सणासुदीची सफाई

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
17 Oct 2025 - 4:45 pm

"नास्तिकांनी खायला कोंडा,
उशाला धोंडाचं गाणं!"
कितीही म्हटलं, तरी
आपल्या देशाची पक्की जमीन
धर्माच्या खाटेचीच सोय!

पंथाच्या गादीची उब,
सांस्कृतिक उशीसंगे अल्हाददायक झोप —
आपलेसेपणा देणारी ही सोय
बहुतेकांना हवीच असते, नाही का?

सणांच्या आधी, माळ्यावरची
समृद्ध अडगळ खाली उतरते,
तेव्हा माळ्याचीही सफाई होते.

तसंच काहीसं —
मऊ मुलायम गादीसुद्धा,
खूप दिवसांनी कडक होते.
मग ती कारखान्यात जाऊन
सासुफ-करून, पुन्हा
मुलायम होते, स्वच्छ होते,
दिवाळी अंकांनी वैचारीक
कल्हई दिल्या सारखी.

बेडही मधूनमधून
हलवावा लागतो —
कचरा, जळमटे बाजूला काढून
पुन्हा नीट लावावा लागतो
आपलच घर चकाचक दिसण्यासाठी .

सणासुदीच्या निमित्ताने
साफसफाई केली की
मनही निवतं,
आनंद दुणावतो.

मग नास्तिक असो वा आस्तिक —
सण साजरा होतोच
उत्साहात, समाधानात.

- (अज्ञेय) माहितगार

festivalsgholpineappleअनर्थशास्त्रअभय-काव्यअव्यक्तआठवणीआनंदकंद वृत्तआयुष्याच्या वाटेवरआरोग्यदायी पाककृतीआशादायककखगकविता माझीकाणकोणकालगंगाकाहीच्या काही कविताकैच्याकैकवितागुलमोहर मोहरतो तेव्हाजिलबीप्रेरणात्मकफ्री स्टाइलभूछत्रीमुक्त कवितारतीबाच्या कविताशेंगोळेअद्भुतरसशांतरसमौजमजा