रंगराव कंपोस्टवाला

vcdatrange's picture
vcdatrange in जनातलं, मनातलं
17 Oct 2018 - 8:10 pm

मागच्या रविवारी अस्मादिकांची डॉक्टर असोसिएशनच्या (नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असो.) सचिवपदी निवड झाली. सभेत स्वागत, सत्कार वैग्रे सोपस्कारातही रंगराव कंपोस्टवाला की पारखी नजर होती ती आपल्या कामाच्या कचर्‍याकडे. कार्यक्रम पार पडल्यानंतर पसार्‍यातली ढीगभर पुष्पगुच्छ घरी सोबत आणली.

एक एक बुके वेगवेगळे करायला जवळपास तीन तासाचा वेळ गेला. काय काय निघालं, यादी तर पहा -
१. हुच्च फुले जरबेरा, कार्नेशन वेगळी काढुन घरभर फ्लावर पॉट सजवले.
२. सजावटीचा हिरवा पाला आणि फुले- बारीक कातरुन कंपोस्ट करीता गच्चीवर रवाना
३. बुकेला लपेटलेला पारदर्शक प्लास्टिक पेपर - सुटे करुन गादीखाली. उपयोग कस‍ा करायचा अजुन ठरले नाही
४. बुकेच्या मुठीला गुंडाळलेले चकचकीत प्लास्टिक पेपर- सुटे करुन रिकाम्या बिसलरी बॉटलस् मध्ये भरायला
५. सेलो टेपचे तुकडे - एकत्र करुन क्रमांक ४ प्रमाणे
६. दोरा - लपेटुन ठेवलाय. दिवाळीत तो फुग्याला दोरा गुंडाळुन करायचा आकाशकंदील बनवायचाय. DIY की काय असतं न‍ा ते.
७. बुकेच्या रिबन्स - क्रमांक ३ प्रमाणे
८. फुलांचे जाड देठ- बारीक देठ कातरुन कंपोस्ट मध्ये टाकलेय तर जाडसर एकत्र बांधुन ठेवलेत. नविन कुंडी भरताना तळाशी टाकेन
९. हिरवा स्पंज - गरजेनुसार सेल्फ वॉटरींग करीता कुंड्यामध्ये ठेवायला.

समजा, भीड/लाज/दुर्लक्ष/ मैनु की अश्या कोणत्याही कारणाने हे बुके मी आणले नसते तर काय झालं असतं पहा

- रात्री उशीरा हॉल आवरणार्‍या वेटरने उचलुन रस्त्याच्या कडेला सगळे बुके टाकुन दिले असते. सकाळी भटक्या जनावरानी खायला सुरुवात केली असती. त्यातलं निम्म प्लास्टिक त्यांच्या पोटात गेलं असतं. उरलेलं दुपारी घंटागाडीतुन डंपिंग यार्डला गेलं असतं. ओला कचरा म्हणुन मशीन मेड कंपोस्ट युनिट कडे जावुन प्लास्टीक, दोरा, सेलोटेप युक्त दर्जेदार कंपोस्ट तयार होवुन ऑर्गॅनिक शेतीद्वारे पुन्हा आपल्याच पोटात. शेतकरी बांधव अवगतच असतिल की वेस्ट कंपोस्ट हे त्याच्या निकृष्ट दर्जामुळे सर्वात स्वस्त मिळतं.

किंवा

- इथे नाशकात हॉटेल वेस्ट एकत्र करुन वीज निर्मिती केली जाते तिकडे पोहोचले जाते. Segrigation at Source न झाल्याने, अत्यंत गरजेपोटी सडलेला, जीवघेणा दुर्गंध येणारा कचरा हाताने विलग करण्याचे काम करणार्‍या तुमच्या माझ्या सारख्याच भगिनींना खरकट्या अन्नाला चिवडुन विलग करावे लागले असते. (या कचर्‍यापासुन वीजनिर्मिती प्रकल्पाचाही किस्सा आहे, पण तो पुन्हा कधीतरी. .)

टीप - कचरा विलगीकरण हा अत्यंत महत्वाचा टप्पा बहुदा दुर्लक्षिलाच जातो. . उगमस्थळी विलगीकरण हे सुटसुटीत असतं. तुमच्याकडे या करता द्यावा लागणारा वेळ नसेल तर नक्कीच तुमची आर्थिक स्थिती इतकी सक्षम असेल की कोणाला तरी या कामाकरीता खाशी नेमणुक करु शकाल.

टीप टीप - पहिल्या ओळीकडेही लक्ष द्या. .

समाजजीवनमानविचारअनुभवमतशिफारस

प्रतिक्रिया

टर्मीनेटर's picture

17 Oct 2018 - 9:04 pm | टर्मीनेटर

तुमची डॉक्टर असोसिएशनच्या (नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असो.) सचिवपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन.
पहिल्या ओळीकडेच जास्त लक्ष दिले :-)
लेखन आवडले.

पहिली ओळ वाचली - अभिनंदन!

तुमच्या यादीतले मुद्दे - ४ आणि ५ नीट समजले नाहीत. क्र. ६ - या रविवारीच एक मैत्रीण आली होती, तिच्या अनुभवाप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवतात तेवढे काही हे सोपे नाही, याचा खूप पसारा होतो.

बाकी उर्वरित लेखातल्या बर्‍याच गोष्टी मीही करते. खरं तर त्यात बराच वेळ जातो, शिवाय पर्यावरण वाचवण्यात स्वतःच्याच घरात खूप पसारा होतोय असं वाटतं, पण खोड जात नाही!

vcdatrange's picture

18 Oct 2018 - 10:29 am | vcdatrange

फोटो डकवता येत नाहीय. https://en.m.wikipedia.org/wiki/Ecobricks य‍ा लिंक मध्ये दिल्याप्रमाणे प्लास्टिक बाटलीत One time Used पेपर, कॅरी बॅग्ज कोंबुन भरायच्या.एका बाटलीत चार पाचशे बॅग्ज बसतात

रुपी's picture

18 Oct 2018 - 10:37 am | रुपी

अच्छा.. ते ही करते :)
पण प्लॅस्टिक चे तुकडे आणि सेलोटेपचे तुकडे भरून काय उपयोग हे समजले नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Oct 2018 - 12:24 pm | डॉ सुहास म्हात्रे

फोटो डकवता येत नाहीय.

"मिपावर चित्रे टाकण्याची कृती", इथल्या सूचना वापरून पहा असे सुचवतो.

कंजूस's picture

18 Oct 2018 - 7:29 am | कंजूस

१) अभिनंदन हो.
२) तुम्हास नवनवीन कल्पना राबवण्यासाठी एक वर्ष दिलं आहे त्याचा नक्कीच उपयोग कराल.
३) पुष्पगुच्छापेक्शा एकेक फूल दिले असते तर काम सोपे झाले असते. एकच गुच्छ घरी करून ठेवता आला असता.
४) दोऱ्याचा कंदील केला आहे एकदा मुलीने. फार सोपा आहे.

मार्मिक गोडसे's picture

18 Oct 2018 - 10:54 am | मार्मिक गोडसे

अभिनंदन.
लेखन आवडले.

मुक्त विहारि's picture

18 Oct 2018 - 10:12 pm | मुक्त विहारि

तुमची डॉक्टर असोसिएशनच्या (नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असो.) सचिवपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन.

आज कुणालाही आपट्याची पाने न देता, दसरा साजरा केला.

मित्रांनी आणि नातेवाईकांनी समजून घेतले.

Yesnee's picture

19 Oct 2018 - 12:29 am | Yesnee

अभिनंदन

नाखु's picture

20 Oct 2018 - 11:41 am | नाखु

तूर्त घरातील विघटनशील कचरा खत खड्ड्यात विल्हेवाट लावण्यासाठी रवाना होत आहे.
सुरवातीला जेष्ठ सदस्यांना नाही आवडलं हे पण मी प्रयत्न चालू ठेवले.
यामुळे गेली पाच वर्षे खरकटे, भाजीपाला त्याज्य,बिनवापरातील भाग, निर्माल्य अजिबात घराबाहेर जात नाही.
पावसाळ्यात पाणी साठत असूनही नाउमेद न होता काम चालू आहे.
घरी करता येईल अश्या भाजीपाल्याची लागवड करण्याचे प्रयोग बाल्यावस्थेत आहेत,त्याला याचेच खत वापरले जाते.
मागीलवर्षी दहा पंधरा स्नेही आप्तेष्टाना देता येईल इतकी वाल पापड्या मिळालेल्या (प्रत्यक्ष दिल्या आहेत)
अजून बरेच शिकायचं आहे.
एक दोन वर्षांनी थोडी उसंत मिळाली की पुनश्च एकदा हरी ओम.

पडून उठलेला नाखु वाचकांची पत्रेवाला