थोरांची ओळख या लेखमालेतले हे दुसरे पुष्प.
आज आपणास ओळख करून घ्यायची आहे ती महान रंगकर्मी, थोर नाट्यलेखक आणि ज्येष्ठ नाट्यअभिनेते आणि निर्माते मुरारआबा पात्रुडकर यांची.
मुरार आबांचं आताचं वय आहे ८८, पण तरुणाला लाजवेल असा उत्साह आहे.माझी त्यांची भेट गेल्याच महिन्यात योगायोगानं झाली. ( रविवारी प्लंबिंगचं काम निघालं, आमच्या नेहमीच्या अदागळे प्लंबरला बोलावले. कामात आहे पण येतो म्हणाला, पण तीन तास उलटून गेले तरी काही आमच्या घरात पोचला नव्हता, म्हणून शेवटी त्याने दिलेल्या पत्त्यावर जाऊन तो काय एवढ्या कामात आहे, ते पाहिलं तर एक वृद्ध गृहस्थ जमिनीवरती आडवं पडून बेसिनखाली गेलेले होते आणि अदागळेला सांगते होते," असं काम व्हायला पाहिजे".... तो वरती उभं राहून वैतागून माझ्याकडे पाहून पुटपुटला, " म्हातारं लै तिरसट आहे..."
...मी खूण केली की जर हळू बोल... तर तो म्हणतो, " बहिरा आहे म्हातारा..तीन तासांपासून याच्याकडून शिकतोय प्लंबिंग.." तेवढ्यात दाढी वाढवलेले ते वृद्ध गृहस्थ बेसिनखालून बाहेर आले. मी अवाक झालो, ते होते मुरार आबा. मग त्यानंतर आमचं जाणंयेणं वाढलं...गप्पा होऊ लागल्या .. अर्थात गप्पा म्हणजे त्यांनी बोलायचं आणि आम्ही ऐकायचं...)
आत्मचरित्र :
मुरार आबांनी रूढार्थानं शालेय शिक्षण घेतलेलं नव्हतं.जीवनानुभवातूनच शिक्षण झालेलं होतं. पण लिहिण्याची आणि वाचण्याची हौस आणि वेग प्रचंड. त्यांनी त्यांचे आत्मचरित्र पाच खंडांमध्ये लिहिले. त्यांच्या आत्मचरित्राचे नाव होते " कामा फ़ाटा मारू". अर्थात कामापुरता मामा आणि कामानंतर सर्वांना फ़ाट्यावर मारू.हे शीर्षक त्यांच्या जगण्याचे ब्रीदवाक्य बनले होते.
शीर्षकाचे श्रेय : मुरार आबांच्या आत्मचरित्राला शीर्षक देण्यासाठी कलाकल प्रकाशनाने जी स्पर्धा घेतली होती त्यात मूळचे डोम्बिवलीचे अभियंते ( सध्या घानामध्ये तेल कंपनीत कामाला ) गुरुशरण बिनीवाले यांनी सुचवलेले हे नाव..." कामा फाटा मारू"
गुरुशरण बिनीवाले ( ते सध्या घानात महत्त्वाच्या कामावर रुजू झाल्याने मुरार आबांबरोबर त्यांचा फोटो देऊ शकत नाही..)
कामा फ़ाटा मारू या आत्मचरित्राचे मुखपृष्ठ.
जिद्द आणि नशीब :
घरातून पळून जाऊन त्यांनी मुंबईत पडेल ती कामं केली, एका चहाच्या गाडीवर मदतनीसाचं काम करताना त्यांची भिलारेअण्णांशी ओळख झाली. त्यावेळी भिलारेअण्णा "सत्यवान " नाटकमंडळी चालवत होते.पूर्वीची ही नावाजलेली संगीत नाटक मंडळी आता डबघाईला आलेली होती. उत्तम गायक नट कंपनी सोडून गेलेले होते, सिनेमा आणि जागतिक मंदीच्या लाटेत कंपनी बंद पडेल की काय अशी परिस्थिती होती.
रूपाची देणगी :
आबांना पाहून सुरुवातीलाच " हा पोरगा काय काम करणार ?" अशी अण्णांची समजूत झाली.पण कंपनीत आबांनी हरकाम्या म्हणून मन लावून काम केले... वेळप्रसंगी भालदार चोपदार,पोलीस, कधी पूतना मावशी, शूर्पणखा अशा भूमिकाही मिळाल्या.मात्र असली चोर किंवा पोलिसाचीच कामं करण्यात त्यांना त्यांचं आयुष्य वाया घालवायचं नव्हतं. ती वाट पाहत होते एका संधीची आणि त्यांचं आयुष्य बदलून टाकणारी ती संधी त्यांना मिळाली.
बकासुराची कृपा :
१९३५ साल...कंपनीचा मुक्काम जांभुळगाव ( खु) येथे पडला होता.शेठ अंबादास हे गावातले मोठे जमीनदार.सत्यवान नाटक मंदळींवर त्यांची मर्जी होती.त्या वर्षी चार मुलींनंतर शेठ अंबादासांना पुत्र झाला होता म्हणून अंबादासांनी गावात खास खेळ ठेवला होता. भीम आणि बकासुर. कंपनीच्या आणि भिलारेअण्णांच्या भीषण आर्थिक परिस्थितीमुळे पगार कधीही होत असत किंवा होतच नसत म्हटले तर जास्त योग्य ठरेल. भुकेले झोपण्याची वेळ सार्या कंपनीवरच येत असे. तर त्या दिवशीही नेहमीप्रमाणेच सर्वांवर भुकेले राहण्याची वेळ आलेली होती. दु:खात सुख इतकेच होते की रात्री नाटक झाल्यानंतर शेठ अंबादास यांच्याकडून सार्या मंडळींना गोडाचे जेवण होते. कधी एकदा नाटक संपते आणि जेवण करतो असे प्रत्येकाला झाले होते. आणि त्याच दिवशी नेमका बकासुराचे काम करणारा नट जुलाबाने आजारी पडला.
अण्णांनी पोरगेल्या मुरारीवरती ही जबाबदारी सोपवली. मुरारीचा आनंद गगनात मावेना. या संधीचं सोनं करायचा त्याने निश्चय केला. पहिलेच दृश्य होते बकासूर गाडाभर अन्न आणि एक माणूस खातो ते....
.
. मुरारी भूमिकेत शिरला होता.त्याने एक गडगडाटी हास्य केले आणि विंगेतून ( काही जणांच्या विरोधाला न जुमानता) गाडाभर अन्न ओढत आणले... खरंतर हे जेवण सगळ्या कंपनीसाठी आणले होते पण मुरारीने ते अन्न रंगमंचावरती नेले. आणि फ़तकल मारून बसून जेवायला सुरुवात केली. बरोबर बळी द्यायला आणलेल्याची भूमिका करणारा नट ( तोही भुकेला) , त्यानेही मुरारीला थोडे जेवण द्यायची विनंती केली. पण बकासुराकडून त्याला एक मुस्कुटात खावी लागली आणि तो भेलकांडत बाजूला पडला. ते पाहून अंबादासांची द्वितीय कन्या खिदळू लागली. सगळीकडे हशा झाला... लोक जेवणार्या बकासुराला उत्तेजन देऊ लागले... त्या उन्मादात बकासुराने १७ जणांचे जेवण संपवले. एवढ्याशा १५ वर्षाच्या पोराने १७ जणांचे जेवण संपवले हे पाहून त्या बळी द्यायला पाठवलेल्या माणसाला फ़ेफ़रे आले... हे सारे विंगेतून पाहून भिलारेअण्णा जे भीमाचा रोल करत असत, त्यांची तळपायाची आग मस्तकाला भिडली... त्यांनी मुरारआबांना शिव्या देत देत रंगमंचावरती उडी घेतली, आणि मुरारीच्या पेकाटात एक लाथ घातली.... मुरार आबांनीही त्यांना खच्चून शिव्या घातल्या...त्यांनी मालक वगैरे काहीही पाहिले नाही.आणि भीमाच्या वेषातल्या मालकाला बडवायला सुरुवात केली...( भूमिकेत मिसळून जाणं म्हणजे काय ते आजकालच्या बॊसला घाबरून जगणार्या तरुणांनी खरंच त्यांच्याकडून शिकावं ).. कंपनीतल्या सर्वांना वाटलं आता मुरारीची नोकरी गेली., पडदा टाका पडदा टाका , असा विंगेत आरडाओरडा सुरू झाला...
.
....पण प्रेक्षक या कुस्तीवरती खुश झाले होते. ही प्रचंड दाद पाहून बकासुरालाही स्फ़ुरण चढले.कुस्ती रंगत गेली. प्रेक्षकांच्या टाळ्या, शिट्यांनी सारा तंबू दुमदुमून गेला. शेठ अंबादासांच्या चारही कन्या आनंदाने नाचू लागल्या.शेठजींच्या डोळ्यंतून घळाघळा अश्रू वाहू लागले. मुरार आबांनी जांभुळगाव जिंकलं. बकासुराचे काम इतके कधीच रंगले नव्हते.
त्या आनंदात अंबादासांनी १७ माणसांचं जेवण पुन्हा मागवलं. कंपनी फ़ार दिवसांनी पोटभर जेवली.भिलारेअण्णांकडून अंबादासांनी वचनच घेतलं की यापुढे कंपनीच्या प्रत्येक नवीन नाटकाचा प्रयोग जांभुळगावात होईल. त्यापुढली ५ वर्षे अंबादासांना दर वर्षी पुत्ररत्न झाले आणि भिलारेअण्णांच्या कंपनीचीही भरभराट झाली. त्या नाटकांमधून आबांनी वृत्रासूर, संकासूर, भस्मासूर डिंभकासूर असे रोल केले... सुंदरी व श्वापद या नाटकातला ( श्वापदाचा) टायटल रोलही त्यांना मिळाला.
(कामा फाटा मारू या पुस्तकातल्या "बकासुराची कृपा" या प्रकरणातला हा दुर्मिळ फोटो...कंपनीचे मालक,, आबा आणि मागे गाडाभर अन्न.)
पौराणिक विरुद्ध सामाजिक :
पन्नासच्या दशकाशेवटी एक वस्तुनिष्ठ नाटकांचं तुफ़ान आलं.त्याकाळी संगीतनाटकांचा, पौराणिक नाटकांचा तिरस्कार करण्याची एक फ़ॆशन तरूणवर्गात रूढ होत होती. सगळं कसं नैसर्गिक नैसर्गिक म्हणजे नैसर्गिक अभिनय, नैसर्गिक संवादफ़ेक , गाणी नाहीत, स्त्री पार्टी नाहीत इ.इ.पण मुरार आबा या लाटेला भुलले नाहीत.पौराणिक नाटकातला व्हिलन ही त्यांची स्पेशालिटी. गडगडाटी हास्य , तांबारलेले डोळे , नैसर्गिक खर्जातला आवाज ही त्यांची वैशिष्ट्ये. .. तांबारलेल्या डोळ्यांसाठी ते रात्री एक स्पेशल औषध रोज घेत असत. भिलारेअण्णांच्या कंपनीचे ते मुख्य व्हिलन होते.
हॆम्लेटच्या बापाचे भूत करत असताना त्यांच्या डोईवरचे केस उभे राहत असत, हे भीषण दृश्य पाहून बायाबापड्या , पोरं बाळं रडत असत.एकदा तर हॆम्लेटच्या बापाचे भूत करत असताना त्यांच्या आवाजाने ग्यालरी कोसळली आणि २५ प्रेक्षक जखमी झाले अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे..
सीमोल्लंघन : सामाजिक नाटके :
" नैसर्गिक अभिनय करणार्या सामाजिक नाटकवाल्यांना मी फ़ाट्यावर मारतो "असे खासगीत अभिमानाने सांगणार्या मुरार आबांना पुढे मात्र सामाजिक नाटकांकडे वळावंच लागलं.१९५८ नंतर ते सामाजिक नाटकांकडे वळले याला एक प्रसंगा कारणीभूत ठरला.
१९५८ चे जांभूळगावला भरलेले पुरोगामी नाट्यसंमेलन. त्याचे निमन्त्रक होते शेठ अंबादास.. त्या वर्षीसुद्धा त्यांना त्यांच्या चौथ्या पत्नीपासून पुत्ररत्न प्राप्त झाले होते.( अशी रत्ने प्राप्त करण्याचा त्यांना छंदच होता म्हणा ना.. ते असो.)... त्या वर्षीच्या सम्मेलनात एक परिसंवाद होता " गरज कशाची? सामाजिक नाटक की पौराणिक नाटक ? "....चर्चेसाठी मुम्बईहून " बलवंत पाच्छापूरकर " नावाचे मोठे समीक्षक आले होते. कोणाचीही भीडभाड न ठेवता समोरासमोर रोखठोक बोलणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते.
चर्चेत शब्दाने शब्द वाढत गेला, तेव्हा बलवंतराव सरळ आबांना म्हणाले, " तुम्हाला सामाजिक भान नाही, दाहक वास्तव दाखवणारी प्रबोधनपर नाटकं करण्याऐवजी जर अशी बालिश पौराणिक नाटकं तुम्ही करत असाल तर मग बालनाट्यंच करा ना..."बिट्टू बिबट्या ओढी शेपट्या " नावाचं एक नाटक मी लिहून देतो हवं तर .... "... सर्व जनता हसली... त्या काळात परिसंवादाला कमी का असेनात, पण काही लोक जमत असत. मुरार आबांना हे बोलणे फ़ार लागले. पण त्यांनी परिसंवादात राग व्यक्त केला नाही.
सम्मेलनाच्या काळात बसवेश्वर लॊजवरती पाहुण्यांची सोय केली जात असे. दुसर्या रात्री पाच्छापूरकर पाचव्यांदा लघुशंकेसाठी उठले ( त्यांना वाढलेल्या प्रोस्टेट ग्रंथीचा त्रास होता), तेव्हा त्यांच्या अंगावर चादर टाकून कोणीतरी त्यांना यथेच्छ धुतले आणि त्यांचे लांबलचक केस आणि मिशा कुरतडल्यासारख्या कापून टाकल्या... पाच्छापूरकर रात्रीच जांभुळगावातून निघून गेले. पुढे त्यांनी कधीच समीक्षा लिहिली नाही. ते पुढे सौथ अफ़्रिकेत केपटाऊनला गेले आणि गांडूळ शेतीवर व्याख्याने देत तिकडेच सुखाने राहिले.
काही पत्रकारांनी या हल्ल्याची जबाबदारी घेण्यासाठी मुरार आबांवर दबाव आणायचा प्रयत्न केला. "मी असले भ्याडासारखे कृत्य करत नाही " असे म्हणत त्यांनी त्या पत्रकारांनाच " तुमचे डोके ठिकाणावर आहे काय?" असा जाब विचारला.आणि या कृत्याची जबाबदारी कधीच स्वीकारली नाही.... जांभुळगावात याच घटनेची चर्चा पुढे वर्षभर चालू राहिली. कामा फाटा मारू या ग्रन्थात या प्रसंगाचे अफ़लातून वर्णन आहे. त्या घटनेनंतर आबांनी केवळ सामाजिक नाटकांत काम करायची प्रतिज्ञा केली.
पाच्छापूरकर आणि मुरार आबा एका निवांत क्षणी..( लवंगलतिका कोचरेकर यांने चितारलेल्या रंगचित्राचा फोटो.)
साठच्या दशकातच त्यांनी निर्मिती केलेली महत्त्वाची सामाजिक नाटके
१. " केवडा आणि बेवडा " : यात दारूचे दुष्परिणाम आधुनिक पद्धतीने मांडले गेले.
२.भांगेत तुळस : फ़ोरास रोडवरच्या पतिव्रतेची करूण दर्दभरी कहाणी
३."ये जवळ ये लाजू नको" : तीन बायकांबरोबर एकत्र राहणार्या रंगेल सत्यवानाची बहारदार कथा.
४.अबब विवाह : विवाहसंस्थेचे दुष्परिणाम जगाला पटवून देणारी गोष्ट.
केवडा आणि बेवडा नाटकातील बेवड्याचे मिथक नृत्तशैलीतून स्पष्ट करताना मुरारआबा पात्रुडकर.
निवृत्ती :
या एका शब्दाची आबांना भयंकर चीड आहे... मी अजून निवृत्त नाही किंबहुना मी म्हाताराच नाही या सन्कल्पनेवर त्यांचा विश्वास आहे... अजूनही लेखकांनी माझ्यासाठी चांगली भूमिका लिहिली तर मी करेन असे ते म्हणतात. मोहन वाघ, सुधीर भट यांना ते नियमितपणे फोन करतात.दोन वर्षांपूर्वीच त्यांनी पुण्यात बालगंधर्वला त्यांच्या पाचही सामाजिक नाटकांचा एकाच दिवशी प्रयोग केला होता... त्यातल्या "दादला माझा गुणाचा" या नाटकात त्यांची दशरंगी भूमिका होती.२००६ मध्ये ८६ व्या वर्षी सुद्धा कॊलेजातला प्रेमिक त्यांनी असा रंगवला की कॊलेजातल्या काही युवतींनी त्यांचा फोटो जवळ बाळगला होता , ही आठवण मला स्वत: आबांनीच सांगितली.
परदेश दौरा :
२००० मध्ये आबांना अबब विवाह या नाटकासाठी अमेरिकेतून बोलावणे आले. मात्र ऐन वेळी अमेरिकन वकिलातीने व्हिसा नाकारला....त्यानंतर त्यांनी दौर्यासाठी दुसर्या देशात जायचे ठरवले.... जगात भारतीय लोक काय कमी आहेत? त्यांनी नवीनच देश शोधायचे ठरवले आणि अनेक देशांशी पत्रव्यवहार करून शेवटी फ़िजी देशाच्या मराठी मंडळाचे आमंत्रण मिळवले. त्यात त्यावेळचे पंतप्रधान महेंद्र चौधरी यांच्याकडून खास स्नेहभोजनाचेही आमंत्रण होते.मोठा प्रवास करून आबा आणि सहकलाकार फ़िजीमध्ये पोचले त्याच रात्री त्यांना विमानतळावरूनच तुरुंगात नेण्यात आले.आबांना कळेना, आपले काय चुकले?... एका सहकलाकाराने तेथील पोलिसांवर आवाज चढवताच त्याने त्याला पिस्तुल दाखवले... सगळेच गप्प झाले.....तिथल्या एका मराठी शिपायाला आबांनी अत्यंत नम्रपणे विचारले की हा सारा प्रकार काय आहे?.. त्याने माहिती दिली की जॊर्ज स्पाईट नामक एका बंडखोर नेत्याने सारा देश ताब्यात घेतला असून पंतप्रधान सध्या जॊर्जच्या ताब्यात आपल्या निवासस्थानी कैदेत आहेत... "आणि आमचे काय?" आबांनी विचारले. तो हसून म्हणाला," पंतप्रधानांचे सर्व पाहुणे आल्याआल्या तुरुंगात रवाना करायचे आदेश आहेत." " आणि नाटकाचं काय?" तो गूढ हसला...
मुरार आबा ( पाठमोरे ) जॊर्ज स्पाईटबरोबर ...."फ़िजीने मला खूप काही दिले."
फ़िजीच्या तुरुंगात राजकीय कैद्यांसाठी वेगळा विभाग नव्हता....जन्मठेप आणि सक्तमजुरी भोगणार्या कैद्यांबरोबर हे महाराष्ट्रातले पापभीरू सज्जन गृहस्थ तीन दिवस आणि तीन रात्री राहिले.... तिथेही मुराराआबांनी तुरुंगाधीक्षकाकडे परवानगी काढून तीन रात्री नाटक केले. एकदा भीम बकासुर ( नव्या संचात ) आणि दोनदा अबब विवाह...मात्र ड्रेपरी देण्यास अधिकार्यांनी असमर्थता व्यक्त केली..... मग विना कॊश्चूमचे अबब विवाह नावाचे नाटक फ़िजीकर गुन्हेगारांनी पाहिले....मात्र त्यातला क्रान्तीकारक विचार एका कैद्यास अजिबात पटला नाही, त्याने नाटक संपल्यानंतर येऊन आबांच्या कानाखाली ओढली..... त्यानंतर आबांना ऐकू येइनासे झाले..... पण आबांचे त्यावरही काही तक्रार नव्हती. ( करूनही अर्थातच काहीही फ़ायदा नव्हता)... आबांच्या मते त्यांच्या अभिनयाला दिलेली पावती होती ती... ( त्यानंतरच मुरार आबांना मराठी नाट्यस्रुष्टीचे एडिसन असे नाव पडले. त्यानंतरही ऐकू येत नसताना आबांनी लीलया नाटकात कामे केली.... " अभिनयासाठी ऐकू यायची गरजच काय?" असा त्यांचा रास्त सवाल असे... स्वत:चे संवाद ते उत्तम बोलत असत.)
सुवा आंतरराष्ट्रीय तुरुंगात नवीन टीमला घेऊन केलेल्या भीम आणि बकासूर प्रयोगानंतर...
कॊस्चूम्स नसतानाही केलेला प्रयोग...
तरूण रंगकर्मींविषयी मत :
त्यांच्याच शब्दात .. " माजलेत रे भो**चे, अरे प्रेक्षक म्हणजे मायबाप हे त्यांना कळायला नको ?.. प्रेक्षकांवर अरेरावी करावी यांनी?
काय तर म्हणे मोबाईल वाजवू नका, लहान मुले आणू नका, म्हातारे दमेकरी आणू नका, आणले तर खोकू देऊ नका...वेफ़र खाऊ नका, जिलबी खाऊ नका... प्लेस्टिकच्या पिशव्या वाजवू नका... आवाज करू नका... अरे इतक्या सूचना द्यायला हे काय बादशाही बोर्डिंग हाउस आहे? आणि इतक्या सूचना तरी का ? तर या भडव्यांच्या नरड्यातनं मोठा आवाज फ़ुटत नाही ना? कॊलर माईक लावतात भो**चे,तरी घाबरतात.. प्रेक्षकांनी आवाज केला तर यांचे बोलणे ऐकू कसे जाणार ? म्हणून ही अरेरावी..... स्वत:च्या उणीवा लपवायला प्रेक्षकांना शिव्या... आताचा एक फ़ोकलीचा मोठा कलाकार तर प्रेक्षकाचा मोबाईल वाजला की पायातली चप्पल फ़ेकून मारतो म्हणे.... अरे चप्पल जोडे मारायला ही काय पत्रकार परिषद आहे की तो कोणी राजकीय नेता आहे?
आपल्या प्रेक्षकाबद्दल काही आदर नको ? ...
अरे आदर दाखवला गंधर्वांनी... आम्ही... आम्ही तिकीट काढायला तयार असलेल्या कोणाला यायला मनाई नाही केली...
आणि आवाज पुरत नाही अशी कोणाची तक्रारसुद्धा नाही आली... माझ्या नाटकाच्या वेळी तर रंगमंचाच्या पुढेच कोपर्यात १० वर्षाखालील मुलांची कबड्डी स्पर्धा रंगलेली असे तर पाच वर्षाखालील मुली पळण्याच्या स्पर्धेत भाग घेत असत.... दमेकरी खोकत असत,कधी वेफ़र बर्फ़ी खाकरे, कधी पोळीभाजी, बटाटेवडे, क्वचित चिकन मटणाच्या मेजवान्या चाललेल्या असत ... आणि समोर आमचे नाटक चालू असे..या नटराजाशप्पथ सांगतो, लहान लहान बाळे सुरात रडत असत पण नाटक चालू असे. ...
काय सांगायचं?उगीच पाश्चात्यांच्या फ़ालतु संकल्पना आणून तुम्ही मोठे रंगकर्मी होणार नाही आहात म्हणावं.... तुलना केली तर आताची ही अरेरावी पाहवत नाही रे बाबा..."
स्त्रिया आणि मुरार आबा :
स्त्री पुरुष संबंध हा मुरार आबांचा लहानपणापासूनचा कुतुहलाचा विषय राहिला.
त्यांच्या आत्मकथनाप्रमाणे लहानपणीच ते मोठे झाले. त्यांनी स्त्रियांना समजून घ्यायचा त्यांच्या बालबुद्धीप्रमाणे अनेकवेळा प्रयत्न केला.कधी ते यशस्वी झाले कधी त्यांच्या जीवनात आलेल्या स्त्रिया यशस्वी झाल्या.... पण त्यांचा रंगमंचावरचा प्रवास अथकपणे चालूच राहिला.... या काळात मोहाचे पुष्कळ क्षण आले आणि गेले, पण रंगमंचाविषयीचे प्रेम, आदर , आस्था, माया सदैव टिकून राहिले.इथे एकच महत्त्वाचा उल्लेख करणे आवश्यक आहे.एकदा एका बलाढ्य चित्रकंपनीच्या मालकिणबाई असलेल्या हिन्दी चित्रपट निर्मात्या स्त्रीने त्यांच्यावर अवघड प्रसंग आणला होता.( या बाईंना त्यांच्या आयुष्यभराच्या कामगिरीबद्दल मानाचा " चित्रपत्नी " असा पुरस्कार मिळाला होता.)... या चित्रपत्नी बाईने त्यांना चित्रपटात देहप्रदर्शन करण्यासाठी बोलावले होते, आणि वाट्टेल ती किंमत देऊ केली होती.( फ़क्त अट एकच होती की "यापुढे नाटकात काम करायचे नाही").. त्या चित्रपत्नीची ऒफ़र त्यांनी क्षणात धुडकावून लावली ...( हा बाणेदारपणा त्या काळात यांनी दाखवला होता आणि तरी समीक्षक यांना कायम बी ग्रेडचे ठरवणार... असो...)
शेठ अंबादास वारल्यानंतर त्यांच्या चौथ्या पत्नीशी आबांनी प्रथम विवाह केला.अम्बादासांची पुष्कळ मालमत्ता त्यात त्यांना मिळाली पण ( अंबादासांच्या पूर्वीच्या ) मुलांशी सतत भांडणे, कोर्टात चाललेले सततचे खटले आणि पत्नीची संशयी वृत्ती यामुळे आबांनी लवकरच घटस्फ़ोट घेतला. त्यापुढचे तीनही विवाह त्यांनी अभिनेत्रींशीच केले. पण त्यांच्याशीही निरनिराळ्या कारणांनी घटस्फ़ोट झाले.
त्याचे डीटेल्स म्हणजे एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे.
" इतके विवाह करूनही मला स्त्रिया काही कळल्या नाहीत, " ही गोष्ट ते इतक्या प्रांजळपणे कबूल करतात.
"अबब विवाह ’ हे नाटक १९६४ साली मंचावरती आलं.त्यातल्या संयोगिता नावाच्या नटीशी त्यांनी चौथा विवाह केला.तो बराच म्हणजे दोन तीन वर्षे टिकला.घटस्फ़ोटानंतर "अबब विवाह" या नाटकाच्या हक्कावरून त्यांचे तिच्याशी भांडण झाले, कोर्टात हा खटला दीर्घ काळ चालला मग संयोगितानेही या नाटकाचे एकपात्री प्रयोग केले आणि ते का कोण जाणे सुपरहिट ठरले.
... मी याबद्दल आबांना विचारलं तर म्हणाले, " खरंतर मीच तिला एक युक्ती सांगितली होती... अनोखी जाहिरात करायची... नाटकाची हिरॊईन हीरोला कडेवरती घेऊन चाललेली आहे, असा फोटो टाकायचा जाहिरातीत.... ... त्या जाहिरातीने काही संस्कृतीरक्षक खवळले आणि मला बदडायलाही आले, पुढे त्या जाहिरातीवर अश्लील म्हणून कोर्टात केस झाली...भरपूर नाव मिळाले आणि प्रयोग धडाआ प्रयत्न केलाधड चालायला लागले. .. काही काळानंतर मोहन ( तोंडवळकरांचा ) त्यानेही अशीच आयडिआ काचेचा चंद्रसाठी जहिरात करताना वापरली.
अबब विवाह ची त्या काळात गाजलेली जाहिरात.
पुढे कोर्टात संयोगिताने 'स्त्री ही अनंत काळाची माता असते' हे आम्हाला या जाहिरातीतून दाखवायचे होते असे सांगितले. खटला जिंकलो .. तोपर्यंत मात्र माझा घटस्फ़ोट झालेला होता.... अगं ए, जरा घोरपडीचं तेल आण जरा.."
हे शेवटचं ते आतल्या कोणालातरी उद्देशून बोलले होते.आतून एक वृद्ध सत्तरीची स्त्री आली...." ही माझी पूर्वीची पत्नी संयोगिता ... हल्ली आम्ही तसेच एकत्र राहतो...आणि एक लक्षात ठेव , बद्धकोष्ठाला पादाभ्यंग बरा"....... ती स्त्री लाजली आणि घोरपडीचे तेल आबांच्या तळव्याला चोळू लागली... घोरपडीचे तेल काशाच्या वाटीने आपल्या पूर्वीच्या नवर्याच्या पायाला चोळणार्या त्या मानिनीकडे पाहून डोळे भरून आले....मुरार आबा त्या वेळी आपल्या अबब विवाह या नाटकाची डीव्हीडी पाहत होते.आणि (काहीही ऐकू येत नसल्याने ) स्वत:च दृश्याप्रमाणे संवाद म्हणत होते... ते अनुपम दृश्य डोळ्यात साठवतच मी तिथून बाहेर पडलो.
तेवढ्यात आबांची हाक आली, " घाटावरती फिरायला येणार का रे? ....तुम्ही तरूण मंडळी कशाला याल म्हातार्याबरोबर?...." मी येतो म्हणालो तरी त्यांचे बोलणे चालूच होते... एकदम त्यांचा मूड उदास वाटायला लागला... "लागल्या पैलतीरी नजरा .. " गाता गाता मला एकदम म्हणाले," सांग पाहू ही कविता कोणाची ?.. महान निसर्ग अभ्यासक प्राध्यापक प्रीतम चांदगुडे यांची... अरे तो चांदगुड्या माझ्या नाटकातली पदं स्वतःच्या व्याख्यानात गाऊन टाळ्या मिळवायचा... पण माफी मागितली त्यानं ..आणि मग गेला.....माफी... काय ? ... कामा फाटा मारू वाचलंस काय? " आज फार असंबद्ध बोलत होते आबा..." त्यात मी सारं प्रांजळपणे कबूल केलं आहे...दोन गोष्टी सोडून... एक.. तो पाच्छापूरकर काय करतो रे हल्ली? नंबर दे बरंका त्याचा... गांडूळ विकायला लावलं रे मी त्याला शेवटी... एकट्यानं एकट्यानं नुसती घोंगडी टाकून बुकलला त्याला... खरंतर हाणायची गरज नव्हती..पण तत्त्व म्हणजे तत्त्व... पण समीक्षाच सोडली त्यानं... म्हणून त्याची माफी ... आणि दुसरे आमचे शेठ अंबादास... त्यांच्या चांगुलपणाचा फारच गैरफायदा घेतला मी... पण त्या देवाच्या क्लार्कापुढे हिशोब द्यायचाय हो सार्यांनाच्...म्हणून त्यांची माफी .. काय?" शेवटाचा प्रश्न संयोगिता बाईंना होता... त्यांची नजर शून्यात हरवली होती... मग आबाही उदास हसून पाण्यात खडे मारू लागले.
.. जाताजाता न राहवून मी मुरार आबांचा फोटो घेतला.
प्रतिक्रिया
1 May 2009 - 12:06 am | बिपिन कार्यकर्ते
मास्तर!!!!!!!!!!!!!!!! साष्टांग नमस्कार.... तुम्हाला आणि तुमच्या मुरारआबांना..................
सुंदरी व श्वापद, कामा फाटा मारु
१. " केवडा आणि बेवडा " : यात दारूचे दुष्परिणाम आधुनिक पद्धतीने मांडले गेले.
२.भांगेत तुळस : फ़ोरास रोडवरच्या पतिव्रतेची करूण दर्दभरी कहाणी
३."ये जवळ ये लाजू नको" : तीन बायकांबरोबर एकत्र राहणार्या रंगेल सत्यवानाची बहारदार कथा.
४.अबब विवाह : विवाहसंस्थेचे दुष्परिणाम जगाला पटवून देणारी गोष्ट.
=)) =)) =)) =)) =))
अवांतर : पुढचे थोर व्यक्तिमत्व महान निसर्ग अभ्यासक प्राध्यापक प्रीतम चांदगुडे का?
बिपिन कार्यकर्ते
1 May 2009 - 12:20 am | घाटावरचे भट
=)) =)) =))
हसता हसता लोळत साष्टांग नमस्कार...
बाकी अरे इतक्या सूचना द्यायला हे काय बादशाही बोर्डिंग हाउस आहे? हे झकासच!!
1 May 2009 - 11:30 am | परिकथेतील राजकुमार
हेच बोलतो !
आपण धन्य आहात , महान आहात ___/\___
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
1 May 2009 - 12:18 am | नंदन
झकास लेख, मास्तर. आबांचे तरूण रंगकर्मींबद्दलचे मत चिंतनीय (की चिंत्य?) आहे :)
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
1 May 2009 - 12:21 am | चतुरंग
मास्तुरे तुम्ही सुटलेले आहात! :) ____||____
एकच पद मनात घोळते आहे
नमन नटवरा विस्मयकारा!!! ;)
(सविस्तर समीक्षा करेनच परंतु आता न राहवून जागा आरक्क्षित करुन ठेवतो! ;) )
चतुरंग
1 May 2009 - 12:22 am | श्रावण मोडक
चालू द्या...
1 May 2009 - 12:25 am | मुक्तसुनीत
आगामी प्रतिसादाकरता ही जागा राखीव आहे. सध्या गडाबडा लोळण्यात आम्ही व्यस्त आहोत.
1 May 2009 - 12:26 am | बेसनलाडू
(अंपायर्)बेसनलाडू
1 May 2009 - 12:56 am | पिवळा डांबिस
कं मास्तर, सगलां बराबर ठीक हाय ना?:)
तू डाक्टर की गोंधळी रं? काय पेशंटबिशंट येत ना सं दिसतांव!!:)
मना तर पयल्यांदा हा लेक टार्यानं लिवंन तुज्ये नावावर टाकला असांच वाटला!!!!:)
का तू तुज्ये लेक टार्याचे नावान टांकतंस?
तुमचा लोकान्चा साला काय भरोसा नाय!!!
-(सबष्टीट्यूट) बिरटिश
1 May 2009 - 1:48 am | घाटावरचे भट
=)) और एक सिक्सर...सॉरी सॉरी चुकलो...डीएलएफ मॅक्सिमम!!!
1 May 2009 - 6:32 pm | टारझन
बाबो ... ओ पिडेश्वरम ... मास्तर एक मुरलेला पट्टीचा लेखक .. वाक्यन वाक्य तोलून लिवणारा ..
आन आम्ही पडलो हिण हिडिस लिवणारे ... कुटं बरोबरी करता राव ... म्या उगाच २ मिनीट हारबर्याच्या झाडाव चढलो ना ...
मास्तर .. आहो काय लिहीता काय ... एकदम खत्री ..
_______/\______
(टरमरकर मास्तर)
1 May 2009 - 1:38 am | धनंजय
दुर्मिळ छायाचित्रे जमवताना काय कष्ट झाले असतील!
1 May 2009 - 1:44 am | प्राजु
आणखी एक षट्कार!!!
जोरदार..............!
(आता अवलिया यांनाही भेटायला जाणार का? ) ;)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
1 May 2009 - 7:24 am | अवलिया
हा हा हा !!
मागच्या वेळेला बाबाजींच्या भेटीस आम्हाला का नेले नाही असे म्हणुन काही जण नाराज झाले होते तर आमची टोपी का उडवलीस म्हणुन काही जण नाराज झाले होते ! :)
--अवलिया
1 May 2009 - 4:50 am | रेवती
लेख पूर्ण वाचला नाही अजून....
आत्ता एवढे हसणे पुरे झाले.
पुर्ण वाचून 'महान' प्रतिक्रिया देइनच.;)
उत्कृष्ट (आणि दुर्मीळ) छायाचित्रं जमवल्याचे बक्षीस आपल्यालाच आहे.
रेवती
1 May 2009 - 7:21 am | अवलिया
ठ्ठो ! ठ्ठो ! ठ्ठो !
=))
बास ! बाकी शब्द नाही !!
भयानक सुंदर :)
--अवलिया
1 May 2009 - 7:51 am | प्रमोद देव
आबाने एक गोष्ट सांगितलेली दिसत नाहीये त्याच्या आत्मचरित्रात.
बकासुराच्या भुमिकेत एक गाणं आहे...
एक लाडू खाऊ भाऊ दोन लाडू खाऊ
चाऊ माऊ पत्रावळीचे पाणी पिऊ...
तर ह्या गाण्याला आमचे संगीत होते. सुरुवातीला आबाला हे गाणे नीट म्हणताच येत नव्हते. चांगल्या पट्ट्या मारमारून त्याच्याकडून तयार करून घेतले एकदाचे.
ह्या गाण्याला तो हमखास वन्समोर घ्यायचा. आता आठवले आणि गहिवरून आले.
आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
1 May 2009 - 8:53 am | क्रान्ति
सकाळी सकाळी इतकी जोरदार मेजवानी! दिवस मस्त जाणार.
=)) =)) =)) =)) =)) =))
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com
1 May 2009 - 9:30 am | डॉ.प्रसाद दाढे
सकाळी सकाळी हसून हसून मेलो.. खत्तरनाक!
1 May 2009 - 11:28 am | स्वाती दिनेश
मास्तर... भाग २ जोरदार एकदम.
एक शंका- जालिंदरबाबांनी लिहिलेल्या नाटकात आबांची प्रमुख भूमिका होती त्याचा उल्लेख चुकून राहिला का?
स्वाती
1 May 2009 - 12:30 pm | अभिज्ञ
उच्च.
=)) =)) =)) =))
अभिज्ञ.
--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
1 May 2009 - 2:46 pm | सहज
फोटोमुळे खास मजा आली.
:-)
चालू द्या.
1 May 2009 - 3:06 pm | आंबोळी
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
प्रो.आंबोळी
1 May 2009 - 4:00 pm | स्वामि
मुरारआबा पात्रुडकर हे नाव वाचल्यावर लेख भडकमकर मास्तरांचा असेल हे वाटलच.जबरदस्त!!! :)) :)) :))
1 May 2009 - 4:53 pm | मेघना भुस्कुटे
आयला, मास्तर, लय बेक्कार..... तिसर्यांदा वाचूनपण हसतेय...