महाराष्ट्रदिनानिमित्त मराठी मनांना हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन! हे माझे वेडेवाकुडे बोल माझ्या महाराष्ट्रासाठी.
ज्ञानरायाची आळंदी, विठूरायाची पंढरी
माझ्या मराठी मातीने दिली जन्माची शिदोरी
महाराष्ट्रभूमी थोर रत्नमाणकांची खाण
क्रांतिकारी, देशभक्त इथे जन्मले महान
विचारप्रवर्तनाचे, ज्ञान-विज्ञान, विद्येचे
इथे नांदते गोकूळ सिद्धी-बुद्धीचे, प्रज्ञेचे
नामा-जनीचे अभंग, ज्ञानेश्वरी, दासबोध
तुकयाची गाथा, अमृतानुभवाचा प्रसाद
कला संस्कृतीची गोदा, श्रद्धा-भक्ती चंद्रभागा
कैवल्याच्या, मांगल्याच्या कृष्णा, मुळा, वैनगंगा
शिवरायाचा मावळ, गड-कोट द्वारपाल
भवानीची तलवार, सह्यगिरी होई ढाल
चतःशृंगी, सप्तशृंगी, एकविरा, अंबाबाई
मायभवानी, रेणुका वसे इथे ठाई-ठाई
अष्टविनायका, तुझे मातीला या वरदान
महाराष्ट्रधर्म वाढो, देई हे पसायदान
प्रतिक्रिया
1 May 2009 - 8:50 am | राघव
भावना पोचल्या :)
चतःशृंगी, सप्तशृंगी, एकविरा, अंबाबाई
मायभवानी, रेणुका वसे इथे ठाई-ठाई ... छान आहे!
या कवितेला प्रतिसाद देण्याच्या निमित्ताने आपणा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! >:D<
राघव
1 May 2009 - 9:03 am | चन्द्रशेखर गोखले
समयोचित आणि सुंदर कविता.. महाराष्ट्र दिनाच्या आपल्याला शुभेच्छा!!
1 May 2009 - 9:36 am | दशानन
|| जय महाराष्ट्र ||
थोडेसं नवीन !
1 May 2009 - 9:38 am | अवलिया
|| जय महाराष्ट्र ||
आपणा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
--अवलिया
1 May 2009 - 11:12 am | परिकथेतील राजकुमार
हेच म्हणतो !
|| जय महाराष्ट्र ||
आपणा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
क्रांतीतै कविता सुंदरच :)
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
1 May 2009 - 11:49 am | मनीषा
सुरेख काव्य ..
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा !
1 May 2009 - 12:38 pm | उमेश__
सुंदर कविता..