प्रस्तावना - काही दिवसांपुर्वी अंनिस वार्तापत्राच्या वेबसाईटचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला अन माधव रिसबूडांची तीव्रतेने आठवण झाली. माधव रिसबूड 2003 मधे निवर्तले. त्यांच्यावर कै. माधव रिसबूड: एक कठोर फलज्योतिष चिकित्सक असा लेख अंनिस वार्तापत्र दिवाळी अंकासाठी त्यावेळी लिहिला होता. अंनिस वार्तापत्रात रिसबूडांनी फलज्योतिषचिकित्सेवर अनेक लेख लिहिले होते. अंनिसची अनेक ठिकाणी वकीली केली होती. त्यावेळी गाजलेल्या नाडीग्रंथ प्रकरणात तर ते अगदी हिरिरीने लेख लिहित. अशा अंनिसच्या हितचिंतक असलेल्या या कठोर फलज्योतिष चिकित्सकावर लिहिलेला लेख अंनिस वार्तापत्राच्या त्यावेळच्या संपादक मंडळाने नाकारला. असे समजले की त्यात व्यक्तिमहात्म्य प्रतिबिंबित होत होते म्हणून नाकारला गेला. नंतर मी तो लेख मनोगत या जालीय दिवाळी अंकात प्रसिद्ध केला. तसेच तो माझ्या ब्लॉगवर ही आहे. शिवाय तो अन्य संकेतस्थळांवर पण टाकला आहे. मिपावर मात्र टाकायचा राहिला असे लक्षात आल्याने तो आत्ता टाकतो आहे. अनेकांनी तो लेख आवडल्याचे आवर्जून कळवले होते. अंनिस वार्तापत्रात नंतर व्यक्तिमहात्म्य प्रतिबिंबित होणारे असंख्य लेख येउन गेले. असो. कदाचित त्यामुळेच त्यानंतर रिसबूडांविषयी असलेला आदर अनेक ठिकाणी व्यक्त करण्याची संधी मी सोडली नाही. 2005 मधे मला वार्तापत्र लेखक पुरस्कार मिळाला. तो घ्यायला आयुष्यात एकदाच सांगलीला गेलो होतो. तेव्हा एक त्यांची आठवण झाली कारण त्या पुरस्काराचे खर्या अर्थाने असलेले मानकरी हे माधव रिसबुड हेच आहेत. त्यांची आठवण येत नाही असा दिवस जात नाही.
माधव रिसबूड : एक कठोर फलज्योतिष चिकित्सक
माझ्या महंमद रफिक शेख मेहबूब पटेल अशा लांबलचक नावाच्या बिनतारी मित्राला पुण्यातल्या अप्पा बळवंत चौकात फिरताना एक छोटं पुस्तक रसिक साहित्य या दुकानातल्या शोकेसवर लावलेले दिसले. त्यानं ते पुस्तक घेतलं आणि मला मुंबईला बिनतारी यंत्रणेवर कळवले की," अरे पका, ज्योतिषावर एक तुझ्या विचारांच एक पुस्तक मला मिळाले आहे. त्याच नांव आहे 'फलज्योतिष विद्येवर शोधकिरण'.
किंमत तीन रुपये. पुण्यात आल्यावर मी ते पुस्तक विकत घेतलं. झपाटल्यासारखं वाचून काढलं. परदेशात एखादा जवळचा मित्र अचानक भेटावा तसा आनंद मला झाला. पुस्तकावर लेखकाचा पत्ता नव्हता. मग मी मुद्रकाच्या पत्त्यावर गेलो. त्यांना रिसबुडांचा पत्ता विचारला. त्यांनाही तो माहीत नव्हता. पण त्यांनी मला ज्यांनी छापायला दिलं त्यांचा अपुरा पत्ता दिला. त्या लोकमान्य नगर मधल्या अपुऱ्या पत्त्यावर काही उत्साही रहिवाशांच्या मदतीने पोहोचलो. तेथून मला रिसबूडांचा पत्ता मिळाला. लगेचच मी रिसबुडांचा घरी दाखल झालो. बेल वाजवली, एका निवृत्त गृहस्थाने स्वागत केले," मीच माधव रिसबूड." त्या नंतर जे ऋणानुबंध निर्माण झाले त्यातून मला एक ज्योतिष प्रवासात जोडीदार मिळाला.
डिव्हिजनल फॉरेस्ट ऑफिसर म्हणून निवृत्त होऊन नुकतेच पुण्यात ते स्थायिक झाले होते. मी नुकताच नोकरीला लागून मुंबईला बदलून गेलो होतो आणि ते पुण्यात आले होते. श्रावणी ते चंपाषष्ठी असे पंचगव्य खाऊन, जानवं बदलत सोवळ्याची अर्धी चड्डी घालून कर्मकांड करीत गेलेले माझे खेड्यातील बालपण आणि त्यांचं त्याच प्रकारचं शहरातील बालपण हे समकालीन वाटावं इतकं साधर्म्य त्यात होते. निवृत्त झाल्यावर त्यांनी फलज्योतिष हा विषय आपल्या पोतडीतून बाहेर काढला. आमची या विषयावर देवाण घेवाण होत राहिली. व्यक्तिगत आयुष्यात नोकरीच्या निमित्ताने अनेक ठिकाणी फिरत, अनेक कौटुंबिक दुःखाचे आघात सहन करीत खचून न जाता विवेकाच्या आधारे त्यावर मात करीत त्यांचा आयुष्याचा प्रवास झाला. आपल्या आयुष्यातील दुःखद घटनांचा उपयोग सुद्धा त्यांनी फलज्योतिषचिकित्सेसाठी केला.त्यांचे आयुष्य विलक्षण घटनांनी भरलेले होते. मी नकळत त्यांचा कुटुंबातील एक सदस्य बनलो.ज्योतिषाबरोबरच इतरही विषयावरील त्यांच्या गप्पा मला स्वातंत्र्यपूर्व काळात घेऊन जात. इतक्या की मी त्यांच्या मंतरलेल्या दिवसांचा,बालपणीच्या घटनांचा, गोड गुपितांचा न कळत साक्षीदार बनत असे. एक दिवस त्यांनी पुण्यात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या स्थापनेविषयी माहिती दिली आणि तेथे जाण्यास सुचविले होते. त्यानंतर माझी बदली पुण्यात झाल्यावर मी अंनिसच्या मीटिंगला दाखल झालो.मी पुण्यात आल्यावर रिसबुडांचा उत्साह वृद्धिंगत झाला. लोकांना फलज्योतिष हा विषय आपण समजावून दिला तर त्या विषयाचा भ्रामकपणा लोकांच्या लक्षात येईल या कल्पनेने त्यांनी 'सहज समजेल फलज्योतिष काय आहे व काय नाही?" हे पुस्तक लिहायला घेतले.
"राष्ट्रपती स्वतःचे शपथग्रहण योग्य मुहूर्तावर होईल याची काळजी घेतात. इस्त्रोच्या अग्निबाण प्रक्षेपणात अनेक वेळा अपयश येण्याचे कारण म्हणजे त्यांनी अशुभवेळी प्रक्षेपण केले असे बंगलोरच्या ज्योतिषाने दावा केला होता. डॉ. बी. एन. पुरंदरे यांनी "शस्त्रक्रियेचे वेळी रुग्णाची कुंडली पाहिली पाहिजे," असे म्हटले होते. १९४७ साली युनियन जॅक खाली उतरवला व तिरंगा वर चढवला ती वेळ अशुभ होती त्या चुकीचे फळ आज आपण भोगतो आहोत. हेच जर शुभ मुहूर्तावर झाले असते तर आज आपण जपान जर्मनीच्याही पुढे गेलो असतो," अशा रंगतदार चर्चा ज्योतिष वर्तुळात होत. उच्च माध्यमिक शिक्षणात फलज्योतिष विषयाचा समावेश अवश्य करावा, ही बाब राज्य शिक्षण मंडळाच्या एका आयोगाने उचलून धरली होती. त्यातच 'गोकेलीन'च्या संशोधनामुळे फलज्योतिषाला वैज्ञानिक आधार आहे, असा समज फोफावू लागला होता. अशा या सर्व पार्श्वभूमीवर लोकांना फलज्योतिष या विषयाचे अंतरंग समजावून सांगितले पाहिजे, असे त्यांना वाटे. या विषयावरील वेगवेगळ्या संकल्पनांचा समाचार घेताना तसेच ज्योतिष समर्थकांच्या पत्रद्वंद्वात ते प्रहसन व कठोर शब्द वापरत, तसेच शालजोडीतून फटकवण्याची कला त्यांना अवगत होती. इतकी की कॉलेजकट्ट्यावरील तरुणाला लाजवेल इतक्या सूचकतेने ते शब्द वापरीत. ग्रह कारक नसून सूचक आहेत, ते फक्त संकेत देण्याचे काम करतात ही संकल्पना ज्योतिषात मांडली जाते. त्या विषयी ते म्हणतात," कोणी एक श्रीमान रूपगर्विता पुरंध्री आपल्यावर अनुरक्त झाली आहे, असा भ्रम झालेल्या भणंग खरबुजाने तिच्या प्रत्येक कटाक्षातून आणि कृतीतून आपल्याला हवा तसा अर्थ काढत बसावे, तसाच प्रकार नियतीचे संकेत हुडकणाऱ्यांच्या बाबतीत आहे."
फलज्योतिषातील गृहीतके वादापुरती का होईना मान्य करून मगच त्याचा प्रतिवाद करण्यावर त्यांचा भर होता. चिकित्सेसाठी बुद्धिवादी लोकांनी फलज्योतिषाचा अभ्यास करावा असे ते म्हणत. अंनिस वार्तापत्रात व इतर नियतकालिकांत त्यांनी वेळोवेळी फलज्योतिषावर टीका करणारे लेख लिहिले.'थोतांड आहे म्हणता, पण का, ते एकदा सांगाल का? ' अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र च्या सप्टेंबर १९९३ च्या अंकातील लेखात त्यांनी उथळ टीका करणाऱ्यांमुळे ज्योतिषाचे कसे फावते हे देखील सांगितले आहे. बुद्धिवादाचा तरी एक कर्मठ पंथ होऊ नये असे ते सांगत. माणसाचा स्वभाव असा आहे की एकदा एखाद्या पंथात सामील झाला की त्याच्या नकळत त्याची बुद्धी त्या पंथाच्या अधिकृत विचारसरणीला झापडबंद पद्धतीने बांधली जाते. मग तो दुसऱ्या तऱ्हेच्या प्रतिपादनाचा अलिप्तपणे विचार करु शकत नाही.'विश्वाचा गाडा आपोआप चालला आहे, त्याच्या मागे कसलीही जाणीवयुक्त प्रेरणा नाही' आणि 'स्मृतीचे अधिष्ठान फक्त मेंदूतच आहे, अन्यत्र स्मृती असू शकत नाही,' ही बुद्धिवाद्यांची विधाने त्यांना संपूर्णपणे पटत नसत. त्या साठी ते तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या 'जडवाद'चा आधार घेत. 'सहज समजेल फलज्योतिष काय आहे व काय नाही?' या त्यांच्या १९९१ सालच्या पुस्तकात त्यांनी वरील प्रकारचे विचार मांडले आहेत. पुढील काळात डॉली मेंढी च्या क्लोनिंगने विज्ञानजगतात खळबळ माजून दिली. स्मृती आणि जाणीव याचे नवे अर्थ वैज्ञानिकांना क्लोनिंग आणि डीएनए च्या संशोधनातून मिळू लागले. फलज्योतिषाच्या विरोधात त्यांनी अनेक इंग्रजी व मराठी नियतकालिकात लेखन केले. त्यातूनच अनेक ज्योतिषांशी त्यांचे पत्रव्यवहारातून वादविवाद झाले. खंडनमंडनाचा तो एक उत्कृष्ट नमुना होता. त्यांचे घर हे आमचे अभ्यासकेंद्रच बनले होते आलेल्या प्रत्येक पत्रावर आमची चर्चा होत असे. चर्चा झाल्यावर त्यातील महत्वाचे मुद्दे ते नंतर लिहून काढीत असत. पत्रव्यवहारातील सातत्य व गतिमानता हे त्यांचे वैशिष्ट्य होते. आमचे पत्रव्यवहार कधी संयुक्त तर कधी स्वतंत्र्यरीत्या होत असत. त्यामुळे ज्योतिष समर्थकांचा कधी कधी गोंधळ उडत असे. त्यावर उपाय म्हणून ते प्रति माधव रिसबूड / प्रकाश घाटपांडे अशी पत्रे पाठवीत. पुढे संगणक लोकप्रिय होऊ लागल्यावर मी त्यांना संगणक घेण्याचा आग्रह केला. त्यांनी तो मान्य केला. संगणक त्यांनी झटकन आत्मसात केला. त्यांना मी देवनागरी फाँट लोड करुन दिले. की बोर्ड तर त्यांचा इतक्या झटकन पाठ झाला की स्टिकर वा की बोर्ड आराखड्याची त्यांना गरजच नसे. पुढील लेखन संगणकामुळे त्यांच्या व माझ्या सोयी साठी खूपच सुलभ झाले. नंतर इंटरनेटद्वारे तर माहितीचे मायाजालच हाताशी आले. परदेशी फलज्योतिषचिकित्सकांशी संपर्क त्यामुळे सुलभ झाला. प्रो.इव्हाव केली हे अमेरिकेतील "कमिटी फॉर द सायंटिफिक इन्हेस्टिगेशन ऑफ क्लेम्स ऑफ पॅरानॉर्मल"च्या फलज्योतिष उपसमितीचे चेअरमन आहेत. अनेक टीकात्मक पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. विशेषतः चंद्राचा मनावरील परिणाम या विषयावर त्यांचा अभ्यास आहे. ते कॅनडातील सस्काटून येथील सस्कॉचिऑन विद्यापीठात शैक्षणिक मानसशास्र विषयाचे प्राध्यापक आहेत. त्यांनी "कन्सेप्ट ऑफ मॉडर्न ऍस्ट्रॉलजी- ए क्रिटीक" हा "सायकलॉजिकल रिपोर्टस १९९७" मध्ये प्रकाशित केलेला शोध निबंध महत्त्वाचा ठरला आहे त्यांचेशी ई-मेल वरुन लेख व माहितीची देवाणघेवाण होत असे. भारतीय ज्योतिषाच्या संकल्पना व त्याचा समर्थपणे केलेला प्रतिवाद हा केली यांना आवडला.
रुडॉल्फ एच. स्मिट "प्रा. एच. जे. आयसेंक फलज्योतिष संशोधन कमिटी"चे सचिव आहेत. "ऍस्ट्रॉलजी अंडर स्क्रुटिनी'चे संपादक, १९९२ ते १९९९ या काळातील "कोरिलेशन' या फलज्योतिषावरील संशोधन करणाऱ्या पत्रिकेचे संपादक होते. नेदरलँडमधील प्रमुख वैज्ञानिक संशोधन केंद्रात संपादक व भाषांतरकार म्हणून त्यांनी काम केले. त्यांना लिहिलेल्या पत्रात रिसबूड म्हणतात, की संख्याशास्रीय चाचण्यांनी फार तर फलज्योतिष हे विश्वासार्ह नाही, हे सिद्ध होईल. पण त्यामुळे ते खोटे शास्त्र आहे हे सिद्ध होत नाही. त्यासाठी मुळावर हल्ला करणे व त्यातील विसंगती दाखवणे गरजेचे आहे. जेफ्री डीन हे पश्चिम ऑस्ट्रेलियातील पर्थ या ठिकाणी मुक्त तांत्रिक लेखक व सल्लागार तसेच संपादक आहेत. ते माजी ज्योतिषी व चिकित्सक ज्योतिष संशोधक आहेत. त्यांचेशी मात्र रिसबुडांचे फारसे जमले नाही. 'सहज समजेल फलज्योतिष काय आहे व काय नाही?' पुस्तक हे लोकांना सहज समजत नाही असे लक्षात आल्यावर त्यांना कधी कधी नैराश्य येत असे.पण ते फार काळ टिकत नसे. तसेच शास्त्रज्ञांनी सुद्धा उथळ टीका केल्यामुळे त्याचा परिणाम नेमका उलटा होई त्यामुळे ते व्यथित होत असत. अनेक बड्या बड्या लोकांनी घेतलेले आक्षेपांचे खंडन ज्योतिषी लोक मोठ्या चतुराईने करत. फलज्योतिषात काहीतरी तथ्य असले पाहिजे, या समजुतीमुळे मुलामुलींची लग्ने जुळवताना पत्रिका पहाण्याचा आग्रह धरला जातो. कित्येक वेळा चांगली अनुरुप स्थळे केवळ पत्रिका जुळत नाही या कारणासाठी नाकारली जातात. मुलीला मंगळ आहे म्हटल्यावर तर तिचे हाल बघायलाच नको. अशा मुलींना आणि त्यांच्या पालकांना जो मनस्ताप केवळ एका निरर्थक श्रद्धेच्या पायी लोक सोसत आहेत, हे पाहून त्यांचे मन अस्वस्थ होई. दुसरी गोष्ट म्हणजे ग्रहपीडा निवारण्यासाठी दैवी उपाय केले जातात, त्यापायी हजारो रुपयांचा चुराडा होतो. भृगुसंहिता, नाडीभविष्य यासारख्या तद्दन बनवाबनवीच्या प्रकारावर आंधळा विश्वास ठेवून आपल्या पैशाची व वेळेची नासाडी करतात. त्यामुळे ज्योतिषी लोकांचे खिसे मात्र गरम होतात. हा सगळा वेडेपणा आहे हे लोकांना कसे आणि कुणी सांगायचे? हा प्रश्न त्यांना वारंवार पडे. यासाठी मूलभूत थिअरीवर असा आक्षेप घेतला पाहिजे की ज्याचे खंडन ज्योतिषांना करता येणे अवघड ठरेल. त्यातूनच पुढे 'फलज्योतिष शास्त्र म्हणजे केवळ स्वैर ठोकताळ्याचे भारुड' असे पुस्तक जुलै १९९७ मध्ये लिहिले.
नाडी भविष्य आणि रिसबूड
त्या काळात नाडी भविष्याचा ढोंगाचा प्रचार कर्नाटकातले एक प्राचार्य आणि वायुदलातील एक अधिकारी मोठ्या हिरिरीने आणि धूमधडाक्याने करीत होते. चेन्नईच्या आसपास कूटलिपीच्या बुरख्याखाली नाडीभविष्याचा धंदा जोरात चालत असतो. आतातर तो पुण्यातही पसरला आहे.परिहार विधीच्या नावाखाली हजारो रुपये भोळ्याभाबड्या लोकांच्याकडून उकळण्यात येतात. या धंद्याचा पर्दाफाश अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला होता. अंनिसच्या बाजूने रिसबुडांनी नाडी ज्योतिषाचा भंडाफोड केला होता. या नाडी पट्ट्या हजारो वर्षांपूर्वी तयार झाल्या की फक्त दोन चारशे वर्षांपूर्वी तयार झाल्या हा मुद्दा आमच्या मते गौण आहे. त्यात लिहिलेले भूत-भविष्य अचूक ठरते किंवा नाही हा प्रश्नही प्रस्तुत चर्चेत गौण आहे. ही नाडी भाकिते अंतर्ज्ञानी महर्षींनी लिहून ठेवली आहेत म्हणून त्यांना आगळेवेगळे महत्त्व आहे असे म्हणणाऱ्यालोकांना आम्ही एक साधा प्रश्न विचारतो.' ज्या महर्षींना सर्व भविष्यकाल जाणता येत होता त्यांना भाकिते वर्तवण्यासाठी कुंडलीच्या कुबड्यांची गरजच काय होती? गंमत म्हणजे, त्या कुंडल्या बनवण्यासाठी आवश्यक असा सर्व तपशील त्यांना अंतर्ज्ञानाच्या साहाय्याने जाणावा लागत होता! प्रत्येक व्यक्तीची जन्मवेळ, जन्मठिकाणाचे अक्षांश रेखांश, आणि जन्मवेळेला असलेली ग्रहस्थिती इतकी सर्व माहिती अंतर्ज्ञानाने मिळवायची आणि कुंडली बनवायची ती कशा करता तर भाकिते वर्तवण्याकरिता! हे म्हणजे मॅरथॉनमध्ये धावणाऱ्याने बगलेत कुबडी घेऊन धावण्यासारखे आहे. त्या अंतर्ज्ञानी महर्षींनी असा वेडेपणा केला असेल का याचे उत्तर वाचकांनी द्यावे. ते उत्तर दिल्यास नाडीवाले स्वामी स्वतःच कुंडल्या बनवतात हे त्यांच्या ध्यानात येईल तमिळ कूटलिपीचा अडसर नसता तर हे सहज सिद्ध करता आले असते, पण ते शक्य नाही म्हणून तर आम्हाला तर्कबुद्धीचा आधार घ्यावा लागतो आहे. केवळ तर्कबुद्धीच्या आधारे नाडी भविष्य खोडून काढता येते. अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या एप्रिल १९९९ च्या अंकातील ' विंग कमांडराचा बहुरंगी बहुढंगी वग' या माझ्या लेखाचे शिल्पकार तेच आहेत. आमच्या होणाऱ्या चर्चांचे शब्दांकन नोंद करण्याची त्यांच्या सवयी मुळेच नाडी ग्रंथाचे एवढे संकलन होऊ शकले. माझ्या बोलण्याचा व त्यांचा लिहिण्याचा झपाटा या संयुक्त कृतीतून परस्परांचा उत्साह वृद्धिंगत होत असे. फलज्योतिषाची लोकप्रियता कशामुळे? फलज्योतिषाबाबत परंपराभिमानी सुशिक्षित वर्गात विशेष आदर दिसून येतो. या शास्त्रात काहीतरी गूढ तथ्य असलेच पाहिजे, त्यामुळेच भाकिते खरी ठरतात अशी त्यांची श्रद्धा असते. त्यांना एक वेडी आशा वाटत असते की कुणी तरी खोल संशोधन करून ते तथ्य कधी ना कधी तरी शोधून काढतीलच. त्यांच्या पूर्वजांच्या दैवी ज्ञानापुढे आजचे विज्ञान क्षुद्र आहे अशी त्यांची समजूत असते, म्हणून या शास्त्रावर टीका करणारे लोक पाश्चात्यांच्या नादाने त्यांच्या थोर पूर्वजांची टवाळी करतात असे म्हटल्यावर मग टीकाकारांच्या टीकेला वेगळे उत्तर देण्याची गरज वाटत नाही. त्यांना स्वतःला जरी या शास्त्रातले कळत नसले तरी त्याचा गौरव करण्यात मात्र ते पुढे असतात. सामान्य लोकांनाही तेच आवडते. आपल्या पूर्वजांत काही लुच्चे किंवा पोटार्थी ज्योतिर्विदही होऊन गेले असण्याची कल्पना त्यांना सहन होत नाही. दुसरे एक चमत्कारिक कारण म्हणजे, अनेक शास्त्रज्ञांची या विषयावरील गुळमुळीत भूमिका. ते असे म्हणतात की फलज्योतिषाचा खरेखोटेपणा फक्त सांख्यिकी संशोधनाच्या मार्गानेच ठरला तर ठरेल, फर्मान काढून तो ठरणार नाही. १९७५ साली १८६ नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञांनी या शास्त्राचा खोल अभ्यास न करता एक ज्योतिष विरोधी पत्रक प्रसिद्ध करून आपले हसे करून घेतले होते. म्हणूनच आता ते स्पष्ट बोलायला बिचकतात. वास्तविक पाहता फलज्योतिषाचा विज्ञानाशी काही एक संबंध नाही, ते थोतांड आहे, असे त्यांना वाटत असले तरी आपले मत ठामपणे ते कधी मांडणार नाहीत.फलज्योतिषावर सांख्यिकी संशोधन करून वादरहित निष्कर्ष कधीकाळी निघतील, ही त्यांची आशा व्यर्थ आहे. इतकेच सांगतो की संगणक युग येऊन पाव शतक उलटल्यावरही अद्याप निर्णायक निष्कर्ष काढता आलेले नाहीत.
शास्त्रज्ञांच्या या गुळमुळीत भूमिकेमुळे फलज्योतिष विरोधाची धार बोथट होते. या शास्त्रावर बालिश आणि गैर लागू आक्षेप घेऊन कित्येक बुद्धिवादी लोक आपले अज्ञान प्रकट करून ज्योतिषांचीच बाजू बळकट करतात! सुशिक्षितांच्या बौद्धिक आळशीपणामुळे आणि उदासीनपणामुळे ज्योतिष-विरोधी प्रचाराला म्हणावा तसा वेग येत नाही. फलज्योतिष एक श्रद्धा चर्चेच्या सोयीसाठी आपण फलज्योतिष या श्रद्धेची दोन अंगे किंवा दोन भाग पाडू. पहिला भाग असा आहे: ' ईश्वराने किंवा निसर्गाने म्हणा, ज्याप्रमाणे प्रत्येक वस्तुमात्राला काही ना काही गुणधर्म दिलेले आहेत,त्याच प्रमाणे ग्रहांना गुणधर्म दिलेले आहेत. त्या गुणधर्मापैकी काही गुणधर्म भौतिक स्वरूपाचे आहेत तर काही गुणधर्म गूढ, दैवी म्हणजे ज्योतिषीय स्वरूपाचे आहेत. या गुणधर्माचे प्रभाव गूढ लहरीच्या स्वरूपात मनुष्यावर पडतात व त्याचे नशीब घडवतात.' फलज्योतिषाचे प्रवक्ते या श्रद्धेचे समर्थन अगदी उघडपणे करतात. सर्वसामान्य सुशिक्षित लोकांना सुद्धा असे वाटते या श्रद्धेत अवैज्ञानिक असे काय आहे? आज जरी शास्त्रज्ञांना हे या गूढ प्रभावलहरींचे स्वरूप ठाऊक नसले तरी उद्या ते समजणार नाही कशावरून? आजच्या विज्ञानाला तरी विश्वातील सगळी कोडी कुठे उलगडली आहेत? जर फलज्योतिष या एवढ्याच श्रद्धेवर आधारलेले असेल तर त्याला थोतांड म्हणण्याचे काही कारण दिसत नाही.ज्योतिष प्रवक्तेही लोकांना असे भासवतात की एवढ्याच एका श्रद्धेवर आधारावर त्यांचे सर्व शास्त्र उभे आहे. पण वस्तुस्थिती तशी नाही. बुद्धिवादी लोकांना ही श्रद्धा जरी भ्रामक वाटत असली तरी तिचा भ्रामकपणा सर्वसामान्य लोकांना पटवून देणे कठीण आहे कारण त्यांना गूढ तत्त्वावर श्रद्धा ठेवणे मनापासून आवडते. ज्योतिष प्रवक्तेही लोकांना सांगतात की आज ना उद्या या श्रद्धेला वैज्ञानिक प्रतिष्ठा मिळेल यात संशय नाही. पाश्चात्य देशात या विषयावर मोठ्या प्रमाणात संशोधन चालू आहे आणि फलज्योतिषाला पुष्टी देणारे पुरावे त्यातून बाहेर येतील याची त्यांना खात्री वाटते. अशा युक्तिवादांवर काय बोलायचे?
श्रद्धेचा दुसरा भाग
श्रद्धेचा जो दुसरा भाग आहे तो असा आहे: - ग्रहांना माणसासारखी बुद्धी व जाणीव असते,त्यांना अनेक डोळे व अनेक दृष्ट्या असतात,त्यांना दूर अंतरावर त्यांच्या इच्छेप्रमाणे परिणाम घडवून आणण्याचे सामर्थ्य असते, म्हणजे रिमोट कंट्रोल असतो? इतकेच नव्हे तर त्यांना फलज्योतिषाचे नियम सुद्धा माहीत असतात! श्रद्धेचा हा भाग सामान्य लोकांना फारसा परिचित नसतो ही अजब श्रद्धा खरी तर अंधश्रद्धाच कुठल्याही संशोधनातून सिद्ध होणे अशक्य आहे ही गोष्ट ज्योतिषप्रवक्ते जाणून असतात. त्यांना हे ही ठाऊक असते की ही श्रद्धा गृहीत धरल्या वाचून त्यांच्या शास्त्राचे सिद्धांत उभेच राहू शकत नाहीत. मात्र सर्वसामान्य लोकांना हे गुपित माहीत नसते. ज्योतिषप्रवक्त्यांची बनवाबनवी जी असते ती ही की, आपले बिंग उघडे पडू नये म्हणून त्यांच्या शास्त्रातल्या सिद्धान्तांची चर्चा ते जाहीरपणे कधीच करीत नाहीत, उलट तशी चर्चा करण्याचे ते टाळतात. पण बतावणी मात्र अशी करतात की टीकाकारांना या शास्त्रातले काही कळत नसल्यामुळे त्यांच्याशी चर्चा करण्याची ज्योतिष बुजुर्गांची इच्छा नाही! टीकाकारांच्या साधार टीकेमुळे या शास्त्राच्या प्रतिष्ठेची लक्तरे लोंबू लागली तरी या बुजुर्गाचा पोकळ डौल काही कमी व्हायचा नाही! श्रद्धेचा हा दुसरा भाग म्हणजे ठार अंधश्रद्धा आहे आणि तिच्यावरच तर या शास्त्रातल्या सिद्धान्तांची सगळी भिस्त आहे हे सत्य आजवर कोणी चव्हाट्यावर आणलेच नव्हते त्यामुळे या शास्त्राचा बडेजाव चालू राहिला.
पाश्चात्य संशोधनाविषयी रिसबुडांची भूमिका
अनेक पाश्चात्य स्केप्टिक लोकांचा दृष्टिकोन आपल्यापेक्षा वेगळा आहे. ते म्हणतात की फलज्योतिष खोटे असेलही पण त्याची प्रत्यंतरे येतात हे सत्य आहे. त्याची नॉन-ऍस्ट्रॉलॉजिकल कारणे देता आली पाहिजेत असा त्यांचा आग्रह आहे. तसेच ज्योतिषी सांगतात तेवढ्या प्रमाणात प्रत्यंतरे येत नाही. फार थोड्या प्रमाणात येतात, एवढेच त्यांना त्यांच्या संशोधनातून सिद्ध करायचे आहे. डेनिस एल्वेल या ब्रिटिश ज्योतिषाचे म्हणणे असे की त्यांचे संशोधनाच चुकीच्या पद्धतीचे आहे. त्या संशोधनामुळे फार तर ज्योतिषाची परीक्षा होते, शास्त्राची परीक्षा होत नाही आपले ज्योतिषी तेच म्हणतात. फलज्योतिष खोटे आहे हे सांगण्याची निकड स्केप्टिक लोकांना वाटत नाही. किंवा तसे सांगण्याचा धीटपणा त्यांच्याकडे नाही. नारळीकरांचे तेच होते. माझ्या लेखात जर काही तांत्रिक उणीवा दिसत असतील तर मला सांगा असे मी डीन व केली या दोघांनाही ई मेलवर विचारले पण ते उत्तरच देत नाहीत. नारळीकरही या बाबत माझ्याशी बोलत नाहीत. माझ्या शॉर्ट कट पद्धतीने हे शास्त्र खोटे ठरवता येते हेच त्यांना आवडत नसावे! आता आपण तरी स्पष्टपणे सांगू या की फलज्योतिष हे पूर्णपणे काल्पनिक किंवा खोटे शास्त्र आहे आणि हितसंबंधी लोकांनी त्याचे थोतांड माजवले आहे. असे रिसबूड रोखठोक.
शेवटचा लेख
फलज्योतिषाच्या विरोधात एक कॅम्पेनच उभारली पाहिजे. पण पुरोगामी चळवळीतील लोक म्हणावी तशी साथ देत नाहीत, असे त्यांना वाटे. प्रत्येक वेळी लेख लिहून झाला की म्हणत 'हा मात्र आता शेवटचा लेख, आता लिहिणे बसा. कुणासाठी लिहायचं?' त्या लेखाला लास्ट, फायनल अशी नावे देत. मग त्याचे पुनर्लेखन होत असे. काही नवीन सुचलं की हा आपला शेवटचा लेख असे ठरवले होते हे ते विसरून जात व पुनश्च नवीन लेखन होत असे. मला आता त्याची सवय झाली होती. एक दिवस मला त्यांनी शेवटचा लेख लिहिला आहे व तो मेलवर पाठवला आहे असे फोनवर सांगितले, फाइलचे नाव असेच शेवटचा लेख. मी नेहमीच्या सवयीने मनातल्या मनात हसलो. नंतर नेहमीप्रमाणे त्यांचेकडे दोन दिवसांनी चक्कर टाकली. आत पाऊल टाकताच शंकेची पाल चुकचुकली. रिसबुडांच्या मुलीने ज्योत्स्नाने सांगितले, "दादा रात्रीच गेले." आणि मी बधिर झालो.
( पुर्वप्रकाशित मनोगत दिवाळी २००७)
प्रतिक्रिया
17 Sep 2020 - 3:18 pm | संजय क्षीरसागर
जीवन कालबद्ध आहे त्यामुळे कशावर किती वेळ घालवावा हे सूज्ञ ठरवतो.
पण सर्व घटना (प्रतिसाद देणं, न देणं, थांबवणं ) एकाच कालात घडतात > तो म्हणजे वर्तमान काळ !
17 Sep 2020 - 3:27 pm | डॅनी ओशन
अहो मी कूट वं काय म्हनलो भूतकाळ आणि वर्तमाणकाळाबद्दल ?
मी फक्त म्हनलो कि वर तुम्हीच यका आयडीला म्हणाला की काळाचा धसका संपवायचा हाय. म्हनजीचं काय कि काळ जातो असला भ्रम तेन काय ठिवायचा नाय. मंग तुम्ही बोलला कि या धाग्यावर तुमचा येळ जातुय. म्हणून तुमचंच ज्ञान मी तुम्हाला सांगितले हो, कि तस काय नस्ताय, काळाचा धसका तुमचा अजून गेलेला नाही. तर तुम्ही म्या पामराला मूर्ख म्हणताय 😖
17 Sep 2020 - 3:34 pm | संजय क्षीरसागर
कुठल्या दुनियेत आहात ?
प्रयत्न करायचे की थांबवायचे इतकाच प्रष्ण होता. वेळ घालवू इच्छित नाही हा त्या अर्थी केलेला शब्दप्रयोग आहे.
17 Sep 2020 - 3:39 pm | डॅनी ओशन
ब्वर साहेब. तुम्हीबी इतरांच्या वेगळ्या अर्थाच्या शब्दप्रयोगांवर लै वाद घालता म्हून मपल्याला वाट्ट की तुमि जे लिव्हता तेच तुमाला म्हणायचे अस्ते.
गरीबाकडून व्हतात वं चुका. तुम्हीबी असं सारक सारक त्यांना पकडून नाही धोपटल पायजे. हाय ना ब्रोबर ?
17 Sep 2020 - 4:12 pm | संजय क्षीरसागर
समजा एखादा ट्रिग्नॉमेट्री समजू शकत नाही हे त्याचं अनाकलन आहे, ते पार, तो निर्बुद्ध आहे इथपर्यंत खेचण्याची गरज नाही.
प्रत्येक सिद्ध वर्तमानात जगा असं सांगतो यासाठी वर्तमान म्हणजे नक्की काय हे समजण्याची गरज आहे.
अनाकलन हे वर्तमान समजण्या विषयीचं आहे आणि त्यापुरतं ते मर्यादित आहे.
आता तो प्रतिसाद पुन्हा वाचाल तर तुमचा गैरसमज दूर होईल.
17 Sep 2020 - 4:29 pm | डॅनी ओशन
ते असलं तरीबी आंतरजालावर कुणालाबी "आकलन झाले न्हाई" आणि "निर्बुद्ध हाय" दोनीबी म्हणलेले आवडत नाय वं.तुम्ही कसा तिरसाटला, तुमचा काळाचा धसका नाय गेला म्हणल्यावर. हाय ना ?
तसेच इतरांचे जुने धागे उचकवून त्यातला औट ऑफ कंटेक्सट प्रश्न बी आपला मुद्दा शिद करण्यासाठी वापरू नै. याने लोकांचा तिळपापड हुतो.(ते रिटायरमेंट वाल म्हणतोय मी.) (आणि हे तुम्हास्नी कॉम्प्लिमेंट नव्हे.)
असं नै हो वागू.
हि दोन यकजाम्पल हायत. बाकी माझ्या मते मिपा सारख्या माध्यमावर काय शिष्ठाचार तेन पाळले पायजेल याची नियमावली असती, तर तुम्ही समदी मोडली असती.
(आता हित मी याकटाच दिस्तुय का असलं काय म्हणू नाका.)
कसाय ना, नसला पटत मुद्दा तर द्यावं व सोडून. प्रत्येक ठिकाणी काय जाऊन त्येचं त्येचं उकरता? दिला नवं तुम्ही तुमच्या धाग्याचा दुवा, द्या न मं सोडून. काय हितबी येळ अन काळ करत बसलाय. तुम्हाला बी तुमचे जुने औट ऑफ कोंटेक्सट डायलॉग हित टाकल्यावरी राग येतू ना ? मंग ?
हां. वादावादी करू नै अस नाय माझं म्हणनं. समोरच्याचा आदर ठिवावा हो. आणि समोरचा नसेल ठिवत तर नै त्याच्या नादी लागू. अस करून तुम्ही इतरांच्या मज्जेवर लई डाग पाडता.
बघा. पटतया का. नाह्यतर हायच नेमीचं.
17 Sep 2020 - 4:51 pm | डॅनी ओशन
आकलन झाले हाय का नाय हाच तर वाद हाय. तुमि हंपायर गत बोट दाखवता "ह्याच आकलन झालं नाय, त्याच आकलन झालं नाय."
समोरच्याला तरास नाय का व्हणार ?
17 Sep 2020 - 2:54 pm | बोलघेवडा
मी गेली २ वर्ष कृष्णमुर्ती पद्धतीचा अभ्यास करत आहे. अद्भुत प्रकारची नक्षत्र पद्धती प्रो. कृष्णमूर्ती नी तयार केली. ज्यांना इच्छा असेल त्यांनी जरूर अभ्यासून पहावी. पारंपरिक / वेदिक पद्धतीचे बेसिक अभ्यास गरजेचे आहे.
17 Sep 2020 - 2:59 pm | शाम भागवत
माधव रिसबूड : एक कठोर फलज्योतिष चिकित्सक
👆 हा धाग्याचा विषय आहे.
तेव्हां त्या विषयावर आता चर्चा सुरू करावी.
🙂
17 Sep 2020 - 3:27 pm | संजय क्षीरसागर
👍
17 Sep 2020 - 4:18 pm | शाम भागवत
🙂
🙏
17 Sep 2020 - 3:48 pm | संगणकनंद
पण सर्व घटना (प्रतिसाद देणं, न देणं, थांबवणं ) एकाच कालात घडतात > तो म्हणजे वर्तमान काळ !
मध्यंतरीच्या काळात बर्याच गोष्टी घडल्या.
मध्यंतरीचा काळ वर्तमान काळात येतो काय? चहा मारी, स्वतःचं स्वतःला कळेना आपण काय खरडतोय आणि चाललेत जगाला ब्रम्हज्ञान शिकवायला.
17 Sep 2020 - 5:02 pm | उन्मेष दिक्षीत
उडी मारावी लागलीच.
१) ज्योतिष :
मलाही प्रश्न पडला होता, कि ज्योतिष हे शास्त्र का असु शकत नाही ? अस्तित्वातलं सगळं एकमेकावर अवलंबून आहे तर ग्रह का अफेक्ट करु शकत नाहीत ?
आणि मी हा प्रश्न इथे संक्षींना उद्देशून समजून घेण्याच्या दृष्टिने विचारणार होतो. पण लिहिता लिहिताच अचानक मला समजलं, कि अस्तित्व ही वन सिंगल कंटिन्युअस प्रोसेस आहे, जिचे स्थळ काळानुसार विभाजन होऊ शकत नाही. त्यामू़ळे ठराविक वेळची किंवा त्या त्या वेळची अशी ग्रहस्थिती अस्तित्वात नाही. ईट इज वन सिंगल युनिटी ! त्यामुळे जन्मवेळ आणि त्यातून "जातक" असा कुठलाही घटक हा वेगळा काढताच येत नाही. या कल्पनेवर बेस्ड शास्त्र हे शास्त्र असू शकत नाही. कारण वेळ, आणि कुठल्यातरी वेळची ग्रहस्थिती असं काही अस्तित्वातच नाही आहे !
२) वेळ आणि काळ :
काहीही समजून घेण्याची इच्छा नस्ताना (अपवाद सोडून ) केवळ वेळ आणि काळ या शब्दांवरून संक्षींशी वाद घालतायत त्यांना उद्देशुन
एन्लाइट्न्ड वन कॅन आयदर बिकम युर डोअर टू द हेवन, ऑर इफ यु आर आर्ग्युंइंग विथ हीम अननेसेसरिली , बिकम्स अॅन अनब्रेकेबल वॉल अँड यू कॅन किप ऑन हिटींग युअर हेड अगेन्स्ट इट अँड फायनली ब्रेक युअर ओन हेड, सो बी केअरफुल.
17 Sep 2020 - 5:37 pm | शा वि कु
व्यक्तिशः मला हा मुद्दा अध्यात्मिक विचारांची खऱ्या आयुष्यातील घटनांची किती फारकत असते असे पटवून देणारा वाटला.
मला कोणत्या घोड्यावर पैज लावल्यावर/कोणत्या तारखेवर लावल्यावर पैसे मिळतील इतका साधासा प्रॅक्टिकल फायदा असतो ज्योतिषाचा. ज्योतिसाच्या नादी लागू नये हे फक्त ज्योतिष काम करत नाही, त्यातून काही फायदा होत नाही ह्यानेच सिद्ध होते. काळ वेळाचे अस्तित्व केवळ ज्योतिषी या व्यक्तीनेच का अमान्य करावे ? केवळ ज्योतिषशास्त्राच्या धाग्यावर का ? शाळेला वेळेवर जावा असा जर एखाद्या धाग्याने सल्ला दिला तर तिथेही हा प्रतिवाद म्हणून कोणी तरी मान्य करणार आहे काय ? किंवा अमुक तमुक महिन्यात जन्मलेल्या बाळाला अमुक तमुक शैक्षणिक वर्षात शाळेत घाला, हा अत्यंत व्यावहारिक सल्ला आहे. तिथेही काळ एकसंध असतो म्हणून चालेल का ?
17 Sep 2020 - 7:46 pm | उन्मेष दिक्षीत
>>केवळ ज्योतिषशास्त्राच्या धाग्यावर का ?
फलज्योतीष चिकित्सा (चिकित्सक) असा आहे, त्यामुळे ते होणारच.
>> कोणत्या घोड्यावर पैज लावल्यावर/कोणत्या तारखेवर लावल्यावर पैसे मिळतील
-- इन्पुट काय आहे बघा पत्रिकेसाठी जातकाचा जन्मदिनांक आणि जन्मवेळ आणि त्यावर बेस्ड प्रेडिक्शन आहे. ज्योतिष प्रेडिक्ट करेल का कि कोणता घोडा जिंकणार ते.
>> शाळेला वेळेवर जावा असा जर एखाद्या धाग्याने सल्ला दिला तर तिथेही हा प्रतिवाद म्हणून कोणी तरी मान्य करणार आहे काय
-- शाळेला , कामाला ठरलेल्या वेळेवर जाणे हा त्या त्या प्रक्रियेचाच भाग आहे, त्यामुळे वेळ तयार होत नाही, तो सोयीचा भाग आहे.
मी वरती लिहिल्याप्रमाणे मलाही प्रश्न होता पण एकदा वेळ नाही असं कळले ना, कि पुढचं सगळं क्रिस्टल क्लिअर होतं, असे प्रश्नच उरत नाहीत मग.
17 Sep 2020 - 6:54 pm | संगणकनंद
"एन्लाइट्न्ड वन"ची लक्षणे:
१. "एन्लाइट्न्ड वन" सतत इतरांना मूर्ख म्हणतो, त्यांचा पाणउतारा करतो.
२. "एन्लाइट्न्ड वन" सतत तिरकस शेरे मारतो.
३. "एन्लाइट्न्ड वन" समोरच्याने अरे केले तर त्याला उत्तर म्हणून दोन वेळा का रे करतो.
४. "एन्लाइट्न्ड वन" समोरचा ज्या पातळीवर असेल त्याहीपेक्षा अधिक खालच्या पातळीवर जातो
५. "एन्लाइट्न्ड वन" मला सर्व विषयातले सर्व कळते असा अहंकार मिरवतो
६. "एन्लाइट्न्ड वन" डॉक्टर लोकांना औषधोपचार शिकवतो, मानसोपचारतज्ञांना मन नाही हे सांगतो
७. "एन्लाइट्न्ड वन" नोबेल पारितोषिक विजेता आला चर्चेला तरी त्याला हरवेन असा अहंकार मिरवतो
८. "एन्लाइट्न्ड वन" संगणक क्षेत्राचे शिक्षण घेतलेल्यांना तसेच त्या क्षेत्रात काम करणार्यांना संगणक कसा चालतो हे शिकवतो
९. "एन्लाइट्न्ड वन" स्मृती स्ट्रींग सारखी धादांत अशास्त्रीय पूडी सोडून स्वतःला विज्ञानवादी म्हणवतो
१०. "एन्लाइट्न्ड वन" चर्चा सुरु करुन प्रश्नांची उत्तरे देता आली नाही की त्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करतो.
17 Sep 2020 - 7:10 pm | उन्मेष दिक्षीत
ते तुम्हाला तुमच्या व्यक्तिगत निरोपात किंवा तुमच्या खरडवहीत येऊन त्याचू म्हणाले , कि तुम्हीच मी त्याचू नाही म्हणत त्यांच्या मागे लागलात तेवढं सांगा.
18 Sep 2020 - 1:47 am | कोहंसोहं१०
ईट इज वन सिंगल युनिटी ! त्यामुळे जन्मवेळ आणि त्यातून "जातक" असा कुठलाही घटक हा वेगळा काढताच येत नाही. या कल्पनेवर बेस्ड शास्त्र हे शास्त्र असू शकत नाही. कारण वेळ, आणि कुठल्यातरी वेळची ग्रहस्थिती असं काही अस्तित्वातच नाही आहे !
>>>>>>> अस्तित्वाच्या एका टप्प्याला ग्रहांची एक स्थिती होती आणि दुसऱ्या टप्प्याला दुसरी. जेंव्हा स्थितीबद्दल होती तेंव्हा पूर्वीची स्थिती दर्शवण्यासाठी ज्याचा वापर केला जातो त्याला काळ म्हणतात. वास्तविकपणे काळ हा स्थितीबद्दलचा निर्देशक आहे. त्यामुळे कुठल्याही वेळची ग्रहस्थिती जेंव्हा आपण म्हणतो तेंव्हा त्या ग्रहाच्या स्पेसिफिक स्थितीबद्दल आपण निर्देश करत असतो.
जर एखाद्या विशिष्ट गोष्टीची स्थिती कधीच बदलत नसेल तर रूढार्थाने ती कालातीत आहे कारण जिथे स्थितीबदलच नाही तिथे काळ दर्शवून काय होणार. पण या दुनियेत जे जे काही आहे त्यात स्थितीबदल येतोच.
पण जी गोष्ट बदलते तिथे तुम्ही तो बदल दर्शवण्यासाठी काळ वापरू शकता. आणि ज्या नियमांच्या द्वारे काही होऊ घातलेल्या बदलांचे प्रेडिक्शन केले जाऊ शकते.
ते सिंगल युनिटी, घटक वेगळे काढणे वगैरे त्यालाच लागू होते ज्यात कधीच बदल होत नाही. पण तो तर्क बदलणाऱ्या गोष्टींसाठी लावले चुकीचे आहे. तो कुतर्क झाला.
एवढे सिम्पल लॉजिक समजले की झाले (हे आधी सांगितले आहे पण तुम्ही ते वाचले की नाही माहित नाही म्हणून लिहिले)
18 Sep 2020 - 2:16 am | कोहंसोहं१०
"एन्लाइट्न्ड वन कॅन आयदर बिकम युर डोअर टू द हेवन, ऑर इफ यु आर आर्ग्युंइंग विथ हीम अननेसेसरिली , बिकम्स अॅन अनब्रेकेबल वॉल अँड यू कॅन किप ऑन हिटींग युअर हेड अगेन्स्ट इट अँड फायनली ब्रेक युअर ओन हेड, सो बी केअरफुल"
>>>> अहो ते म्हणाले आणि तुम्ही मानले? ४ पुस्तके वाचून त्यातील तत्वज्ञान शाब्दिक अतिसाराच्या रूपाने मांडणारे आणि स्वतःच स्वतःला एन्लाइट्न्ड म्हणवून घेणारे अहंकारी लोक जर खरंच एन्लाइट्न्ड असते तर जगात एन्लाइट्न्ड वन ची संख्या करोडोंमध्ये असती.
कोरडे शाब्दिक ज्ञान आणि अनुभव यात जमीन अस्मानाचा फरक असतो.
स्वरूपाचे ज्ञान होण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अहंकार संपूर्णपणे नष्ट व्हावा लागतो. तुम्ही ज्याला एन्लाइट्न्ड समजत आहात त्यांच्यात तो ठासून भरला आहे हे केवळ प्रतिसाद वाचून सांगता येते. इतका की मोठे वैज्ञानिक, संत हे चुकीचे आणि मीच एकटा बरोबर असे सांगण्यास ही ते कमी करत नाहीत.
बाकी अनेक कारणे देता येतील पण एवढे एक कारण पुरेसे आहे ते मायेच्या चिखलात खोल रुतले आहेत हे सांगण्यासाठी.
फॉलो करायचेच असेल तर संतांना आणि त्यांच्या साहित्य-तत्वज्ञानाला करा त्यांच्या टीकाकारांना नाही.
थिंक थाउजंड टाइम्स बिफोर फॉलोईंग एनीवन एल्स ही/शी विल ड्रॅग यु थाउजंड स्टेप्स बॅक विदाउट यु रिअलाइनजिंग इट.
18 Sep 2020 - 7:16 pm | उन्मेष दिक्षीत
आणि मी मानले ते जरा स्पष्ट करा.
>>स्वरूपाचे ज्ञान होण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अहंकार संपूर्णपणे नष्ट व्हावा लागतो
-- अहंकार म्हणजे काय आणि तो दूर कसा करायचा ते स्पष्ट करा. तुम्हाला स्वरुपाचे ज्ञान झाले आहे काय ? असल्यास दुसरा कोण काय करतो, शो-ऑफ करतो का वगैरे भिती बाळगायचे कारण नाही. आणि नसल्यास, तुमच्या म्हणण्याला काही एक अर्थ नाही, तुम्हीच हे इथून तिथून ऐकुन नुसते फेकत आहात.
>> मायेच्या चिखलात खोल रुतले आहेत
-- तुम्ही बाहेर आला आहात ना मायेच्या चिखलातून, तुमचे अभिनंदन.
मला तुमच्याशी वाद घालण्यात बिल्कुल इंटरेस्ट नाही. आपल्याला जे झेपत नाही आणि झेपणारही नाही ते दुसर्याला सहज जमले आणि तो ते सोपे आहे हे आत्मविश्वासाने सांगतो आहे, आणि दुसरा ही त्याला समजलं म्हणून दाद देतोय हे तुम्हाला बघवत नाही आणि त्यासाठी तुम्ही संत मंडंळींच्या नावाआड लपत आहात एवढं स्पष्ट दिसतंय तुमच्या प्रतिसादावरून.
19 Sep 2020 - 7:15 pm | कोहंसोहं१०
मी आत्मज्ञानी आहे असा कधीच दावा केला नाही आणि झालोच तरीसुद्धा तसा दावा करणार नाही कारण तसे करण्याची काहीच गरज पडणार नाही.
पण अध्यात्मात रुची असल्यामुळे आत्मज्ञानी कोण नाही हे ओळखणे मला फारसे अवघड जात नाही.
काही लोक आत्मज्ञानी अस्ल्याचा दावा करतात कारण पुस्तकी तत्वज्ञान त्यांना नवख्यांच्या माथी हणून स्वतःचा अहंकार कुरुवाळायचा असतो. असे लोक फक्त त्यांना ज्या गोष्टी पटतात त्याच रेटत राहून आपले अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. कारण माघार घेतली की जमवलेली टाळकी गमावण्याची धोका असतो. त्यामुळे सतत वाद निर्माण करून चर्चेत कसे राहावे हेच ते बघत असतात. अध्यात्मात याला लोकेषणा ही संज्ञा आहे.
साधी माणसे ज्यांना अध्यात्मातले काहीच माहित नसते ते अश्या गोष्टींना फसतात. पण ज्यांचा अध्यात्माचा अभ्यास आहे त्यांना हा दांभिकपणा लक्षात येतो. अश्या दांभिक लोकांपासून लोकांना सावध करण्यासाठी मात्र कधीकधी नाईलाजाने काठी हातात घेतो.
आपल्याला जे झेपत नाही आणि झेपणारही नाही ते दुसर्याला सहज जमले आणि तो ते सोपे आहे हे आत्मविश्वासाने सांगतो आहे, आणि दुसरा ही त्याला समजलं म्हणून दाद देतोय हे तुम्हाला बघवत नाही>>>>>>>
हाहाहा. अहो दुसऱ्यांना आत्मज्ञानी झालेले बघवत नसते तर मी संतांचा हवाला कसा दिला असता? जे आत्मज्ञानी आहेत ते पूजनीयच आहेत. आणि मी आत्मज्ञानी नाही म्हणूनच संतांचे साहित्य वाचावे असे सुचवले कारण अध्यात्मात योग्य दिशा फक्त स्वरूपाचा लाभ झालेले लोकच देऊ शकतात. अहंकारी लोक नाही.
आणि तुम्हाला आत्मज्ञान काय इतके स्वस्त वाटले का की कोणालाही सहजसाध्य होईल? तुकाराम महाराज म्हणतात- चणे खावे लोखंडाचे। मग ब्रह्मपदीं नाचे॥
इतके ते अवघड आहे. बुद्धालासुद्धा अत्यंत कष्टातून ते साध्य झाले होते. ही अवस्था सर्वोच्च आहे आणि यापलीकडे प्राप्त करण्यासारखे काही नाही. त्यामुळे ही कोणालाही सहजासहजी साध्य होत नाही. आणि ज्याला झालीच आहे तो असा संकेतस्थळावर येऊन केवळ माझेच खरे, मीच शहाणा बाकी सर्व मूर्ख म्हणत वाद घालत बसणार नाही.
म्हणून तुम्हाला सांगितले होते जर अध्यात्माविषयी जाणून घ्यायचे असेल तर संतांचे- ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास, रामकृष्ण परमहंस, विवेकानंद, परमहंस योगानंद, गोंदवलेकर महाराज यांचे साहित्य वाचा आणि त्यांना अनुसरा. ते खरे लोकोत्तर पुरुष, ना की या संतांना नावे ठेवून, ते कसे चुकीचे आहेत हे दाखवून मीच कसा बरोबर हे सांगणारा जालावरचा महाभाग.
20 Sep 2020 - 12:56 am | उन्मेष दिक्षीत
म्हणून शेवटचा प्रतीसाद देतो.
अध्यात्मावर प्रश्न-उत्तर अशी चर्चा होऊ शकते, वादविवाद नाहीत. ज्याला समजले त्याने सांगणे आणि ज्याला समजून घ्यायचे आहे त्याने नीट ऐकणे. दॅट्स इट.
>> आणि तुम्हाला आत्मज्ञान काय इतके स्वस्त वाटले का की कोणालाही सहजसाध्य होईल? तुकाराम महाराज म्हणतात- चणे खावे लोखंडाचे। मग ब्रह्मपदीं नाचे॥
इतके ते अवघड आहे
>> पण ज्यांचा अध्यात्माचा अभ्यास आहे त्यांना हा दांभिकपणा लक्षात येतो. अश्या दांभिक लोकांपासून लोकांना सावध करण्यासाठी मात्र कधीकधी नाईलाजाने काठी हातात घेतो.
तुमचे असे प्रतीसाद वाचून एखादा भरकटू शकतो. म्हणून म्हणालो तुम्हाला आत्मज्ञान झाले नसताना तुम्ही ऐकीव गोष्टींवरून कसे काय ठरवू शकता की एखाद्याला सत्य समजले आहे कि नाही ?
>> म्हणून तुम्हाला सांगितले होते जर अध्यात्माविषयी जाणून घ्यायचे असेल तर संतांचे- ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास, रामकृष्ण परमहंस, विवेकानंद, परमहंस योगानंद, गोंदवलेकर महाराज यांचे साहित्य वाचा आणि त्यांना अनुसरा
वाचलेले आहे. तुम्हीच निष्कर्श कढला की मी ते वाचलेले नाही. सगळे एकच सांगतात. आणि या धाग्यावर 'नो टाईम' या अंगाने चर्चा चालू आहे. 'सत् श्री अकाल' ऐकले नाही का तुम्ही ? गुरु नानकांनी म्हटलेले आहे. संक्षीही तेच सांगतायत , 'काल' हा लेख वाचला का त्यांचा ? आता गुरु नानकांना समजले नाही असे म्हणू नका.
मला तुम्हाला काही पटवून द्यायचे नाही, फक्त कुणी काय म्हटले यापेक्षा स्वतःचा अनुभव काय आहे हे मांडले तर ते उपयोगी आहे, नाहीतर टाइमपास होतो फक्त.
23 Sep 2020 - 5:25 am | कोहंसोहं१०
तुमचे असे प्रतीसाद वाचून एखादा भरकटू शकतो. म्हणून म्हणालो तुम्हाला आत्मज्ञान झाले नसताना तुम्ही ऐकीव गोष्टींवरून कसे काय ठरवू शकता की एखाद्याला सत्य समजले आहे कि नाही ? >>>>>>>>
ऐकीव गोष्टींवरून कशाला, एकूण जालावरच्या माझ्याच अनुभवरूनच सांगतोय.
एखाद्याला सत्य गवसले आहे हे सांगणे अवघड असते कारण वरून वर्तवणूक अगदी संतांसारखी पण आतून कसे असतील सांगता येणे अवघड आहे.
पण एकंदर बाह्य वर्तवणुकीवरून ज्याला ते गवसले नाही हे सांगणे सोप्पे आहे. यात रॉकेट सायन्स काहीच नाही. मी म्हणतो तेच खरे, स्वतःच स्वतःला सर्वज्ञानी म्हणणे आणि टोकाचा अहंकार यावरून त्यांचे ज्ञान पुस्तकी आहे (म्हणूनच अहंकारही आहे) अनुभवातून आलेले नाही हे सांगणे खरेच अवघड आहे का?
वाचलेले आहे. तुम्हीच निष्कर्श कढला की मी ते वाचलेले नाही. सगळे एकच सांगतात.>>>>>>> वाचलेले आहे तरीही अश्या संतांनाच नावे ठेवणाराचे लेखन वाचून तुम्ही त्याला एन्लायटन्ड समजताय?
हेच संक्षी रामकृष्ण परमहंसांना भ्रमिष्ट म्हणाले होते हे वाचले नाहीत का? नामजप म्हणजे मूर्खपणा, संतांनी जो मार्ग सांगितला त्याची काहीच गरज नव्हती त्याऐवजी त्यांनी असे-असे करायला पाहिजे होते हे सुचवले होते. एका धाग्यावरील प्रतिसादात शंकराचार्यानाही चुकीचे म्हणाले होते.
इतकी गर्वीष्ठता एन्लायटन्ड सोडा पण सामान्य माणसातही नसते....यावरून ते एन्लायटन्ड नाहीत हे सांगणे खरेच अवघड आहे का?
आणि या धाग्यावर 'नो टाईम' या अंगाने चर्चा चालू आहे. 'सत् श्री अकाल' ऐकले नाही का तुम्ही ? गुरु नानकांनी म्हटलेले आहे. संक्षीही तेच सांगतायत>>>>> सर्वप्रथम धाग्याचा विषय वेगळा होता. तो भरकटवायला सुरुवात संक्षींनी केली.
बाकी माझे प्रतिसाद वर वाचले असतील तर माझा विरोध संक्षींच्या आध्यात्मिक तत्वज्ञानाला नसून त्याचा चुकीच्या ठिकाणी उपयोग करण्याला आहे. त्या तत्वज्ञानाचा आधार घेऊन तर संपूर्ण विज्ञान सुद्धा खोटे ठरते. पण विज्ञानाच्या धाग्यावर जाऊन हेच तत्वज्ञान पाजळायची त्यांची हिम्मत नाही हे मी वर सांगितले आहे.
व्यावहारिक जगाच्या त्यांना न पटणाऱ्या गोष्टींना उगाचच अध्यात्माच्या साहाय्याने सोयीस्कररीत्या विरोध करत ते स्वतःचा मुद्दा रेटत राहतात (विषयाचे ज्ञान नसले की अज्ञान उघडे पडू नये तरीही आपलेच म्हणणे खरे करायचे असेल तर बरेचदा ते असे करतात)
यावरूनही ते एन्लायटन्ड नाहीत हे सांगणे खरेच अवघड आहे का? आणि तुम्ही त्यांना एन्लायटन्ड म्हणताय....
जाता जाता - वाचली नसल्यास रामदास स्वामींनी दासबोधात सांगितलेली पढतमूर्खाची लक्षणे नक्की वाचा.
18 Sep 2020 - 11:34 am | प्रकाश घाटपांडे
रिसबूड असते तर त्यांनी संक्षींच्या चिकाटीला दाद दिली असती. कुंडली बनवताना जन्मस्थळ जन्मवेळ व जन्मतारीख या गोष्टी मूलभूत डेटा म्हणून वापरला जातो. आता वेळ व तारीख या कालदर्शक असलेल्या गोश्टींवर संक्षींनी मूलभूत हल्ला केला आहे. आता राहिला जन्मस्थळाचा मुद्दा. तो दिशा या संबंधाने घेता येतो. दिक्काल या संज्ञेमधे तो ही अवकाशात आभासी आहे असे प्रतिपादन करता येते. अवकाशात विवक्षित क्षणी प्रक्षेपित झालेल्या राशीचक्रात पृथ्वी व ते जन्मस्थळ बिंदुरुप होउन जाते असे मी रिसबूडांना सांगत असे त्यावर रिसबूडांनी एक चित्र व लेख तयार केला होता. तो लेख http://www.misalpav.com/node/7006
18 Sep 2020 - 12:19 pm | संजय क्षीरसागर
तर किमान सूज्ञ लोकांना तरी ज्योतिष थोतांड आहे हे समजलं असतं.
तरीही तुमच्या या एका प्रतिसादात सगळा सारांश आला आणि समाधान वाटलं.
१.
जिथे दिवस-रात्रच नाही तिथे कालाची कल्पना वस्तुस्थितीचं गहन अज्ञान दर्शवते. जगातला कोणताही ज्योतिषी आणि त्याची आरती ओवाळणारा कुणीही जातक, एका क्षणात बाद होतात. पण जसे देवभोळे खुळ्यासारखे चमत्कारांवर विश्वास ठेवतात तसं हे पब्लिक ज्योतिष्याच्या फेकंफाकी वर भरोसा ठेवतं त्यामुळे तो धंदा जोमात आहे, पण एकूणात निर्बुद्धपणा तोच !
२.
आकाश ही मानवी दृष्टीची मर्यादा आहे. कुणीही माईचा लाल आकाशात कोणत्याही दिशेला कितीही प्रवास करत राहिला तरी दि एंडचा बोर्ड येणार नाही. थोडक्यात, स्थान हा कायम व्यक्ती किंवा वस्तू सापेक्ष बिंदू आहे -हाच आइन्स्टाइअनच्या थिअरी ऑफ रिलेटिवीटीचा आधार आहे. मूर्ख ज्योतिषी आणि वेडगळ जातक, `जन्मस्थान हा जातक बेस्ड काल्पनिक बिंदू' गृहित धरुन सगळी निरर्थक फेकाफेकी करतात. एक त्याचू दुसर्या त्याचूला, फुल त्याचू बनवतो, असा हा सगळा खेळ आहे.
तुम्ही नकाशा वगैरे केलायं ते ठीक आहे पण इतक्या खोलात जाण्याची गरज नव्हती.
३. खगोल शास्त्राचा अत्यंत कष्टानं जमवलेला डेटा हॅक करुन लबाड लोकांनी मूर्ख लोकांना नादी लावून स्वतःच्या पोटपाण्यासाठी निर्माण केलेलं महाथोतांड म्हणजे हे ज्योतिषशास्त्र !
18 Sep 2020 - 1:38 pm | गामा पैलवान
संजय क्षीरसागर,
हे विधान तथ्यहीन ( म्हणजे factually incorrect ) आहे. प्रकाशाचा वेग मापकाच्या वेगावर अवलंबून नसून स्थिर असतो, हा आईनस्टाईनच्या विशिष्ट सापेक्षतावादाचा पाया आहे. स्थान हा सापेक्षबिंदू आहे असं विधान आईनस्टाईनने कुठेही केलेलं नाही. निदान तसं विकिवर तरी आढळून येत नाही (संदर्भ : https://en.wikipedia.org/wiki/Theory_of_relativity ).
आ.न.,
-गा.पै.
18 Sep 2020 - 2:46 pm | संजय क्षीरसागर
काल हा व्यक्तीसापेक्ष आहे असा मूळ मुद्दा होताSimple Relativity - Understanding Einstein's Special Theory of Relativity त्यात पुन्हा प्रकाश, वेग वगैरे भानगडी आहेत. व्यक्तीसापेक्ष सिद्धांत हा पर्यायानं स्थान सापेक्ष सुद्धा होतो कारण दोन वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या निरिक्षकांचे निष्कर्श वेगळे असतील.
अर्थात, इथे सापेक्षता वादावर चर्चा करण्यात अर्थ नाही कारण मूळ मुद्दा `जातकाचं जन्मस्थान' हा आहे. अवकाश हे अखंड आणि बिंदूरहित असल्यानं असा स्थान निर्देश होऊ शकत नाही. जर तसा केला गेला तर तो जातक बेस्ड असेल, ज्याला (म्हणजे जन्म-स्थानाला) काहीएक अर्थ नाही.
18 Sep 2020 - 5:55 pm | मराठी कथालेखक
इथे अनेक दिग्गजांची गहन चर्चा चालू आहे. मला त्यातलं फारसं काही झेपलं नाही.
माझा ज्योतिषशास्त्र वा भविष्यावर अजिबात विश्वास नाही.
पण स्वतःचं भविष्य ऐकणं / वाचणं हे खूप रंजक असतं. एखाद्या ज्योतिषी माझा हात (किंवा कुंडली ) हातात घेवून काळजी पुर्वक बघू लागतो, स्वतःशीच काहीतरी गणितं मांडू लागतो तेव्हा ते खूप थ्रिलिंग वाटतं. भविष्य (चुकूनमाकून) खरं ठरणार की खोटं ही वेगळी बाब. बरेचदा तर मी काय सांगितलं होतं ते सपशेल विसरुनही जातो. पण तरी ती पाच दहा मिनटं खूप रंजक असतात अगदी कानात प्राण आणून तो व्यक्ती काय म्हणतोय ते ऐकावेसे वाटते हे नक्की. अर्थात याकरिता मी मुद्दाम वेळ व पैसा खर्च करुन कुणाकडे जात नाही. असे हौसेने भविष्य सांगणारे लोक आसपास वा कामाच्या ठिकाणी वगैरे कधी भेटतात.
मला वाटतं "खरी की खोटी" यापेक्षा मनाला रिझवण्याचे सामर्थ्य ज्या गोष्टींकडे आहे तिकडे सामान्य माणूस आकर्षित होतो. चित्रपट नाही का आपण मन लावून बघतो. चित्रपटातला नायक जेव्हा अन्यायाविरुद्ध पेटून उठतो, हाणामारी करतो तेव्हा आपल्याही मुठी वळतात. बहूतकरुन काल्पनिक चित्रपट बनतात भारतात वा जगात अब्जावधी रुपये वा डॉलर्स खर्चुन जगभरात जास्तीत जास्त काल्पनिक कथेवरचे चित्रपट बनतात तर तुलनेने कमी माहितीपट बनतात किंवा त्यांची बाजारपेठ कमी मुल्याची असते, त्यातही व्यावसायिक अशा तथाकथित ऐतिहासिक आणि बिग बजेट चित्रपटात काल्पनिक मालमसाला जास्त असतो (मग मस्तानी आणि काशीबाई एकत्र नाचतात किंवा बाजीराव व मस्तानीचा मृत्यू एकाच वेळी होतो!!)
म्हणून मला वाटते कि सामान्यत: माणूस वास्तवापेक्षा कल्पनेत अधिक रमतो.
18 Sep 2020 - 8:35 pm | गवि
सर्व वाचल्यावर आता असे मत दिल्यावाचून राहवत नाही की..
वाद उगीच विकोपाला जातोय.
संक्षी, ज्योतिषाला मूलभूत आधार नाही हे एक वैध व्यक्तिगत मत सिद्ध करण्यासाठी तुम्ही खूपच क्लिष्ट थियरी (जरी अस्तित्वात असली तरी ) इन्व्होक करताय असं वाटत नाही का? काळ अशी एन्टीटि अस्तित्वात नसणे इतक्या खोलात शिरण्यापेक्षा त्याहून खूप सहज व्यावहारिक पातळीवर अनेक मुद्दे मांडून त्यातली अतार्किकता सिद्ध करता येऊ शकली असती असं वाटत नाही का?
याउपर जाऊन ज्यांचा विश्वास दृढ आहे त्यांचा विश्वास उडू शकतो असं खरंच वाटतं का?
वादविवादात थोडी लठ्ठालठ्ठी होतेच, पण जर समोरच्याला आपला मुद्दा पटवून द्यायचा उद्देश असेल तर त्याला तुच्छ लेखून ते कसं साध्य होईल?
18 Sep 2020 - 9:34 pm | संजय क्षीरसागर
१.
अ) दिवस-रात्र पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे होतात; अस्तित्वात काल-आज-उद्या असा प्रकारच नाही ही उघड गोष्ट आहे कुणाला कळत नसेल का ?
ब) ज्योतिषातून काल बाद केला तर विषय संपला यात न समजण्यासारखं काये ?
२.
माझ्या वरच्या प्रतिसादात म्हटलंय
जगात फक्त दोनच टाइपचे लोक आहेत, काल नाही हा बोध झालेले आणि तो न झालेले. या दोन्हीच्या सीमारेषेवर एखादा असतो, पण बोध न झालेल्यांचा रेटाच इतका प्रचंड असतो की ते त्याला पार भंजाळवून टाकतात !
या समजू शकणार्या व्यक्तीच्या जीवनात कमालीचा बदल घडू शकतो आणि अशांसाठी मी लिहितो. (प्रकाश घाटपांडेंचा उशीरा आलेला प्रतिसाद किती वेधक आहे ते पहा)
३.
वाट्टेल ती पोस्ट काढून क्रोनॉलॉजी पहा > इथे सुद्धा कुणी सुरुवात केली ते पहा (सुबोध खरे!) > आणि पहिला व्यक्तिगत प्रतिसाद कुणाचा आहे ते पहा.
लोक न समजण्या इतके अज्ञानी आहेत का ? त्यांना फक्त काहीतरी करुन मुद्दा हुकवायचा असतो आणि ते करण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे व्यक्तीगत हल्ला (याची जालीय बुजुर्गांना कल्पना आहेच) !
त्यामुळे मी रामराज्य या पोस्ट्वर एक साधा उपाय सुचवला होता : व्यक्तीगत प्रतिसाद दिसता क्षणी डिलीट करा म्हणजे सगळं सुरळीत होईल.
अरे ला कारे केलं नाही तर या जगात कुणाचा टिकाव लागेल ? तस्मात, आता सगळ्या प्रतिसादांवर पुन्हा एकदा नजर फिरवून पहा.
18 Sep 2020 - 11:34 pm | गड्डा झब्बू
चला जगात फक्त दोनच टाइपचे लोक आहेत (दोन्हीच्या सीमारेषेवर एखादा असतो-अशा एखाद्यामुळे आलेला तिसरा टाइप दुर्लक्षित करून) हे तुम्ही मान्य केलेत हे हि नसे थोडके!
मग प्रश्न असे पडतात कि अशा एखाद्या व्यक्तीच्या जीवनात कमालीचा बदल घडवून आणण्यासाठी तुम्ही (तुमच्याच भाषेत प्रचंड रेटा असलेल्या) बोध न झालेल्यांना वेठीला का धरताय? ज्यांना तुमचे विचार पटत नाहीत त्यांच्याशी वितंडवाद का घालताय?? त्यापेक्षा त्या एखाद्या व्यक्तीला हेरून त्याच्या ख.फ. वर खरडून , व्यनी करून करा कि त्याचे प्रबोधन. का उगाच @अमुक @तमुक च्या प्रतिसादांनी मुख्य फलकावरील जागा अडवून त्या चर्चेत रस नसलेल्या बाकीच्या वाचकांना वात आणताय???
तुम्हाला झालेल्या बोधामुळे झालेले-होणारे फायदे सांगणारे धागे काढा, वाचक वाचतील ते. ज्यांना रस असेल त्यात ते देतील प्रतिसाद त्यावर. करा त्यांच्याशी चर्चा. काही विरोधी मतांचे प्रतिसादही येतील पण नाहीतरी तुम्ही समजू शकणार्या व्यक्तीच्या जीवनात कमालीचा बदल घडवण्यासाठीच लिहिता ना? मग करा कि विरोधी मत असलेल्यांकडे दुर्लक्ष! मोठ्या मनाने त्यांना माफ करा आणि हा वैचारिक बलात्कार थांबवा बुवा!! अति होतंय आता म्हणून हा लेखनप्रपंच.
हा प्रतिसाद पटला नाही (तो पटणार नाही ह्याची खात्री आहेच) तर त्यावर उपप्रतिसाद देण्याचे कष्ट न घेता विशाल मनाने मलाही माफ करा हे वेगळे सांगणे न लागे.
आपला क्षमायाचक,
गड्डा झब्बू
19 Sep 2020 - 12:19 am | डीप डाईव्हर
आरा रा रा रा खतरनाक 😈
19 Sep 2020 - 11:44 am | संजय क्षीरसागर
गड्डा झब्बू दिला आहे, घ्या आनंद !
19 Sep 2020 - 1:03 pm | डीप डाईव्हर
आपल्या दोघांमधे कुठलीही डायरेक्ट शाब्दिक चकमक झालेली नसताना आता तुम्ही म्हणताय मलाही गड्डा झब्बू दिला आहेत तर मी पण तुम्हाला एक झब्बू देतो. तो एक पानी आहे कि गड्डा हे तुम्हीच ठरवा 😁
तुमचे असले सियाप्पा जर ट्विटर किंवा फेसबुकवर चालू असते तर खास तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी मी #Get-Well-Soon-Mamu असा हॅशटॅग काढला असता. आणि तो मिर्विवाद्पणे चांगला ट्रेंड मधे राहिला असता. अफसोस मिपाकर खूप सोशिक आणि भिडस्त आहेत त्यामुळे हा हॅशटॅग इथे मी सोडून कोणी वापरणार नाही.
#Get-Well-Soon-Mamu
अवांतर:- (हे अवांतर आहे कि नाही हे ज्याचेत्याने ठरवावे) मिपावर अनेक आयडिंची काही वैशिष्ट्ये आवडतात त्यातला एक आयडी मदनबाण. ते आपल्या प्रतिसादात 'आजची स्वाक्षरी:-' म्हणून रोज नवीन काहीतरी, बहुतेक वेळा एखादे गाणे लिहितात. अशा चिकाटीने मी प्रत्येक प्रतिसादात तसे करू शकेन असे वाटत नाही. तरी पण या प्रतिसादात दासबोधात समर्थ रामदासांनी सांगितलेल्या अनेक मूर्खलक्षणांपैकी पढतमूर्खाचे लक्षण आणि त्याचा सारांश स्वाक्षरी म्हणून लिहावा म्हण्तो.
आजची स्वाक्षरी:-
मुक्त क्रिया प्रतिपादी ।सगुण भक्ती उच्छेदी ।स्वधर्म आणि साधन निंदी ।तो येक पढतमूर्ख ॥ (२.१०.४)
सारांश:- अडाणी माणसे लवकर सुधारतात. आपल्या मूर्खपणाची जाणीव झाली की, ते त्यांची वागणूक बदलतात, मूर्खपणा सोडून देतात. परंतु, जे बहुश्रुत, व्युत्पन्न आणि ब्रह्मज्ञान सांगणारे पढतमूर्ख असतात, त्यांना आपला मूर्खपणा हा ‘मूर्खपणा’ वाटत नाही. आपल्या मूर्ख विचारांना ते चिकटून राहतात आणि त्यांचे विचार शहाणपणाचे आहेत, असे ते लोकांना सांगतात सुटतात. समर्थांसारख्या एखाद्या अधिकारी व्यक्तीने कानउघडणी केली, तर त्यांची विचार करण्याची पद्धत बदलते. आपल्या मूर्खपणाची जाणीव होऊन हे पढतमूर्ख सुधारण्याची शक्यता असते, अन्यथा ते स्वत:लाच शहाणे समजत असतात. काय चांगले ते माहीत असूनही हे निंद्य गोष्टी स्वीकारतात. सदाचाराची किंमत ओळखूनही भ्रष्टाचाराचा अवलंब करतात. हा पढतमूर्ख दुसऱ्याला चांगले मार्गदर्शन करतो, पण स्वत: मात्र स्वार्थापायी उलट वागतो. ब्रह्मज्ञानाच्या चार-दोन गोष्टी कळू लागल्यावर तो स्वैराचाराचा पुरस्कार करतो. स्वधर्माची, पारमार्थिक साधनांची निंदा करतो. हा माणूस ‘पढतमूर्ख’ समजावा.
शास्त्रमर्यादा सोडून वागावे, असा तो प्रचार करतो. त्याला आपल्या बुद्धिज्ञानाचा गर्व झाल्याने बाकीच्या लोकांना तो मूर्खात काढतो आणि लोकांमध्ये काय दोष आहेत हेच पाहत बसतो.
जय जय रघुवीर समर्थ 🙏
19 Sep 2020 - 1:25 pm | शा वि कु
२ महिने सदस्यकाल आणि इतके वैर ? पक्का ड्यु.
(असू दे आणि ड्यु. नो प्रॉब्लेम विद मी. फक्त माझा कयास सांगतोय.)
19 Sep 2020 - 1:42 pm | डीप डाईव्हर
वैर ? मझे इथेच कय जालिय वावरात कोणाशीच वैर नाही.
एक मार्मिक प्रतिसाद भावला म्हणून त्यावर प्रतिक्रिया दिली तर विनाकारण मला त्या वादात ओढण्यात आले.
असे त्यांनीच म्हन्टले आहे ना? मग मला अरे केल्यावर मी कारे केले तर काय ते वैर झाले? पुन्हा सांगतो माझे इथे कोणाशीही वैर नाही!
19 Sep 2020 - 1:54 pm | शा वि कु
म्हणायची पद्धत हो. तुम्ही काय तलवार घेऊन धाऊन जाताय म्हणायच नव्हतं.
बाकी तुम्ही "मोकलाया दाही दिशा" ला ट्रिब्युट दिला ह्याने ड्यु असण्याचा संशय बळावला आहे :))
(ह.घ्या. जर ड्यु नसाल तर.)
19 Sep 2020 - 2:05 pm | डीप डाईव्हर
माझा आयडीच डीप डाईव्हर आहे. वर्तमानातले लेखन वाचता वाचता मिपासागरात खोल बुडी मारून छान छान रत्ने वर काढणे याच द्देशाने मी इथे हा आयडी घेतला आहे. मिपावर नवीन असलो तरी इतर मराठी साईट्सवर खूप वर्षांपासून वावरत आहे.
Dont worry, be happy 🙂
19 Sep 2020 - 3:35 pm | संजय क्षीरसागर
नेमका उचलला !
पहिल्यांदा अरे कुणी केलं आहे ते पहा. इतकं घोर विस्मरण असेल तर तुमचा जगात कुठेही टिकाव लागणार नाही.
19 Sep 2020 - 4:24 pm | डीप डाईव्हर
LOL, ROFL वगैरे सर्व काही एकदम झालं राव तुमचा हा प्रतिसाद वाचून
😆 😆 😁 😁 😂 😂
माझा जगात कुठे टिकाव लागेल कि नाही याची काळजी तुम्ही नका करू बुवा, पण मला मुद्देसूद प्रतिसाद देण्यात तुमचा टिकाव नक्की लागणार नाही याची खात्री बाळगा. चिखलात दगड मारायची खाजच असेल तर जरूर तसे करा, पण त्यातून तुमच्याच अंगावर घाण उडेल याचे विस्मरण होऊ देऊ नका.
😆 😆 😁 😁 😂 😂
#Get-Well-Soon-Mamu
आत्ताची स्वाक्षरी:- तुका म्हणे - भले तरी देऊ कासेची लंगोटी। नाठाळाचे माथी हाणू काठी।
19 Sep 2020 - 5:55 pm | संजय क्षीरसागर
हा उप-प्रतिसाद कुणी दिला आहे ?
उगीच भंकस करण्यापेक्षा वर विचारलेल्या प्रष्णाचं उत्तर द्या.
19 Sep 2020 - 7:14 pm | डीप डाईव्हर
आता मात्र तुम्हाला हसावे 😀 का रडावे 😥 तेच समजेनासे झाले आहे.
हा उपप्रतिसाद मीच दिलाय आणि तो गड्डा झब्बू यांच्या प्रतिसादाला दिलाय, तोही त्यांचे मुद्दे पटले म्हणून!
त्यात तुमच्यावर मी कोणतीही थेट शाब्दिक, वैयक्तिक टीका केलेली नाही किंवा तुमचा नामोल्लेखही केलेला नाही. असे असूनही तुम्ही माझ्या त्या प्रतिसादावर
असा उपप्रतिसाद दिला आहे. मला कोणाचीही उधारी ठेवायची सवय नसल्याने तुम्ही दिलेल्या झब्बुची त्वरित परतफेड केली.
बर नंतर त्या माझ्या थेट तुम्हाला दिलेल्या प्रतिसादावर उत्तर न देता तुम्ही परत मी शा वि कु यांना दिलेल्या प्रतिसादावर
अशी प्रतिक्रिया दिलीत. मुद्दे-विचारलेले प्रश्न टाळण्यात तुम्ही वाकबगार असल्याचे इथे काही प्रतिसादात वाचले आहेच त्यामुळेही त्याचे हाही विशेष वाटले नाही.
वर एका प्रतिसादात तुम्हीच लिहिलंय कि
हेच तुम्हाला लागू होत नाही का? आपली विचारसरणी एकसारखी नाही त्यामुळे तुमचा वाचलेला एकमेव लेख आणि तुमचे प्रतिसाद मला नाही पटत पण मी तुमच्या धाग्यावर, तुमच्या इतरत्र दिलेलता प्रतिसादांवर कुठलीही टीका केलेली नाही. तरी मी दुसर्यांच्या प्रतिसादांवर मी दिलेल्या प्रतीसादाचे निमित्त काढून तुम्ही मला यात ओढलेत. ती बोलीभाषेत काहीतरी म्हण आहेना कुठलेसे गाढव अंगावर घेणे वगैरे त्या प्रमाणे.
राहिला विषय
"@ डीप डाईव्हर : खालच्या प्रतिसादात तुम्हाला ही गड्डा झब्बू दिला आहे, घ्या आनंद "असे भंकस प्रतिसाद द्यायची सुरुवात कोणी केली? आपणच बुद्धिमान, सर्वज्ञानी असल्याची बतावणी करत असला निर्बुद्ध मट्ठपणा करणे हि केवळ तुमची monopoly नाही, तो इतरांनाही करता येतो. मला सुद्धा!
व्यक्तिगत प्रतिसाद देण्याची सुरुवात तुम्ही केली आहे, तेव्हा भोगा आपल्या कर्माची फळे.
असो. पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा!
#Get-Well-Soon-Mamu
आताची स्वाक्षरी:- खाजवून खरुज काढू नये!
19 Sep 2020 - 7:25 pm | संजय क्षीरसागर
मग त्याला मी उत्तर दिलंय तिथे काय ते उत्तर द्या.
19 Sep 2020 - 7:54 pm | डीप डाईव्हर
मला तुमच्याशी वाद घालायची इच्छा असती तर मी तुमच्याच धाग्यावर-प्रतिसादांवर नसते का घातले. आणि तिथेही तुम्ही दिलेले उत्तर मला पटलेले नाही तर मी कशाला तिथे उत्तर द्यायला जाऊ? जे पटले होते त्यावर मी प्रतिसाद दिला होता. आणि जे मला उद्देशून तुमचे प्रतिसाद आले त्यावरही मी उत्तरे दिली आहेत. फुकाची पचपच तुम्ही करताय साहेब पण ते तुमच्या लक्षात येत नाहीये हे माझे दुर्दैव 😌
शुभेच्छा!
#Get-Well-Soon-Mamu
आताची स्वाक्षरी:- घोडे के आघाडी और गधे के पिछाडी नही चला करते! एक आगेसे लात मारता है तो दुसरा पीछेसे!
19 Sep 2020 - 9:43 am | संजय क्षीरसागर
आला असता आणि मग क्षमायाचनेची इतकी घाई पण झाली नसती. पण तुमची हौस दांडगी त्यामुळे मला ही आता उत्तर देणं भाग आहे.
१.
ती व्यक्ती आपण ही असू शकतो असं तुम्हाला का वाटत नाही ? शिवाय हा ओपन फोरम आहे त्यावर एकाच विचारसरणीच्या लोकांनी टाळ कुटावे आणि बाकीच्यांनी माना डोलवाव्या अशी अपेक्षा व्यर्थ आहे. अर्थात, कुणावर माझे प्रतिसाद वाचण्याची सक्ती आहे का ? कोंडी होते याचा सरळ अर्थ प्रतिसाद वाचल्याशिवाय तर रहावत नाही, तो पटतोयं देखिल पण तसं मान्य करण्याची हिंमत नाही असा होतो.
२.
तुम्ही काहीही न वाचता प्रतिसाद ठोकतायं ! माझ्या एकसोएक पोस्ट इथे प्रकाशित झाल्या आहेत आणि त्यामुळे लोकांच्या जीवनात बदलही झाले आहेत. पहा :
तुमच्या लेखनातून तुमचा व्यासंग नक्की जाणवतो, तुमच्या कडे अनेक वेगवेगळे विषय हाताळाण्याचीही क्षमता आहे. उदा एखाद्या गजलेचा आस्वादात्म्क लेख लिहावा तर तो तुम्हीच किंवा मागे एकदा तुम्ही ग्रेस वर एक लेख लिहीला होता त्या नंतर मला ग्रेस नव्याने भेटायला लागला. तुम्ही लिहिलेली "रुणुझुणु" ही लेखमाला, किंवा भय इथले संपत नाही हे लेख खरोखर वाचनिय आहेत. तुमच्या गेसाल्ट वरच्या लेखाने तर मला जगा कडे पहायचा एक नवा दृष्टीकोन मिळाला, वाटले अरे? असेही काही असू शकते ह्याचा मी कधी विचारच केला नव्हता. या नव्या दृष्टीकोनाचा मला वैयक्तीक आयुष्यात खुप फायदा झाला.
तुम्हाला वाचन वाढवण्याची गरज आहे.
वैचारिक बलात्कार करुन घेणं ही वाचकाची हौस आहे. ते लेखकाचं कौशल्य समजत असाल तर वाचकाच्या धारणा कमालीच्या ढिसाळ आहेत आणि त्यामुळे त्याला स्वतःच्या अबलत्वाचा फिल येतो आहे, ही गोष्ट कुणालाही कळेल इतकी उघड आहे.
19 Sep 2020 - 11:43 pm | उपयोजक
याउपर जाऊन ज्यांचा विश्वास दृढ आहे त्यांचा विश्वास उडू शकतो असं खरंच वाटतं का?
हेच म्हणतो.
लोक पुरेसे शहाणे असतात.फायदा होत आहे तोपर्यंत ज्योतिषशास्त्राचा आधार घेतात.मग कोणी कितीही फलज्योतिष थोतांड आहे , काळ अस्तित्वातच नाही वगैरे जडबंबाळ शब्दात गप्पा मारल्या , अगदी चौकाचौकात फलज्योतिष थोतांड असल्याची पथनाट्ये केली ,फ्लेक्स लावले ,रिक्षा फिरवली तरीही लोक जातातच.
महागडे मानसोपचार , अफाट लोकसंख्येमुळे आलेली अस्थिरता यावर हमखास उपाय मिळणार का?
19 Sep 2020 - 12:50 pm | गामा पैलवान
संजय क्षीरसागर,
तुमचा इथला संदेश वाचला.
मूळ मुद्दा जातकाचं जन्मस्थान असेल तर कृपया आईनस्टाईनचं नाव घेऊ नका. ते उदाहरण पार चुकीचं आहे. त्याने निरर्थक फाटे फुटतात. दुसरं एखादं समर्पक उदाहरण योजा म्हणून सुचवेन.
तुम्ही इथे म्हणता की लोकांना फक्त काहीतरी करुन मुद्दा हुकवायचा असतो. पण आईनस्टाईनचं नाव घेऊन तुम्हीच मुद्दा हुकवताय, असं नाही होत ?
आ.न.,
-गा.पै.
19 Sep 2020 - 3:27 pm | संजय क्षीरसागर
आकाश ही मानवी दृष्टीची मर्यादा आहे. कुणीही माईचा लाल आकाशात कोणत्याही दिशेला कितीही प्रवास करत राहिला तरी दि एंडचा बोर्ड येणार नाही. थोडक्यात, स्थान हा कायम व्यक्ती किंवा वस्तू सापेक्ष बिंदू आहे
हा मुद्दा आहे आणि त्यामुळे साधकाचं जन्मस्थान हा काल्पनिक बिंदू आहे; तस्मात, तो बिंदू गृहित धरुन केलेलं अनुमान व्यर्थ आहे.
आइन्स्टाईनचा सापेक्षता वाद त्याच्याशी कसा रिलेटेड आहे ते मी विडीओ देऊन दाखवलं आहे.
तुमचं सापेक्षतावादाचं इंटरप्रिटेशन वेगळं असू शकतं त्यामुळे मुद्दा हुकलेला नाही
20 Sep 2020 - 1:48 am | गामा पैलवान
संजय क्षीरसागर,
तुमच्या मूळ मुद्द्याचा सापेक्षतावादाशी कसलाही संबंध नाही. आईनस्टाईनचं नाव विनाकारण मध्ये आलं आहे. तेव्हढं टाळता आलं तर पहा. अर्थात आपापली मर्जी बलीयसी.
असो.
बाकी, 'माझ्या सापेक्षतावादाचं इंटरप्रिटेशन' नावाचा पदार्थ अस्तित्वात नाही. आईनस्टाईनने जे केलंय तेच पुरेसं आहे. त्यापासून ढळायचा विचारही मी करू शकंत नाही. त्या बाबतीत मला स्वतंत्र मत नाही.
आ.न.,
-गा.पै.
20 Sep 2020 - 1:10 pm | संजय क्षीरसागर
कसलाही संबंध नाही ?
सापेक्षतेत निरिक्षकाच्या स्थानाचं जे महत्व आहे (ट्रेनमधे असलेला आईन्स्टाइन आणि बाहेर असलेली व्यक्ती), तद्वत ज्योतिषात एकाच वेळी जन्मलेल्या दोन जातकांच्या जन्मस्थानावरुन वेगवेगळी अनुमानं येतील असा त्याचा अर्थ आहे.
20 Sep 2020 - 2:00 pm | गामा पैलवान
संजय क्षीरसागर,
आईनस्टाईनच्या सापेक्षतेत निरिक्षकाच्या स्थानाचं शून्य महत्व आहे. ट्रेनमधे असलेला आईन्स्टाइन आणि बाहेर असलेली व्यक्ती यांचे वेग भिन्न आहेत. आईनस्टाईनच्या सापेक्षतेत दोन निरीक्षकांच्या सापेक्ष वेगाला महत्त्व आहे. त्यांच्या आपसांतल्या स्थानाला नाही.
आ.न.,
-गा.पै.
20 Sep 2020 - 2:15 pm | चौकटराजा
आईनस्टाईनच्या सापेक्षतेत निरिक्षकाच्या स्थानाचं शून्य महत्व आहे. हे कसे ?
समजा निरीक्षक किडा आहे , वा माणूस आहे वा पक्षी आहे तर एकच वस्तू त्याला वेगळी दिसेल ना ? याचा उहापोह " आय लेव्हल व्यू " वर्म्स आय व्यू व बर्ड आय व्यू यात होतो ना ?
20 Sep 2020 - 2:23 pm | गामा पैलवान
चौकटराजा,
आईनस्टाईनची व तुमचीआमची सापेक्षता वेगळी आहे. म्हणूनंच म्हणतो की गरज नसेल तर आईनस्टाईनचं नाव आजिबात घेऊ नये. अन्यथा उगीच गोंधळ वाढतो.
आ.न.,
-गा.पै.
20 Sep 2020 - 5:57 pm | चौकटराजा
डॉ.वसन्त चिपळेणकर यांनी लिहिलेले एक वरील नावाचे एक पुस्तक आहे. त्यात निरिक्षकाचे स्थान अधोरेखित केले आहे. पुस्तक वाचून बरेच दिवस झाल्याने इथे विस्त्रुत असे काही लिहिता येत नाही. निरिक्षकाला महत्व त्यात विशद केले आहे हे मला नक्की आठवत आहे !!
20 Sep 2020 - 3:32 pm | संजय क्षीरसागर
वेग आणि स्थान इंटर-रिलेटेड आहे.
वेग आणि स्थान परस्परावलंबी असल्यानं निरिक्षकाशिवाय काहीही जाणलं जाऊ शकणार नाही. निरिक्षकच नसेल तर सापेक्षतावाद कुणाच्या संदर्भात निर्माण होईल ? निरिक्षक शून्य सापेक्षता या जगात असूच शकत नाही.
20 Sep 2020 - 8:45 pm | गामा पैलवान
संजय क्षीरसागर,
तुम्ही काढलेला हा प्रश्न पार निरर्थक आहे :
निरीक्षक नाहीये असं कोण म्हणतोय? उलट, तिथे एक सोडून दोन निरीक्षक आहेत. एक जातक आणि दुसरा आईनस्टाईन. तर, हे दोघं कुठे तोंड करून बसलेत आणि त्यांची सापेक्ष स्थानं ( = आपापली बुडं टेकायच्या जागा ) काय आहेत हे दोन प्रश्न आईनस्टाईनच्या विशिष्ट सापेक्षतेत विचारले जात नाहीत. त्यांच्या आपसांतल्या वेगांत काय फरक इतकंच आईनस्टाईन विचारतो.
हे विवेचन तुम्हांस मान्य नसल्यास कृपया आईनस्टाईनचं नाव घेऊ नका.
आ.न.,
-गा.पै.
20 Sep 2020 - 10:50 pm | संजय क्षीरसागर
दोन निरिक्षक वेगवेगळ्या ठिकाणी असल्यामुळेच फरक आहे. त्यांची स्थानंही निरिक्षित परिक्षणाच्या दिशेनंच असायला हवीत हे उघड आहे. एकटा आइन्स्टाइन रेल्वेनं निघाला तर सापेक्षता वाद होऊच शकत नाही.
तुम्हाला हे पटत नसेल तर तुम्ही सापेक्षता वादावर स्वतंत्र पोस्ट लिहा, तिथे मी प्रतिवाद करीन.
21 Sep 2020 - 1:30 am | गामा पैलवान
संजय क्षीरसागर,
एकटा आइन्स्टाइन रेल्वेनं निघतो व जातक रेल्वेबाहेर असतो तेव्हाच आईनस्टाईनचा सापेक्षतावाद लागू पडतो.
मी दुसरी पोस्ट लिहिणार नाही. कारण की ती फक्त तुम्हालाच उद्देशून असेल, आणि तुम्हाला या विषयाची फारशी माहिती नाही.
आ.न.,
-गा.पै.
21 Sep 2020 - 10:31 am | सुबोध खरे
तुम्हाला या विषयाची फारशी माहिती नाही.
काय सांगताय?
आपण फार भयंकर विधान करताय.
काळजी घ्या
21 Sep 2020 - 10:57 am | संगणकनंद
मला माहिती नाही असा एकही विषय या जगात नाही. सापेक्षतावादावर चर्चा करण्यासाठी खुद्द आईनस्टाईन जरी चर्चेला आला तरी मी त्याला हरवून दाखवेन. तुम्ही फक्त त्याला बोलवा. कसे बोलवायचे यासाठी माझी स्मृती स्ट्रींग पूडी "आता पुन्हा" वाचा.
आ.न.,
पढतमुर्खंजय भरप्रतिसादसागर
21 Sep 2020 - 12:50 pm | संजय क्षीरसागर
१.
हाच निरिक्षकांचा स्थानभेद आहे ! त्यामुळे तुमचं पहिलं (आणि निष्कारण ठामपणे केलेलं) विधान : "आईनस्टाईनच्या सापेक्षतेत निरिक्षकाच्या स्थानाचं शून्य महत्व आहे." चुकीचं आहे.
२.
सापेक्षतावादावरचा लेख सर्वांना माहितीपर होईल पण वर १ मधे म्हटल्याप्रमाणे तुम्हाला विषयाची नक्की किती माहिती आहे ते पहा.
19 Sep 2020 - 2:27 pm | सुबोध खरे
मी म्हणजे मी म्हणजे मीच
19 Sep 2020 - 4:56 pm | Rajesh188
हे सर्व वरील ज्ञान पृथ्वी वरील मर्त्य मानवाच्या बुध्दी पलीकडे आहे.
अवकाश अनंत आहे त्याला अंत आहे ह्याच प्रश्न. भोवती पृथ्वी वरील मृत्त मानव अडखला आहे .
19 Sep 2020 - 6:52 pm | शशिकांत ओक
धागा तुमच्या हातून सटकून कुठल्या कुठे गेला.
मोबाईलवर स्क्रीनच्या बाहेर लेखन गेले आहे...
ट्रेन प्रवासात रिझर्वेशनवाल्यांची जागा बळकावून हमरीतुमरीवर येणाऱ्या अगांतूक प्रवाशांच्या आवेशात लेखन करताना पहायला मजा येते आहे. गारुड्याचे खेळ पहायला आलेल्यांना जंभूरा आवडतो... पण त्याला पडद्यात लपवले जाते. तसे आपले वरिष्ठ मित्र वर्य रिसबुडांना बिनबुडाचे करून टाकले आहे कि काय असे वाटले!
19 Sep 2020 - 11:45 pm | उपयोजक
19 Sep 2020 - 11:50 pm | उपयोजक
😂
20 Sep 2020 - 12:32 am | कपिलमुनी
आमच्या गावाकडे काही बेवडे रिकामटेकडे असायचे , कुठे जेसीबी चालू झाला की उगाच गर्दी करून बघत बसायचे, तिरके मार, सरळ जाऊ दे टाईप चे निरुपयोगी सल्ले द्यायचे, त्यांना वाटायचं , जे सी बी वाल्या पेक्षा आपल्याला जास्त कळतंय ,
धागा बघून त्याची आठवण झाली
20 Sep 2020 - 9:02 am | शा वि कु
बऱ्याचदा हा युक्तिवाद वापरला जातो,
:))
यावर (नॉन-ऍस्ट्रोलॉजिकल कारणे) तुमचं आणखी लिखाण असेल तर वाचायला आवडेल.
20 Sep 2020 - 1:40 pm | चौकटराजा
समजा मंगळाला काही गुणवैशिष्ट्ये आहेत .त्यामुळे तो पत्रिकेत " असणे" हे आयुष्यावर काही भले बुरे प्रश्न निर्माण करू शकतो.
आता मंगळावर जावून माणसाने विशिष्ट वातावरण मंगळावर मर्यादित अवकाशात का होईना निर्माण केलं व तिथे एक स्त्रीने व पुरुष यांचा संयोग घडवून मूल निर्माण केले तर त्याच्या पत्रिकेत मंगळ कुठे असेल ... ?
बाकी स्थान ,दिशा,,दिवस रात्र हे व्यवहारिक पातळीवर आवश्यक असले तरी ते वैश्विक पातळीवर शून्य किंमत असलेले आहेत . फारतर उलट व सुलट दिशा असे काही मान्य करता येईल !
20 Sep 2020 - 3:44 pm | संजय क्षीरसागर
इथे संयोग होऊन निर्माण झालेल्या अपत्याच्या पत्रिकेत, प्रत्येकावर सर्वात जास्त आणि क्षणोक्षणी परिणाम करणारा ग्रह म्हणजे पृथ्वी, कुठेही नसते !
20 Sep 2020 - 2:15 pm | ऋतुराज चित्रे
हया दोघींचे भविष्य सारखेच असेल का ? जन्म वेळ व स्थान एकच आहे दोघींचे.
25 Sep 2020 - 11:03 am | ऋतुराज चित्रे
https://www.misalpav.com/comment/1080887#comment-1080887
अगदी आयडेंटीकल ट्वीन वर विज्ञानात संशोधन झाले आहे. चालूही आहे. असे संशोधन फलज्योतिष चिकीत्सकांनी केले आहे का ?
25 Sep 2020 - 5:29 pm | प्रकाश घाटपांडे
१३) जुळ्या मुलांच्या कुंडल्यात फरक असतो का?
सर्वसाधारणपणे जुळ्या मुलांच्या जन्मवेळेमध्ये १५-२० मिनिटांचे अंतर असते. काही केसेस मध्ये ते काही तासांपर्यंत जाते. १५-२० मिनिटांच्या फरकामुळे ठोकळाकुंडलीतल्या ग्रहांची स्थाने व राशींचे आकडे यात सहसा काही फरक पडत नाही. वर सांगितल्या प्रमाणे बॉर्डर वेळेचा जन्म असेल तर उपरोक्त उदाहरणात जसे तीनचे चार झाले तसा प्रथम स्थानातल्या राशीच्या आकड्यात एका आकड्याचा फरक पडू शकतो, आणि त्याचबरोबर नक्षत्रही बदलू शकते. या बाबत प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ व ज्योतिषसमर्थक कै. डॉ.भा.नि. पुरंदरे यांनी एक किस्सा पुण्यातील ज्योतिष संमेलनात सांगितला होता. तो असा:- त्यांच्या कडे प्रसूती साठी आलेल्या एका केसमध्ये पंधरावीस मिनिटांच्या अंतराने जुळ्या मुली जन्माला आल्या. त्या एकाच वारेवरच्या होत्या. परंतु एक काळसर होती व एक उजळ होती. त्यांनी जेव्हा मुलींच्या पत्रिका केल्या तेव्हा त्यांना असे आढळून आले की त्या पंधरावीस मिनीटांमध्ये एकीचे जन्म-नक्षत्र बदलले होते. त्या मुळे एक मुलगी सावळी व एक उजळ असा त्यांच्या वर्णात फरक पडला असे त्यांचे म्हणणे होते.
त्यांच्या विधानाचा अर्थ असा होतो की दोन्ही मुली या एकाच फलित गर्भपेशीचे विभाजन होउन झालेल्या जुळ्या मुली ( युनिओव्ह्यूलर ) होत्या कारण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्या एका वारेवरच्या होत्या. परंतु, तरीही त्यांच्या वर्णात फरक पडला तो केवळ १५ मिनिटात एकीचे नक्षत्र बदलल्यामुळे पडला. आम्हाला त्यांच्या या विधानाच्या सत्यतेबद्दलच शंका वाटते. ती शंका अशी:- असा वर्णातला फरक फक्त माता-पित्यांच्या जनुकांच्या जोडणीत होणाऱ्या फरकामुळे पडू शकतो असे जनुक-शास्त्र सांगते. युनिओव्ह्यूलर केस मध्ये असा फरक पडणे शक्य नाही. कारण तशा केसमध्ये जनुकांच्या जोडणीत फरक पडलेला नसतो. पण जर डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे केवळ नक्षत्र-बदलामुळे हा फरक पडला असेल तर ती गोष्ट या शास्त्रात मूलभूत क्रांति घडवणारी ठरेल. ती केस वास्तविक एखाद्या मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध होण्याच्या योग्यतेचीच ठरेल. ती काही एखाद्या ज्योतिष-संमेलनात सांगून सोडून देण्यासारखी किरकोळ गोष्ट नव्हे!
आता प्रश्न असा आहे की हे त्यांचे संशोधन एखाद्या मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध होउन त्याला मान्यता मिळाली आहे का ? एवढया मोठया तज्ज्ञ डॉक्टराने सांगितले ते खरे असलेच पाहिजे असे सामान्य माणूस मानणारच. दुसऱ्या तज्ज्ञांची मते या बाबतीत काय आहेत हे पहाण्याच्या भानगडीत तो पडत नाही. यावरून एवढे मात्र दिसते की जेव्हा एखादा मोठा डॉक्टर स्वत:च ज्योतिषी बनतो तेव्हा तो त्या शास्त्राच्या समर्थनासाठी दिशाभूल करणारी विधाने करू शकतो. पुढे २४ व्या प्रश्नाच्या उत्तरात आम्ही हेच दाखवून दिले आहे.
या ठिकाणी हस्तरेषातज्ज्ञ पुढे येतात. ते म्हणतात, ''जुळया मुलांची कुंडली एकवेळ सारखी असेल पण हस्तरेषा मात्र वेगळया असतात. अहो, हा निसर्गाचा आरसा आहे! तुमची जन्मवेळ चुकू शकते. पण हा आरसा काही बदलत नाही. तुम्ही आमच्याकडे या.``
25 Sep 2020 - 5:31 pm | प्रकाश घाटपांडे
इथे अजुन पुर्वसंचित,प्राक्तन हे घटक येतात. त्याचे आकलन ज्योतिषी व्यक्तीच्या उपासना अध्यात्मिक सामर्थ्य यावर अवलंबून असतात. म्हणजे फॅक्टर्स वाढले
25 Sep 2020 - 6:09 pm | ऋतुराज चित्रे
जुळ्या मुलांच्या कुंडल्यात फरक असतो का?
सर्वसाधारणपणे जुळ्या मुलांच्या जन्मवेळेमध्ये १५-२० मिनिटांचे अंतर असते. काही केसेस मध्ये ते काही तासांपर्यंत जाते
एकत्रित जुळे एकमेकांना चिकटून असल्याने त्यांची जन्मवेळ सारखीच असते परंतू त्यांचे भविष्य सारखे नसते, खासकरून जेव्हा ते एकमेकांना अंशत: जोडलेले असतात ,मुख्य अवयव मेंदू , हृदय , फुप्फुस , यकृत, किडनी सामायीक नसतात. जन्म वेळ आणि स्थानात फरक नसतो .
25 Sep 2020 - 6:28 pm | प्रकाश घाटपांडे
ही केस विशेष व अपवादात्मक आहे
20 Sep 2020 - 2:18 pm | ऋतुराज चित्रे
स्त्रीने व पुरुष यांचा संयोग घडवून मूल निर्माण केले तर त्याच्या पत्रिकेत मंगळ कुठे असेल ... ?
पत्रिकेत मंगळाची जागा पृथ्वी घेईल.
20 Sep 2020 - 5:48 pm | चौकटराजा
म्हणजे जसजसे नव्या ग्रहान्चे शोध लागतील त्याप्रमाणे या शास्त्रातील गृहितकेच बदलावी लागणार ! असे ज्योतिष शास्त्री करतील असे खात्रीने वाटते का.... ? प्रुथ्वी तामसी, दयाळू की कशी हे मंगळावरचे ज्योतिषी कोणत्या आधारावर ठरवतील ???
20 Sep 2020 - 6:51 pm | सतिश गावडे
कृष्ण विवरांचे कुंडलीतील स्थान आणि त्यांचा जातकाच्या आयुष्यावर होणारे परिणाम यावर आइन्स्टाइन वेग स्थळ काल तज्ज्ञांचे काय मत आहे?
20 Sep 2020 - 8:02 pm | कानडाऊ योगेशु
ज्ञात असलेली कृष्णविवरे आहेत का? म्हणजे जसे ग्रहांना नावे आहेत तसे कृष्णविवरांना पण नावे असायला हवीत.
20 Sep 2020 - 8:23 pm | शा वि कु
विकिपीडिया यादी
20 Sep 2020 - 8:26 pm | सतिश गावडे
हो, ज्ञात असलेल्या कृष्णविवरांची भली मोठी यादी आहे.
20 Sep 2020 - 10:11 pm | Rajesh188
आकाशातील ग्रह गोल ( आपल्या सूर्य माले मधील पृथ्वी वरच्या प्रतेक वस्तू परिणाम करतात.
विविध प्रकारची बल विश्वात कार्यान्वित आहेत.
त्या मधील काही थोडकी च बल आपल्याला माहीत असतील अजुन बाकी बल आपल्याला अजुन माहीतच नसतील हे पण शक्य आहे.
शेवटी सजीव सृष्टी ही विश्व चाच भाग मानवी मानवी शरीर सुद्धा काही वेगळे नाही.
त्या मुळे विशिष्ट ठिकाणी विशिष्ट ग्रह गोलांची स्थिती असेल तर मानवी मनावर त्याचा परिणाम होतो हे अनुभव नी माहीत पडल्या वर त्या आधारित ज्योतिष शास्त्र विकसित केले गेले असेल.
चेतना म्हणजे काय हे अजुन स्पष्ट झालेला नाही.
चेतना ही ब्रह्मांड तून च निर्माण होते असे पण काही लोकांचे मत आहे.
21 Sep 2020 - 11:27 am | चौकटराजा
गुरू जर माझ्यावर परिणाम करीत असेल तर मी ही काहीतरी परिणाम गुरुवर करत असेनच की नाही ? प्रश्न आहे तो की त्या परिणामाची व्याप्ती काय ? त्याच्यात व माझ्यात अंतर किती ( सोशल डिस्टन्सिंग ) . त्याता ही महत्वाचे असे की माझ्यातील अत्यन्त गुन्तागुन्तीच्या मानसिक प्रक्रियांवर गुरूच्या चलनाचा परिणाम कितीसा ..? व माझ्या मानसिकतेचा गुरूवर परिणाम किती ?
21 Sep 2020 - 11:43 am | शा वि कु
योग्य प्रश्न. परिणाम तर त्या लॉजिकने दगड, माती, शेण यांचा पण होतो. कुंडलीत त्यांचा का विचार होत नाही ?
21 Sep 2020 - 12:11 pm | Rajesh188
बरेच जुने ज्ञान हे अनुभवातून मांडलेल्या सुत्रा वर अवलंबून आहे.
जसे मुंग्या निघायला लागल्या ,अन्न जमवायला लागल्या की समजायचे आता पावूस सुरु होणार.
आकाशात लांबवर काळ्या ढगांची भिंत दिसायला लागली की समजायचे काहीच वेळात वळीव पावूस येणार .
वळीव पावसाचे ढग खूप वेगात प्रवास करतात लांब दिसणारा पावूस काही मिनिटात पोचतो.
हे सर्व अनुभव वर आहे.
ह्याची शास्त्रीय कारणे आज सुद्धा माहीत नसतील..
तसेच ज्योतिष हे सुद्धा अनेक प्रयोगातून आलेल्या अनुभव वर अवलंबून आहे.
शास्त्रीय पद्धतीने सिद्ध करता येणार नाही
21 Sep 2020 - 1:50 pm | गामा पैलवान
संजय क्षीरसागर,
हाच निरिक्षकांचा स्थानभेद आहे ! त्यामुळे तुमचं पहिलं (आणि निष्कारण ठामपणे केलेलं) विधान : "आईनस्टाईनच्या सापेक्षतेत निरिक्षकाच्या स्थानाचं शून्य महत्व आहे." चुकीचं आहे.
हा स्थानभेद ब्रह्मांडात सर्वत्र आढळून येतो. भौतिकशास्त्राचं एक गृहीतक आहे की कोणत्याही दोन विभिन्न वस्तू एकाच वेळी एकाच स्थानी अस्तित्वात नसतात. तस्मात आईनस्टाईनचं बूड व जातकाचं बूड नेहमी विभिन्न स्थानं व्यापणार आहे.
या चिरंतन सत्याचा आईनस्टाईनच्या सापेक्षतेशी अणुमात्र संबंध नाही.
आ.न.,
-गा.पै.
21 Sep 2020 - 1:58 pm | Rajesh188
जी मत व्यक्त होत आहेत.
जे दुर्मिळ विज्ञान इथे सांगितले जात आहे.
ते जागतिक स्तरावर च्या कोणत्याच संशोधकांच्या पण बुध्दी च्या बाहेरच आहे.
एवढे ज्ञान त्यांना पण नाही
तर महान संशोधकांना तुमच्या चर्चेत घेवू नका
21 Sep 2020 - 2:40 pm | शा वि कु
बुडभिन्नत्व शब्द भारी आहे. खूप आवडला.
21 Sep 2020 - 2:46 pm | संजय क्षीरसागर
पहिल्यासरखाच चुकीचा निष्कर्श काढलात !
१.
करेक्ट ! आइन्स्टाईन ट्रेनमधे आहे आणि दुसरी व्यक्ती बाहेर आहे हा स्थानभेद आहे आणि त्यामुळेच त्यांचं वस्तुस्थितीचं आकलन सापेक्ष आहे
२.
जर आइन्स्टाईन आणि दुसरी व्यक्ती ट्रेनमधेच असतील तर सापेक्षता वादाला अर्थच उरत नाही.