तुझ्या दु:खाविना

शिवापा's picture
शिवापा in जे न देखे रवी...
18 Mar 2009 - 5:47 am

अजुन किती वेळ जाईल?
तुझी आठवण कुठपर्यंत राहिल?
तु गेलायेस पण आठवण छळतेय
तुझ्या सांवल्यात मी अजुन चालतेय
कुठलाच विचार येत नाहि तुझ्या दु:खाविना

अवचित वाजलेला फोन काळजाचे ठोके चुकवतो
गर्दीतला प्रत्येक चेहरा तुझाच भासतो
प्रत्येक रात्री वाट पहात रहाते झोपेची
झोपही येत नाहि तुझ्या दु:खाविना

जाग आल्यावर हात तुझ्या स्पर्शासाठी आसुसतो
तु नसल्याची आठवण झाल्यावर एकदम बावरतो
कधितरी थांबेलच हे सर्व
दु:खांचे हेहि संपेल पर्व

आयुष्याच्या पटलावर पुढे सरकतांना
आठवणीची सारी भुते जळतांना
हसणे तेव्हढेसे कठिण रहाणार नाहि
अवेळी अश्रुही तरळणार नाहि

तुझी आठवण तेव्हांहि येईल
पण तुझ्या दु:खाविना

प्रेमकाव्यकवितामुक्तकप्रकटनप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

शितल's picture

18 Mar 2009 - 5:50 am | शितल

प्रेमकाव्य छान आहे. :)

अवांतर - राजे यांच्याकडे शिकवणी लावली असेल का ह्यांनी.. :?

शिवापा's picture

18 Mar 2009 - 5:55 am | शिवापा

नाहि लावली. म्हणजे गेला होतो खरा पण प्रवेश नाहि मिळाला. त्यात ते कुठल्याश्या तबकड्यांवर काहितरी सिरियस लिवायच्या मागे आहेत.

शितल's picture

18 Mar 2009 - 5:56 am | शितल

मग तुमचे नशिब थोर आहे.. ;)

अनिल हटेला's picture

18 Mar 2009 - 7:53 am | अनिल हटेला

>>मग तुमचे नशिब थोर आहे. =)) =)) =))

सह्ही!!!

उत्तम प्रेमकाव्य !!! येउ देत अजुनही !!!!

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..