वाढदिवसानिमित्ताने त्यांचे अभिष्ट-चिंतन.
मला आवडलेली त्यांची गाणी....
१. ह्या जन्मावर ह्या जगण्यावर शतदा प्रेम करावे. https://www.youtube.com/watch?v=ky0osqfJPDE
२. भेट तुझी माझी स्मरते https://www.youtube.com/watch?v=9NE4elqxG3Q
३. दिवस तुझे हे फुलायचे https://www.youtube.com/watch?v=T4t-Gc4YoBI
४. स्वरगंगेच्या काठावर्ती वचन दिले तू मला https://www.youtube.com/watch?v=ma6dgjGF9SI
आणि
५. येशील येशील येशील राणी पहाटे पहाटे येशील https://www.youtube.com/watch?v=RYcuTXiQkDw
प्रतिक्रिया
4 May 2016 - 8:20 am | चांदणे संदीप
धन्यवाद मुवी, आठवण करून दिल्याबद्दल.
अरूण दाते यांना जन्मदिनाच्या अनेक शुभेच्छा!!
एकेकाळी त्यांची गाणी ऐकल्याशिवाय दिवस जात नसे माझा. वरच्या लिस्टमध्ये आणखी खूप गाणी ॲड करता येतील पण मला आत्ता लगेच आठवले ते म्हणजे, "जेव्हा तिची नी माझी चोरून भेट झाली, झाली फुले कळ्यांची झाडे भरात आली!"
धन्यवाद पुन्हा एकदा! ___/\___
Sandy
4 May 2016 - 8:31 am | मुक्त विहारि
अहो,
मग अजून गाणी अॅड करा ना.
रात्रीच्या निरव शांतततेत भावगीते बायकोच्या सोबतीने ऐकणे, हा एक वेगळाच सोहळा असतो.
4 May 2016 - 10:51 am | चांदणे संदीप
१) भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी
https://www.youtube.com/watch?v=FXmOR_BezaA
२) डोळे कशासाठी
https://www.youtube.com/watch?v=उंओवः४डोQQक
३) शुक्रतारा मंद वारा
https://www.youtube.com/watch?v=bu10VgPSK-w
४) जेव्हा तिची नी माझी चोरून भेट झाली
https://www.youtube.com/watch?v=झ८ह्छोऋट्चVओ
५) अखेरचे येतील माझ्या
https://www.youtube.com/watch?v=VJKMFEcePK4
वेन्जॉय माडी!
Sandy
4 May 2016 - 9:10 am | चौकटराजा
अरूण दाते यांचे फार मोठे ऋण सुगम संगीत रसिकांवर आहे.त्याना दीर्घायु आरोग्यासह लाभो ही मनोकामना !
आपली आवडती आणखी तीन गाणी वानगीदाखल
१. धुके दाटलेले उदास उदास २. डोळ्यात सांजवेळी # सखी शेजारिणी
4 May 2016 - 10:36 am | नाखु
किमान ३ वेळा कार्यक्रम प्रत्यक्ष पहावयास मिळाला त्यातील एक्दा स्वयंसेवक असल्याने (आणि त्यांचा सहवादक महविद्यालयीन मित्र असल्याने अगदी जवळ जाऊन शुभेच्छा देऊ शकलो)
त्याना दीर्घायु आरोग्यासह लाभो ही मनोकामना !
4 May 2016 - 11:35 am | मुक्त विहारि
जमीनीवर पाय असलेले असे कलावंत फार विरळे.
4 May 2016 - 5:38 pm | डॉ सुहास म्हात्रे
अत्यंत समयोचित लेख ! अरूण दाते यांची गाणी आवडत नाही असा माणूस शोधून काढणे कठीण आहे. गेल्या अनेक पिढ्यांना त्यांनी आपल्या गायनाने भारून टाकले आहे.
अरूण दाते यांना जन्मदिनाच्या अनेक शुभेच्छा !!