राम राम सभ्य मिपाकर स्त्रीपुरुषहो,
आत्ताच ऑनलाईन आलो. नेहमीप्रमाणेच मिपाबद्दल काहीना काही सूचना करणारे, कंप्लेन्टी करंणारे, एकमेकांबद्दल तक्रारी करणारे दोन-पाच व्य नि आले होते. परंतु त्यातील एक व्य नि मला खूप सुखावणारा होता, आनंद देणारा होता. त्या व्य नि तील जो मजकूर होता त्याचे श्रेय अर्थातच मिपाचे आणि मिपाकरांचे! :)
आपल्याही सर्वांना त्या व्य नि तील मजकूर निश्चित आनंद देऊन जाईल या हेतूने तो व्य नि मी येथे देत आहे. व्य नि पाठवणार्या व्यक्तिचे नाव उघड करणे अर्थातच उचित होणार नाही. त्याचप्रमाणे व्य नि तील काही मजकूरदेखील मी संपादित करत आहे जेणेकरून व्य नि पाठवणार्या व्यक्तिचे नाव जाहीर होणार नाही.
माझ्या मते व्य नि कुणी पाठवला हा मुद्दा गौण आहे. परंतु त्यातील मजकूर मात्र सर्वांना आनंद देऊन जाईल अशी खात्री वाटते! :)
व्य नि चा मजकूर खाली निळ्या अक्षरात देत आहे. मी केलेले संपादन ठळक अक्षरात देत आहे -
प्रिय तात्यास,
सप्रेम नमस्कार,
मी योगायोगानेच मिपावर आलो.मिपावरील अस॑ख्य सिध्दहस्त लेखका॑च्या प्रेरणेने मीही मिपावर लेखन करावयास लागलो.
ति ते लेखन चोरुन वाचत असे, त्यामुळे माझ्या खर्या प्रेमाची साक्ष तिला पटली.तिचा आणी माझाही "ईगो" गळुन पडला.
आज तिने फोन केला आम्ही दोघे आज पुन्हा एक झालो.
हे आपले आणी आपल्या मिपाचे माझ्यावर अ॑नत ऊपकार आहेत.
खरोखरच आपल्याला कोटी-कोटी धन्यवाद.....
मी आपला ऋणी आहे,आपल्या ऊपकाराची मी कधीही आपणास कधीही परतफेड करू शकत नाही.पण मी आपल्या कधीही काहीही कामी पडलो तर स्वतला भाग्यवान समजेन.
तानपुर्याच्या तारा आता नव्याने जुळल्या आहेत असं वाटतं! त्या आता अशाच सुरेल झंकारत राहोत हीच शुभेच्छा! :)
आपला,
(कृतार्थ आणि कृतज्ञ) तात्या अभ्यंकर.
प्रतिक्रिया
22 Apr 2009 - 11:32 pm | प्राजु
मिपाचा आणि तात्यांचा विजय असो..
सदर सभासदाने सर्व मिपाकरांना लग्नाला बोलवावे. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
22 Apr 2009 - 11:35 pm | यशोधरा
अरे वा! अभिनंदन!
ह्या व्यक्तीचेही आणि तात्या आणि मिपाचेही!
22 Apr 2009 - 11:37 pm | शितल
प्राजु आणि यशोधराच्या मताशी सहमत. :)
मिपा, तात्या आणि त्या दोघांचे ही अभिनंदण. :)
23 Apr 2009 - 7:29 am | सायली पानसे
तात्या तुमचे आणि जोडप्याचे अभिनंदन! आणि शुभेच्छा.
23 Apr 2009 - 12:35 am | संदीप चित्रे
आनंदात सहभागी
23 Apr 2009 - 12:49 am | अनामिक
-अनामिक
23 Apr 2009 - 12:31 am | विकास
चांगलीच बातमी आहे! मिपाचा वापर असाच वृद्धींगत होवोत!
धन्यवाद तात्या!
23 Apr 2009 - 1:50 am | मुक्तसुनीत
विकास राव आणि अन्य समस्त मिपाकरांबरोबर सहमत आहे ! वर्धिष्णु: मराठीविश्ववंदिता ! :-)
23 Apr 2009 - 3:38 am | पिवळा डांबिस
क्या बात है!!!
आमच्या जोडप्याला शुभेच्छा!!!
23 Apr 2009 - 5:29 am | घाटावरचे भट
असेच म्हणतो.
23 Apr 2009 - 11:22 am | अवलिया
हेच बोलतो
--अवलिया
23 Apr 2009 - 11:24 am | नंदन
सहमत आहे, अभिनंदन!
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
23 Apr 2009 - 11:36 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
अभिन॑दन! यापुढे स॑वादाचा अभाव कधीच होऊ नये यासाठी अनेक शुभेच्छा.
अदिती
स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?
24 Apr 2009 - 9:57 am | मैत्र
मिपा च्या माध्यमातून इतकी आनंदाची गोष्ट घडून आली याचाच खूप आनंद झाला!
अनेक शुभेच्छा!
3 May 2009 - 3:16 am | टारझन
सही !!! आज पर्यंत ऑर्कूटवर असे किस्से झाल्याचं माहीत होतं ... आता मिपावरही !! झकास !!
तात्या .. चियर अप !!
तसं नाव उघड करण्यात गैर काही नव्हतं कारण अनैतिक असं काही नाही वाटत यात, असो :)
23 Apr 2009 - 12:35 am | समिधा
मिपा, तात्या आणि त्या दोघांचे ही अभिनंदन
समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)
23 Apr 2009 - 5:40 am | प्रमोद देव
छान!
आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
23 Apr 2009 - 7:19 am | प्राची
जोडी जमली रे... 8>
अभिनंदन सर्वांचे. =D>
लग्नाला बोलवायला विसरू नका.
23 Apr 2009 - 7:21 am | विनायक प्रभू
बरे वाटले
23 Apr 2009 - 7:38 am | दिपक
अभिनंदन ! आता सुखाने संसार करा. तुमचे प्रेम रोज बहरत राहो. शुभेच्छा ! :)
23 Apr 2009 - 7:44 am | भडकमकर मास्तर
छान झाले... आनंदात सहभागी आहे...
_____________________________
कुठे संत तुकाराम? कुठे शांताराम आठवले?
23 Apr 2009 - 7:51 am | प्रकाश घाटपांडे
वा!वा! सोताचा सोता गळुन पड्ला कि मंग कस मोकळ वाटतय! म्हजी उगाच विल्लॅष्टीक ला विस्त्री नको!
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
23 Apr 2009 - 7:52 am | काळा डॉन
अरे वा! छान छान! लाईफच बनलीकी तुमची. :)
माझ्या मते तुम्ही आता स्वत:हुनच सांगून टाका तुम्हि कोण ते, त्यात लाजायच कशाला? :X
~everything is fair in love and war!
23 Apr 2009 - 11:18 am | परिकथेतील राजकुमार
चला प्रेमभंगाचे दुखः संपले म्हणायचे ;)
परा होम्स
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
24 Apr 2009 - 12:24 am | टिउ
अभिनंदन!
3 May 2009 - 3:20 am | टारझन
हाच तो .. पर्या ... साल्या मला तुझ्यावरट डाऊट्टे ... तुझे पण सताठ प्रेमभंग झालेले ना ?
23 Apr 2009 - 11:24 am | शक्तिमान
वा वा... मिपा आता मॅचमेकर पण झाले म्हणायचे!
23 Apr 2009 - 11:27 am | सागर
अभिनंदन !
आता सुखाने संसार करा. माझ्याकडून एक गोष्ट सांगू इच्छितो
संसाराचा पाया हा मुख्यपणे एकमेकांवर असलेला अतूट विश्वास आणि प्रेमाच्या आधारावर उभा असतो.
कोणत्याही प्रकारच्या शंका, संशय, वा खुलासे हवे असतील तर त्याचे प्रकटन स्वतःच्या जोडीदाराकडेच करणे गरजेचे असते.
समज-गैरसमज जे काही दूर होतात ते आपांपसातील संवादानेच दूर होतात. संवाद सुरु झाला की हळू हळू तो सुसंवाद होतो.
मग सोप्या गोष्टी ज्या आपणच क्लिष्ट करुन ठेवतो त्या सुतासारख्या सरळ होतात... दोघांतील समज-गैरसमज दोघांनीच दूर केले तर मनातील मळभ एकदम स्वच्छ आभाळासारखे होते पण तिसरी व्यक्ती आली की त्यात ढग दाटून येतात.
मनापासून आनंद झाला की मिसळपाव मुळे एक घर पुन्हा सजीव झाले.
शुभं भवतुं :)
- सागर
23 Apr 2009 - 3:00 pm | सँडी
अभिनंदन!
मनापासून आनंद झाला की मिसळपाव मुळे एक घर पुन्हा सजीव झाले.
अगदी मनातलं बोललास सागर.
लग्नाला बोलवा सगळ्यांना(कमीत कमी तात्यांना तरी;))
नांदा सौख्यभरे!
-सँडी
काय'द्याच बोला?
24 Apr 2009 - 1:39 pm | सागर
सँडी,
त्यांचे लग्न झालेले आहे की नाही हे फकस्त तात्याच सांगू शकतात ;) प्रतिसादावरुन तरी असे वाटत आहे की लग्न झालेले असावे.
पण छान वाटले की एक घर पुन्हा सजले... :)
सागर
23 Apr 2009 - 11:28 am | यन्ना _रास्कला
तात्त्याची करनी आनी मिपाच्या नारलात गोडगोड पानी.
*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यानी पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !
23 Apr 2009 - 11:29 am | उदय सप्रे
असेच एकमेकांशी मिसळा आणि नात्यांना पावा , धन्यवाद रे मिसळ पावा !
यापेक्षा जास्त मोठी पोचपावती आणि काय असू शकते तात्या?
मिपा मुळे खरोखरच चांगले वाचावयास मिळते आणि सर्वांना संधी मिळते , तात्यांचे व्यक्तिशः आभार .
उदय सप्रेम
23 Apr 2009 - 11:30 am | वेताळ
पण मला एक कळाले नाही ते दोघे इथे भेटले का अगोदर त्याचे प्रेम होते ,त्यात दुरावा येवुन परत त्याची भेट मिपावर झाली. जरा नीट कळाले तर बरे होईल.तोपर्यत मिपा,तात्या व त्या दोघाचे अभिनंदन.
खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
23 Apr 2009 - 12:39 pm | विजुभाऊ
वॉ........बोळा निघाला रे.............. ;)
जय हो...
वाजवा रे वाजवा ....ढुम ढुम ढुमाक ढुम ढुम ढुमाक ढुम ढुम ढुमाक ढूम.......
आज तेरी नजरों से नजरे मिलाने की इजाजत चाहता हुं
जीनेसे पहले मरने की इजाजत चाहत हुं.
ये मुमकीन नही के खामोंश चला जाऊं
तुम्हे अल्फाजों मे बसाने की इजाजत चाहता हुं........विजुभाऊ सातारवी
24 Apr 2009 - 10:12 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आज तेरी नजरों से नजरे मिलाने की इजाजत चाहता हुं
जीनेसे पहले मरने की इजाजत चाहत हुं.
ये मुमकीन नही के खामोंश चला जाऊं
तुम्हे अल्फाजों मे बसाने की इजाजत चाहता हुं
विजूभौ, थांबू नका ! चालू द्या. :)
23 Apr 2009 - 1:51 pm | चन्द्रशेखर गोखले
मिसळ आणि पावाचं नातं आहेच मुळी अतुट , या जोडी चा(मिपा) आदर्श ठेवून तर अनेक जोड्या जमल्या तर त्यात नवल ते काय ?
तात्यांसाठी जयहो !!!
23 Apr 2009 - 2:26 pm | शक्तिमान
प्रतिसादासाठी जय हो !!
23 Apr 2009 - 2:37 pm | चतुरंग
मिसळपाववाल्यांचा आणि हाटेलवाल्या तात्या शेट्टींचा विजय असो.!! :)
चतुरंग
23 Apr 2009 - 7:29 pm | दिपाली पाटिल
मिपा, तात्या आणि त्या दोघांचे ही अभिनंदन ;;)
दिपाली :)
23 Apr 2009 - 8:01 pm | देवदत्त
अभिनंदन,
तात्यांचे आणि त्या दोघांचेही.
24 Apr 2009 - 9:55 am | खडूस
- आहेच मी खडूस
पटलं तर बोला नाहीतर गेलात उडत
24 Apr 2009 - 10:09 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तात्या, मिपाचे असे साइड एफेक्टस् होतील असे वाटले नव्हते..! :)
'त्या' दोघांचे आणि तात्यासेठचे अभिनंदनच !
-दिलीप बिरुटे
(कुछ कुछ होता है वाला )
3 May 2009 - 2:15 am | जोशी पुण्यात दन्गा
लग्नाचे बोलावणे राहूद्यात हो !! पण त्या २ घ्नानी सगळ्यान्ना मिसळ-पाव ची मेजवानी दिली पाहीजे !!
बेडेकर बद्दल काय मत आहे लोकहो.... जमायच का?
म्हणजे जोडी नक्की कोण तेही कळेल.... :)