यातना

सहज's picture
सहज in जे न देखे रवी...
14 Dec 2007 - 9:08 am

कळतील कुणा यातना

होतात आमच्या मना

मुक्त स्वांतत्र्याचा बहाणा

का तर मिळावा रोज घालाया धिंगाणा

साहीत्य निर्मीतीस कोण पुसेना

पण नवसदस्य नावाच्या हुशार कल्पना

पंचायत-मालक कोण कूठे समजेना

कोणाच्या खांद्यावरून कोण साधे निशाणा

शत्रुस अनासाये मिळे कराया ठणाणा

लेखन-वाचनाचा आनंद मिळेना

साहित्यप्रेमाच्या मोठ्या वल्गना

माय मराठी काय म्हणेल

कोणास नाही याची तमा

हे ठिकाणधोरणमांडणीवावरमुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

सर्किट's picture

14 Dec 2007 - 9:14 am | सर्किट (not verified)

माय मराठी काय म्हणेल

कोणास नाही याची तमा

माय मराठी ची आणि ला कुणालाही तमा असण्याचे किंवा खेद असण्याचे कारण मला तरी दिसत नाही !

कुणी कुणाचे पासवर्ड (शुद्ध मराठीत) चोरणे, ह्याचे माय मराठी ला काय घेणे देणे ?

माय मराठीला ह्या चोरांना आपली मुले म्हणून नाकारणे हेच योग्य ठरेल.

(आपली चोरी माय मराठीच्य नावावर कुणीतरी खपवतील, हे नक्कीच ! माय मराठीच्य नावावर आपले गुन्हे आजवर आचार्य अत्र्यांपासून ते शक्तिवेलूंपर्यंत सर्वांनी खपवले आहेत.)

- सर्किट

गुंडोपंत's picture

14 Dec 2007 - 9:21 am | गुंडोपंत

वा! भारी कविता केलीत सहजराव!

मुक्त स्वांतत्र्याचा बहाणा

का तर मिळावा रोज घालाया धिंगाणा

साहीत्य निर्मीतीस कोण पुसेना

पण नवसदस्य नावाच्या हुशार कल्पना

हे विषेश आवडले.
यमकात बोलायचे तर;

" 'इतर सगळ्या' सदस्यांची हीच खंत
असे काही खास सदस्यांचा हाच आनंद "

आपला
या सार्‍याला वैतागलेला
गुंडोपंत

ऋषिकेश's picture

14 Dec 2007 - 9:26 am | ऋषिकेश

वा ! कविता आवडली.. फर्मास आहे :)

>>माय मराठी काय म्हणेल
>>कोणास नाही याची तमा

हे तर ध्रुपद व्हावे असे आहे ;).. आणि सत्यतेमुळे अढळ ध्रुवपद :))

-ऋषिकेश

जुना अभिजित's picture

14 Dec 2007 - 9:27 am | जुना अभिजित

सहजरावांची सहज कविता...सहमत आहे.

आनंदी रहा. आनंद इकडून मिळत नसेल तर दुसरीकडून मिळवा. चांगलं लिहिणारे दूर जात आहेत. या गदारोळात नक्की कुठं आणि कुणासाठी लिहायचं हे त्यांना समजेनासं झालंय. तसा मी खुप लहान आहे तुम्हाला सल्ला द्यायला पण लहान तोंडी मोठा घास म्हणून सोडून द्या. आपल्याला आवडतात तेच लेख वाचणे, चर्चा करणे आणि प्रतिसाद देणे. तेव्हा नको त्या गोष्टी मनाला लावून घेऊ नका. लोड नाही घ्यायचा.

ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

प्रमोद देव's picture

14 Dec 2007 - 9:31 am | प्रमोद देव

सहजराव अगदी तुमच्या नावाप्रमाणेच अतिशय सहजतेने तुम्ही इथल्या परिस्थितीबद्दलची खंत व्यक्त केलेली आहे.
कविता आवडलीच पण अशी कविता तुम्हाला करावी लागली हे काही चांगले झालेले नाही.
म्हणूनच म्हणतो की लवकरात लवकर इथले वातावरण शुद्ध होऊन इथल्या कवींना/लेखकांना चांगल्या कल्पना सूचून त्यावरील छान छान कविता/लेख आमच्यासारख्या वाचकांना वाचायला मिळोत अशी सदिच्छा व्यक्त करतो.

राजीव अनंत भिडे's picture

14 Dec 2007 - 9:33 am | राजीव अनंत भिडे

झकास कविता!

>>शत्रुस अनासाये मिळे कराया ठणाणा<<

शत्रू कोण? आणि कुणाचे? तात्याचे की मिसळपावचे? ;)))

अर्थात, शत्रू कुणीही असले तरी त्यांची फार चिंता नको. तात्या त्यांना एक हाती सांभाळू शकेल असे वाटते!

अजानुकर्णांचा,

>>माझ्या माहितीप्रमाणे पंचायत समितीच्या इतर सदस्यांपैकी नीलकांत सध्या एकूणच आंतरजालावर नाही. विकास व कोलबेर गेले काही दिवस मिसळपावावर दिसलेले नाहीत. मी स्वतः हे लेखन उडवलेले नाही.

सदर लेखन उडवण्यामागे पाकिस्तान, आयएसआय वगैरे परकीय शक्तींचा हात असण्याची शक्यताही नाही. मात्र संपादकीय मंडळाबाहेरील व्यक्तींचा यात हस्तक्षेप असण्याची शक्यता आहे.

उपरोल्लिखित सदस्यांव्यतिरिक्त आणखी कोणी संपादक मंडळावर आहे का?<<

हा प्रतिसाद पाहिल्यास शत्रू कोण याची कल्पना येते. ज्या तात्याने या माणसाला मोठ्या विश्वासाने (किंबहुना आंधळेपणाने!) काळजीवाहू संपादक नेमले, तसेच इतरही चार पंचायत सदस्यांची नांवे जाहीर करून त्यांच्या हाती संपादनाचे सर्व अधिकार देऊन तात्या मोकळा झाला, त्या माणसाने मानभावीपणाने,

उपरोल्लिखित सदस्यांव्यतिरिक्त आणखी कोणी संपादक मंडळावर आहे का?

असा प्रश्न विचारणे यावरून शत्रू कोण? आणि असलेच तर ते अंतर्गत शत्रूच असावेत याची सहज कल्पना येते, यावी! ;))))

अर्थात, मिसळपावला अश्या पेल्यातल्या वादळांचं काही नाही कारण एका वादळी व्यक्तिमत्वानेच हे संकेतस्थळ सुरू केले आहे!

राजीव अनंत भिडे,
हिंदु कॉलनी, मुंबई.

सर्किट's picture

14 Dec 2007 - 9:40 am | सर्किट (not verified)

हा प्रतिसाद पाहिल्यास शत्रू कोण याची कल्पना येते.

आपल्या शत्रूंची पूर्ण कल्पना नसणे हे आपल्याशीच शत्रुत्व आहे.

संपदकमंडळांशी उगाच युद्ध पुकारताहात तुम्ही.

त्या आधी. जरा महाजालाचा वेध घ्या.

- सर्किट

सहज's picture

14 Dec 2007 - 9:41 am | सहज

भिडेसाहेब शब्दाला शब्द फूटतात, थांबवायचेय का वाढवायचेय?

मिसळपाव हे तुम्हाला वाटते तसे मोठे संकेतस्थळ व्हावे ह्या इच्छेने प्रयत्न व्हावेत. तुम्ही म्हणता तसे "संवाद" चालू ठेवले तर हे वादळ-पेला करत "एकच प्याला" उरेल. कृपया लक्षात घ्या.

अवांतर - हायकोर्टातले वकील भिडे आपणच का? :-)

आजानुकर्ण's picture

14 Dec 2007 - 9:45 am | आजानुकर्ण

तात्या व माझे वैयक्तिक मैत्रीपूर्ण संबंध अशा घटनेनंतर चांगलेच राहतील.

याआधी झालेले संपादन हे पूर्ण विचारांती झालेले होते. मी याआधीही स्पष्ट केले आहे की पंचायत समितीच्या कोणत्याही कार्याची जबाबदारी एक सदस्य म्हणून माझीही आहे. दुसर्‍यांच्या अवधानाने/अनवधानाने झालेल्या कृत्यामुळे पंचायत समिती व मंडळातील सदस्यांची विश्वासार्हता पणाला लागत असेल तर त्याविरुद्ध आवाज उठवणे हे शत्रुत्व घेणे असा विचार असल्यास त्याकडे दुर्लक्ष करणे मला हितावह वाटते.

संपादन मंडळ म्हणजे मालकाची मर्जी सांभाळणे हे (मालकांना नसले तरी) येथील सदस्यांना जर अभिप्रेत असेल तर ते मला शक्य नाही. लोकशाहीत मला तो अधिकार असावा.

सर्किट's picture

14 Dec 2007 - 9:50 am | सर्किट (not verified)

तात्या व माझे वैयक्तिक मैत्रीपूर्ण संबंध अशा घटनेनंतर चांगलेच राहतील

माझे ही !

संपादन मंडळ म्हणजे मालकाची मर्जी सांभाळणे हे (मालकांना नसले तरी) येथील सदस्यांना जर अभिप्रेत असेल तर ते मला शक्य नाही. लोकशाहीत मला तो अधिकार असावा.

माझ्या "निवडणूक आयुक्त" ह्या अधिकाराविषयीदेखील मला असेच म्हणायचे आहे.

- (तात्याकडून खुलाश्याच्या अपेक्षेत) सर्किट

चित्रा's picture

14 Dec 2007 - 10:22 am | चित्रा

सहजराव,
तुमची कविता चांगली आहे. बर्‍याच लोकांच्या भावना व्यक्त करते असे वाटले.

याच संदर्भात एक सामान्य वाचक म्हणून माझेही मत द्यावेसे वाटले. कोणाला त्याची काही पर्वा आहे असे वाटत नाही, पण सांगितले नाही तर लोकशाहीतील अधिकार/कर्तव्य बजावले नाही असे म्हणावे लागेल.

मला हे जे अनेक दिवस चालले आहे ते सर्व पाहून कंटाळा आला आहे. इथे वाचायला येते मी - सर्वांना आता ओळखतेही, आणि सवय झाली आहे म्हणून आपोआप हातून हे पान उघडले जाते - पण सततची भांडणेही बघवत नाहीत. हे असेच चालू राहिले तर तेही येणे बंद होईल. (ही धमकी वगैरे नाही, कृपया असे समजू नये. पण नेहमी येणार्‍या व्यक्तींचेही असे होत असेल तर नव्यांचे काय? या नव्या आणि काही एक होऊ इच्छिणार्‍या संकेतस्थळाची अशी वाताहात होऊ नये अशी मनापासून इच्छा आहे).

सर्किट's picture

14 Dec 2007 - 10:27 am | सर्किट (not verified)

सहमत आहे...

माझ्याने येणे बंद होणार नाही, पण लिहिणे मात्र नक्कीच बंद होईल..

आणि हो, ही धमकीच समजावी !

ह्या संकेतस्थळाकडून माझ्या खूपच अपेक्षा आहेत. इथल्या संपादकीय धोरणांइतकी पारदर्शक धोरणे इतर कुठल्याही संकेतस्थळाची नाहीत, म्हणून.

हल्ली घडलेल्या घडामोडींमुळे संपादकमंडळाच्या पारदर्शकतेवर डाग पडलाय, हे कबूल व्हावे.

हा डाग स्वच्छ व्हावा, हीच मनापासून इच्छा !

- सर्किट

बेसनलाडू's picture

14 Dec 2007 - 10:30 am | बेसनलाडू

नव्यांचे काय? या नव्या आणि काही एक होऊ इच्छिणार्‍या संकेतस्थळाची अशी वाताहात होऊ नये अशी मनापासून इच्छा आहे.
--- सहमत आहे. याबाबतीत तात्यांशी बोलणे झाले आहे माझे मागे एकदा व्य नि तून. तो व्य. नि आणि त्याला तात्यांचे उत्तर आणि नवीन सदस्यांचे काय होत असेल, या प्रश्नाला तात्यांचे उत्तर येथे वाचता येईल.
सहजराव, तुमच्या कवितेतील प्रश्नांची उत्तरेही त्याच दुव्यावर मिळतील, असे मला वाटते. तुमची आणि इतर सदस्यांचीही व्यथा अगदी समर्पकपणे, समयोचितपणे मोजक्या शब्दांत मांडलीत, याबद्दल तुमचे कौतुक वाटते.
(दुवादार)बेसनलाडू

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Dec 2007 - 8:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहजराव,
कविता आवडली.

कळतील कुणा यातना
होतात आमच्या मना
मुक्त स्वांतत्र्याचा बहाणा

आणि

का तर मिळावा रोज घालाया धिंगाणा.

कवीच्या या भावना अनेकांच्या आहेत.

कोणाच्या खांद्यावरून कोण साधे निशाणा

तेच तर काय कळत नाही ना, सहजराव.......!

लेखन-वाचनाचा आनंद मिळेना
माय मराठी काय म्हणेल
कोणास नाही याची तमा

माय मराठीचा विचार करणारे, जोपर्यंत आपल्यासारखे सदस्य लिहीताहेत तो पर्यंत काही आनंद आणि काही यातना सर्वांनीच सोसाव्यात, सहजराव !
बाकी अशाच 'सहज' सोप्या कविता येऊ द्या !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

उग्रसेन's picture

16 Dec 2007 - 12:32 am | उग्रसेन

काय सहजभाऊ
हाय का वळख,
हीकडं येऊन कइता करु राह्यले का भो
लय झक्कास लिव्हा लागले इकडं येऊन :)

प्राजु's picture

16 Dec 2007 - 9:37 am | प्राजु

मानले तुम्हाला..

मिसळपावच्या सगळ्याच हितचिंतकांच्या मनातले विचार आहेत हे. चित्राने सांगितल्याप्रमाणे कदाचित चांगल्या लेखकांचेच काय पण वाचकांचेही इथे येणे बंद होईल.
हे थांबायला हवे.

प्राजु. (मिसळपावची नियमित वाचक.)

विजय पाटील's picture

18 Dec 2007 - 1:42 pm | विजय पाटील

मिसळपावच्या सगळ्याच हितचिंतकांच्या मनातले विचार आहेत हे. चित्राने सांगितल्याप्रमाणे कदाचित चांगल्या लेखकांचेच काय पण वाचकांचेही इथे येणे बंद होईल.
हे थांबायला हवे.

मीही सहमत
विजय