आत्ताच याहूच्या संकेत स्थळावर गेलो होतो आणि एक सुखद धक्का बसला!
त्यांच्या गृहपर्णावर (होमपेजवर भारतासाठीचे जे .in आहे त्यावर आहेच पण हे जगाचे मुख्य पान...) चक्क याहू या अक्षराच्या अलीकडे दोन लुकलुकत्या पणत्या आणि दुसरीकडे "हॅपी दिवाली" असा संदेश. त्याच्यावर टिचकी मारल्यावर दिवाळीवर विशेष माहीती मिळाली.
वास्तवीक अशी रेखाटने मी गुगलच्या प्रमुखपानावर कायम पाहीली आहेत पण दिवाळीसाठी मात्र दिसले नाही... आजही त्यांच्या भारतासाठीच्या गृहपर्णावर एक रेखाटन आहे पण त्यात पणत्या वगैरे न दाखवता आकाशाकंदील वाटणारे पण "स्टार्स" दाखवले आहेत...
तेंव्हा किमानपक्षी सामाजीक जाणिवेत भारतीय संस्कृतीचे योग्य प्रदर्शन केल्याबद्दल येथे याहू! वरचढ वाटले...
सर्कीटसाहेब,
जर आमच्या भावना योग्य ठिकाणी पोचवता आल्या तर अवश्य पोचवा. अर्थात आम्ही (येथील कोणिही) जर तसे कळवावेसे वाटत असेल तर तसेही अवश्य सांगा!
धन्यवाद!
प्रतिक्रिया
28 Oct 2008 - 7:03 pm | सखाराम_गटणे™
http://in.yahoo.com/?p=us वर पणत्या आहेत.
http://www.google.co.in फक्त पेटलेले फटाके आहेत.
--
आम्ही जालिय देशमुख आहोत.
28 Oct 2008 - 7:17 pm | मीनल
खरच की!
बर वाटल पाहून.
मीनल.
28 Oct 2008 - 7:20 pm | ऋषिकेश
सकाळी गुगलवर पाहिलं होतं ठिक वाटलं.. पण याहूवरचं चित्र मस्त आहे :)
बरं वाटलं
-(खुष) ऋषिकेश
28 Oct 2008 - 7:21 pm | घाशीराम कोतवाल १.२
अखेर भारतीय संस्क्रतीची दखल घेतली त्यांनी
मी आता तसा कोतवाल नाही बरं?
28 Oct 2008 - 7:28 pm | प्राजु
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
28 Oct 2008 - 11:30 pm | सर्किट (not verified)
जर आमच्या भावना योग्य ठिकाणी पोचवता आल्या तर अवश्य पोचवा. अर्थात आम्ही (येथील कोणिही) जर तसे कळवावेसे वाटत असेल तर तसेही अवश्य सांगा!
नक्की.
आपणही येथे मुखपृष्ठाविषयीच्या आपल्या भावना व्यक्त करू शकता.
-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
29 Oct 2008 - 4:55 am | मदनबाण
लिंक बद्दल धन्यवाद.. :)
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
29 Oct 2008 - 7:56 am | विसोबा खेचर
अरे वा! कौतुक आहे हो याहूचं!
29 Oct 2008 - 8:22 am | सहज
पणत्यासहीत याहूचा लोगो आवडला.
29 Oct 2008 - 9:10 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भारतीय संस्कृतीचे योग्य प्रदर्शन केल्याबद्दल येथे याहू! वरचढ वाटले...
भारतीय जालीय व्यवहार काबीज करण्यासाठी असे सोंग अनेकांना आणावे लागतील असे वाटते,
असे असले तरीही, भारतीय संस्कृतीची दखल घेतल्याचा आनंद आहेच.
-दिलीप बिरुटे
(रोखठोक)