बर्लिनचा 'सिटी पॅलेस' अवतरला नव्या रुपात

पराग१२२६३'s picture
पराग१२२६३ in जनातलं, मनातलं
24 Jul 2021 - 7:31 pm

जर्मनीची राजधानी बर्लिनच्या मधूनच वाहणाऱ्या स्प्रे नदीच्या किनाऱ्यावर ‘स्टाड्टश्लोस’ (सिटी पॅलेस) म्हणजेच ‘हम्बोल्ड्ट फोरम’ (Humboldt Forum) उभारण्यात आलेला आहे. या नवनिर्मित राजवाड्याचा उर्वरित भागही 20 जुलै 2021 पासून सामान्य लोकांसाठी उघडण्यात आला आहे. बर्लिन शहराच्या स्थापनेला 2012 मध्ये 775 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एकेकाळी बर्लिनची ओळख असलेल्या या राजवाड्याची पुन:उभारणी करण्याची योजना जर्मन सरकारने आखली होती.

‘स्टाड्टश्लोस’ला ‘बेर्लिनर श्लोस’ म्हणूनही ओळखले जात होते. याच्या पुन:उभारणीचा विचार मांडला जाऊ लागला तेव्हापासूनच ही संपूर्ण योजना सतत वादात सापडत राहिली. सुरुवातीला अशा खर्चिक योजनेला आणि संकल्पनेला विरोध झाला. त्यातच या राजवाड्याच्या उभारणीतून जर्मनीने वसाहतवादाच्या काळात केलेली लूट आणि अत्याचाराचे उदात्तीकरण होणार आहे, असाही आरोप होत राहिला आहे. मात्र ही इमारत उभारण्यामागे संशोधनाला चालना देण्चा हेतू असल्याचे अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आणि ही नवी इमारत ‘स्टाड्टश्लोस’ऐवजी ‘हुम्बोल्ड्ट फोरुम’ म्हणून ओळखले जाईल, असे जाहीर करण्यात आले.

बर्लिनच्या मध्यवर्ती भागात वसलेल्या त्या ‘सिटी पॅलेस’ने 1701 ते 1918 दरम्यान प्रशियन साम्राज्याचा समृद्धीचा काळ आणि अस्तही अनुभवला होता. याच राजवाड्यातून राजा विलहेल्म (पहिला) याने 1871 मध्ये स्वत:ला एकीकृत जर्मन प्रदेशाचा पहिला सम्राट (जर्मन भाषेतील शब्द - काइझर) म्हणून घोषित केले. पहिल्या महायुद्धापर्यंत ही स्थिती कायम होती.

1990 मध्ये जर्मनीच्या एकीकरणानंतर ‘सिटी पॅलेस’च्या पुनरुज्जीवनाचा विचार सुरू झाल्यावर त्याच्या बाजूने आणि विरोधात असे दोन्ही प्रकारचे सूर जनतेत उमटू लागले. पण जर्मन संसदेने (बुंडेसटाग) 2002 मध्ये ‘स्टाड्टश्लोस’च्या पुनर्बांधणीचा ठराव मंजूर केला. त्यानंतर 2006-2008 या काळात ‘प्रजासत्ताकाचा राजवाडा’ नव्या इमारतीच्या बांधकामासाठी पाडण्यात आला.

हा सविस्तर लेख खालील लिंकवर वाचता येईल.
https://avateebhavatee.blogspot.com/2021/07/blog-post_24.html

संस्कृतीइतिहासदेशांतरसमीक्षालेखबातमी

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

31 Jul 2021 - 12:51 pm | चौथा कोनाडा

धागा येऊन १ आठवडा, वाचने : ४४३,
एकही प्रतिक्रिया नाही ?

गॉडजिला's picture

31 Jul 2021 - 2:24 pm | गॉडजिला

असा समज झाल्याने हे होत असावे?

तुषार काळभोर's picture

31 Jul 2021 - 7:22 pm | तुषार काळभोर

?

तुषार काळभोर's picture

31 Jul 2021 - 8:28 pm | तुषार काळभोर

जर कोणाचा तसा समज होत असेल तर तो गैर नसावा.

गॉडजिला's picture

31 Jul 2021 - 8:55 pm | गॉडजिला

कारण धागा ही जाहिरात आहेे असाच समज होतोय असं मला वाटतं.