हृदयांत सागराच्या..

प्राजु's picture
प्राजु in जे न देखे रवी...
21 Sep 2008 - 9:42 pm

हृदयांत सागराच्या
फेसाळतात लाटा
खडकांत फेनफुलेही
शोधित जात वाटा

खेळांत गलबताच्या
लाटांचाही झिम्मा
अस्तास भास्कराच्या
क्षितिजावरी रक्तिमा

ओठांत शिंपलीच्या
मोत्याचेच गाणे
किनार्‍यावरी सांडले
सोनियाचे दाणे

जातात पाऊले गं
तिरपी कोण कशी??
खेकड्याची चाल
रेतीवरी नक्षी

घेताच खोल श्वास
वारा ओशाळला
धुंदीत यौवनाच्या
क्षारात गंधाळला

रात्रीस साथ देई
खर्जातली गाज
चंदेरी पाण्यावरी
चढला रूपेरी साज..

का संथ चालला गं
हा चंद्र अस्ताकडे
प्रेमात तो ही घाली
लहरींना साकडे

उदयांस भास्कराच्या
सागर मंत्रावला
ओल्या वाळूवरी
शिंपला दवांत भिजला

- प्राजु

कलाचारोळ्याकविताप्रकटनविचारप्रतिसाद

प्रतिक्रिया

आनंदयात्री's picture

21 Sep 2008 - 10:05 pm | आनंदयात्री

जातात पाऊले गं
तिरपी कोण कशी??
खेकड्याची चाल
रेतीवरी नक्षी

निव्वळ अस्सल !!
सुरेख :)
खेकड्याची चाल तिरकी .. पण रेतीसाठी तर ती नक्षी .. खुप छान !

*संस्कृत आणी शुद्धलेखन आमचे ऍड्रिनलिन आहे*

रेवती's picture

22 Sep 2008 - 12:07 am | रेवती

मस्त कविता!
घेताच खोल श्वास
वारा ओशाळला
धुंदीत यौवनाच्या
क्षारात गंधाळला

फार आवडले.

रेवती

विसोबा खेचर's picture

22 Sep 2008 - 12:08 am | विसोबा खेचर

वा! एक अतिशय चांगल्या दर्जाची कविता वाचल्याचा आनंद झाला

रात्रीस साथ देई
खर्जातली गाज
चंदेरी पाण्यावरी
चढला रूपेरी साज..

ह्या ओळी सर्वाधिक आवडल्या, सुरेखच आहेत!

प्राजू, दिवसेंदिवस तुझी कविता प्रगल्भ आणि अधिकाधिक सुरेख होत आहे. जियो....!

तात्या.

इनोबा म्हणे's picture

22 Sep 2008 - 12:09 am | इनोबा म्हणे

घेताच खोल श्वास
वारा ओशाळला
धुंदीत यौवनाच्या
क्षारात गंधाळला

आवडली कविता

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

शितल's picture

22 Sep 2008 - 12:27 am | शितल

जातात पाऊले गं
तिरपी कोण कशी??
खेकड्याची चाल
रेतीवरी नक्षी

ही तर मस्त कल्पना .
:)

श्रीकृष्ण सामंत's picture

22 Sep 2008 - 12:57 am | श्रीकृष्ण सामंत

कविता खूपच सुंदर आहे.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

फटू's picture

22 Sep 2008 - 1:54 am | फटू

सुंदर आहे कविता...

जातात पाऊले गं
तिरपी कोण कशी??
खेकड्याची चाल
रेतीवरी नक्षी

हे कडवं तर एकदम क्लासच...

सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

अरुण मनोहर's picture

22 Sep 2008 - 7:09 am | अरुण मनोहर

कविता छान जमली आहे.

मदनबाण's picture

22 Sep 2008 - 8:59 am | मदनबाण

सुंदर कविता...
ओठांत शिंपलीच्या
मोत्याचेच गाणे
किनार्‍यावरी सांडले
सोनियाचे दाणे
हे फार आवडल.. :)

मदनबाण.....

"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

संदीप चित्रे's picture

22 Sep 2008 - 10:05 am | संदीप चित्रे

खूप सुरेख आहे कविता. पहिल्या ओळीशी सुसंगत असं चित्र पूर्ण केलं आहेस.
एकाच ओळीने सुरूवात करूनही आपल्या दोघांच्या मनात किती भिन्न प्रकारच्या कविता उमलल्या ते पाहून गंमत वाटली.

llपुण्याचे पेशवेll's picture

22 Sep 2008 - 11:58 am | llपुण्याचे पेशवेll

प्राजु , कविता (नेहेमीप्रमाणेच) फारच सुंदर आहे.
अवांतरः बिनडोक बनीने त्याचे अजून विडंबन कसे पाडले नाही ?
पुण्याचे पेशवे

राघव's picture

22 Sep 2008 - 5:28 pm | राघव

वाहवा! एकाच कल्पनेची दोन रुपे दिसलीत.. खूप छान!!

रात्रीस साथ देई
खर्जातली गाज
चंदेरी पाण्यावरी
चढला रूपेरी साज..

या ओळी सर्वाधिक आवडल्यात. येऊ द्यात अजून. शुभेच्छा! :)

मुमुक्षु

स्वाती राजेश's picture

22 Sep 2008 - 5:54 pm | स्वाती राजेश

जातात पाऊले गं
तिरपी कोण कशी??
खेकड्याची चाल
रेतीवरी नक्षी

त्याच्या त्या चालीवरून ओळ सुचते??
कमाल आहे तुझी....:)शेवटी तुझे मन कवियत्रीचे..
सलाम तुला आणि तुझ्या कवितांना..

स्वाती दिनेश's picture

22 Sep 2008 - 6:13 pm | स्वाती दिनेश

प्राजु,कविता आवडली.
रात्रीस साथ देई
खर्जातली गाज
चंदेरी पाण्यावरी
चढला रूपेरी साज..
हे खूप आवडले.
स्वाती

चतुरंग's picture

22 Sep 2008 - 6:14 pm | चतुरंग

संपूर्ण कविता छानच आहे पण त्यातही मला पुढची चार कडवी अगदी आवडली, अत्यंत चित्रदर्शी!

ओठांत शिंपलीच्या
मोत्याचेच गाणे
किनार्‍यावरी सांडले
सोनियाचे दाणे

जातात पाऊले गं
तिरपी कोण कशी??
खेकड्याची चाल
रेतीवरी नक्षी

घेताच खोल श्वास
वारा ओशाळला
धुंदीत यौवनाच्या
क्षारात गंधाळला

रात्रीस साथ देई
खर्जातली गाज
चंदेरी पाण्यावरी
चढला रूपेरी साज..

प्राजू, अल्पाक्षरांत कल्पना समर्थपणे पोचवणे कठिण असते ते तुझ्या कवितेतून दिसू लागले आहे. कविता प्रगल्भ होते आहे.

चतुरंग

प्राजु's picture

22 Sep 2008 - 7:07 pm | प्राजु

आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

पद्माकर टिल्लु's picture

22 Sep 2008 - 8:30 pm | पद्माकर टिल्लु

padmaakar

प्राजु

कविता फारच भावली. सर्व कविता सन्ग्रहित कधी करणार!!!

पद्माकर