बाप्पामुळे एकत्र आणलेली लोक मंडळांमुळे वेगळी तर झाली नाही आहेत ना ?????

सतिश२५१०'s picture
सतिश२५१० in जनातलं, मनातलं
19 Sep 2016 - 5:23 pm

लहानपणी येणाऱ्या प्रत्येक मंदिरासमोर 3 -3 वेळा नमस्कार करून जाणारा मी , देवासमोर खूप खाबरून जणू त्याला मी केलेल्या सगळ्या लहान लहान चुकांची माफी मागून पुढे जात होतो .....शाळेतून घरापर्यंत येताना लागणाऱ्या प्रत्येक मंदिरासमोरून मागंन तेच असायचं फक्त त्या मध्ये जास्त कळकळ आणायचा प्रयत्न करायचो. त्या वेळेस मंदिर तशी साधीच होती आणि आज जितकी मानस मंदिराचा बाहेर दिसतात त्या पेक्षा जास्त मानस मंदिराचा आत दिसायची ...वर्षातून एकदाच कधी तरी बाहेर स्पीकर लागायचा आणि पूर्ण भांडुप मध्ये कदाचित वर्षात एकदाच जेवण (भंडारा ) असायचा ....त्या दिवसाची वाट पाहण्यात पण मजाच होती ....

गणेशोत्सव माझा आवडीचा सण.....

भांडुपमधेही गणपती मंडळ होतीच पण ती नक्कीच हाताचा बोटावर मोजण्या इतकेच होते .....प्रत्येक गणपती साठी 2 ते 3 तासाची मोठी रांग असायची आणि त्या रांगेतून पुढे सरकताना जणू रॅशनचा दुकानावर रॉकेल मिळणार कि नाही अशीच भीती असायची .फरक इतकाच होता कि रॅशनचा दुकानावर आईने जबरदस्तीने पाठवलेलं असायचं आणि गणपतीचा लाईन मध्ये मित्रांसोबत स्वतःहून जायचं असायचं .....
पण इतक्या कष्टानंतर जेव्हा त्या मंडपा मध्ये एन्ट्री मिळायची त्या वेळेचा आनंद वेगळाच असायचा .....घरात TV होती पण cable नव्हती त्या मुळे ते देखावे जणू एक मोठ्या स्क्रीन वर लावलेला picture वाटायचं ....आणि बाहेर पडताना ते चलचित्र काहीतरी एक सामाजिक संदेश देऊन जात होता हे लक्षात येत होत ....त्याचा माजा मनावर नक्कीच खूप मोठा परिणाम होत होता .....कारण गोष्टी वाचण्यापेक्षा

त्या प्रत्यक्ष कशा घडल्या असतील याला पाहण्यात जास्त मजा यायची ....

त्या वेळेस भांडुप ची लोक गणपती दर्शन साठी भांडुप चा बाहेर कधी जातच नसतील असा माजा तरी समज आहे .... कारण खेतवाडीचे गणपती आम्ही फक्त नवाकाळ मध्ये बगायचो .....कारण त्या वेळेस देखावे मंडपाचा आत मध्ये असायचे आणि बाहेरून सगळे मंडप खूप साधे आणि सारखे दिसायचे ....त्या मुळे आत मध्ये काय आहे याच औत्सुक्य कायम असायचं . ...मोबाईल नसल्यामुळे त्यांचे विडिओ हि शक्य नव्हते त्या मुळे प्रत्येकाला ते जाऊन पाहून भाग होत ....नऊ दिवसातले कमीत कमी 3 दिवस तरी आम्ही बाहेर पडायचंचोच .....अर्थात सगळं वेळ गणपती साठी बाहेर असायचो असाही नाही .....पण मनात घरचांची भीती नेहमी असायची ....आणि ती होती मनून बराच .....ओळखीवर गणपती पाहता येईल असं सांगून भरपूर सारे प्रयत्न करायचो पण त्याचा फायदा खूपच कमी व्हायचा ....आणि त्या चक्कर मध्ये कित्यके वेळा परत लाईन लावायला लागायची .

हल्ली बाहेर फिरताना बघतो कि गणपतीला लाईन तर दिसतच नाहीत आणि मंडपाचा आत मधली चलचित्र पण कुठे तरी विलुप्त झालेली आहेत .कदाचित मंडळांनी त्याचा खर्च कमी करून तो गणपती विसर्जनाचा दिवशी असणारा DJ वाल्याला दिला असेल ....नाहीतरी त्या देखवायसाठी लागणारी मेहनत आणि स्किल आता राहिलेत तरी कुठे ....

नाहीतरी लहानपणी मी कोणता सार्वजनिक गणपती आणताना नाही पाहिला,गणपती नेहमी खूप रात्रीचा वेळेस कोणताही आवाज न करता आणायचे पण आता बाप्पाना पण ट्रॅफिक मध्ये आणला जात ....असं मुद्दामून केलं जात कि आपल्यासारखे कामावरून आल्या नंतर बाप्पा आणायला जातात हे नक्की नाही ठाऊक ....पण बाप्पा पण त्या ट्रॅफिक मध्ये कंटाळत असतील हे नक्कीच .....
बाप्पा आणताना आम्ही आनंद व्यक्त करतो मनून आवाज करतो हे जर भावनिक दृष्ट्या पटत असेल तर मग बाप्पा जाताना पण त्यावरून डबल आवाज करून त्याला त्या खाऱ्या आणि पूर्ण खराब झालेल्या समुद्रात विसर्जन करताना आनंद कसा व्यक्त होऊ शकतो .....

अगदी लहान असताना राजा हा शब्द मी गणपतीचा पुढे लावलेला कधी एकला नव्हता पण आता प्रत्येक गल्लीत एक राजा आणि प्र्यत्येकां नगरात एक महाराजा दिसतो ....मनाला खूप त्रास होतो जेव्हा या जगाचा राजाला लोक गल्लीतला राजा बनवून ठेवतात ...

तसेही आपले 33 कोटी देव आणि त्यात पण प्रत्येक देवाला आपण इतक्या प्रकारे वाटतो .....आजही इतके लोक 2 वेळचा जेवणासाठी जीवन मरणाचा संघर्ष करतायत त्यांच्यासाठी काम करणाऱ्या इतक्या संघटनाही नाहीत जितके मुंबई मंडळ आहेत.....आणि याच मुंबईत त्याच वेळेस आपण ऑनलाईन अभिषेक बुक करतोय .....देशातली गरिबी आणि देववावर खर्च केलेला पैसे यावर खूप काही बोलता येईल पण आज तो विषय नव्हेच ...
जेव्हा शतकऱ्याला 12 तास लाईट मिळत नाही तेव्हा आपण 12 तास रोषणाई करून ठेवतो ....मनात अशी शंका निर्माण होते कि सार्वजनिक सन मोठे होत चालले आहेत आणि घराघरात होणारे सन कुठे तरी संपत चालले आहेत.....पण हे पण इतकंच खरं आहे कि गेल्या काही वर्षांपासून घरघुती गणपती मध्ये एक साकारातमक बदल दिसतोय मग तो सामाजिक मूल्य जपण्याचा असो किंवा पर्यावरणाचा काळजीबद्दलचा असो,

स्वतः मुंबई मध्ये इतकी मंडळ झाली आहेत कि जर बाप्पा ला स्वतःला सगळी कडे भेट द्यायची झाली तर 10 दिवस पुरतील कि नाही याचीहि शास्वती नाही.....आणि हि मंडळ त्याला दर्शनाचा लाईन मधून जायला देतील कि मुखदर्शनाचा यावरून त्याचा लालबाग मध्ये मुक्काम ठरेल.
टिळकांनी लोकांना एकत्र आणण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव चालू केला पण बाप्पामुळे एकत्र आलेली लोक मंडळामुळे वेगळी तर झाली आहेत ना????

आर्थिक परिस्थिती बदलली मनून तर माजा मनात या व्यवस्थे बद्दल चिडचिड आणि रोष तर होत नाही ना पण मी जे काही कमावलं आहे ते बाप्पाचीच देणं आहे हे मात्र खरंच आहे....पण तरीही तस असेल तर "बाप्पा मला सुबुद्धी दे इतकाच म्हणेन"

बाप्पा मला ती गर्दी नकोय ते DJ पण नकोयत पण मला तुला शांत भेटायचं आहे ,खूप गप्पा मारायचा आहेत.....परत त्या रांगेत उभं राहून तुज दर्शन घ्यायचं आहे त्यामुळे...गणपती बाप्पा मोरया पुढचा वर्षी लवकर या !!!!!

धोरणसमाजजीवनमानराहणीविचारप्रतिसाद

प्रतिक्रिया

संदीप डांगे's picture

19 Sep 2016 - 6:00 pm | संदीप डांगे

तुझं आहे तुझ्यापाशी परि तू जागा भुलालासी।

प्रचेतस's picture

19 Sep 2016 - 10:24 pm | प्रचेतस

टिपिकल नॉस्टेल्जिक लेख.
पूर्वीच्या काळी असं नव्हतं वगैरे वगैरे टाइप.

पैसा's picture

19 Sep 2016 - 10:24 pm | पैसा

पण लोक ठिकाणी येताना फारच कठीण आहे.

आज काल गणपतीची स्थापना कोणतेही मंडळ करीत नाही.direct राजा किंवा महाराजाच बसवतात.

प्रकाश घाटपांडे's picture

21 Sep 2016 - 9:42 am | प्रकाश घाटपांडे

आत्मचिंतन व मानसपूजा करा. तुमचा गणपती तुम्हाला हवा तसा भेटेल.