(उगिच भेटली घाटावर ती)

बेसनलाडू's picture
बेसनलाडू in जे न देखे रवी...
5 Mar 2009 - 1:13 am

उगिच भेटली घाटावर ती
बर्‍याच दिवसांनंतर
ओळख सारी धुवून गेली
बर्‍याच दिवसांनंतर

फेस धवल तोंडाला आला
धुके दाटले डोळीं
लालकेशरी चार शलाका
फुलून आल्या गाली
चपलेचाही प्रसाद आला
शिवीआरतीनंतर
उगिच भेटली घाटावर ती
बर्‍याच दिवसांनंतर

पेकाटाची मोडुन हाडे
हाती घेतला हात
(वळ्णावरती अवघड इतक्या
सहज घातली लाथ)
धडपडलो अन् धूम ठोकली
मान घातली खाली
त्या मौनाचा अर्थ सांगण्या
मागे धाउन आली
बुक्क्यांची मग उधळ्ण झाली
कुठेकुठे ति भयंकर
उगिच भेटली घाटावर ती
बर्‍याच दिवसांनंतर

प्रेरणा: पुष्कराज यांना सहज वाटेवर भेटलेली कविता

कविताविडंबनमौजमजाप्रकटनप्रतिसादप्रतिभा

प्रतिक्रिया

नाटक्या's picture

5 Mar 2009 - 1:29 am | नाटक्या

एकदम जोरात दिसता... :-)

- नाटक्या

अवलिया's picture

5 Mar 2009 - 8:28 am | अवलिया

मस्त :)

--अवलिया