सध्या मिपामधे दोन विषयांवर भरपूर चर्चा वाचायला मिळाली आहे. पहिला विषय- राज ठाकरे ह्यांनी धसास लावलेला, मराठी प्रदेशात मराठी माणसांना नोकरी मिळण्यास प्राधान्य हवे हा.
दुसरा शुद्ध, अशुद्ध भाषेचा.
ह्या दोन्ही विषयांना जोडणारी एक बातमी इ सकाळवर वाचली. कर्नाटकात, मराठीपळ्या आणि कोननकल्ल गावात १७९७ सालापासून स्थायीक झालेली मराठी कुटूंबे. २०० वर्षे जुना बाज असलेली भाषा तिथे अजूनही वापरली जाते.
मराठीपळ्यात १००% मराठी लोकसंख्या आहे. महाराष्ट्राबाहेर शेकडो वर्षे राहून मराठी भाषा आणि संस्कृतीचे वर्षानुवर्षे जतन करणाऱ्यांना मात्र कधीही रस्त्यावर उतरावे लागलेले नाही.
महाराष्ट्राबाहेर 'मराठीयत' मूळ स्वरुपात जपण्याचे हे उदाहरण
http://www.esakal.com/esakal/10262008/SpecialnewsA0077EAFD8.htm
इथे वाचायला मिळेल. शुद्ध, अशुद्ध कशाला म्हणावे? महाराष्टात 'बाहेरून' आलेल्यांचे 'हक्क' काय असावेत ह्या प्रश्नांचा विचार करतांना मराठीपळ्या गावासारखे समाज काय शिकवतात इकडेही लक्ष द्यायला हवे.
प्रतिक्रिया
26 Oct 2008 - 8:40 am | विसोबा खेचर
महाराष्ट्राबाहेर शेकडो वर्षे राहून मराठी भाषा आणि संस्कृतीचे वर्षानुवर्षे जतन करणाऱ्यांना मात्र कधीही रस्त्यावर उतरावे लागलेले नाही.
कारण तिथे यूपी-बिहारचे भैय्ये अमर्याद संख्येत पोहोचले नसतील! असो..!