त्रिवेणीचा प्रयत्न :
आज कधी नव्हे ते मला खरंच
यशाची किल्ली मिळाली आहे..
अरे! कुलुपच बदललं कोणीतरी !
******************************
यशाकडे जाणारा मार्ग
दिसत असतो...पण नेहमीच
अंडर कन्स्ट्रकशन असतो..
- प्राजु
(कुठेतरी इंग्रजीमध्ये वाचलेल्या विचारांना त्रिवेणीचं रूप देण्याचा प्रयत्न केला आहे.)
प्रतिक्रिया
19 Oct 2008 - 8:43 am | चन्द्रशेखर गोखले
छान्!सुंदर सुबक वेणी! !
19 Oct 2008 - 9:20 am | अरुण मनोहर
अरे! कुलुपच बदललं कोणीतरी !
कीती खरय हे नेहमीच्या जीवनांत!
19 Oct 2008 - 11:09 am | दत्ता काळे
अरे! कुलुपच बदललं कोणीतरी !
कुलुप=हल्लीची जीवनमूल्ये.
फार छान!
19 Oct 2008 - 11:47 am | बेसनलाडू
जास्त आवडली.
(आस्वादक)बेसनलाडू
19 Oct 2008 - 12:09 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मस्तच प्राजु.
19 Oct 2008 - 12:17 pm | मनिष
मस्त प्रयत्न!!!
माझाही एक प्रयत्न -
कायद्याचा बडगा, सर्वसामान्यांसाठी,
कायद्यातील पळवाटा, धनदांडग्यांसाठी;
माझा न्यायसंस्थेवर पुर्ण विश्वास आहे!!!
21 Oct 2008 - 10:47 am | आनंदयात्री
पाच खुन,दोन बलात्कार अन एक प्रकरणही आहे,
माझा न्यायसंस्थेवर पुर्ण विश्वास आहे.
टेंशन नाय .. !! साला आपल्याकडे पोत्यांनी पैसा आहे !!!
19 Oct 2008 - 4:02 pm | विसोबा खेचर
प्राजू,
वेण्या-त्रिवेण्या छान! :)
औरभी आने दो...
तात्या.
19 Oct 2008 - 7:15 pm | बिपिन कार्यकर्ते
आयला... हा त्रिवेणी प्रकार मस्तच आहे. प्राजु,तू लिहिल्यापण आहेस छान.
पहिली खासच...
आज कधी नव्हे ते मला खरंच
यशाची किल्ली मिळाली आहे..
अरे! कुलुपच बदललं कोणीतरी !
मराठीत याला पोपट होणं म्हणतात. :)
यशकडे जाणारा मार्ग
दिसत असतो...पण नेहमीच
अंडर कन्स्ट्रकशन असतो..
खूप त्रासदायक सत्य आहे हे. :(
बिपिन कार्यकर्ते
19 Oct 2008 - 9:16 pm | प्राजु
सर्वांचे मनापासून धन्यवाद.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
20 Oct 2008 - 11:58 pm | चतुरंग
आमचीही एक तिपेडी -
काल बॉबकट शांपू करताना आठवलं
की पूर्वी घालत असे मी दोन दोन वेण्या
आजकाल पर्सिस खंबाटा ही लेटेस्ट फॅशन आहे म्हणतात! ;)
(खुद के साथ बातां : प्रतिसादांची घुसखोरी केल्याशिवाय लोकांच्या समोर येता येत नाही आजकाल! ;)
चतुरंग
21 Oct 2008 - 10:17 am | आनंदयात्री
शांपुच्या जाहिरातीत सळसळणारे केस
दाखवत उसळणारा मिश्टर ब्युटिफुल हेअर !!
बायकोचा कुत्सित कटाक्ष खुप काही सांगुन जातो ;)
20 Oct 2008 - 7:23 am | सहज
त्रिवेणी काव्यप्रकार पसंत आहे. एकदम आवडलाय.
आता त्रिवेणी आल्यावर विद्रोही त्रिवेणी देखील आली पाहीजे ना, त्यातुन त्रिवेणी स्वगत. कृ. ह. घ्या.
च्या** आले का *&^% कविलोक परत
बरोबर् आहे फुकटात वाचक मिळाले *&&^%
पण *&^% तू कशाला हे पान उघडतो
20 Oct 2008 - 8:07 am | प्राजु
हाहाहा..
सॉल्लिड...!! धन्य आहे तुमची. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
20 Oct 2008 - 11:36 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
सहजराव, तुम्हीपण कवी झालात की हो त्रिवेण्या वाचून!
=))
20 Oct 2008 - 11:42 am | बिपिन कार्यकर्ते
सहजानंद स्वामी महाराज की जय...
__||__
बिपिन कार्यकर्ते
20 Oct 2008 - 4:01 pm | विजुभाऊ
एक जपानी हायकू
फुलावरून फुलपाखरु उडाले
हलक्याने त्याने पंख पसरले
पाकळ्यांना जाग आली नाही
20 Oct 2008 - 4:09 pm | आनंदयात्री
हायकुच्या नियमात बसत नाही.
20 Oct 2008 - 4:21 pm | विजुभाऊ
हायकुच्या नियमात बसत नाही.
नाहीच
किरकीरो कुरोसावा आणि तनाका फुसुची यांच्या हायकु :एक कायकु प्रकार. या विष्लेष्णत्मक ग्रंथात हायकु च्या सर्व वृत्तांचा सारासार विचार करण्यात आलेला आहे.
त्ल्ब्यार दॉल्फीयॉ या फ्रेंच कवीने फ्रेंच हायकू यावर" क्वार्त्र ल्बासु "हा संदर्भ ग्रन्थ लिहिला आहे त्यात असलेल्या नियमात हे हायकू व्यवस्थित बसत आहे.
रक्झान्द याझ्दीर या इराणी कवीने हायकु लिहिताना "अल हायर्कु नक्स" या ग्रन्थात हादीस मध्ये उल्लेखलेल्या हायकुंवर आधारीत "आयत" प्रमाणे हायकू लिहिले आहेत.
कृपया त्यांचा आपन अभ्यास करावा ही विनन्ती
तरीदेखिल आपल्याला काही नवे नियम सापडले असल्यास येथेच मांडावे. ( कृपया लिन्क देउ नये)
20 Oct 2008 - 7:37 am | गणा मास्तर
'सहज'ने सहजसहज खुप भारी लिहिले आहे
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)
20 Oct 2008 - 11:15 am | विजुभाऊ
विद्रोही वेण्या
मी एकटाच भुंकत होतो.
पेकाटात काठी बसली
माझी साथ संगत हरवली
अजून एक
येथे भुंकु नका कोणी
येथे थुंकु नका कोणी
वाळत घातली आहेत जुनी धुणी
कोण येथे एकटा मरेल
कोण येथे एकटा तरेल
कंपूच तारेल ज्याला त्याला.
20 Oct 2008 - 2:11 pm | छोटा डॉन
विद्रोही विड्या
मी एकटाच फुंकत बसलो होतो.
पेकाटात काठी बसली
माझी विडी हातातुन पडुन वाया गेली
अजून एक
येथे फुंकु नका कोणी
येथे खोकु नका कोणी
आजकाल सरकार बंदी आणली आहे फुंकण्यावरी
कोण येथे एकटा फुंकुन मरेल
कोण येथे एकटा फुंकुन तरेल
फुकाड कंपूच तारेल ज्याला त्याला.
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
20 Oct 2008 - 2:24 pm | आनंदयात्री
लै भारी !!
=))
20 Oct 2008 - 11:50 am | आनंदयात्री
पहिली त्रिवेणी त्या ग्राफिटी सारखी वाटली.
च्या** आले का *&^% कविलोक परत
बरोबर् आहे फुकटात वाचक मिळाले *&&^%
पण *&^% तू कशाला हे पान उघडतो
अस्से का ??
हे घ्या .. एक पे एक फ्री !!
१.
शब्दांची ओढाताण, भावनांची घालमेल
मनापासुन फुलवलेली सुरेखशी काव्यवेल
बेडकाचा जिव घेणार दगड टाकला होता पाण्यात त्याने सहजच !!
२.
नवा आहे काव्यप्रकार त्रिवेणीचा
नाही याला जाच हायकुचा
विडंबनांपासुन कोणी वाचले आहे का ?
20 Oct 2008 - 11:59 am | बेसनलाडू
नवा आहे काव्यप्रकार त्रिवेणीचा
नाही याला जाच हायकुचा
विडंबनांपासुन कोणी वाचले आहे का ?
हसून हसून पडलो कोचावरून! ब्येष्ट!
(हसरा)बेसनलाडू
20 Oct 2008 - 2:29 pm | छोटा डॉन
नवा आहे काव्यप्रकार त्रिवेणीचा
पण डोक्याला शॉट्ट आहेच विडंबकांचा
आमच्यासारख्या उत्साही विडंबकांपासुन कोणी वाचले आहे का ?
(उत्साही विडंबक)छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
20 Oct 2008 - 2:39 pm | आनंदयात्री
म्हणे उत्साही स्वतःला, स्वयंघोषित आणी एक
हरवुन गेले तुंग्रुस, झुंडित आज कैक
विडंबनांवर एवढी वाईट वेळ आलिये ?
20 Oct 2008 - 11:58 am | विजुभाऊ
विडम्बनापासुन आम्ही वाचलो आहोत सारे
काहीच ल्हिले नाही ; लिहुन आम्ही काही
कधीच दिल्हे नाही आवाहन; मारण्यास माझी या रे
20 Oct 2008 - 12:02 pm | आनंदयात्री
त्या सोवळ्या कविंची फेडलीच लाज सारी
त्या तिथेच शोधित होती, खाद्य झुंड सारी
त्यांना विजुभाउ दिसलेच नाहित ??
20 Oct 2008 - 12:13 pm | विजुभाऊ
फेडून लाज आज ; मुक्त मी झालो
नेसूची फेकुन लक्तरे ; वार्यासवे निघालो
आता फिकीर कसली ; सोयरेच ;सारे शत्रु झाले होते
20 Oct 2008 - 12:19 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
आता फिकीर कसली ; सोयरेच ;सारे शत्रु झाले होते
हे वाक्य हजार विरोधकांना अंगाखांद्यावर बाळगणार्या आंद्या हलकट्ट उर्फ अँडी स्काऊंड्रलच्या तोंडी जास्त शोभेल!
अवांतरः तुम्ही लोकांनी (सहज, आंद्या, इजाभौ) जामच मज्जा आणली आहे.
कविता वाचायला माझी काही हरकत नसते जेव्हा तिचा अर्थ समजतो
कवितेचं सार्थक तेव्हाच होतं जेव्हा कोणी तिचं विडंबन टाकतो
स्वगतःपण तुला मेले काहीच येत नाही ना, तेव्हा गप गुमान हसत रहा!
20 Oct 2008 - 12:20 pm | आनंदयात्री
मज मित्र नाही कोणी, नाही सख्याही येथे
मी फाडितोही कपडे, मग्रुर अंतरवस्त्रे !!
पाठीत खंजिर खुपसतांना विचार केला होता का ?
20 Oct 2008 - 1:18 pm | छोटा डॉन
अहो पाठीत खंजीर खुपसण्याची रीतच पुरानी
ही गोष्टी इतिहास घडवणारी
कधी मनोगती, कधी मिपाकरी तर कधी लोकायती ...
( सर्वजण कॄपया ह घ्याच. उद्देश फक्त विनोद आहे )
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
20 Oct 2008 - 2:07 pm | आनंदयात्री
अहो हलकेच घ्या म्हणन्याची रीतच पुरानी
आताच्या गोष्टी इतिहास बदलवणार्या
क्काय ..? .. !! तुम्ही संकेतस्थळांबद्दल बोलताय ?
20 Oct 2008 - 12:24 pm | विजुभाऊ
मग्रुर अंतरवस्त्रे !! =)) भलतेच टोचतय
ये तो बडा टॉइंग है....
आवांतरः कपड्यातला साबण नीट काढुन टाकला की कपडे वाळवल्या वर टोचत नाहीत
20 Oct 2008 - 12:32 pm | विजुभाऊ
पाठीत खुपसला खंजीर माझ्या कोणी
काय खुपसु तेथे आता विचारतो मज कोणी
म्हणणे त्यास एकच ; पसर त्यावर मिठाच्या गोणी
( किंवा ; नको लावु आणिबाणी)
20 Oct 2008 - 12:36 pm | आनंदयात्री
काढु नका ती नावे
मागताल फक्त पाणी
तुमचे टमरेल गळके तर नाही ना ??
20 Oct 2008 - 12:41 pm | विजुभाऊ
वागयुद्ध खेळण्याची खुमखुमी कशाला?
आम्हा नाही फिकीर कोण जिंकेल कोण मरेल
ऐकुनी प्रश्न " कोण मरेल ?" शब्द येती तुमच्या ओठी ..टमरेल टमरेल टमरेल
20 Oct 2008 - 2:45 pm | छोटा डॉन
"कोण मरेल ? कोण तरेल? " अशा प्रश्नार्थक वागयुद्धांची खुमखुमी कशाला ?
डार्वीन सांगुन गेला जो आहे "फिटेस्ट" तो जगेल आणि "कमजोर" मरेल ...
पण आमचे " काळजी नको, एवढ्या लवकर काही मरत नाही" हे ऐकुन बरेच जण धावले घेऊन ....टमरेल टमरेल टमरेल
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
20 Oct 2008 - 2:40 pm | मनिष
=)) =)) =))
अशक्य आहेत पोरं आपल्याकडची, आणि विजुभाऊंच्या सर्वस्पर्शी प्रतिभेपुढे तर आपण हात जोडले (जोडले म्हणलं, टेकले नाही ;))....
हसून, हसून पोट दुखते आहे.
20 Oct 2008 - 2:41 pm | आनंदयात्री
>>, आणि विजुभाऊंच्या सर्वस्पर्शी प्रतिभेपुढे तर आपन हात जोडले (जोडले म्हणलं, टेकले नाही Wink
चामायला विजुभाउंची ती प्रतिभा आमची ती टुकारी ?? हे बरयं ..
20 Oct 2008 - 2:44 pm | छोटा डॉन
आयला विजुभाऊंची आहे ती सर्वस्पर्शी प्रतिभेची तयारी ...
मग आंद्याने " आमची काय टुकारी" म्हणुन कुठे झक मारी ?
च्यायला ह्या दुनयेची रितच आहे निराळी ....
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
20 Oct 2008 - 2:44 pm | मनिष
तुमची बी प्रतिभा लय भारी...आता तर राष्ट्र्पती झाली!!! :)
20 Oct 2008 - 2:49 pm | आनंदयात्री
मायला आमची प्रतिभा राष्ट्रपती अन त्यांची काय मदर टेरेसा ??
20 Oct 2008 - 2:57 pm | मनिष
मदर टेरेस वर नाही झोपू देत आजकाल!!! ;)
=) मनिष
(खुद के साथ बातां - मनिष आता पुरे रे आचाटपणा, नाहीतर लोक्स वाढदिवसाच्या शुभेच्छा देतील, नाहीतर 'आता पुर्णम करीष्ये' म्हणतील ;))
20 Oct 2008 - 3:04 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
टेरेसवर जाऊन समोरच्या पोरींकडे बघून शिट्या मारायच्या
घरी असताना सरळ, सभ्य असण्याच्या बाता करायच्या
साला आजकाल मदरनी शिस्त लावली तर पोरं वाढदिवसाच्या शुभेच्छांना घाबरतात.
20 Oct 2008 - 3:14 pm | मनिष
अवो पोरींना सुदरवा की जरा...टेरेस वर गेलो की त्याच शिट्ट्या मारतात...लायटि बंद-चालू काय करत्यात....घरी बाप-भाई न्हाय का मेल्यांना!!! =))
त्यांची मदर काय शिस्त लावत नाय म्ह्णून तर हाय...
20 Oct 2008 - 3:15 pm | अवलिया
करुन भागलेल्या आजीबैंनी शिस्तीचा बडगा उगारायचा
रात्री पडल्यापडल्या आठवणींचा फुलोरा फुलवायचा
आमच्याकाळी असे असते तर मी आज पणजी असते म्हणून स्फुंदायचे
20 Oct 2008 - 3:18 pm | मनिष
=)) =)) =))
छे!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! नाना - अफलातुन!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
20 Oct 2008 - 3:04 pm | विद्य।धर बिवरे
जेव्हा आपल्याला यशाची किल्ली सापडते, तेव्हा कोणी कर॑टे कुलूपच बदलतात .ते॑व्हा दरवाजा फोडायला शिका.
20 Oct 2008 - 3:11 pm | विजुभाऊ
रात्र होती ती स्वप्नांची जरी
तू नव्हतीस त्यात परी
मी शोधुन थकलो घरोघरी
20 Oct 2008 - 3:14 pm | बिपिन कार्यकर्ते
आयला... परी आलीच का? विजुभाऊ, हे तुम्ही दुसर्याच कोणाच्या मनातलं तर नाही लिहिलं? ;)
बिपिन कार्यकर्ते
20 Oct 2008 - 3:17 pm | अवलिया
विजुभावुंची त्रिवेणी जरतारी
न येता त्यात ती स्वरुपपरी
आहे मनोहर तरी...
20 Oct 2008 - 3:17 pm | आनंदयात्री
=))
(काय किडा हाये बॉ या माणसाच्या *डीत !! ..!! :O )
स्वप्न पाहुन फुटला घाम
मजबुत चोळला होता बाम..
घरोघरी मातीच्याच चुली ;)
20 Oct 2008 - 3:19 pm | बिपिन कार्यकर्ते
कितीक शोधती परीला,
उरात घेऊन वेदनेचा भाला,
जल्लां पन ती परी कोन हाय त्ये कलंना अजून.
;)
बिपिन कार्यकर्ते
20 Oct 2008 - 3:27 pm | छोटा डॉन
आम्ही कशाला शोधु परी ?
आज मिळाली तर परी नाही तर उद्या दुसरी कोणीतरी ...
कारण तशी आमची रितच आहे करारी ...
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
20 Oct 2008 - 3:20 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
तू नव्हतीस त्यात परी
इजाभौंना परकायाप्रवेश जमला तरी
जाऊ द्या ना, त्यांना सगळं येतं मान्य केलं की बाम काय करायचाय?
20 Oct 2008 - 3:25 pm | विजुभाऊ
घरोघरी पहाता परी
बोलणी खाती कैक सखे
ऐकले उगाचच ; हेच दु:ख भलते सलते उरी
----------------------------------------
थंडीमध्ये नेसूनी बंडी
कोणी येक उभा राही
दिसता कोणी आनन्दे शहारुन(शहाळून) जाई
20 Oct 2008 - 3:29 pm | आनंदयात्री
=))
तुफ्फान !!
भाउंची प्रतिभा फळाफळा वहातेय !!
20 Oct 2008 - 4:01 pm | सखाराम_गटणे™
चोळतो मी साबण माझ्याच पाठीला,
पाहतो मी वाट विकांताची,
शनिवार शिवाय तुझी पाठ सापडेना !!!!!!!
20 Oct 2008 - 4:10 pm | अवलिया
तु़झी पाठ आज सापडली
अचानक साबणाची वडी संपली
अरे ! दहा जणींचा साबण एकीतच संपला की !!
20 Oct 2008 - 4:24 pm | सखाराम_गटणे™
संपला साबण आता,
घेतो दगड हाती सपाता,
पण नको फिरवु पाठ आता.
20 Oct 2008 - 4:27 pm | अवलिया
पाठ फिरवण्या कुणा सांगता
कूणाच्या अन कानी लागता
नच विसरा जिथे प्रवेश घेतला काल, तिथले आम्ही सरदार
20 Oct 2008 - 4:04 pm | विजुभाऊ
नाही निर्मळ मन
तेथे काय करील साबण
........तुका म्हणे
20 Oct 2008 - 4:05 pm | विजुभाऊ
पावसाचा थेंब तळ्यात पडला
पाण्यावरचा तरंग
वाढतच गेला
20 Oct 2008 - 4:07 pm | ऋचा
घरोघरी "मातीच्याच चुली"
पाहुन सिनेमा खात्री पटली
गॅस वापरा की ......
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
20 Oct 2008 - 4:10 pm | सखाराम_गटणे™
पाउस धोधो पडला,
आम्ही भिजलो,
पण परी बरोबर भाउबाहुन गेले.
20 Oct 2008 - 4:11 pm | अवलिया
परी गेली भाउ गेले
गटण्याच्या नयनी पाणी आले
बरे झाले जे झाले असे कोण रे ते तिकडे पुटपुटले
20 Oct 2008 - 4:13 pm | आनंदयात्री
तुम्हाला कसे ऐकु आले हो ? मीच बोल्लो होतो !!
20 Oct 2008 - 4:20 pm | सखाराम_गटणे™
नयनांत अडकलो मी,
नाडीत अडकला तुम्ही,
ही का तुमची तर्हा ???????
20 Oct 2008 - 4:23 pm | अवलिया
जेव्हा जे करायचे तेच मी करतो
नयन सोडुन मी नाडी सोडतो
सुखाने निवांत मी अन सुस्कारे सोडता तुम्ही ..
20 Oct 2008 - 4:30 pm | सखाराम_गटणे™
घाई आम्ही नाही करत,
फोडल्या शिवाय कलिंगड खात नाही आम्ही.
बोला आता????
20 Oct 2008 - 4:33 pm | अवलिया
तुमचे म्हणणे पाण्यात न उतरणे पोहोण्याआधी
आम्ही बोलतो पोहोणे न ये पाण्यात जाण्याआधी
मुढावस्थेतले तुम्ही अन विचारता बोला आता? सांगा काय बोलु
20 Oct 2008 - 4:37 pm | सखाराम_गटणे™
आम्ही ठेवतो मनात प्रेमभावना,
नको आम्ह्लाला नुसतीच वासना,
असु आम्ही नवीन तरी आहे आमच्या अजुन दम बराच
20 Oct 2008 - 4:44 pm | अवलिया
नुसते प्रेम न ये कामा
काम फुलवी मनाच्या प्रेमा
न जुने न नवे सगळे सारखे मदनबाणा
20 Oct 2008 - 4:44 pm | अवलिया
नुसते प्रेम न ये कामा
काम फुलवी मनाच्या प्रेमा
न जुने न नवे सगळे सारखे मदनबाणा
20 Oct 2008 - 7:42 pm | सखाराम_गटणे™
काम ही असावे प्रेमात,
पण नसावा मुख्य हेतु
नाहीतर जावे बारमध्ये.
20 Oct 2008 - 8:00 pm | अवलिया
यावेळेस तुला नाही जमली त्रिवेणी
कैरीबैग म्हणुन देतोस हातात गोणी
छया! अरे गटण्या ! अजुन अंमळ लहानच आहेस झाले!!
20 Oct 2008 - 4:24 pm | विजुभाऊ
बरे झाले जे झाले असे कोण रे ते तिकडे पुटपुटले
नाना =)) _/\_
20 Oct 2008 - 4:39 pm | विजुभाऊ
मी पावसात गेलो
भि़ऊन चिम्ब झालो
आतून बाहेरुन....