"आर..जा..र भाड्या, म्या काय लगच मरत नाय.संमद्यांना घालुन मरीण,म्या अमर हाय". केश्याच्या बाप बसल्या जागी किरकीरला.
*****************************************************************************************
.केश्याचा बाप गावचा मांत्रीक होता. आखा गाव त्याच्या कड याचा, भुत्,भानामती की सर्दी ,पडसं गाव वाल्याला मात्रींका शिवाय पर्याय नव्हता.
केश्याच्या बापाला पाच वर्षापुर्वी अंगावरन वार गेलत्,बाप बसल्या जागीच सगळ करायचा,कुणी गावातल सकुन बगायला आल की केश्याच काम असायच बापाला देवी म्होर नेऊन ठेवायच.बाप बसल्या जागी घुमायचा.
पयका बरा भेटायच पण केश्याची जिंदगी बापा भोवतीच फिरायची. केश्या याला लै वैतागला होता
"साल मरत पण नाय," केश्या एक रात्री बडबडला.
"आर..जा..र भाड्या, म्या काय लगच मरत नाय.संमद्यांना घालुन मरीण,म्या अमर हाय". केश्याच्या बाप बसल्या जागी किरकीरला.
केश्या दुसर्या सकाळी उठला, बापाची किरकीर कशी आयकु आली नाय याचा विचार करत बापाच्या तोंडावरची गोधडी बाजुला केली.
.
.
.
बाप ऑफ झालता.
.
.
.
स्वतला समोरच्या आरश्या बघुन हसणारा केश्या भेसुर दिसत होता.
.
.
.
केश्याचा बाप अमर झालता.
प्रतिक्रिया
25 Nov 2016 - 2:11 pm | किसन शिंदे
हम्म, महामृत्यूंजय मंत्र का?!
25 Nov 2016 - 2:34 pm | एस
कथा आवडली.
25 Nov 2016 - 3:59 pm | सिरुसेरि
हा हुडुचा प्रकार तर नव्हे ?
25 Nov 2016 - 5:06 pm | महासंग्राम
मस्त ए शशक आहे का ???
25 Nov 2016 - 7:26 pm | पद्मावति
मस्तच.
27 Nov 2016 - 12:19 am | ज्योति अळवणी
बापरे... मस्तच ह पण