वार्तालाप: दुर्जनांचा ही सन्मान करा.

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
8 Aug 2023 - 9:07 am


दुर्जन प्राणी समजावे.
परी ते प्रगट न करावे.
सज्जना परीस आळवावे.
महत्त्व देऊनी.

समर्थ म्हणतात राजकारण करताना, दुर्जन लोक असतील ते ओळखून ठेवावे पण त्यांचा दुर्जनपणा प्रगट करू नये. इतकेच नव्हे, तर त्यांना सज्जनापेक्षाही अधिक मोठेपण देऊन प्रसन्न ठेवावे. राजकारणात दुर्जन लोक तुम्हाला त्रास देऊ शकता तर त्यांना महत्त्व देऊन संतुष्ट करावे. त्यांच्या उपयोग करून त्यांना आपल्या शत्रू वर सोडावे. योग्य वेळी त्यांना नष्ट ही करून टाकावे. नीती कथाही म्हणतात दुर्जन आणि नीच शत्रूला थोडे बहुत देऊन संतुष्ट केले पाहिजे आणि तुल्यबळ शत्रूशी युद्ध केले पाहिजे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचा प्रयत्न करत होते तर दुसरीकडे विजापूर आणि आदिलशाही स्वराज्य नष्ट करण्याचा प्रयत्न करत होते. अश्या बिकट परिस्थितीत दिल्लीच्या बादशहा औरंगजेबाने मिर्झाराजे जयसिंहला स्वराज्य नष्ट करण्यासाठी दक्षिणेत पाठविले. मिर्झा राजा जयसिंग मोठी फौज घेऊन दक्षिणेत आले. एवढ्या विशाल फौजेशी युद्ध करणे म्हणजे स्वराज्याचा विनाश. छत्रपती शिवाजी महाराजांनी समर्थांनी दासबोधात सांगितलेला मार्ग निवडला. महाराजांनी स्वराज्याचा हितासाठी दुर्जन मुघलांशी तह केला आणि स्वराज्याचे 23 किल्ले मुघलांच्या हवाली केले. एका दुर्जन शत्रूला प्रसन्न केले आणि त्याच्या वापर दुसऱ्या शत्रू विरुद्ध केला. मुगल फौजा विजापूर विरुद्ध युद्ध करण्यात गुंतल्या. स्वराज्याचे दोन्ही विरोधी दुर्बळ झाले. त्याचा फायदा स्वराज्याला झाला. अखेर मराठी साम्राज्य अटक ते कटक पर्यंत पसरले.

वर्तमान काळात ही भाजपने मेहबूबा मुफ्ती सोबत सत्ता स्थापन केली. हजारो काश्मिरी हिंदूंना काश्मीर मधून पलायन करावे लागले होते, त्यात तिच्या पक्षाचा ही हात होता, असे अधिकांश भारतीयांना वाटत होते. तरीही भाजप ने तिच्या सारख्या दुर्जन शत्रूला मुख्यमंत्री पद दिले. भाजपचे हे कृत्य अधिकांश भारतीयांना पटले नाही. पण भाजपने त्याच सत्तेचा फायदा घेऊन काश्मीर मधून धारा 370 हटवली. आपले उद्दिष्ट साध्य केले.

राजकारणात दुर्जन शत्रूचा उपयोग ही जे स्वतःच्या हितासाठी करू शकतात त्यांनाच खरे राजकारण कळले असते.

संस्कृतीइतिहासवाङ्मयविचारआस्वादलेख

प्रतिक्रिया

विवेकपटाईत's picture

11 Aug 2023 - 9:41 am | विवेकपटाईत

मला वाटले होते या धाग्यावर प्रतिसाद जास्त येतील.बहुतेक इथे दुर्जनांचा सन्मान हा विषय पटलेला नाही.

मुक्त विहारि's picture

11 Aug 2023 - 10:08 am | मुक्त विहारि

धन्यवाद

सुरिया's picture

11 Aug 2023 - 6:27 pm | सुरिया

दाखवायचा असतो पॉर्नच. आंबटशौकीनांची डीमांड असतेच मग पोस्टर लावायचे डाकू हसीना चे, प्रेक्शक अर्धा एक तास कसल्याही बी सी ग्रेडला सहन करतात अपेक्षित गरमाईसाठी. तसला हा प्रकार आहे लेखाचा. आणि तो आवर्जून प्रत्येक लेखात केला जातो. संस्थळावर एकतर्फी प्रचारातून उडणारी राळ टाळावी म्हणून प्रशासकांनी राजकारण टाळलेच मग काय करायचे. कुठूनतरी कसातरी संबध जोडायचा आणि आणि लावायची रीळ.
अवघडे खरेच.

अहिरावण's picture

11 Aug 2023 - 7:14 pm | अहिरावण

तद्दन बिनडोक लेखन

चौथा कोनाडा's picture

11 Aug 2023 - 8:24 pm | चौथा कोनाडा
चौथा कोनाडा's picture

11 Aug 2023 - 8:24 pm | चौथा कोनाडा

आता समर्थ म्हणताहेत म्हणजे बरोबरच असणार !
आणि तुम्ही पटाईत म्हणजे विवेक ठेऊनच लेख लिहिला असणार !

राजकारण भलता अवघड प्रकार असतो .. चकणाऱ्या चाली खेळाव्या लागतात .. लॉन्ग टर्म विजयासाठी शॉर्ट टर्म तडजोडी कराव्या लागतात !

स्वगत : कुणी तरी पोर्ण चा उल्लेख केलाय .. आता धाग्यावर लक्ष ठेऊन राहावे लागणार :-)