळाने ह्या सोई देण्याचे धोरण आहे. तुम्ही काहीही करू नका, त्या सोई आपोआप सुरू होतील.

प्रिया८'s picture

19 Mar 2009 - 12:49 am | प्रिया८

मला खरडवहीतल्या निरोपाला प्रतिसाद देता येत नाहिये. क्रुपया मदत करा.

कवटी's picture

19 Mar 2009 - 1:23 pm | कवटी

स्वगृहची लिंक पानाच्या सगळ्यात खाली पण द्यावी. मोठा लेख आणि खूप प्रतिक्रीया असल्या की शेवटची प्रतिक्रीया वाचून परत वरती स्क्रोल करत येउन मग स्वगृह टिचकावे लागते. पानाच्या शेवटी लिंक दिल्यास सोयीचे पडेल.

कवटी

ढ's picture

19 Mar 2009 - 1:28 pm |

कवटी यांच्याशी सहमत.

अगदी हेच सुचवावेसे वाटत होते.

घाशीराम कोतवाल १.२'s picture

19 Mar 2009 - 1:38 pm | घाशीराम कोतवाल १.२

आमचे एक स्नेहि श्री अजय गुरुजी यांचे खाते मिसळ्पाव वर लॉग ईन होत नाहि आहे जरा पहा ना!!! त्यांना मेल मिळाली तुमची पासवर्ड्ची

**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

सँडी's picture

19 Mar 2009 - 2:02 pm | सँडी

प्रथम, हे अतिउत्कॄष्ठ संकेतस्थळ उपलब्ध करुन दिल्याबद्दल आपले खुप खुप खुप आभार.

पुर्वपरीक्षण मध्ये अक्षररंग दिसत नाहीत. (मी फाफॉ वापरतोय.)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Mar 2009 - 2:28 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रतिक्रिया देताना "Input format"वर क्लिक करा आणि त्यात Full HTML वर टिचकी मारा, रंग दिसतात. हे प्रत्येक प्रतिक्रीया देताना करावं लागतं.

अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

गणपा's picture

19 Mar 2009 - 3:17 pm | गणपा

मलाही हे जमत न्हवत.
आता जमल बहुतेक.
धन्यवाद अदिती आणि सॅडी.

- गण्या

Meghana's picture

20 Mar 2009 - 12:40 pm | Meghana

मी काही माहिती हवी होती त्या बद्दल मीपा वर खरडवही मधे जाउन काही लिखाण केले आहे ते कुठेच दिसत नाही. कोणी काही मदत करू शकेल का?

संग्राम's picture

26 Mar 2009 - 10:39 pm | संग्राम

ख्ररडवहीची सुविधा द्या

संग्राम's picture

26 Mar 2009 - 10:41 pm | संग्राम

ख्ररडवहीची सुविधा द्या

सिद्धि's picture

27 Mar 2009 - 2:04 am | सिद्धि

कवित पाथवायच्या असतिल तर काय करायचे?

बिपिन कार्यकर्ते's picture

27 Mar 2009 - 2:37 am | बिपिन कार्यकर्ते

नमस्कार!!! तुमचा कविता पाठवायच्या असतील तर काय करायचे हा प्रश्न बघितला.

डावीकडे 'लेखन करा' असे आहे तिथे टिचकी मारा.
जे न देखे रवी... वर टिचकी मारा.
शीर्षक द्या.
लेखनविषय आणि लेखनप्रकार निवडा
गाभा मधे कविता टंकित करा.
पुर्वदृश्य वर टिचकी मारा.
प्रकाशित करा.

बिपिन कार्यकर्ते

Nile's picture

28 Mar 2009 - 3:07 pm | Nile

१. पट्ला वर व्य. नी. चा उल्लेख आढ्ळला, माझ्या खात्यात (वा इतर) कुठे हा पर्याय दिसत नाही?
२. मी कुणाच्याही खरडवहीत लिहु शकत नाही? (संदेशः You are not allowed to post in this guestbook.)

यासाठि मी काय केले पाहीजे हे सांगितले तर फार बरे होइल.

(नविन सदस्य)Nile.

विसोबा खेचर's picture

28 Mar 2009 - 3:30 pm | विसोबा खेचर

नवीन सभासदांना ही सुविधा लगेच मिळत नाही. लौकरच आपल्याला ही सुविधा सुरू होईल..

तात्या.

Nile's picture

28 Mar 2009 - 3:38 pm | Nile

वेळात वेळ काढुन उत्तरे दिल्याबद्द्ल आभारी आहे!

Nile's picture

24 Apr 2009 - 9:40 am | Nile

खाल्लेल्या मिसळीचे पुर्ण बिल भरेन!!! आता तरी खरडायची परवानगी द्या? :)

संग्राम's picture

28 Mar 2009 - 8:43 pm | संग्राम

मी कुणाच्या प्रतिसादाला उत्तर देउ शकत नाही ...." You are not allowed to post in this guestbook." असा एरर येतोय ...

नेने's picture

1 Apr 2009 - 10:23 pm | नेने

खरडवही दिसत नाही.

Suhas Narane's picture

8 Apr 2009 - 1:18 pm | Suhas Narane

mla aalelya kardialaa utaare kashi dyaayachi?

marathi type hot nahi.

उमेश कोठीकर's picture

9 Apr 2009 - 6:46 am | उमेश कोठीकर

खरडवहीची सुविधा बंद आहे.

विसोबा खेचर's picture

9 Apr 2009 - 6:52 am | विसोबा खेचर

आता व्य नि आणि ख व ची सुविधा सुरू केली आहे...

तात्या.

Suhas Narane's picture

9 Apr 2009 - 10:23 am | Suhas Narane

खरडवहीची सुविधा बंद आहे.

आदिती ताईंना उत्तर देऊ पाहाते आहे पण बहुधा खरडवहीची सुविधा बंद असावी कारण 'प्रतिसाद द्या' वर टिचकी दिली की 'यु आर नॉट अलाऊड टू पोस्ट' असा काहीसा संदेश येतो.

माझ्या ब्लॉगवर तारखा दिसत आहेत. कॄपया या दुव्यावर टिचकी देऊन खातरजमा करून पाहावी.

आदितीताईंच्या संदेशाला उत्तर देण्यास थोडा विलंब झाला, त्याबद्दल दिलगीर आहे.

Suhas Narane's picture

17 Apr 2009 - 5:43 pm | Suhas Narane

मी अलेल्या खर्डीना उत्तरे क्शी देउ?/

बाकरवडी's picture

17 Apr 2009 - 6:02 pm | बाकरवडी

मी स्वगृह येथून login केल्यानंतर खरड्फळ्यावर गेल्यावर परत login करावे लागते.
मी मोझिला फायरर्फॉक्स वापरत आहे.
असा प्रोब्लेम फक्त खफलाच येत आहे.
कृपया याचे कारण सांगा.

:B :B :B बाकरवडी :B :B :B

ललिता's picture

23 Apr 2009 - 4:27 pm | ललिता

मी बरेच दिवस इथे लिखाण वा खरडव्ही लिहिली नाहीय. बहुतेक माझी खरडवही सुविधा बंद पडलेय वाटते. मला यशोधराची आलेली खरड दिसली, पण "प्रतिसाद द्या" वर टिचकी मारल्यावर यशोधराची प्रोफाईल उघडते व तिथे "You are not allowed to post in this guestbook" असा संदेश मिळतो.

मी काही चुकतेय का किंवा मी काय करू म्हणजे सुविधा परत सुरळीत होईल?

माधुरी दिक्षित's picture

23 Apr 2009 - 5:53 pm | माधुरी दिक्षित

माझीही ख्ररडवही बंद आहे अजुन

उदय सप्रे's picture

24 Apr 2009 - 11:15 am | उदय सप्रे

तात्या / सरपंच ,

मिपावर चित्र टाकायचे म्हणजे ते कुठेतरी अधोरभारित (upload) करा आणि तिथून त्याचा दुवा इथे द्या असा द्रविडीप्राणायाम करावा लागतो. त्याऐवजी मिपावर ब्राऊझची सोय असती तर बरे झाले असते.

सृष्टीलावण्या यांच्या या विनंतीला मी पण "मम" म्हणतो.काही करता येईल काय तात्या?
उदय सप्रे

दिपाली पाटिल's picture

28 Apr 2009 - 8:56 pm | दिपाली पाटिल

सरपंच साहेब,

माझी खरडवही दिसत नाहीये...

दिपाली :)

Nile's picture

29 Apr 2009 - 12:08 am | Nile

तुमच्या खात्यात जाउन बदल (enable) करुन पहा!

दिपाली पाटिल's picture

30 Apr 2009 - 2:29 am | दिपाली पाटिल

नमस्कार निलकांत,

माझ्या खात्यात अचानक खरडवही आणि व्यनि ची सुविधा मला दिसत नाहीये.

धन्यवाद.
दिपाली :)

दिपाली पाटिल's picture

30 Apr 2009 - 2:36 am | दिपाली पाटिल

:D

दिपाली :)

शार्दुल's picture

9 May 2009 - 1:59 pm | शार्दुल

ख.फ. बन्द आहे,,, कसे वाप्रावे?????????

नेहा

संग्राम's picture

19 Nov 2009 - 12:40 pm | संग्राम

आलेल्या खरडींना मी उत्तर देऊ शकत नाही ...

मुख्य पानावरील सर्व ट्रॅकरच्या ठोकळ्यांतील माहिती जाड अक्षरात दिसत आहे. ते पूर्ववत करता येऊ शकतील का?