व्हॅलेंटाईन्स डे....

प्राजु's picture
प्राजु in जे न देखे रवी...
2 Feb 2008 - 10:42 pm

मंडळी,
१४ फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन्स डे. या दिवशी प्रेम व्यक्त करण्याचा मोका तमाम प्रेमींना मिळतो.
या दिवसाच्या निमित्ताने एक धागा चालू करावा असा विचार सहज डोक्यात आला. प्रेम या विषयावर आपण चारोळ्या लिहूया का? प्रेम .. मग ते कोणावरहि असेल. ईश्वर , पती-पत्नी, आई, वडील, भाऊ-बहीण, मित्र्-मैत्रिण किंवा पाळीव प्राणी अगदी निसर्गावर सुद्धा..
कोणाबद्दलही वाटणारे प्रेम आपण शब्दबद्ध करूया का?
एक सूचना मात्र : प्रेम भंग किंवा उदासिन चारोळ्या लिहू नयेत.

ऋशिकेश, सहजराव, वरदा, स्वाती (तिन्ही- राजेश, दिनेश, महेश), विनायक, सगळे डॉन, डांबीसकाका, चतुरंग, केशवसुमार, प्रभाकर राव, डॉ. प्रसाद, सर्किट, विनायक, टिंगी.., चेंगट नाना, धोंडोपंत काका, प्रमोदकाका, तात्या.. तमाम मिपाकरांना.. ही विनंती की, आपण सगळ्यांनी याला हातभार लावावा.

(पुन्हा नव्या जोमाने उभी) प्राजु.

शब्द जोडताना माझ्या
हातून एक काव्य घडले..
कळलेच नाही मला मी
मि.पा. डॉट कॉम च्या प्रेमात पडले...

- प्राजु

चारोळ्याकवितासद्भावनाप्रतिसादप्रतिक्रियाआस्वाद

प्रतिक्रिया

केशवसुमार's picture

2 Feb 2008 - 11:17 pm | केशवसुमार

शब्द बदलून माझ्या
हातून पुन्हा एक काव्य पडले..
कळलेच नाही मला
विडंबनाच्या च्या प्रेमात हे काय घडले...

विसोबा खेचर's picture

2 Feb 2008 - 11:38 pm | विसोबा खेचर

वा प्राजू, छान आहे उपक्रम!

चालू द्या..

(पुन्हा नव्या जोमाने उभी)

हे आवडले..:)
वेलकम ब्यॅक...

मि.पा. डॉट कॉम च्या प्रेमात पडले...

तुझे मिपावरील प्रेम असेच कायम राहू दे, हीच संत व्हॅलेन्टाईनच्या चरणी संत तात्याबांची प्रार्थना.. :)

आपला,
संत तात्या.

अवांतर - आम्हाला पिरेम करण्याकरता १४ फेब्रुवारी हा एकच दिवस नव्हे तर कुठलाही दिवस चालतो! :)

पिवळा डांबिस's picture

2 Feb 2008 - 11:47 pm | पिवळा डांबिस

अजून वारयावर गुंजतात
ज्याच्या प्रेमाच्या आरोळ्या
असा हा पिवळा डांबिस
कशाला करील चारोळ्या?
:))

तुझ्या आग्रहाखातर केलेली माझ्या आयुष्यातली ही पहिली चारोळी!
खराब निघाली तर प्राजुला धोपटा, रे!! :)))

ऋषिकेश's picture

3 Feb 2008 - 12:26 am | ऋषिकेश

प्रिय अनामिकेस,

प्रेमाचा प्रत्येक रंग
मला तुझ्यामधे दिसतोय
तुझ्यातील रंगांमुळेच
मी प्रेम करायल शिकतोय

-(प्रेमळ) ऋषिकेश

प्राजु's picture

3 Feb 2008 - 12:28 am | प्राजु

तुझ्या प्रत्येक रंगात
मला माझाच चेहरा दिसला
उन, पाऊस, वा-यामध्ये
कसा ऋतू हसला...!

- प्राजु

ऋषिकेश's picture

3 Feb 2008 - 12:32 am | ऋषिकेश

ऋतुंचे हसणे,
पावसाचे बरसणे,
तुझ्या एका हास्यापुढे
हे सारे काही उणे

प्राजु's picture

3 Feb 2008 - 12:36 am | प्राजु

डांबिसकाका,
तुमच्या धोपटण्यामध्ये
मायेचा ओलावा आहे
या पुतणीला तुमच्या, इथे
परदेशात विसावा आहे...

-प्राजु

इनोबा म्हणे's picture

3 Feb 2008 - 12:57 am | इनोबा म्हणे

क्या बात है.... एकापेक्षा एक

विसाव्याच्या शोधामधे
दूनियेत रणरण फिरलो,
फिरून पुन्हा आईच्या
कुशीत मी शिरलो.

'आई'.....आपल्या आयुष्यातले पहिले प्रेम.... या व्हेलेंटाईन डेला सर्वप्रथम तिला ही प्रेमळ भेट.
बाकी 'तात्यांच्या' म्हणण्याप्रमाणे प्रेमाकरीता आम्हालाही व्हॅलेंटाईन डेची गरज नाही.... आपला प्रत्येक क्षण 'व्हेलेंटाईन....

(प्रेमळ) -इनोबा

पिवळा डांबिस's picture

4 Feb 2008 - 12:12 am | पिवळा डांबिस

अगदी कोंड्याचा मांडा बनवणारी सुग्रण कवयत्री आहेस गं तू, प्राजु!
छान, छान!!

llपुण्याचे पेशवेll's picture

3 Feb 2008 - 1:18 am | llपुण्याचे पेशवेll

तू इथे नसलीस तरी
तुझे अस्तित्व प्रत्येक रंगात आहे
आपल्या प्रेमाची मदहोशी
अजूनही माझ्या अंगात आहे...
पुण्याचे पेशवे

स्वाती राजेश's picture

3 Feb 2008 - 3:31 pm | स्वाती राजेश

पुन्हा उपक्रम चालू केल्याबद्दल आनंद झाला.
प्राजु, धनंजय, विनायक, ऋषिकेश. पिवळा डांबिस चालू राहू दे...
आम्हाला नविन नविन चारोळ्या वाचायला दिल्याबद्द्ल धन्यवाद.

प्राजु's picture

4 Feb 2008 - 2:14 am | प्राजु

प्रेम कर गरीबा सारखं
कोंड्याच्या भाकरीवर
प्रेम कर कुंभारासारखं..
मातीच्या खापरीवर (मांडे भाजण्यासाठी लागणा-या)

- प्राजू

llपुण्याचे पेशवेll's picture

4 Feb 2008 - 4:47 am | llपुण्याचे पेशवेll

प्रेम कर कधीही
कुठल्याही खापरीवर
आपल्यासाठिचे त्याचे पोळणं पाहून
त्याचे ऋण मनात स्मर

ऋणी.
डॅनी.
पुण्याचे पेशवे

सुनील's picture

4 Feb 2008 - 5:32 am | सुनील

वाचतो आहोत (नाहीतरी काव्याच्या बाबतीत आम्ही तेवढेच करू शकतो!).

चारोळ्या पुन्हा सुरू झाल्या हे चांगले झाले!

(रसिक) सुनील

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

प्राजु's picture

4 Feb 2008 - 9:33 am | प्राजु

कॄष्णाची घेण्या फिरकि राधा झाली कान्हा
जाता सामोरी त्याला, अचंबित कान्हा दिसे..
म्हणे तिला"कृष्णाच्या नयनी दिसे राधा ..
पण तुझ्या तर नयनी कान्हाच वसे???"

- प्राजु

विसोबा खेचर's picture

4 Feb 2008 - 11:18 am | विसोबा खेचर

छ्या! कैच्या कैच केली आहेस हो ही चारोळी!

आपल्याला नाय आवडली!

प्रामाणिक मत, राग नसावा...

आपला,
('चारोळ्या पाडणे' या प्रकाराला भयंकर घाबरणारा!) तात्या.

प्रमोद देव's picture

4 Feb 2008 - 11:32 am | प्रमोद देव

कृष्णाची घेण्या फिरकी राधा झाली कान्हा
जाता सामोरी त्याला,अचंबित दिसे कान्हा
म्हणे राधेला, मम नयनात फक्त वसे राधा..
तव नयनात मात्र मजला दिसतसे कान्हा

llपुण्याचे पेशवेll's picture

4 Feb 2008 - 8:17 pm | llपुण्याचे पेशवेll

ही चारोळी नसून ती नागपूरच्या एका कविंच्या कवितेच्या पहील्या चार ओळी आहेत. पण त्या फार सुंदर आहेत त्यामुळे इथे देण्याचा मोह आवरत नाही. जर कोणाला ती कविता आणि कवि माहीत असतील तर कृपया पूर्ण कविता प्रकाशित करावी.

वेदना पचविल्या ज्यानी
हसण्याचे मानकरी ते,
त्यानीच फुले वेचावी
काट्यांशी ज्यांचे नाते......
-अज्ञात कवि

-वेदना पचवणारा
डॅनी
पुण्याचे पेशवे

प्राजु's picture

5 Feb 2008 - 12:10 am | प्राजु

प्रेमाची लाली चढे मम गाली
अशी ही जादू केली तरी कुणी
लाज आली पाहूनी मजला
प्रतिबिंब माझे त्या दर्पणी..

- प्राजु

( कृष्ण -राधेची कल्पना शब्दांत नाही नीट मांडता आली, त्याबद्दल मी दिलगीर आहे. प्रमोदकाकांनी ति उत्तम शब्दांत मांडली, धन्यवाद प्रमोद काका.)

वरदा's picture

5 Feb 2008 - 7:43 pm | वरदा

आयुष्यात कधीहि लिहिल्या नाही
कवितेच्या दोन ओळी
तुझ्या प्रेमात प्राजुताई
ही पहीली चारोळी

छे फार कठीण आहे ग प्राजु...अशी लिहितेस तु इतक्या छान चारोळ्या.....

गौरी's picture

5 Feb 2008 - 11:58 pm | गौरी

प्रेमात..

प्रेमात पडले कसे मी
कळले ना माझ्या मनी
उमजले सर्व काही
प्रतिबिंब पाहता मज तुझ्या नयनी

(पहिलीच चारोळी आहे. चारोळी एक्स्पर्ट प्राजू , जमलं का नाही सांग गं!!!)

प्रेमाची चारोळी | करायाचा ध्यास |
नाही तो अभ्यास | काव्यक्षेत्री ||
जमावी ती कशी | चारोळी मजला |
म्हणे 'चतुरंगा'| धाव आता!||

चतुरंग

प्राजु's picture

6 Feb 2008 - 12:37 am | प्राजु

वरदा, गौरी, चतुरंग.. अप्रतिम..
येऊद्यात अशाच आणखीहि...

प्रेमामध्ये असे | अशी काही जादू| |
हरवतो साधू | मेनकेत| |
कोण म्हणे प्रेम | सुखाचा निचरा |
नाही त्यास थारा| दुनियेत| |

- प्राजु

चतुरंग's picture

6 Feb 2008 - 12:43 am | चतुरंग

प्रेमाची ती हाक | असे किती मोठी |
दुसरी चारोळी | पहा झाली ||
प्रेमच ते मोठे | व्यापून उरले |
'मि.पा.'अवकाशा | दशांगुळे ||

चतुरंग

प्राजु's picture

6 Feb 2008 - 12:51 am | प्राजु

वा. चतुरंग.. सह्ह्ही बॉस

चारोळीत तुझ्या | प्रेम भरलेले|
भरून उरलेले| अंतरात| |
मि.पा.अवकाश| कृतकृत्य झाले|
धन्य ते पावले| आंतरजाली| |

-प्राजु

वरदा's picture

6 Feb 2008 - 12:54 am | वरदा

क्या बात है...प्राजु, चतुरंग सहीच...

चतुरंग's picture

6 Feb 2008 - 1:05 am | चतुरंग

प्रेमाला ह्या कशी | नसे ती उपमा |
कोणी लेखाजोखा | ठेवीयला ||
वाटा ते भरून | आता दाहीदिशा |
वदे मि.पा.वरी |'चतुरंग' ||

चतुरंग

प्राजु's picture

6 Feb 2008 - 1:12 am | प्राजु

देवाजीच्या द्वारी| मागणे न उरे|
जीवनी या भरे| प्रेम सारे| |
म्हणोनि असे की| प्रेमची करावे|
ओवाळूनी द्यावे| जीवन ते| |

- प्राजु

इनोबा म्हणे's picture

6 Feb 2008 - 1:15 am | इनोबा म्हणे

च्यामारी... चारोळ्यांच्या जागी ओव्या कशा काय चालू झाल्या?
असो! छान चालू आहे....

चतुरंग's picture

6 Feb 2008 - 1:15 am | चतुरंग

काम माझे आता | वाट तेची पाही |
जावयाचे आहे | लॅबमध्ये ||
विसरत नाही | प्रेमा मी तरिही |
म्हणे 'चतुरंगा' | पळ आता! ||

चतुरंग

प्राजु's picture

6 Feb 2008 - 1:24 am | प्राजु

अरे सभासदा | श्लोक नाहि काही|
प्रेमाचीच असे| चारोळी ही| |
प्रेमाचीच गाथा| प्रेमिकांच्या ओठी |
कविता वा श्लोक| लिही तू ही | |

- प्राजु

इनोबा म्हणे's picture

6 Feb 2008 - 1:42 am | इनोबा म्हणे

प्राजूबाई तूम्ही|म्हणता म्हणून|
पामर हा काही|नाही काव्यासी लायक||
आम्ही खरडतो चार| ओळी काही बाही|
चारोळी म्हणती|जन आपसूक||

जमलं एकदाचं... हूश्श.....!

-संथ इनोबा(संदर्भः मिसळबोध)

रविराज's picture

6 Feb 2008 - 2:26 am | रविराज

तू माझी प्रिया
मी तुझा रवी
व्हॅलेंटाईन्स डेच्या निमित्ताने
मी झालो कवी

- रविराज

प्राजु's picture

6 Feb 2008 - 2:33 am | प्राजु

रविराज,
उखाणा सदृश कविता छान आहे. त्यात तिचे नाव गुंफले असतेत तर मस्त उखाणाच झाला असता...

- प्राजु

रविराज's picture

6 Feb 2008 - 3:00 am | रविराज

प्राजु,
नाव गुंफले ले आहे त्यामधे.
रविराज.

प्राजु's picture

6 Feb 2008 - 3:02 am | प्राजु

अरे वा.. तिचे नाव "प्रिया" आहे तर.. खूपच छान...
आणखिही येऊदेत अशा चरोळ्या..

- प्राजु

छोटा डॉन's picture

6 Feb 2008 - 9:16 am | छोटा डॉन

च्यायला डोक्याचा भूगा झाला तरी आम्हाला 'कविता' सुचेल तर शपथ ...

म्हणून आमच्या मनाच्या भावना दर्शवणार्‍या "संदिप आणि सलील" यांच्या ४ ओळी देत आहे ....

" दिसे जे कवीला , न दिसते रवीला
सांगून गेले कुणीसे शहाणे ... ....
दिसे जे कवीला , न दिसते रवीला
सांगून गेले कुणीसे शहाणे ... ....
मला तू न दिसशी, परंतु तयांच्या
नशिबी कसे सांग तुजला पहाणे ....

प्रिये ये निघेनी घनांच्या कडेने .....
मला एकटेसे आता वाटत आहे ..... "

विरहतेने व्याकूळ [ छोटा डॉन ]

विसोबा खेचर's picture

6 Feb 2008 - 11:06 am | विसोबा खेचर

च्यायला डोक्याचा भूगा झाला तरी आम्हाला 'कविता' सुचेल तर शपथ ...

आम्हीही दिवसातून एकदा तरी अगदी हेच म्हणत असतो! :)

तात्या.

रविराज's picture

6 Feb 2008 - 11:01 am | रविराज

महाबळेश्वर वाई पाचगणी
कोयना भीमा कास बामणोली
ठोसेघर प्रतापगड सज्जनगड
सह्याद्री अजिंक्यतारा
आय लव माय(भू़मी) सातारा

- रविराज .

विसोबा खेचर's picture

6 Feb 2008 - 11:08 am | विसोबा खेचर

मस्त चारोळी! :)

आपला,
(महाराष्ट्रीयन) तात्या.

रविराज's picture

6 Feb 2008 - 11:31 am | रविराज

माफ कर प्रिये मला, तुला मी खोटं बोललो
तुझ्या आधी सुद्धा होतो मी प्रेमात पडलो
येते जेव्हा आठवण तिची, मनात खमंग वारा वादळी
ती होती माझ्या आजीच्या हातची पुरणपोळी

पुरणपोळीवर तुप जोडीला आमरस
प्रेम घट्ट झाले आमचे दिवसेंदिवस
कधी निमित्त सणाचे कधी वाढदिवसाचे
तर कधी आमच्या भेटीला निमित्त माझ्या रुसण्याचे

एकदा मात्र घात झाला
पुरणपोळीने धोका दिला
अचानक आजी निघुन गेली
प्रेयसीही माझी तिच्याबरोबर गेली

आता जेव्हा गावी जातो
चुली समोर आजीला पाहतो
तीच्या आठवणींच्या पुरणपोळ्या
मी पोटभर खातो

- रविराज.

विसोबा खेचर's picture

6 Feb 2008 - 11:41 am | विसोबा खेचर

ही कविता वेगळीच आहे बुवा! उगीच मन उदास करून गेली..!

तात्या.

ऋषिकेश's picture

6 Feb 2008 - 9:28 pm | ऋषिकेश

अप्रतिम कविता!!!
खूप खूप आवडली.. अजून येऊ दे रविराज

प्राजु's picture

6 Feb 2008 - 8:15 pm | प्राजु

पांधरा शुभ्र गोळा तरंगे
जशी सळसळे तरूणाई
मुखी येता.. तृप्त आत्मा
ती माझी रस्-मलाई.....

उम्म्म..... वा वा...

- (रसमलाईत गुंतलेली )प्राजु

विकास्_मी मराठी's picture

6 Feb 2008 - 8:24 pm | विकास्_मी मराठी

िव्कास०१५४
गाजराची पुन्गी
वाजली तर वाजली
नाहितर मॊडून खाल्ली
पोरगी पटली तर पटली
नाहितर बहीण मानली.........

ब्रिटिश टिंग्या's picture

6 Feb 2008 - 9:59 pm | ब्रिटिश टिंग्या

भरपुर झाले 'राज'कारण
अन 'सपा'ची सत्तेची हाव
मिटवा वाद सगळे आता
वाढवु फक्त प्रेम अन् बंधुभाव

- (समस्त भैय्यांचा भाऊ) छोटी टिंगी

अव्यक्त's picture

7 Feb 2008 - 12:22 am | अव्यक्त

श्याम नभ जसे झाकोळे चंद्रमा
कृष्ण कूम्तल व्यापे तव मुख चंद्र्मा
नभातुन जसा चंद्र प्रकाश झळाळे
कुंतलातुन तव सौंदर्य प्रभा झळाळे ...

(प्रेमवीर) अव्यक्त!

विसोबा खेचर's picture

7 Feb 2008 - 12:42 am | विसोबा खेचर

तात्या दिवाना
अनुष्कावर मरतो
अनुष्कासाठीच
अहोरात्र झुरतो..

आपला,
(अनुष्का प्रेमी) तात्या.

वरदा's picture

7 Feb 2008 - 12:49 am | वरदा

तात्या कोण ही अनुष्का?

विसोबा खेचर's picture

7 Feb 2008 - 12:52 am | विसोबा खेचर

तात्या कोण ही अनुष्का?

उत्तर कृपया तुमच्या खरडवहीत पाहा, इथे विषयांतर नको.. :)

तात्या.

llपुण्याचे पेशवेll's picture

7 Feb 2008 - 3:34 am | llपुण्याचे पेशवेll

अव्यक्तने व्यक्त केलेली भावना खरच मस्त आहे.....

आणि काय हे तात्या. कोण ही अनुष्का सांगा की ! काय झाले 'प्रेमळ' विषयांतर झाले तरी.

पुण्याचे पेशवे

जुना अभिजित's picture

7 Feb 2008 - 11:21 am | जुना अभिजित

तिने मोठ्या तोर्‍याने
माझे प्रेम झिडकारले
तेच फूल सुदैवाने
तिच्या मैत्रिणीने स्विकारले.

ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

प्रेमे झाली, झाल्या आणाभाका
लग्ने झाली, झाली पोरे बाळे, बळे.
कुठ्ली प्रभा? कुठ्ला चन्द्रमा?
नभातुन कुठे तो चंद्र प्रकाश झळाळे
कुंतलातुन मम फक्त गुन्ता कोसळे

विसोबा खेचर's picture

7 Feb 2008 - 10:40 pm | विसोबा खेचर

क्या बात है..

वास्तववादी चारोळी! नुसत्या छान छान, प्रेमळ प्रेमळ चारोळ्या वाचून कंटाळा आला होता!

तात्या.

प्राजु's picture

8 Feb 2008 - 1:19 am | प्राजु

गंधित त्या फुलांच्या राशी
सख्या मी सांडित गेले
डाव सुंदर संसाराचा
तुझ्यासवे मांडित गेले

- प्राजु

वरदा's picture

8 Feb 2008 - 6:36 am | वरदा

संसाराच्या या डावात
रंगात तुझ्या रंगले
राहीले न माझी मी
प्रेमात अशी भिजले

वरदा's picture

8 Feb 2008 - 6:36 am | वरदा

संसाराच्या या डावात
रंगात तुझ्या रंगले
राहीले न माझी मी
प्रेमात अशी भिजले

विसोबा खेचर's picture

8 Feb 2008 - 6:38 am | विसोबा खेचर

राहीले न माझी मी
प्रेमात अशी भिजले

वरदा,

नाही, प्रेमात वगैरे भिजलीस ते चांगलंच आहे, पण दोनदोनदा? :)

वरदा's picture

8 Feb 2008 - 6:38 am | वरदा

का झालं असं? एक पोस्ट उडवता येईल का प्लीज?

विसोबा खेचर's picture

8 Feb 2008 - 6:58 am | विसोबा खेचर

का झालं असं?

कदाचित तुझं तुझ्या नवर्‍यावर जरा जास्तच प्रेम असावं म्हणून असं झालं! :)

एक पोस्ट उडवता येईल का प्लीज?

हो नक्कीच येईल. परंतु राहू दे! मिपाने तुला नवर्‍यावर दोनदोनदा प्रेम करायची परवानगी दिली आहे! :)

तात्या.

वरदा's picture

8 Feb 2008 - 6:49 am | वरदा

मी पाहीलच लगेच खालंचं पोस्ट लिहिलं..पोस्ट कसं उडवायचं? अहो प्राजु कडुन प्रेरणा घेऊन सुचेल ते लिहिते...तिला कसं सुचतं कोण जाणे म्हणुन म्हटंलं आपणही प्रयत्न करत रहावा......

प्राजु's picture

8 Feb 2008 - 6:57 am | प्राजु

वरदा...
सह्ही आहेस हं!
छान जमलीये चरोळी..

प्राजु

वरदा's picture

8 Feb 2008 - 7:13 am | वरदा

थँक्यू ...तुझं सर्टीफिकेट महत्वाचं...तू खूपच छान लिहितेस....

वरदा's picture

8 Feb 2008 - 7:57 am | वरदा

कळ्ळं होतं मला ते..उत्तर लिहीते म्हट्लं आणि राहीलं...आता चारोळित उत्तर

प्रेम का मोजून करता येतं
ते कायमचं असतं...
ते दोन जणांच्या नुसत्या असण्यानं नाही
मनं गुंफल्यानं होतं...

प्राजु तू आता बास कर गं म्हणेपर्यंत लिहीणारे मी चारोळ्या....

प्राजु's picture

8 Feb 2008 - 9:42 am | प्राजु

तू ये सोबत माझ्या
कवितेच्या विश्वात
भावनेला वीण शब्दांत
जसा पाऊस यावा ग्रिष्मात

-(आनंदी) प्राजु

किशोरी's picture

8 Feb 2008 - 1:33 pm | किशोरी

प्रेमाचे हे लक्षण
असते खास
चोहीकडे होतो
आनंदाचा आभास

अजुन एक
जीवनदायीनी,वात्सल्य तु
तुच आहेस माया
प्रेमस्वरुप आई तु
देवाचीच काया

(जमली का हो चारोळी??,या प्राजुजीं काय सुंदर चारोळ्या करतात,कस जमत कोन जाणे
असतात चार ओळी पण निबध लिहीणे सोपे अस वाट्तय,चार ओळीतच वेड लागायची पाळी आली)

वरदा's picture

8 Feb 2008 - 5:42 pm | वरदा

मी येते सोबत तुझ्या
गुंफीत शब्दांना
देईन आकार माझ्या
मनातील भावनांना

वरदा's picture

8 Feb 2008 - 5:43 pm | वरदा

छान आहेत की दोन्ही चारोळ्या...खूप आवडल्या...

स्वाती राजेश's picture

8 Feb 2008 - 6:26 pm | स्वाती राजेश

प्राजु, वरदा, किशोरी
या चारोळ्या मस्तच...
अजुनी येऊ देत अशाच छान छान ...
वाचून करूया फस्त...

बाय द वे ही चारोळी नव्हे-:))))))))

प्राजु's picture

8 Feb 2008 - 6:30 pm | प्राजु

कविता हे माझे
पहिले प्रेम आहे
वरदा, किशोरी
तुमचेही सेम आहे???

- प्राजु

वरदा's picture

8 Feb 2008 - 7:50 pm | वरदा

कविता करणे प्राजु
तुझासवेच शिकले
कोण जाणे प्रेम का हे
चार ओळी खरडू लागले

राजे's picture

8 Feb 2008 - 7:50 pm | राजे (not verified)

प्रेमाचे काय
तुझे माझे सेम आहे
तुझे त्याच्यावर आहे
माझे तुझ्यावर आहे......

मी कधीच लिहीत नाही
कवीता हा माझा प्रांत नाही
पण तुझ्यात व माझ्यात काही सेम असावे
ह्यातच ह्या चारोळीच्या जन्माची मेख आहे.....

जशी जमली तशी केली आहे चारोळी मी
आवडली तर बेस्ट आहे
नाही तर नेहमी प्रमाणे वेस्ट आहे
कोणी नाही तर वाचनारे गेस्ट (पाहूणे सदस्य) आहेत

राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....

किशोरी's picture

8 Feb 2008 - 8:01 pm | किशोरी

सौंदर्याचा अविष्कार
हा शब्दांचा आहे खेळ
कविता म्हणजे
मनातील भावनांचा सुंदर मेळ

(तुमच्या प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद वरदा,स्वाती,प्राजु)

राजे's picture

8 Feb 2008 - 8:13 pm | राजे (not verified)

भावनांना आकार देणे
हा काही माझा खेळ नाही
तुझ्या प्रेमात पडणे
ह्यात काही गेम नाही

राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....

प्राजु's picture

8 Feb 2008 - 8:16 pm | प्राजु

सुर्व्या निघाला लाल होऊनी
वाटेला लागला परतीच्या
क्षितिजावरती चुंबुनी गेला
कोमल अधरा धरतीच्या....

- प्राजु
( सुर्व्या - म्हणजे सुर्य..)

वरदा's picture

8 Feb 2008 - 8:19 pm | वरदा

प्राजु एक्दम वेगळी आणि छान चारोळी

राजे's picture

8 Feb 2008 - 8:32 pm | राजे (not verified)

ह्या सुर्याचे रोज नवे नाटक आहे
दिलावर रोज नवा दंश आहे
आज जगावे तुझ्यासाठी
तर मागे आपला वंश आहे...

राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....

किशोरी's picture

9 Feb 2008 - 10:01 am | किशोरी

सुर्या गेला चुंबुनी
धरतीचे अधर
धरती लाजली ओढुन घेतला
तिने चांदण्याचा पदर

किशोरी's picture

9 Feb 2008 - 10:03 am | किशोरी

प्रेमात पडल्यावर
सगळ जग सुंदर दिसत
लग्न झाल्यावर कळत
प्रेम नेहमीच आंधळ असत

प्राजु's picture

10 Feb 2008 - 12:59 am | प्राजु

तुझ्या डोळ्यांतल्या नभी
माझे स्वच्छंदी विहरणे
निळ्या मेघात दाटूनी
सरीतूनी बरसणे..

- प्राजु

सुधीर कांदळकर's picture

10 Feb 2008 - 8:16 pm | सुधीर कांदळकर

वाटतो. ही ग्रंथि आम्हाला जन्मतः च नाही. फार फार मजा आली. आपल्या सर्वांचे कौतुक वाटते. प्राजू, हा आनंदमयी चैतन्याचा ओघ असाच राहू दे. सर्वांना धन्यवाद.