जपानला शरणागती स्वीकारण्यासाठी भाग पाडण्याच्या दृष्टीने अमेरिकेने गुप्त ‘मॅनहॅटन प्रकल्प’ हाती घेतला होता. त्याच्या पहिल्या टप्प्यात 16 जुलै 1945 रोजी अमेरिकेने न्यू मेक्सिकोच्या वाळवंटात ‘त्रिनिटी’ या जगातील पहिल्या अण्वस्त्राची चाचणी घेतली. ती चाचणी यशस्वी झाल्यावर या नव्या अस्त्राच्या मदतीने जपानला आपल्या अटींवर शरणागती पत्करायला लावण्यासाठी मित्र देशांच्या हालचाली सुरू झाल्या. त्यानंतर अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर ‘मॅनहॅटन प्रकल्पा’त तयार करण्यात आलेली ‘Little Boy’ आणि ‘Fat Man’ ही अण्वस्त्रे अनुक्रमे 6 आणि 9 ऑगस्ट 1945 रोजी डागली. त्यानंतर 15 ऑगस्ट 1945 रोजी जपानने विनाअट शरणागती पत्करली.
हिरोशिमावरील अण्वस्त्र हल्ल्यात सुमारे 1,40,000 हजार आणि नागासाकीवरच्या हल्ल्यात सुमारे 70,000 लोकांचा बळी गेला होता. दोन्ही शहरे तर बेचिराख झाली होती. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी 6 ऑगस्टला ‘हिरोशिमा दिन’ पाळला जातो.
राखेतून उभा राहिलेला जपान आज जगातील प्रमुख 7 विकसित देशांपैकी एक बनला आहे. पण अण्वस्त्रांच्या बाबतीत तो अतिशय संवेदनशील आहे.
भारताचा आजवरचा अणुइतिहास, अण्वस्त्रप्रसारबंदी, अण्वस्त्रांचे संपूर्ण नि:शस्त्रीकरण याबाबतची भूमिका व जबाबदार आण्विकशक्ती या बाबी टोकियोने विचारात घ्याव्यात आणि अणुऊर्जा क्षेत्रात सहकार्य करावे असे भारताला वाटते. कारण भारत ‘अण्वस्त्रमुक्त जग’ या तत्वाशी कायम बांधिलकी व्यक्त करत आला आहे.
जपानवरील अमेरिकेच्या अणुहल्ल्याला 75 वर्षे पूर्ण होऊन गेली आहेत. त्या पार्श्वभूमीवर टोकियोतील ऑलिंपिक स्पर्धांच्या समारोप समारंभात अणुहल्ल्याच्या स्मृतींवर आधारित कार्यक्रम सादर केला जाणार आहे.
हा विषय सविस्तर खालील लिंकवरही आहे.
https://avateebhavatee.blogspot.com/2021/08/blog-post_6.html?m=1
प्रतिक्रिया
6 Aug 2021 - 2:26 pm | मराठी_माणूस
एक शंका: पहील्या बाँब स्फोटा नंतरच प्रचंड हानी चे स्वरुप दिसले होते , ते पाहील्या नंतर ही दुसरा बॉंब का टाकला असावा?
6 Aug 2021 - 3:13 pm | चंद्रसूर्यकुमार
याचे उत्तर पुढे दडलेले आहे--
‘Little Boy’ आणि ‘Fat Man’ ही अण्वस्त्रे अनुक्रमे 6 आणि 9 ऑगस्ट 1945 रोजी डागली. त्यानंतर 15 ऑगस्ट 1945 रोजी जपानने विनाअट शरणागती पत्करली.
हिरोशिमावर बॉम्ब टाकला होता जपानने लवकरात लवकर शरणागती पत्करून युध्द थांबावे म्हणून. ६ तारखेचा तो भयानक हल्ला झाल्यावरही जपानने शरणागती पत्करली नाही. मग ९ तारखेला नागासाकीवर हल्ला झाला. तरीही जपानी सेनाधिकार्यांना लढायची खाज होती आणि ते शरणागती पत्करायला तयार नव्हते. राजे हिरोहिटो शरण यावे या मताचे होते तर त्याला सेनाधिकार्यांचा विरोध होता. शेवटी जपानने मग १५ ऑगस्टला शरणागती पत्करली. ते झाले नसते तर कदाचित मग तिसरा, चौथा, पाचवा असे बॉम्बही टाकले गेले असते. जपानी म्हणजे जाम डेंजर लोक होते.
6 Aug 2021 - 4:37 pm | पराग१२२६३
हो बरोबर आहे.
6 Aug 2021 - 6:04 pm | मराठी_माणूस
तरीही असे वाटते की , दुसरा बाँब टाकायच्या आधी थोडा धीर धरायला हवा होता. पहील्या नंतर झालेली मनुष्य हानी आणि त्याचे होणारे दुरगामी परीणाम सर्वत्र पसरुन लोकांचा दबाव वाढला असता. झालेली हानी कीती आहे ते समजुन सर्व राष्ट्रात ते लगेच पोहचणे आजच्या सारखे वेगवान निश्चितच नसणार . तसेही ते ९ तारखे नंतर लगेच शरण आले नाहीतच
6 Aug 2021 - 6:39 pm | पराग१२२६३
जपाननं या क्षणाला आपल्यासमोर शरणागती पत्करावी हे अमेरिकेसाठी तातडीची गरज होती तिच्या राष्ट्रहिताच्या संरक्षणाच्या दृष्टीने.
6 Aug 2021 - 7:31 pm | चंद्रसूर्यकुमार
म्हणजेच काय तर शत्रूच्या देशातील लोकांचे प्राण वाचायला पाहिजेत म्हणून अमेरिकेने आपल्या लोकांचे बळी द्यायला हवे होते असे म्हणायचे आहे का? युध्द लगेच थांबले नसते आणि आणखी काही काळ चालू राहिले असते तर त्यात अमेरिकन सैनिक मारले गेले नसते का? युध्द चालू असताना शत्रूच्या देशातील लोकांच्या जीवाची काळजी अमेरिकेने का करावी?
6 Aug 2021 - 7:45 pm | Rajesh188
नसते का? युध्द चालू असताना शत्रूच्या देशातील लोकांच्या जीवाची काळजी अमेरिकेने का करावी?
ह्या मतावर तुम्ही ठाम असेल तर world trade सेंटर वरील हल्ला सुद्धा योग्य च होता असे म्हणावे लागेल.
निरपराध लोकांवर हल्ला करणे हे कधीच समर्थनीय होत नाही.
जपानी सैन्य अमेरिके बरोबर लढत होते सामान्य जनता नाही.
सैनिक ठिकाणावर हल्ला केला असता तर एकवेळ समजून घेता आले असते.
7 Aug 2021 - 10:23 am | सुबोध खरे
अत्यावशक्य
नागासाकी हे लष्करी ठाणे होते एवढा वाचलं असतं तरी ठीक होतं
6 Aug 2021 - 3:17 pm | कॉमी
पहिल्या बॉंबच्या वेळेस सुद्धा माहीतच असणार कि काय होणार ते. चाचणी त्यासाठीच तर होते ना ?
6 Aug 2021 - 4:29 pm | पराग१२२६३
पहिल्या बॉंबहल्ल्यानंतरही तातडीनं जपानकडून शरणागतीची काही चिन्ह दिसली नाहीत. म्हणून नागासाकीवरही अणुहल्ला करण्यात आला.
6 Aug 2021 - 4:35 pm | पराग१२२६३
पहिल्या बॉंबहल्ल्यानंतरही तातडीनं जपानकडून शरणागतीची काही चिन्ह दिसली नाहीत. म्हणून नागासाकीवरही अणुहल्ला करण्यात आला.
6 Aug 2021 - 6:19 pm | Rajesh188
अमेरिके नी चालू केलेली परंपरा बाकी राष्ट्रांनी पण पुढे चालू ठेवावी का.
क्षत्रू राष्ट्र युद्धात शरण येत नाही तो पर्यंत अणू अस्त्रांचा वापर. करावा का.
अमेरिकेने महा मूर्ख पना केला होता. अणू बॉम्ब प्रचंड विध्वंस घडवून आणेल ह्याची त्याला जाणीव होती.
अमेरिके नी आज पूर्ण जगाची माफी मागणे गरजेचे होते.
6 Aug 2021 - 3:32 pm | Bhakti
6 Aug 2021 - 6:31 pm | Rajesh188
हायड्रोजन बॉम्ब नी किती नुकसान होईल हे पण कशाला प्रत्यक्षात माहीत नाही.
अमेरिकेवर टाकून कन्फर्म कोणी केले तर चालेल का.
बिलकुल चालणार नाही.
चाचणी घेताना सर्व अंदाज आलेला असतो त्या साठी त्याचा वापर लोक वस्ती वर करायची गरज नाही.
पण अमेरिकेने जपान वर अणू बॉम्ब टाकून खूप मोठा गुन्हा केला आहे.
तो लपविण्यासाठी काही तरी धतुर मातुर कारणे दिली जात आहेत.
6 Aug 2021 - 9:37 pm | गामा पैलवान
मराठी_माणूस,
हिरोशिमाच्या आधी राजधानी तोक्यो वर तुफान बॉम्बफेक झाली होती. तिच्यात लाखभराहून जास्त जपानी लोकं मृत्युमुखी पडले होते. संदर्भ : https://en.wikipedia.org/wiki/Bombing_of_Tokyo
हिरोशिमाचा संहार भयंकर असला तरी जपानी सहज हार मानण्यातले नव्हते. अमेरिकेसही याची कल्पना होतीच. म्हणून त्यांनी दुसरा अणुबॉम्ब सज्ज ठेवलेला होता. त्यासाठी कोकुरा हे शहरही निश्चित केलं. मात्र खराब हवामानामुळे नागासाकीवर बॉम्ब टाकण्यात आला.
हिरोशिमामध्ये मेलेल्यांपैकी बरेच जण कोरियन वा कोरियाशी निगडीत होते. काही कोरियन लोकांच्या मते कोरियन युद्ध १९५३ साली सुरू झालं नसून हिरोशिमापासनं सुरू झालं.
असो.
काही इतिहासकारांच्या मते जपानने बाह्यत: लढाई चालू ठेवायचं ठरलेलं असलं तरी आतून शरणागती पत्करायला उत्सुक होता. रशियासमोर पत्करायची की अमेरिकेसमोर इतकाच प्रश्न उरला होता. अमेरिकेस याचा सुगावा लागला. पारडं आपल्या बाजूस झुकावं म्हणून पहिला बॉम्ब टाकला. त्यात अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने दुसराही टाकला. तोवर रशियाने आक्रमक भूमिका घेऊन जपानची बेटं गिळायची तयारी सुरू केली. म्हणून अमेरिकेने रशियाला आगेकूच थांबण्याची चेतावणी देण्यासाठी हे दोन बॉम्ब टाकले.
आ.न.,
-गा.पै.
6 Aug 2021 - 10:25 pm | चंद्रसूर्यकुमार
२८ जुलैला अमेरिकेने मॉस्कोतील जपानी वकीलातीमार्फत जपान सरकारला निर्वाणीचा इशारा धाडला होता की ताबडतोब शरणागती पत्करा नाहीतर सर्वनाशाला सामोरे जायची तयारी ठेवा. १ ते ५ ऑगस्ट दरम्यान तेच आवाहन करणारी इंग्लिश आणि जपानी या दोन्ही भाषांमध्ये लिहिलेली हजारो पत्रके अमेरिकन विमानांनी जपानमध्ये टाकली होती. याचा अर्थ अमेरिकेने जपानला आधी इशारे दिले होते. जर जपान शरणागती पत्करायला उत्सुक असेल तर असा निर्वाणीचा खलिता आल्यावर तरी जपानने शरणागती पत्करायला हवी होती. पण त्यांनी ते तसे का केले नाही? इतकेच नव्हे तर १५ ऑगस्टला जपानने शरणागती पत्करली त्याच्या काही तास आधी काही जपानी सेनानींनी राजे हिरोहिटोंनाच कैद करून शरणागती पत्करायच्या निर्णयाविरोधात हालचाली केल्या होत्या. जपानी लोक राजाला इतके मानत असूनही त्याच राजाला कैद करायची हालचाल करून युध्द चालू ठेवायची खुमखुमी असलेले लोकही तिथे होते.
जवळपास पूर्ण दुसर्या महायुध्दाच्या काळात रशिया आणि जपान यांच्यात शांतताकरार होता. त्यामुळे रशिया जर्मनीविरोधात पूर्ण लक्ष केंद्रीत करू शकला. जपानने अमेरिकेवर हल्ला केला त्याऐवजी रशियावर पूर्वेकडून हल्ला केला असता तर दुसर्या महायुध्दाचा निकाल कदाचित वेगळा असता. अर्थात जर-तरला काही अर्थ नसतो. पण सांगायचा मुद्दा हा की हा शांतताकरार जवळपास शेवटपर्यंत टिकला होता. जर्मनीचा प्रश्न संपल्यावर रशियाने ८ ऑगस्टला तो करार मोडल्याचे जाहीर केले आणि ९ ऑगस्टला नागासाकीचा हल्ला व्हायच्या काही तास आधी जपानवर हल्ला सुरू केला. रशिया हा बोका आयत्या वेळी लोण्याचा गोळा लाटायला आला होता. जपानने अमेरिकेपुढे शरणागती पत्करल्यावरही रशियाचे युध्द सुरूच राहिले होते. कुरिल बेटे त्यावेळी रशियानी लाटली आणि अजूनही जपानला परत दिलेली नाहीत. शेवटी जपानने २ सप्टेंबरला रशियापुढे शरणागती पत्करली. तेव्हा जपानकडून शरणागती घेण्यापेक्षा कुरिल बेटे वगैरे लोण्याचे गोळे आयत्या वेळेस युध्दात पडून लाटायला रशिया हा बोका युध्दात उतरला होता.
बाकी हिरोशिमा-नागासाकी हल्ल्यात दोनेक लाख लोक मेले म्हणून गळे काढणार्या लोकांना बर्याच गोष्टी माहित नसतात. त्यातील सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे जपानने शरणागती न पत्करता युध्द चालूच ठेवले असते तर मग जपानवर सैनिकी हल्ला करावा लागला असता. ऑपरेशन डाऊनफॉल या नावाने त्याची तयारी सुरूही होती. पण जपानी हे अत्यंत चिवट आणि कडवे लढवय्ये असल्याने त्या सैनिकी हल्ल्यात हिरोशिमा-नागासाकीपेक्षा कित्येक पटींनी जपानी (आणि अमेरिकनही) लोकच मारले गेले असते ही शक्यता आहे. आणि अमेरिकन सैनिकांना जपानी मारत असतील तर जपान्यांना पूर्ण शरणागती पत्करायला लावण्याइतका चोप द्यायच्या आधी युध्द थांबवायला अमेरिकन राज्यकर्ते हे भारतीय राज्यकर्त्यांप्रमाणे मानवतावादाचे फुकाचे डोहाळे लागलेले नव्हते. असो.
6 Aug 2021 - 10:45 pm | सुक्या
जपानी लोक राजाला इतके मानत असूनही त्याच राजाला कैद करायची हालचाल करून युध्द चालू ठेवायची खुमखुमी असलेले लोकही तिथे होते.
माझ्या मते याला तिथे असलेली बुशिडु विचारधारा कारणीभुत असावी. मरेपर्यंत लढु हा त्या विचार्धारेचा गाभा आहे. त्यामुळे तिथे कामीकाझी पायलट खुप होते. त्यात जपानी लोकांचा शरणागती पत्करलेल्या लोकांवरचा राग किंवा त्या लोकांचा अपमान करण्याची भावना किंवा शरणागती पत्करलेला जगण्यास लायक नसतो वगेरे मानसिकता याला जबाब्दार असावी.
6 Aug 2021 - 11:05 pm | चंद्रसूर्यकुमार
शक्यता आहे.
6 Aug 2021 - 11:04 pm | पराग१२२६३
चंद्रसूर्यकुमारजी, तुम्ही मांडलेले मुद्दे योग्य आहेत; पण मी असं म्हणेन की, अमेरिकन राज्यकर्ते कधीच मानवतावादी नसतात. ते त्या त्या काळानुसार वास्तववादी अधिक असतात.
6 Aug 2021 - 11:18 pm | चंद्रसूर्यकुमार
सगळ्यात महत्वाचे म्हणजे युध्द सुरू असताना राज्यकर्त्यांनी आपल्या नागरिकांच्या जीवाची पर्वा करायची की शत्रूच्या? शत्रूदेशातल्या नागरिकांचा जीव वाचावा म्हणून आपल्या नागरिकांचा बळी द्यायचा का? बरेच लोक म्हणतात की जपान तसेही टेकीला आले होते आणि महिन्या-दीडमहिन्यात शरण आले असते. जपान्यांची युध्दाची खुमखुमी लक्षात घेता तसे झालेच असते यावर विश्वास ठेवणे कठीण जाते. विशेषतः नागासाकीनंतरही जपानने शरणागती पत्करायला ६ दिवस घेतले असतील तर. तरी समजा इतर लोक म्हणतात म्हणून ते मान्य केले तरी आणखी एक गोष्ट विसरता येणार नाही. १९४५ च्या सुरवातीपासून अमेरिकेचे जपान आघाडीवर सरासरी दर आठवड्याला ४००० सैनिक मारले जात होते. पण महिना-दीड महिना युध्द चालू ठेवायचे म्हणजे १५-२० हजार अमेरिकन सैनिकांचा बळी द्यायचा असा त्याचा अर्थ झाला असता. अमेरिकेच्या अध्यक्षांची जबाबदारी काय होती? अमेरिकन लोकांचे रक्षण करणे की शत्रूच्या देशातील लोकांचे रक्षण करणे? सगळ्यात कळीचा मुद्दा तोच आहे.
जपान्यांची त्यावेळची प्रवृत्ती लक्षात घेता तसा दणका दिला नसता तर जपान शरण इतक्या सहजासहजी नक्कीच आले नसते.
7 Aug 2021 - 3:28 am | अनन्त अवधुत
युद्ध जर पुढे सुरुच राहिले असते तर जपानने पण अमेरिकेवर असाच एक भयंकर हल्ला करायचा कट रचला होता. त्यात ते अणुबाँब ऐवजी प्लेग पसरवणारे बाँब फेकणार होते. ऑपरेशन चेरी ब्लॉजम
जपानने आपल्या जैविक शस्त्रांची चाचणी लोकांवर (त्यात भारतीय पण होते) केली होती. त्याचा परिणाम पाहुन त्यांनी पुढील योजना आखली.
7 Aug 2021 - 8:35 am | चंद्रसूर्यकुमार
बापरे. हे माहित नव्हते. ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
अमेरिकेने जपानच्या नागरी वस्तीवर हल्ला केला त्याविरूध्द गळे काढणारे लोक याविरूध्द काय म्हणतील? जपान्यांनी दक्षिण पूर्व आशियात आणि भारतातही अंदमानात ज्या कत्तली केल्या होत्या तशाच कत्तली संधी मिळाली असती तर अमेरिकेतही केल्याच असत्या. ती संधी त्यांना द्यायची की त्यापूर्वीच एक सणसणीत रट्टा घालून ते कधीही डोके वर काढणार नाहीत याची व्यवस्था करायची हा प्रश्न होता. आपले लोक मेले तरी चालतील पण शत्रूच्या देशातील लोक वाचले पाहिजेत असली फुकाची मानवता अमेरिकन राज्यकर्ते जोपासत नव्हते हे अमेरिकन लोकांचे नशीब चांगले होते.
14 Aug 2021 - 3:09 pm | शानबा५१२
होमिओपॅथीबद्दल असे लिहणा-या विकिपिडीयाचे दाखले दीले जातयत! वा!
https://en.wikipedia.org/wiki/Homeopathy
6 Aug 2021 - 10:52 pm | मदनबाण
मध्यंतरीच्या काळात मी काही न्युक्लिअर टेस्ट / डॉक्युमेंटरीज पाहिल्या होत्या त्याचे व्हिडियो इथे देउन जातो...
जाता जाता :- फुकुशिमा रेडिएशन सगळे विसरले का ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Santana - Oye Como Va (Live HQ - Carlos Santana)
6 Aug 2021 - 10:54 pm | सौन्दर्य
जपानने हिटलर व मुसोलिनी बरोबर हात मिळवणी करून आशियातील छोट्या छोट्या देशांचे लचके तोडायला तशी देखील सुरवात केलीच होती. जपानचे सैन्य रंगून पर्यंत पोहोचले होतेच. त्यांनी देखील अपरिमित क्रौर्य दाखवून मनुष्य हानी केली. जंगलातील वनराज घायाळ झाल्यावर जंगली कुत्रे, तरस जसे त्याचे चारही बाजूने लचके तोडायला पुढे सरसावतात तसे जपान्यांचे वर्तन होते. त्यांचे नशीब वाईट म्हणून त्यांना अमेरिकेच्या पर्ल हार्बरवर हल्ला करण्याची दुर्बुद्धी झाली. नाहीतर दुसरे महायुद्ध इतक्या लवकर संपले नसते.
6 Aug 2021 - 11:24 pm | चंद्रसूर्यकुमार
हा मुद्दा बर्याच लोकांच्या लक्षात येत नाही किंवा ते सोयीस्करपणे त्याकडे दुर्लक्ष करत असतात. जपान्यांनी दक्षिण पूर्व आशियात आणि चीनमध्ये अतिशय नृशंस अशा कत्तली केल्या होत्या.
एकदा वाघाला डिवचले तर मग तो वाघ फाडून खाणारच. मग वाघाने मला खाल्ले ही तक्रार करून उपयोग नसतो. शत्रूने युध्द सुरू केले असेल तर ते संपवायचे कसे हे आम्ही ठरवू असे अमेरिकन राज्यकर्त्यांना वाटले असेल तर त्यात काही चूक आहे असे वाटत नाही. तरीही हिरोशिमा-नागासाकी पूर्वी अमेरिकेने जपानला इशारे दिले होते. ते त्यांनी मानले नाहीत त्यामुळे दुर्दैवाने जपानी लोकांना त्याचे परिणाम भोगावे लागले.
7 Aug 2021 - 9:06 am | Rajesh188
अणू बॉम्ब चा वापर करणे हे चूकच होते त्याचे समर्थन करण्याचे काही कारण नाही.
बॉम्ब चा विस्फोट झाल्या नंतर त्याचा परिणाम त्याच भागापूर्ता मर्यादित राहत नाही.
त्या दुष्परणामांना देशाच्या सीमा माहीत नसतात.
स्फोटानंतर radioactive कण हवे द्वारे खूप मोठ्या प्रदेशात पसरतात.आणि हवा ,पाणी दूषित करतात.कॅन्सर सारखे महाभयंकर रोग मानव त निर्माण करण्याची क्षमता ते राखून असतात.
अनेक वर्ष अणू बॉम्ब चे दुष्परिणाम राहतात.
वनस्पती,प्राणी ह्यांचे हकनाक जीव जातात.
पृथ्वी वातावरण वर अत्यंत घातक परिणाम पण नक्कीच होत असणार.
आणि ज्या देशात अणू स्फोट केला आहे त्याच्या आजबजूच्या देशात पण त्याचे दुष्परिणाम होतात.
आता जर महायुद्ध झाले आणि युद्ध जिंकण्यासाठी काही ही करू हीच राजकीय नेत्यांची वृत्ती असेल तर.
हजारो अणू बॉम्ब,हायड्रोजन बॉम्ब चा वापर होईल आणि पृथ्वी वर ची जीवसृष्टी माणसा सहित नष्ट होईल.
युद्ध जिंकण्या साठी एवढी मोठी किंमत देणे म्हणजे महा मूर्ख पणाच असेल.
7 Aug 2021 - 1:33 pm | मराठी_माणूस
हो. पण अमेरिकन सैन्यांचे जीव जास्त महत्वाचे नाहीत का? लाखो जपान्यांच्या (तेही सामान्य, निरपराध) जीवांचे एव्हढे काय मह्त्व ?
7 Aug 2021 - 7:39 pm | चंद्रसूर्यकुमार
भारत-पाकिस्तान युध्द चालू असताना भारताच्या पंतप्रधानाने पाकिस्तानातल्या लोकांचे जीव वाचावेत म्हणून आपल्या लोकांना मरू दिले तर तुमची प्रतिक्रिया काय असेल?
सैनिक हे पण देशाचे नागरिकच असतात. कोणाही देशाच्या राज्यकर्त्यांची आपल्या सैनिकांचे जीव वाचवणे ही पण जबाबदारी असते. सैनिक हे काही बळीचे बकरे नसतात त्यामुळे ते युध्दात मेले तरी चालेल असे म्हणणे असेल तर भोळसट गांधीवाद्यांच्या दृष्टीकोनातून ते योग्य असेल पण प्रॅक्टिकल दृष्टीने अयोग्य आहे. तेव्हा आपले सैनिक विरूध्द त्यांचे सामान्य लोक यात जास्त महत्व आपल्या सैनिकांनाच दिले पाहिजे.
आपण समस्येत नसतो आणि दुसर्या कोणीच्या तरी समस्या लांबून बघत असतो आणि निर्णय दुसर्या कोणाला तरी घ्यायचा असतो तेव्हा अशी मानवतावादाची झूल पांघरून अमुक करायला हवे होते, तमुक करायला हवे होते ही लेक्चरबाजी करणे सोपे असते.
असो. मी माझा मुद्दा पुरेसा स्पष्ट केला आहे. आता पूर्णविराम.
7 Aug 2021 - 8:01 pm | Rajesh188
महायुद्ध दोस्त राष्ट्रांनी जिंकले म्हणून भारताचा काय फायदा झाला आणि जपान जिंकला असता तर भारताचे काय नुकसान झाले असते.
आपल्याला जपान दुश्मन वाटायचे काही कारण नाही किंवा अमेरिका हित चिंतक वाटायचे काही कारण नाही.
मग परमाणू बॉम्ब हल्ल्या नी भारताने का आनंदाने नाच करावा.
7 Aug 2021 - 8:12 pm | Rajesh188
सुभाष चंद्र बोस जर्मनी आणि जपान चे सहकार्य घेवून भारताला ब्रिटिश सत्ते पासून मुक्त करण्याच्या प्रयत्नात होते.
दोन्ही राष्ट्र सुभाषचंद्र ह्यांना मदत करायला पण तयार होते.
त्यांनी सेना पण स्थापन केली होती.
भारताने ब्रिटिशांच्या बाजू नी युध्दात उतरून चुकीचा निर्णय घेतला .
7 Aug 2021 - 8:17 pm | गामा पैलवान
चंद्रसूर्यकुमार,
रशियाप्रमाणे जपानलाही लोण्याचे गोळे पटकावलेले होते. ( त्यापैकी काही : आशिया प्रशांत, फिलिपिन्स, ब्रह्मदेश, सिंगापूर, इत्यादि ) हे गोळे जपानला हातात राखायची नितांत गरज होती. करण की १९४२ नंतर जपानसमोर अमेरिका वरचढ होऊ लागली. हे गोळे राखण्यासाठी व इतर उद्दिष्टे जसे की युद्धगुन्हे टाळणे, राजघराणे अबाधित ठेवणे वगैरेसाठी रशिया मध्यस्थ म्हणून काम करेल असा जपानचा होरा होता. पण हिरोशिमानंतर स्टालिनने टोपी फिरवली व जपानवर आक्रमण केलं. हिरोशिमाची हानी प्रचंड असली तरी इतर एकत्रित हानीच्या तुलनेने कमीच होती. तसंच जपानी जनता अमेरिकी आक्रमणाविरुद्ध युद्धासाठी सज्ज होती. त्या उन्मादात हिरोशिमाची लोकहानी खपून गेली. या कोंडीवर 'उपाय' म्हणून अमेरिकेने दुसरा अणुध्वम टाकला.
यासंबंधी माझी माहिती ज्यावर आधारित आहे तो लेख गेले दोन दिवस शोधंत होतो. शेवटी सापडला (इंग्रजी दुवा) : http://archive.boston.com/news/world/asia/articles/2011/08/07/why_did_ja...
जमल्यास हा लेख वाचा म्हणून सुचवेन. बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील.
आ.न.,
-गा.पै.
7 Aug 2021 - 8:37 pm | Rajesh188
जपान जिंकला असता तर त्यांनी चीन पण बराच काबीज केला असता.आणि ते भारताच्या दृष्टी नी फायद्या चेच ठरले असते.
जपान जिंकला असता तर ब्रिटिश सरकार तेव्हाच उलथून टाकले असते.भारत मुक्त झाला असता.
आणि जपान नी भारतावर कब्जा मिळवण्याची शक्यता कमी होती.
मग भारताला आनंद जपान हरण्यात झाला पाहिजे की ब्रिटिश जिंकण्यात.
7 Aug 2021 - 9:03 pm | मराठी_माणूस
बाकी अमेरिकेच्या खिजगणतीत नसलेले त्यांची तळी उचलुन धरणारे असंख्य वकील जगभर पसरलेले आहेत. दुसरे महायुध्द संपल्या नंतरही आजता गायत अमेरिकेचे , जगाला त्रासदायक उद्योग चालु आहेत , तुलनेने जपान शांत बसलाय.
दुसरे महायुध्द चालु करणारे जर्मनही आदरणीय असतात. पाश्चिमात्य आणि अमेरिकन्स नेहमीच बरोबर असतात .
7 Aug 2021 - 10:32 pm | गॉडजिला
हाहाहा, कारण तहामधे जपानला सैन्य ठेवायची बंदी झाली अन त्याबदल्यात अमेरिकेला तेथे सैन्य तळ उभारू दिला गेला, अमेरिकेने जपानचे संरक्षण यापुढे करावे असे ठरले. अमेरिकेने ते वचन प्रदीर्घकाळ पाळले कारण त्यांनाही अणुबॉम्बचे damage control करायचे असावे. आता जपानही सैन्य ठेवतो पण संरक्षणाची प्रमूख जबाबदारी अमेरिकेचे नाविक दल पाळत आले आहे.
8 Aug 2021 - 2:05 am | Rajesh188
ह्यांचा पराजय झाला असता भारताला जास्त फायदा झाला असता.
जपान सर्व च बाबतीत अमेरिका पेक्षा खूप सुसंस्कृत आहे.
त्यांची संस्कृती उच्च आहे.
त्याची आहार शैली उत्तम आहे.
त्यांचे निसर्ग विषयी प्रेम उत्तम आहे.
अमेरिके पेक्षा जपान च प्रभाव जगावर वाढला असता तर आता जी पृथ्वी वरील जीव सृष्टी विनाशाच्या सीमेवर पोचली आहे ती पोचली नसती.
जंक फूड ,दारू,बंदूक संस्कृती,स्वैराचार,चंगळवादी संस्कृती ही सर्व पाश्चिमात्य देशांची देणं आहे.
दुसरे महा युद्ध त्यांनी हरणे जगा साठी शुभ संकेत झाला असता
8 Aug 2021 - 2:28 am | गॉडजिला
इतिहास शिकणे सोडा नुसते व्हिडियो गेम्स जरी खेळले असते (call of duty world at we war) तरी जपानी क्रूरता म्हणजे काय याची झलक मिळाली असते बाकी भौतिक सुखे जपानमध्ये अमेरिकेपेक्षा जास्तं आहेत... जपानला गेलात की ते ही अनुभवून या.
बाकी मुळात हिटलरने मस्ती केली नसती तर युद्धच झाले नसते काकुला मिशा अस्त्या तर तिला काका म्हंटले असते वगेरे आम्हीं शाळेत भरपूर गप्पा मारल्या आहेत... आपल्याला बहुतेक त्याची संधी मिळाली नसावी
8 Aug 2021 - 4:42 pm | तुषार काळभोर
शिवाय इथे काही ठराविक विकृत सदस्य असंबद्ध, तर्कहीन, संदर्भहीन आणि एकूणच हीन प्रतिसाद देत असल्याने, थोडा डेटा:
या डेटा मधून काय माहिती मिळते, ते ज्याने त्याने आपापल्या वकुबानुसार ठरवावे.
दुसऱ्या महायुद्धातील सर्वाधिक मृत्यू :
देश - सैनिकी मृत्यू - विरुद्ध देशातील सैन्यामुळे झालेले नागरी मृत्यू
जपान - २१-२३ लाख - ५-८ लाख
चीन - ३०-३७ लाख - ७५-८० लाख
रशिया (सोव्हिएत युनियन) - ८५-११५ लाख - ४५-१०० लाख
पोलंड - २.४ लाख - ५६-५८ लाख
जर्मनी - ४४-५३ लाख - १५-३० लाख
भारत - ८७ हजार - शून्य
भारताचे आकडे तुलनेसाठी दिले आहेत. इतर देश सर्वाधिक नागरी हत्या झालेले देश आहेत.
वरील देशातील दुसऱ्या महायुद्धातील जे नागरी मृत्यू झाले, ते प्रत्येकी कोणत्या देशामुळे झाले असतील?
उदा. रशिया, पोलंड मधील एक ते दीड कोटी नागरिकांचे मृत्यू कोणत्या देशामुळे झाले? चीन मधील सत्तर - ऐंशी लाख नागरिक कोणत्या देशामुळे मृत्युमुखी पडले?
त्या दोन देशांनी भारताची काय वाट लावली असती, कल्पना करता येते का पहा.
8 Aug 2021 - 4:56 pm | गॉडजिला
सुरेख प्रतिसाद.
9 Aug 2021 - 2:18 am | Rajesh188
साम्राज्यवादी ब्रिटन,रशिया,आणि फ्रान्स हे देश होते.ब्रिटिश ल नी अनेक देश गिळंकृत केले होते.
आणि ह्या साम्राज्य वादी वृत्ती मुळेच पाहिले महा युद्ध भडकले.
ब्रिटिश लोकांचा साम्राज्य वादा विषयी एक शब्द बोलणार नाहीत पण जर्मनी जपान ल मात्र आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणारे अमेरिका प्रेमी येथे आहेत.
पाहिले महायुद्ध जर्मनी हरल्यावर जर्मनी वर त्यांच्या स्वाभिमानाला ठेस पोचेल असे निर्बंध घातले गेले आणि दुसऱ्या महायुद्धाच्या घाईत जग कोसळले त्याला साम्राज्य वादी ब्रिटन,फ्रान्स,रशिया हे पण देश कारणीभूत आहेत.
तेव्हाचा ब्रिटिश इंडियन army ची ताकत खूप कमी होती जपान नी ब्रिटिश भारतावर हल्ला केला असता तर काही दिवसातच भारत त्यांनी जिंकला असता.
जपान च्या विजयी घोडी दोडी मुळे ब्रिटिश सैन्य खचले होते .
त्या मुळे जपान नी भारतात नागरी वस्ती वर हल्ले करून जीवित हानी केली असती हा तर्क च चुकीचं आहे.
11 Aug 2021 - 3:30 am | अनन्त अवधुत
तीन वर्षे भारताची अंदमान आणि निकोबार बेट जपानच्या ताब्यात असताना जपान्यांनी तिथे मनसोक्त धुडगुस घातला, तिथल्या नागरिकांना, त्यात ब्रिटिश समर्थक, राष्ट्रवादी, आणि जपानला मदत करणारे असे सगळे आले, त्यांना ठार केले.
युद्धादरम्यान भारतीय जरी गरीब होते तरी भारत मात्र एक संपन्न देश होता. अशा संपन्न देशाला आपल्या सैनिकांचे रक्त सांडुन, ब्रिटिशांपासुन सोडवून, स्वातंत्र्य द्यायला जपान काय वेडा नव्हता. उलट जपान जर जिंकला असता तर त्याने अधिक जोमाने भारतावर राज्य केले असते.आणि म्हणे जपान युद्ध जिंकला असता तर भारताला स्वातंत्र्य मिळाले असते.
पहिल्या महायुद्धा मध्ये जपान इंग्लंड, फ्रान्स, अमेरिकेच्या बाजुने लढले. पण व्हर्सायच्या तहात पदरात फारसे काही न पडल्याने दुसरे महायुद्ध जपानने जर्मनीच्या बाजुने लढले.
11 Aug 2021 - 2:52 am | अनन्त अवधुत
तेव्हा १९४२ ते ४५ हे तीन वर्षे जपानचा त्या बेटांवर ताबा होता.
हे दोन दुवे पहा
१. जपानचे अंदमान आणि निकोबारवरील अत्याचार
२.जपान्यांनी भारतीयांचे केलेले शिरकाण
जपानने ती बेट जिंकल्यावर तिथे आझाद हिंद सरकारची स्थापना केली. सुभाषचंद्र बोसांनी त्या बेटांचे नामकरण शहीद आणि स्वराज असे केले होते. तिथे आझाद हिंद सरकार जरी स्थापन केले असले तरी बेटांवर हुकुमत मात्र जपानची होती. प्रशासनात आणि इतर सगळ्या ठिकाणी मुख्य जपानी अधिकारीच असे. त्यांचेच निर्णय अंतिम असत.
तिथल्या भारतीयांची मदत मिळावी आणि विरोध होवू नये म्हणून आझाद हिंद सरकार हे मधाचं बोट पुढे केल्या गेले होते.
11 Aug 2021 - 6:15 pm | गामा पैलवान
अनन्त अवधुत,
तुमच्याशी शंभर टक्के सहमत आहे. जपानी सैनिक हे शुद्ध पशू होते. बहुधा म्हणूनंच नेताजींनी जपान्यांना भारतीय भूमीत येऊ द्यायचं नव्हतं. दुसऱ्या महायुद्धात जपानी सैनिकांनी राबा-उल येथे आझाद हिंद सेनेच्या ( किंवा ब्रिटीश आधिपत्याखालील भारतीय सेनेच्या ) सुमारे वीसेक हजार सैनिकांना ठार मारून खाऊन टाकलं होतं. जपानी सैनिकांन नरमांसभक्षण वर्ज्य नाही.
जपानी सैनिकांच्या अत्याचारांच्या भीषण कहाण्या इथे आहेत ( इंग्रजी दुवा ) : https://en.wikipedia.org/wiki/Unit_731#Activities
जपानी सैनिक आणि जपानी नागरिक पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत.
आ.न.,
-गा.पै.
11 Aug 2021 - 6:18 pm | गामा पैलवान
राबा उल च्या नरमांसभक्षणाचा (इंग्रजी) दुवा :
https://timesofindia.indiatimes.com/india/japanese-ate-indian-pows-used-...
-गा.पै.
11 Aug 2021 - 6:34 pm | Rajesh188
ब्रिटिश सत्तेला उलथून लावण्यासाठी जगातील कोणत्याच देशाची मदत घेणे भारता च्या हिताचे नव्हते.
जपान,जर्मनी ह्या राष्ट्रांना आपण बाद च करून टाकले आहे.
बाकी कोणत्या ही परकीय राष्ट्र पेक्षा ब्रिटिश राज्य कर्ते उत्तम होते, असाच ह्याचा अर्थ होतो.
पण महायुद्ध झालेच नसते .झाले असते आणि ते सहज मित्र राष्ट्रांनी जिंकले असते तर ब्रिटिशांची ताकत नक्कीच वाढली असती.
मग त्या स्थितीत भारतीय स्वतंत्र लढा क्रूर पने चिरडून टाकला असता.
जालियनवाला बाग हत्याकांड हे चांगले उदाहरण आहे .
11 Aug 2021 - 11:32 pm | पराग१२२६३
Rajesh188, तुमच्या मताशी सहमत.
12 Aug 2021 - 1:04 am | अनन्त अवधुत
भारताला कोणीही मदत केली असती तरी तो देश नवा राज्यकर्ता झाला असता. लक्षात घ्या, जगात नव्या नव्या वसाहती मिळवणे हे युद्धाचे कारण होते अशा वेळेस ब्रिटिश साम्राज्यातला हीरा म्हणवला जाणारा भारत कोणीतरी सोडुन देईल, हि अपेक्षाच चुक आहे.
त्यामुळे ब्रिटिश गेल्यावर भारत परतंत्र असता; भारताचा स्वातंत्र्यलढा सुरुच राहीला असता.
युद्धात इतके नुकसान सोसून जर जर्मनी, जपान ने भारत जिंकला असता तर झालेला खर्च वसूल करण्यासाठी भारतीयांचा छळ नविन जोमाने सुरु झाला असता.
12 Aug 2021 - 3:21 pm | चंद्रसूर्यकुमार
भारताचा स्वातंत्र्यलढा नुसता सुरूच राहिला नसता तर ब्रिटिशांपेक्षा अनेक पटींनी खुनशी शत्रूशी मुकाबला करायला लागला असता. सत्याग्रह, अहिंसात्मक लढा वगैरे ब्रिटिशांपुढे चालून गेले. पण तसले काही जपान्यांपुढे चालायची शक्यता अगदी शून्य होती. जपान्यांनी दक्षिण पूर्व आशियात केलेल्या कत्तली पाहता तेच म्हणावेसे वाटते.
12 Aug 2021 - 4:07 pm | Rajesh188
बाकी आता जी जपानी लोकांची प्रतिमा आहे त्या वरून ते खुनशी,क्रूर असतील असे वाटले नाही.
हिंसा सोडूनच दिली वाटत त्यांनी.महायुद्ध च्या भयंकर विनाश नंतर सुद्धा जपान नी स्वतः ला सावरले आणि काही वर्षात च तो एक प्रगत देश झाला. हया वरून हे नक्की म्हणता येईल जपानी लोक प्रचंड देश प्रेमी आणि राष्ट्राभिमानी नक्कीच आहेतं.
12 Aug 2021 - 5:19 pm | चंद्रसूर्यकुमार
म्हणजे कसलीही माहिती न घेता नेहमीप्रमाणे सगळा हवेतलाच गोळीबार चालू होता का?
महायुध्दानंतर काय झाले त्याचा आणि महायुध्द संपण्यापूर्वीपासून काही वर्षे जे काही चालले होते त्याचा काहीही संबंध नाही. ब्रिटिश एकदम सज्जन आणि अहिंसावादी वाटावेत असे जपानी होते आणि जपान्यांना चुकूनमाकून भारतात आतपर्यंत घुसता आले असते तर आपले हाल कुत्र्याने खाल्ले नसते हे नक्कीच.
13 Aug 2021 - 6:19 am | अनन्त अवधुत
जपान्यांना तर सत्याग्रह, मोर्चा वगैरे आवडला असता, इतके सगळे गिनीपिग त्यांच्या जैविक शस्त्रांच्या चाचणीसाठी एका जागी सहज कुठे मिळायला. आपल्याला फक्त जर्मनीचा डॉ. मेंगेल माहिती आहे, पण ह्यांचे कारनामे फारसे कधी बाहेर आले नाहीत. हा एक दुवा इथे थोडी माहिती एकत्र केली आहे.
12 Aug 2021 - 3:29 am | गॉडजिला
१५ ऑगस्ट ला येणार की दांडी मारणार ?
11 Aug 2021 - 11:34 pm | पराग१२२६३
सहमत
8 Aug 2021 - 6:06 pm | अमरेंद्र बाहुबली
वर कुणीतरी लिहीलंय भारताने ईंग्रजांच्या बाजुने युध्दात ऊतरायला नक होते. >>>>
मुळात तेव्हा भारत अस्तित्वात होता का?? सैन्य ईंग्रजांच्या ताब्यात होते म्हणजे भारतीय सेना ब्रिटीश सेना होती??
10 Aug 2021 - 7:56 pm | कॉमी
या चर्चेमुळे वॉचमेन या सिनेमाची आठवण झाली.
10 Aug 2021 - 10:20 pm | गॉडजिला
...
13 Aug 2021 - 11:49 am | मराठी_माणूस
जर्मनांच्य छळछवण्या, गोर्यांचे वर्णाभेदामुळे माणसांना जनावरा सारखे वागवण्यांच्या गुलामी प्रथा, पोर्तुगीजांचे गोव्यातले Inquisition, ह्याचे ही उल्लेख ह्या निमित्ताने आवश्यक.
14 Aug 2021 - 3:12 pm | शानबा५१२
मी खुप रस घेउन बारकाईने सर्व वाचत होतो तेव्हा विकीपीडीयाचे भराभर दाखले, दुवे दीले गेले, आणि खरच पुर्ण मुड गेला. वरती पण एका प्रतिसादात ही लिंक दीली आहे.
https://en.wikipedia.org/wiki/Homeopathy
होमिओपॅथी = Homeopathic remedies are biochemically inert, and have no effect on any known disease.[8][15][16] Hahnemann's theory of disease, centered around principles he termed miasms, is inconsistent with subsequent identification of viruses and bacteria as causes of disease.
अरे आर्सेनिक अल्बम ३० पण होमिओपॅथीक आहे.