१ मे २००९ महाराष्ट्र राज्य स्थापना सुवर्ण महोत्सवी
माझी ही कविता माझ्या महाराष्ट्रासाठी !
संतांची पुण्यभूमी
वीरांची रणभूमी
जगात वेगळा
महाराष्ट्र माझा
शिवबा माझे दैवत
भवानीची मला सोबत
जोशात लढेन
दर्याला हरवेन
पंचगंगेचे पाणी
कोल्हापूरी वाणी
शत्रुंनो तलवार म्यान करा
वाहतील रक्तांच्या धारा
महाराष्ट्र गर्व माझा
कवितेमधील व्याकरण व लय चुका सुधारण्यासाठी प्राजु ह्यांनी जी मदत केली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.
प्रतिक्रिया
26 Apr 2009 - 6:20 pm | अविनाशकुलकर्णी
अशी कविता म्हणयला पर प्रांतियांच्या लोंढ्या पुढे मराठी माणुस रहायला तर हवा ना>>>.
यूपीच्या चणेवाल्याने ठोसा दिला, तरी राज ठाकरे यांची बत्तीशी पडेल. ते आम्हाला काय आव्हान देणार? यूपीतून मुंबईत येताना सन्मानाने या, मी तुमच्या संरक्षणासाठी बसलोच आहे. शिवसेनेचे काका म्हातारे झाले आहेत, त्यांना बनारसच्या गंगेत पाठवा, त्यांची सगळी पापे धुतली जातील.............अबु अझमी बरलला
मुंबईत आम्ही छठपूजा करूच!- लालू
25 Apr 2009, 0135 hrs IST
26 Apr 2009 - 6:22 pm | दशानन
एकजुटता हाच मुलमंत्र !
थोडेसं नवीन !
26 Apr 2009 - 6:24 pm | शितल
राजे,
कविता मस्त केली आहे. :)
26 Apr 2009 - 8:26 pm | अवलिया
हेच म्हणतो
--अवलिया
26 Apr 2009 - 6:36 pm | यशोधरा
मस्त आहे कविता!
26 Apr 2009 - 6:46 pm | अनंता
|| कैवल्याचा पुतळा
प्रगटला भूतळा
चैतन्याचा जिव्हाळा
ज्ञानोबा माझा ||
विशेष म्हणजे ज्ञानोबारायांविषयीचे हे वर्णन महाराष्ट्रालाही तंतोतंत लागू पडते.
हा हा हा... आता मी फेमस होणार!!
सुबरु वन, सुबरु टू , सुबरू थ्री....
26 Apr 2009 - 9:07 pm | प्राजु
जय महाराष्ट्र..!
लगे रहो राजे. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
26 Apr 2009 - 10:30 pm | क्रान्ति
राजे, मस्त कविता.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com