लोकल मराठी भाषा(शब्द-प्रतिशब्द-वाक्यप्रकार)

इनोबा म्हणे's picture
इनोबा म्हणे in जनातलं, मनातलं
7 Jan 2008 - 8:57 pm

आख्खा 'इंडिया' मधे 'वर्ल्डफेमस' असलेल्या 'मुम्बईय्या हिंदी' प्रमाणेच मराठीतसुद्धा अशा प्रकारचे गमतीशीर शब्द व वाक्यप्रकार आहेत जे ठराविक शहरात वा गावात वापरले जातात.आपण अशाच प्रकारचे शब्द इथं इतर गावकर्‍यांनाही सांगावेत,जेणेकरुन आपले शब्द-वाक्यप्रकार ही आख्ख्या मिपात 'वर्ल्डफेमस' होतील.

आमच्या पुण्यात आम्ही वापरत असलेले काही शब्दः
गोड आमटी: बोलीभाषेतही लेखी मराठी,जड शब्दांचा वापर करणारे 'महाशय'(शक्यतो 'सदाशिव पेठेतला')
अनपरवडेबलः न परवडणारे
अनझेपेबलः न झेपणारे
मसशाणा: अतिशहाणा
नव्वदने कल्टी खाणे: लगेच सटकणे
निगाहे बघ: निघायचे बघ
केशवः नाकासमोर चालणारी व्यक्ती
होमीओपॅथीचा पेशंटः होमोसेक्शूअल
चंद्रावर असणे,टांगा पल्टी-घोडे फरारः पिऊन टुन्न झालेला
घे मिटवून नायतर दे पेटवूनः नुसताच आवाज करुन भांडणार्‍यांना उद्देशून,'हात' न लावता भांडणार्‍यांसाठी

असे आणखी बरेच शब्द आहेत.तुर्तास एवढेच.
(बोलीभाषेवर प्रेम करणारा) -इनोबा

हे ठिकाणप्रतिशब्दभाषावाक्प्रचारमौजमजाप्रतिसादविरंगुळा

प्रतिक्रिया

सुनील's picture

7 Jan 2008 - 9:12 pm | सुनील

कलटी मारणे - चुपचाप सटकणे
पतियाळा - लार्ज पेग
खंबा - फुल्ल बाटली
कर्जत्-कसारा - तिरळी व्यक्ती

आठवतील तसे टाकीनच!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सुनील's picture

7 Jan 2008 - 10:06 pm | सुनील

मालगाडी - लेडीज स्पेशल

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

ब्रिटिश टिंग्या's picture

7 Jan 2008 - 10:46 pm | ब्रिटिश टिंग्या

य - खुप
श्यामची आई, वहिनीच्या बांगड्या - 'ते' चित्रपट
कांदापोहे - दाखवण्याचा कार्यक्रम
झम्या - बावळट
वडील - उच्च
वरचा क्लास -लयी भारी
सामान - (हे तुम्हाला महिती असेलच)
खडकी दापोडी - एकदम टुकार
एल्.बी.डब्ल्यु. - लांबून बरी वाटते.
काशी - गडबड
लयी वेळा - निश्चित
पडीक - निवांत (जसा मी मि.पा. वर आहे तसा)
बॅटरी - चष्मेधारक्/धारकी
कल्ला - लयी भारी
हत्ती - खुप मोठा पोपट
मारा डबल - कलटी मारणे
वकार युनुस - खुप दारू पिउन ओकणे
पोत्याने - भरपुर
सांडणे - पडणे (उदा. तो पळता पळता सांडला)

आणि शेवटी

टिंगी - थाप

आपला,

('थाप'लेला) छोटी टिंगी

प्राजु's picture

8 Jan 2008 - 10:13 am | प्राजु

नाद करू नको - वाटेला जाऊ नको.
कट्ट्यावर बैस - गप्प बैस
वरणभात - टिपीकल जुनाट वळणाचा/ची
छम्मा छम्मा - एकदम भन्नाट..
टि.पी. - तांबडा पांढरा (रस्सा)

अजून आहेत बरेच. आठवून सांगेन.
- प्राजु.

तात्या विंचू's picture

8 Jan 2008 - 10:55 am | तात्या विंचू

चावी - चौकातला पाण्याचा नळ
डाम्ब - (कोणताही) खाम्ब
शिस्तीत जेवा - सावकाश जेवा
नादखुळा

मोळा = खिळा
बालटी = बादली
मस्ती येणे = माजणे
खवळणे = चिडणे, संतापणे
फिरुन गंगावेस = तीच ती गोष्ट पुन्हा सांगणे

चतुरंग

सुनील's picture

8 Jan 2008 - 7:27 pm | सुनील

टि.पी. - तांबडा पांढरा (रस्सा)

मुंबईला टि.पी. म्हणजे टवाळक्या (टाईम पास)

फुल्ल टि.पी. म्हणजे नुसती धमाल!!!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

इनोबा म्हणे's picture

8 Jan 2008 - 11:01 am | इनोबा म्हणे

गुंडाळणे: खोटं बोलून काम साधणे
डोक्याची मंडई करणे: डोकं खाणे
सोपान,सोपान्या: बावळट माणूस
उल्हासी,चपळ चिता: मंदबुद्धी असलेला
टि.टि.एम.एम.: तूझं तू माझं मी
चलन देणे: फसवणे,खोटं बोलणे
बाजार उठवणे: वाट लावणे
जँगो,झँकी फँकी: 'रंगीला' टाईपचे कपडे वापरणारा,स्टाईल मारणारा
बोटं घालून मोठं करणे: काम बिघडवणे
डोळ्यांनी गोळीबार करणे: रागात बघणे
च्या खांद्यावर बंदूक ठेवणे: आपलं काम साधन्यासाठी ...च्या(दुसर्‍याच्या) नावाचा वापर करणे

(पुन्हा भेटू) -इनोबा

धमाल मुलगा's picture

9 Jan 2008 - 3:00 pm | धमाल मुलगा

डोलकर : दारु पिउन झिन्गलेला
सावरकरः डोलकराला सावरणारा
गन्डणे : हतबुद्ध होणे..ते..कामातून जाणे (पेपर बघून तो पार गन्डला. नवा मोबाईल कालच गन्डला)
बसणे : दारु प्यायला जाणे. (चला, आज बसू)
हिरवळः मुली / मुलीन्चा घोळका
लागणे : दैना होणे / अवस्था वाईट होणे (ऑफिसमध्ये माझी पाssर लागली)
टिपणे: समजणे
भैरवी घेणे : कट्ट्यावरचा कार्यक्रम उरकता गेणे
कानाच्या बागेत भुन्गे फिरणे: ऐकू कमी येणे.
जीवात जीव येणे : मुलीला दिवस जाणे.
===============================
समस्त गावकरी हो...मिसळपाव वरच हे माझ पहिलच लिखाण आहे.
चुकल॑ माकल॑ माफ करा. नव॑ कोकरु आहे, लेकराला समजुन घ्या......

अवलिया's picture

9 Jan 2008 - 7:22 pm | अवलिया

विनायक म्हणजे टिंबुक आहे

इनोबा म्हणे's picture

10 Jan 2008 - 2:17 am | इनोबा म्हणे

'नानाचा' चहा आण: म्हणजे चहा आणू नको(विशेषकरुन नको असलेली मंडळी आली की हा चहा मागवीला जातो)
'अण्णाचा' चहा आणः चहा घेऊनच ये.

नान्या चेंगटा तुला काय झाले रे?

सुधीर कांदळकर's picture

10 Jan 2008 - 9:54 pm | सुधीर कांदळकर

तुंबणे = आतुर होणे. ती बघ मला बघायला कशी तुंबली आहे.
रापचिक = सुरेख.
मालकंस गाणे = पोरींच्या मागे धावणे.
अठ्ठावीस = पिऊन टुन्न.

llपुण्याचे पेशवेll's picture

11 Jan 2008 - 8:53 am | llपुण्याचे पेशवेll

अस्सल कोल्हापूरी 'नादखुळा'
-पुण्याचे पेशवे

llपुण्याचे पेशवेll's picture

11 Jan 2008 - 8:59 am | llपुण्याचे पेशवेll

गोळीबार करणे - फेका मारणे, टिंग्या टाकणे
हत्ती होणे: खूप मोठा पचका होणे
झेंगटः भानगड
पुण्याचे पेशवे

बहुरंगी's picture

11 Jan 2008 - 11:11 am | बहुरंगी

वा, काय नविन नविन शब्द प्रयोग वाचायला मिळाले आहेत ..... धम्माल आली.
मि पण काही रत्नागिरी, जयगड परिसरात ऐकलेले काही शब्द प्रयोग ....
अडस : जबरदस्त मुलगी
कोकम : माल
कोकम्या : जो कोकमाला बघत असतो तो
ढांढळपट्टी : पोट खराब झाल्यावर होणार्‍या फेर्‍या
अतिरेकी : नाठाळ
आपला,
बहुरंगी मिसळे

विसोबा खेचर's picture

12 Jan 2008 - 1:42 am | विसोबा खेचर

छान चाल्लंय! बरेच नवीन शब्द भेटले! :)

छान आहे उपक्रम, चालू द्या..

तात्या.

स्वयम्भू's picture

14 Jan 2008 - 11:55 pm | स्वयम्भू (not verified)

आमराई : लेडीज होस्टेल
सासरा करणे : कुणाला तरी कापणे / खर्च करायला लावणे
(वरचे दोन मरठी भाषेला मी अर्पण केलेले अलन्कार आहेत)
सुलट्या : जुलाब (उलट्यन्च्या उलटे) वापर : आज मला सुलट्या होत असल्या मुळे मी सुट्टी घेतली आहे.
सरबरीत : भैसाटलेला / गोनधळलेला / वगेरे वगेरे
मेन्दु सटकणे : रागावणे
मन्दार : मन्द मणूस
चपटी : क्वार्टर (दारूची)
खम्बा : अख्खी बाटली

वेळे अभावी इतकेच देतोय. बाकी नन्तर लीहीनच.

आपला,

स्वयंभू

इनोबा म्हणे's picture

15 Jan 2008 - 12:26 am | इनोबा म्हणे

तुम्ही वापरत असलेले हे शब्द-वाक्प्रचार कोणत्या भागातील/प्रदेशातील आहेत त्याचा उल्लेख जरुर करा.

(बोली भाषेवर प्रेम करणारा) -इनोबा

बन्ड्या's picture

23 Jan 2008 - 2:35 am | बन्ड्या

हान हान : भरपेट खाने , मार- मार. (परिस्थितिनुसार.....)
घुमिव : फिरवने
काटा किर्र : पिवुन टाईट
पिक्चर पाडने : पानउतार करणे
शिप्पारस : स्व:ताची टि़मकी वाजवणे

वेळे अभावी इतकेच........
आपला बन्ड्या

संगीता's picture

23 Jan 2008 - 2:25 pm | संगीता

गिड्डा - बुटका
किवंडा - बहिरा
डोक्यावर पडलैस का? - वेड लागले का?
हुडकणे - शोधणे
गावले - सापडले
ढोक नंबर- शेवटचा नंबर
किर्यानिष्ट - अर्थ माहीत नाही पण भरपूर ठिकाणी ऐकला आहे.

मंडळी, मिपा वर प्रथमच लिहित आहे.
काही चुकले असेल तर क्षमस्व.

संगीता

विसोबा खेचर's picture

24 Jan 2008 - 7:16 am | विसोबा खेचर

संगीता मॅडम,

मंडळी, मिपा वर प्रथमच लिहित आहे.

मिपावर मन:पूर्वक अभिनंदन...

काही चुकले असेल तर क्षमस्व.

अहो त्यात क्षमाकशाबद्दल? सगळी घरचीच मंडळी आहेत! यू नो, वी आर लाईक अ फ्यॅमिली! :)

असो, मिपाच्या फ्यॅमिलीत आपलंही स्वागत!

आपला,
(मिपा कुटुंबीय!) तात्या.

संगीता's picture

25 Jan 2008 - 8:49 pm | संगीता

पाव्हणं म्हणून मिसळपावाची चव घेण्यापरीस फ्यॅमिलीसंगट मिसळपावाची चव न्यारीच......

बराबर हाय नव्ह.

(कोल्हापूरी) संगीता

किशोरी's picture

24 Jan 2008 - 6:56 pm | किशोरी

पपलु : जाड व्यक्ती
कट पीस :बुटकी व्यक्ती
जेष्ठ नागरीक : ३० वर्षापुढील लग्न न झालेली व्यक्ती
तुणतुणे : बोर करनारी व्यक्ती
ढापण :चष्मा

सुनील's picture

24 Jan 2008 - 8:06 pm | सुनील

किशोरी, तु दिलेले लोकल मराठी शब्द कुठल्या भागात प्रचलित आहेत ते ही सांग.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विसोबा खेचर's picture

24 Jan 2008 - 10:27 pm | विसोबा खेचर

>>पपलु : जाड व्यक्ती
जेष्ठ नागरीक : ३० वर्षापुढील लग्न न झालेली व्यक्ती<<

हम्म! म्हणजे आम्ही 'पपलु-जेष्ठ नागरीक' आहोत हे समजले! :)

आपला,
(३० वर्षांपुढील अविवाहीत सुदृढ!) तात्या.

:))

किशोरी's picture

25 Jan 2008 - 6:46 pm | किशोरी

सुनीलजी,
आमच्या सारखी निरागस बालके जेव्हा अकलेचे तारे तोडायला,दिवे लावायला किवा अक्कल पाजळायला(असे
मोठ्या लोकांचे म्हणणे)म्हणजे शिकायला कॉलेजात जात तेथील लोकल भाषा ही.

आहो तात्या,
आवडले नसेल तर माफ करा हं,मजेत लिहीले आहे ते.

llपुण्याचे पेशवेll's picture

27 Jan 2008 - 4:36 am | llपुण्याचे पेशवेll

अंधार : थोडक्यात मराठित अर्थ 'होपलेस'
भुक्कडः एकदम खराब

पुण्याचे पेशवे