" या पुस्तकांवर बंदी आहे! "

दासबोध.कॊम's picture
दासबोध.कॊम in जनातलं, मनातलं
14 Sep 2016 - 5:25 pm

" या पुस्तकांवर बंदी आहे! ", हे वाक्य अखेरीस इंग्रज गव्हर्नराने उच्चारलेच! "काळ" च तसा होता तो!
आजच्या "सकाळ" किंवा "नवा काळ" वाचणा-या पिढील न मानवेल असा!
"काळ" हे एका अत्यंत ज्वलज्वलनतेजस जहाल व "अस्सल" मराठी पत्रिकेचे अथवा वृत्तपत्राचे नाव...
त्याचे कर्ते होते शिवराम महादेव परांजपे! हे टिळकांचे समकालीन व घनिष्ट स्नेही देखील...
काळाकर्ते शिवराम परांजपे व केसरी, मराठा कार लोकमान्य
त्यांचे तपशिलात फ़ारसे न शिरता त्यांचे अग्रलेखांविषयी बोलुयात.
१९०३ पासून पुढे त्यांनी काळ पत्रात जे जे अग्रलेख लिहिले ते इतके जहाल होते व इंग्रजांवर इतके थेट टीका करणारे होते की तिळपापड झालेल्या इंग्रजांनी या पत्रिकेवरच बंदी आणली. (असहिष्णुता!)
 महाड, २७ जून, इ.स. १८६४ - २७ सप्टेंबर, इ.स. १९२९)
परंतु गप्प बसतील ते मराठी तरुण कुठले! रात्रीचा दिवस करून त्यांनी या सर्व अग्रलेखांचे एकत्रीकरण करून खिळाप्रेसच्या काळात ती सर्व अक्षरजुळणी करून गुपचूप छापून घेतली व वितरीत केली! सावरकरांना काळ्या पाण्याची शिक्षा करण्यात आली त्यासाठी जे दोन खटले त्यांचेवर गुदरण्यात आले होते त्यातील एक पुस्तक प्रकाशनासंदर्भातला होता त्या प्रकाशित पुस्तकांच्या यादीत ही शि.म. परांजप्यांच्या अग्रलेखांची (अर्थातच पुनर्प्रकाशित) पुस्तकमाला होती! हे कळल्यावर उत्कंठा वाढली की असे नक्की काय लिहिले असेल या ग्रंथांत? ही १० ग्रंथांची एक मालिकाच आहे! "काळांतील निवडक निबंध " असे तिचे नांव...
त्यानंतर हे सर्व ग्रंथ मिळवून एकत्र केले ( जिज्ञासूंना ते येथे वाचता येतील) (कन्ट्रोल व एफ़ एकत्र दाबून लेखाखाली दिलेल्या यादीतील ग्रन्थ शोधणे...असो )
काळातील निवडक निबंध
यातील लेख शिमंनी इतक्या तळमळीने लिहिलेले आहेत व ते इतक्या व्यापक विषयांवर आहेत आणि अशा प्रतिकुल परिस्थितीत मोठ्या धैर्याने लिहिलेले आहेत की वाचून अचम्बा होतो! या सर्वाची पुसटशी कल्पना वाचकांना यावी म्हणून या दहाही ग्रंथांच्या अनुक्रमणिकांची यादी एकत्र करून ती आम्ही वेगळी प्रकाशित केलेली आहे. ती जरी चाळली तरी विषयांचा अंदाज येतो. आज आपण स्वतंत्र आहोत परंतु तो काळ काय होता याचे यथार्थ आकलन हे ग्रंथ वाचून झाल्याशिवाय रहात नाहीत! वाचनाची आवड असलेल्या प्रत्येकाने हे ग्रंथ चाळावेतच!

त्यांची यादी खालीलप्रमाणे आहे,

काळ पत्रिकेत प्रकाशित झालेल्या व इंग्रजांनी बंदी आणलेल्या अग्रलेखांची मालिका अर्थात "काळातील निवडक निबंध" भाग १ ते १० च्या एकत्रित केलेल्या विषयानुक्रमणिका
काळांतील निवडक निबंध भाग पहिला : शिवराम महादेव परांजपे (इंग्रजांनी बंदी घातलेले पुस्तक) ( पुनर्प्रकाशित १९४६)
काळांतील निवडक निबंध भाग दुसरा: शिवराम महादेव परांजपे (इंग्रजांनी बंदी घातलेले पुस्तक) (१९०३)
काळांतील निवडक निबंध भाग दुसरा: शिवराम महादेव परांजपे (इंग्रजांनी बंदी घातलेले पुस्तकाची द्वितीयावृत्ती) (१९४६)
काळांतील निवडक निबंध भाग तिसरा : शिवराम महादेव परांजपे (इंग्रजांनी बंदी घातलेले पुस्तक) (१९४६)
काळांतील निवडक निबंध भाग चवथा: शिवराम महादेव परांजपे (इंग्रजांनी बंदी घातलेले पुस्तक) (१९४६)
काळांतील निवडक निबंध भाग पाचवा : शिवराम महादेव परांजपे (इंग्रजांनी बंदी घातलेले पुस्तक) (१९४६)
काळांतील निवडक निबंध भाग सहावा : शिवराम महादेव परांजपे (इंग्रजांनी बंदी घातलेले पुस्तक) (१९४६)
काळांतील निवडक निबंध भाग सातवा : शिवराम महादेव परांजपे (इंग्रजांनी बंदी घातलेले पुस्तक) (१९४६)
काळांतील निवडक निबंध भाग आठवा: शिवराम महादेव परांजपे (इंग्रजांनी बंदी घातलेले पुस्तक, यात दासबोध नावाचा एक निबंध आहे!) (१९०६)
काळांतील निवडक निबंध भाग आठवा द्वितीय आवृत्ती : शिवराम महादेव परांजपे (इंग्रजांनी बंदी घातलेले पुस्तक, यात दासबोध नावाचा एक निबंध आहे!) (१९०६)
काळांतील निवडक निबंध भाग नववा: शिवराम महादेव परांजपे (इंग्रजांनी बंदी घातलेले पुस्तक) (१९४६)
काळांतील निवडक निबंध भाग दहावा: शिवराम महादेव परांजपे (इंग्रजांनी बंदी घातलेले पुस्तक) (१९४६)

कळावे,

वाचून झाले की कळवाल!

इतिहासवाङ्मयसमाजराजकारणशिक्षणशिफारस

प्रतिक्रिया

चित्रगुप्त's picture

14 Sep 2016 - 5:45 pm | चित्रगुप्त

त्या काळातील साहित्य इथे सहज उपलब्ध करून देत आहात हे खूपच छान. वामन पंडित, मोरोपंत, रघुनाथ पंडित यांची चरित्रे (आणि चरित्रात्मक कादंबर्‍या असल्यास त्याही) आणि काव्य उपलब्ध आहे का ?

दासबोध.कॊम's picture

14 Sep 2016 - 5:47 pm | दासबोध.कॊम

वैयक्तिक वाचनासाठी अशी गोळा केलेली काही पुस्तके आहेत.
अफ़ाट कार्य आहे १९०० ते १९३० या काळातील लेखक प्रकाशकांचे...

पाटीलभाऊ's picture

14 Sep 2016 - 5:51 pm | पाटीलभाऊ

खरंच..अमूल्य असा ठेवा आहे हा...!

दासबोध.कॊम's picture

14 Sep 2016 - 6:01 pm | दासबोध.कॊम

शिवरामपंतांच्या लेखन विषयांचा अंदाज यावा याकरिता अनुक्रमणिकेचे एक पृष्ठ उदाहरणादाखल देत आहे...अशी १० पुस्तके आहेत! इंग्रजांचे तर "याड पळाले" असेल!
वानगीदाखल एक अनुक्रमणिका

फारच अभ्यासपुर्ण साईट दासबोध.com, शिवाजि महाराजांवरिल लेखांचा खजिनाच आहे. फार्शि शब्द्कोशातिल कितितरि शब्द
मराठित आहेत.

चौकटराजा's picture

15 Sep 2016 - 1:08 pm | चौकटराजा

मराठीचा अभिमान वगैरे बाळगळणार्‍या लोकानी एक लक्षात ठेवावे की मराठी भाषा ( आजची) कानडी, गुजराथी, पोर्तुगीज, संस्कृत , फारसी ,उर्दू तथा अरबी यानी बनलेली आहे.

पैसा's picture

15 Sep 2016 - 3:41 pm | पैसा

_/\_ फार मोठे काम केले आहेत. जमेल तेवढी पुस्तके वाचून काढीन.

मुक्त विहारि's picture

16 Sep 2016 - 10:34 am | मुक्त विहारि

धन्यवाद

रघुनाथ.केरकर's picture

16 Sep 2016 - 10:58 am | रघुनाथ.केरकर

धन्यवाद

रविकिरण फडके's picture

16 Sep 2016 - 10:07 pm | रविकिरण फडके

मी काही चूक करतोय का?
जिज्ञासूंना ते येथे वाचता येतील ह्या लिंकवर क्लिक केले कि dasbodh.com असे page उघडते व this page cannot be reached असा message ही येतो त्या site वर.

दासबोध.कॊम's picture

16 Sep 2016 - 10:31 pm | दासबोध.कॊम

खरेतर असे व्हायला नाही पाहिजे...
थेट लिंक पहा बरं उघडून
http://www.dasbodh.com/p/blog-page_707.html

रविकिरण फडके's picture

17 Sep 2016 - 6:57 pm | रविकिरण फडके

तात्पुरता प्रॉब्लेम असावा बहुधा कारण आता उघडतंय पान.
धन्यवाद!

गिड्डे's picture

23 Sep 2016 - 5:44 pm | गिड्डे

वरील सर्व पुस्तके आज आहेत उपलब्ध पण पीडीएफ मधे आहेत
१९३०-१९५० पर्यंतची बहुतेक पुस्तके आहेत माझ्याकडे
मला वाटते मराठी कादम्बरी साहित्य यांच्या उत्क्रांतीचा तो काळ होता शीम परांजपे यांची विंध्याचल मस्त

गिड्डे's picture

23 Sep 2016 - 5:46 pm | गिड्डे

वरील सर्व पुस्तके आज आहेत उपलब्ध पण पीडीएफ मधे आहेत
१९३०-१९५० पर्यंतची बहुतेक पुस्तके आहेत माझ्याकडे
मला वाटते मराठी कादम्बरी साहित्य यांच्या उत्क्रांतीचा तो काळ होता शीम परांजपे यांची विंध्याचल मस्त

अभय म्हात्रे's picture

24 Sep 2016 - 7:58 am | अभय म्हात्रे

खुपच उपुक्त पोस्ट आहे.

हि पोस्ट मिसलपाव वर पोस्ट केल्या बद्द्ल खुप खुप आभार.