मुखवट्यांमागचे चेहरे- डायना आणि चार्ल्स

Primary tabs

महासंग्राम's picture
महासंग्राम in जनातलं, मनातलं
14 May 2019 - 11:48 am

डायना जेव्हा तिच्या प्रियकरासोबत (दोडी अल फयाद) कार अपघातात वारली, तेव्हा तिच्याबद्दल साऱ्या जगभरात हळहळ व्यक्त झाली होती. एका करारी बेधडक राजस्नुषेचा मृत्यू चटका लावणारा होता. विचार करा, जिच्या साम्राज्यावर कधीही सूर्य मावळत नव्हता अशी ख्याती असलेल्या इंग्लडच्या राणीची सून होणं किती कठीण गोष्ट असेल. राजघरण्याची प्रतिष्ठा सांभाळणं आणि ते टिकवण्यासाठी कित्येक मुखवटे राजघराण्यातील व्यक्तींना चढवावे लागतात. पण आपल्याला जे दिसतं ते सारंच खरं नसतं, अश्याच राजेशाही चेहऱ्यांची करुण कहाणी म्हणजे मीना प्रभूंचं 'मुखवट्यांमागचे चेहरे- डायना आणि चार्ल्स' हे पुस्तक !

पुस्तक सुरू होते ते डायनाच्या माहेरापासून! पुढे युवराज चार्ल्सचं सर्वस्वी वेगळं जग, त्याला पार पाडाव्या लागणाऱ्या जबाबदाऱ्या, डायनाचा राजवर्तुळात होणारा प्रवेश, यामुळे लग्नापूर्वीची बेधडक डायना लग्नानंतर पूर्णतः बदलून जाते. राजसुनेला पार पाडाव्या लागणाऱ्या जबाबदाऱ्यांचं डायनावर आलेलं दडपण, त्यातून तिची होणारी फरफट, चार्ल्स सोबत वाढत जाणारे ताणतणाव, तरीही चार्ल्सचं तिला सांभाळून घेणं, या सर्वांची हृदयद्रावक कहाणी यात गुंफली आहे. इंगलंड बाहेरच्या मीडियात डायनाबद्दल बरीच कणव आणि चार्ल्स बद्दल राग असला तरी, डायनाचं सर्वस्वी वेगळं रूप यातून आपल्यासमोर उभं राहतं.

मागच्याच आठवड्यात डायनाचा धाकटा मुलगा प्रिन्स हॅरी आणि मेगन यांचा यांना 'आर्ची' नावाचं पुत्ररत्न प्राप्त झालं. सध्या या नव्या सुनेविषयी बरेच प्रवाद आहेत आणि राजघराण्यात सगळंच आलबेल नाहीये असं म्हणतात. इंग्लिश समाज आपल्या रूढी परंपरांविषयी कायमच आग्रही राहिला आहे. असे असतांना डायनाच्या त्या वेळेसच्या वर्तनाने तत्कालीन समाज आणि राजघराण्यावर काय परिणाम झाला असेल, याची किंचितशी कल्पना या पुस्तकातून आपल्याला येते. किंचितशी या करता म्हणतोय कारण हे पुस्तक फार वरवरचं अगदी पेज ३ टाईप वाटत राहतं. विशेषतः दोडी अल फयाद बरोबरचं तिच्या प्रेमप्रकरणाबद्दल, आई म्हणून मुलांसोबतच्या तिच्या नात्याबद्दल फारसं भाष्य केलेलं नाही. मला तरी या पुस्तकातून डायनाचं अंतरंग उलगडलेलं असेल असं वाटलं होतं पण ती अपेक्षा अगदीच धुळीस मिळाली.

डायना

वाङ्मयसाहित्यिकसमाजजीवनमानप्रतिक्रियाविरंगुळा

प्रतिक्रिया

मीना प्रभू देत असलेली माहिती कितपत विश्वासार्ह मानावी? त्यांनी स्वतः जबाबदार लोकांशी बोलून जमा केलेली माहिती आहे का ही? जबाबदार म्हणजे राजघराण्यातील, अथवा चार्ल्स, डायना ह्यांच्याशी घरोबा असलेले वगैरे, वा त्यांचे कुटुंबीय वगैरे? की ह्या राजघराण्याच्या संबंधात इतके लेखन झाले आहे, त्यातलीच माहिती दिली आहे, इथले तिथले उचलून? कोणत्या पुस्तकाचा अनुवाद आहे का?

एकुणात तिसऱ्या पानावरचे गॉसिप दिसते आहे, हे पुस्तक म्हणजे.

महासंग्राम's picture

14 May 2019 - 2:09 pm | महासंग्राम

तै त्यांनी डायनाबद्दलच्या विविध मुलाखतींचा संदर्भ वापरलाय पुस्तक लिहितांना त्यामुळेच पेज ३ टाईपचं पुस्तक म्हणालोय मी.

यशोधरा's picture

14 May 2019 - 2:27 pm | यशोधरा

हो, तेच की.

गड्डा झब्बू's picture

14 May 2019 - 6:46 pm | गड्डा झब्बू

मला तर बुवा ति बाई ठराविक चष्मे लाऊन जग बघणारी वाट्टे. तरी बर लेखकांनीच त्याला पेज ३ टाईपचं पुस्तक म्हणलय.

पद्मावति's picture

14 May 2019 - 9:20 pm | पद्मावति

मीना प्रभूंचं प्रवासवर्णना व्यतिरिक्त इतर लिखाण मी कधी वाचलं नव्हतं. तुमच्यामुळे नवीनच कळतंय हे आणि तुम्ही म्हणताय तसंच वाटतंय पेज थ्री टाईप. पण सहज मिळालं तर वाचेनही कदाचित.