प्राजू तै ची भारी रोमॅण्टीक कविता पौर्णिमा वाचून आम्हाला आणखी एक (एकतर्फी) रोमान्स आठवला.
तोच शब्दांत मांडण्याचा प्रयत्न! :X
चू. भू. द्या. घ्या.
देशात रंगलेल्या खेळात येशील का?
हा डाव मतपेटीचा तू पूर्ण करशील का?
बघ मागतो तुला मी आकाश बहुमताचे
मज आस जिंकण्याची, (तू) 'टेकू' होशील का?
(मत)पेटीस घेत हाती मल्हार छेडतो मी
आश्वासनांस भुलूनी, मज चिंब करशील का?
दिवसात कैकवेळा 'मिरवून' येत असतो!
(सत्ता-मुकुट घेऊन स्वप्नी येशील का?)
'भिजती' अनेक रात्री (मत) काळजीत तुझीया
दारूस मी दिलेल्या, वेळी(च) स्मरशील का?
घेतले मीच माझे उद्दीष्ट जीवनाचे
सत्तेत फिरून येण्या, तू 'हात' देशील का?
जरी पाहिले पुन्हा मी तसलेच(!!) स्वप्न माझे
देऊन भीक पुन्हा, सरकार देशील का?
राघव
प्रतिक्रिया
14 Apr 2009 - 6:41 pm | मदनबाण
व्वा. सॉलिइइट्ट.
मदनबाण.....
I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.
14 Apr 2009 - 6:42 pm | अवलिया
मस्त रे राघवा !!
--अवलिया
14 Apr 2009 - 6:48 pm | परिकथेतील राजकुमार
राघवा अप्रतीम रे रघुनंदना.
एकदम रामबाणच मारलास की तु. आणी आमच्या मदनबाणाला सुद्धा भावला बघ तो ;)
कवितेतले आम्हाला फारसे कळत नाही पण विडंबनात आम्हास काहि गती आहे असे वाटते.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
14 Apr 2009 - 6:49 pm | प्राजु
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अगदी चपखल बसते आहे.
मस्त...!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
14 Apr 2009 - 7:35 pm | मराठमोळा
तु पण सुरु का? :O चालु द्या.. विडंबन नव्हे ते.. कविताच की दुसरी..
मस्तच.. येऊ दे अजुन. आता मागे वळुन पहायचे नाही ;)
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
15 Apr 2009 - 2:29 pm | राघव
मी पामर काही खासा विडंबक नाही :D
विडंबनाचा हा केवळ दुसरा प्रयत्न! त्यामुळे पंचेस जरा कमी असतील. असो. :)
सगळ्यांचे मनापासून आभार !
राघव