पिस्तुल्या

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
8 Jun 2016 - 5:01 pm

नागराज मंजुळेची हि पहिली शॉर्टफिल्म. अहमदनगरच्या चित्रकार्यशाळेत तिसऱ्या वर्षी त्यानं केलेला खरंतर हा एक प्रोजेक्ट होता. तंत्रज्ञानाच्या बाबतीत बरीच पिछाडीवर असलेली ही कार्यशाळा नागराजला राष्ट्रीय पुरस्कार मिळवण्यापासून रोखू शकली नाही, यातच खरंतर नागराजचं घवघवीत यश आहे.

मोजून दोन दिवसात (की सहा?) पिस्तुल्याचं चित्रीकरण पु्र्ण झालं. मात्र त्याआधी त्याने कित्येक दिवस तयारी केली होती. कॅमेरा कोठे ठेवायचा, लोकेशन्स, पात्रनिवड, वगैरेवर बरीच मेहनत घेतली होती.
हि केवळ १५ मिनिटांची शॉर्टफिल्म आहे. मात्र नागराजनं त्यातही एक जग उभं केलंय हे नक्की. पात्रं अभिनय करतायत असं कुठेच वाटलं नाही. अस्सल नैसर्गिक अभिनय. कथेत थोडे ट्विस्टपण आहेत जे समजायला थोडा वेळही लागतो.
कितीही अस्सल कलाकृती सरळसोट सामाजिक संदेश देणारी निघाली तर तिची धार जरा बोथटच होते. पिस्तुल्याच्या बाबतीत मला हेच जाणवले. मात्र तिकडे जरा दुर्लक्ष केल्यास कथेची मांडणी आणि चित्रभाषा डोळ्याला सुखावत राहतात.

फारच अपेक्षा घेऊन पाहिलात तर कदाचित हाती जास्त काही पडणार नाही. मात्र एकदा नक्कीच पाहिला पाहिजे असा जरूर आहे.

थोडक्यात कथा सांगतो,

लक्शुक्का बारक्या पिस्तुल्याला घेऊन दारोदारी पाटा वरुटा विकत फिरत असते. पाठीमागे पिस्तुल्या 'टी टी टी' करत तारांची गाडी चालवत असतो. मध्येच थांबून तो हातातल्या कागदावर लिहीलेली अक्षरं वाचण्याचा प्रयत्न करत राहतो. दगडं कोरुन पोट भरणाऱ्या जमातीतली ही मायलेकरं घरोघरी भाकर मागूनही पोट भरत असतात. एके ठिकाणी लक्शुक्का तारांची गाडी आवडलेल्या एका पोराशी गाडीच्या बदल्यात दोन ताज्या भाकरीचा सौदाही करते. स्वतः बनवलेली गाडी अशी सहजासहजी गेली याचं दु:ख पिस्तुल्या धड दाखवूही शकत नाही.

मुळात पिस्तुल्याला शाळेची आवड आहे. लक्शुक्का मात्र "तुझ्या गांडीला न्याट पडलं, तुला साळा आटवती व्हयरं, भाडखाऊ" म्हणत त्याला विरोध दर्शवते. पाटी पुस्तकं, गणवेस यांसारखा फाजिलपणा तिला खपणारा नसतो. आणि गणवेशाशिवाय शाळेत प्रवेश नाही असा तिढा पिस्तुल्यापुढे आहे.
पुढे काय होतं? हे चित्रफितीत पाहणेच उत्तम.

जाता जाता:

यूट्यूब वरची ही पिस्तुल्या (खराब क्लॉलिटीची प्रिंट) इच्छूकांनी जरुर बघावी. HD क्लॉलिटी कोठे सापडली नाही. क्षमस्व.

समाजशिक्षणचित्रपटप्रकटनआस्वादमाध्यमवेध

प्रतिक्रिया

हकु's picture

8 Jun 2016 - 5:04 pm | हकु

नक्कीच बघीन!

राजकुमार१२३४५६'s picture

8 Jun 2016 - 6:02 pm | राजकुमार१२३४५६

अजून एक कॉपी राईट. आधीच नागराज मंजुळे साहेब सैराट च्या कॉपी राईटमुळे त्रासले आहेत.

जव्हेरगंज's picture

8 Jun 2016 - 6:32 pm | जव्हेरगंज

अर्रर्रर, असं आहे का ते?
यूट्यूब चार पाच ठिकाणीतरी आहे!

अरे काय भंगार प्रिण्ट आहे. ओरिजिनल कुठे मिळेल?

जव्हेरगंज's picture

8 Jun 2016 - 7:09 pm | जव्हेरगंज

1) Gerry's Garden ( फुल कॉमेडी)

https://m.youtube.com/watch?v=Wvit70Mfx4g

अफ्रिकेचा मुम्बैकर's picture

9 Jun 2016 - 6:34 pm | अफ्रिकेचा मुम्बैकर

पिस्तुल्ल्या आनि सैरत दोन्हि चित्रपत Overrated ........
Frandry was much batter than Sairat but did not get that much appreciation..
Compared to Sairat i was more touched by Masaan hindi movie...

जव्हेरगंज's picture

9 Jun 2016 - 7:44 pm | जव्हेरगंज

मसाण!
फारच भेदक आहे!

मारवा's picture

10 Jun 2016 - 10:21 pm | मारवा

मसान अत्यंत उत्कृष्ठ कलाकृती आहे यात तीळमात्र शंका नाही. मात्र परवाच वरुण ग्रोवर च्या मुलाखतीत त्याने स्वतः "सैराट" ची तोंडभरुन स्तुती केलीय.
तो मला वाटत इव्हन इतक म्हणाला की "सैराट" पासुन खुप काही घेण्या शिकण्यासारख आहे
असो

अफ्रिकेचा मुम्बैकर's picture

10 Jun 2016 - 1:41 pm | अफ्रिकेचा मुम्बैकर

हो नक्किच