खेळ नेहमीचाच.. एक ओळ मला सुचली ती अशी -
स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं!
.....
पुढची ओळ काय होऊ शकेल ते आपल्याला सुचतंय तसं प्रतिसादात लिहायचं.
हि कविता नाही. त्यामुळे फक्त दोनच ओळी असणारेत.
अट एकच, वर लिहिलेल्या पहिल्या ओळीशी निगडीत अशीच दुसरी ओळ असायला हवी!
बघुयात कुणाचे कसे कसे डोके चालते ते ;)
मुमुक्षु
प्रतिक्रिया
18 Sep 2008 - 2:27 pm | प्रभाकर पेठकर
स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं!
तरण्या मुलींवर मरू लागली सगळीच तरूण मुलं!
18 Sep 2008 - 2:31 pm | सहज
स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं!
हो का?
तरण्यामुलांच्या खांद्यावरनं नेम साधु लागले
काका
:-D
18 Sep 2008 - 2:38 pm | प्रभाकर पेठकर
अरे असे नाही....
स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं!
काकांच्या मनात अजून तारुण्याची 'खुळं'
18 Sep 2008 - 2:42 pm | अरुण मनोहर
स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं!
तरुण थकले पण काकांची स्पीड फुल्ल!
18 Sep 2008 - 2:31 pm | बेधुन्द मनाची लहर
स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं!
वेचायला येइनात, वेन्धळी सारी मुल !!!
18 Sep 2008 - 2:33 pm | अरुण मनोहर
स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं!
कावळी जोपासते कोकीळेची पिलं
स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं!
मुमुक्षुने केलं चावटांना रान खुलं
18 Sep 2008 - 2:36 pm | जैनाचं कार्ट (not verified)
स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं!
मुमुक्षुने केलं चावटांना रान खुलं
=))
जबरा!
जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग
18 Sep 2008 - 2:34 pm | बेधुन्द मनाची लहर
स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं!
....... च्या घरची पेटवते चुल!!!
हा हा हा उखाणा पण चालेल ना....
18 Sep 2008 - 3:04 pm | वृषाली
स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं!
स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं!
स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं!
स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं!
अरे बापरे
असं झालं तर मग
जाईला पन येतील मोगर्याची फुलं! =))
वृषाली
18 Sep 2008 - 3:11 pm | यशोधरा
स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं!
मिपावर चालतात भलतीच की ही खुळं!!
प्लीज प्लीज प्लीज हलके घ्या!! माफी !!
18 Sep 2008 - 3:25 pm | राघव
हा हा हा... चांगलं चाललेलंय...
स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं,
(भलतेच काय) आमच्या मते बुवा सगळी वेडी मुलं!!
कृपया सगळे हलकेच घ्या हं :)
18 Sep 2008 - 3:37 pm | राघव
आणखी एक..
स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं! :O
निर्माल्य असं कुणी फेकलं जरा पाहुया बरं!! :W
मुमुक्षु
18 Sep 2008 - 4:34 pm | अरुण मनोहर
स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं! Surprise
जरा पाहुया बरं!! निर्माल्य कुणी फेकलं? Waiting
18 Sep 2008 - 5:55 pm | योगी९००
स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं!
माणिकताईन्ची गाणी गाते राणी बागुलं !!!
18 Sep 2008 - 7:13 pm | विनायक प्रभू
http://vipravani.wordpress.com/
स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं
कुठे आहेत सांगा घेउ तुमची चरण धूल
वि.प्र.
18 Sep 2008 - 7:23 pm | चतुरंग
स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदीची फुलं
'तिचं' सुरु शॉपिंग अन 'त्याच्या'कडे मुलं! ;)
चतुरंग
18 Sep 2008 - 11:06 pm | प्राजु
चतुरंग... भलतेच विचार सुचतात हो तुम्हाला...
सह्ही... भरपूर हसले तुमचा हा उखाणा ऐकून..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
18 Sep 2008 - 7:33 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदीची फुलं
वड्याचं तेल वांग्यावर का वं ओतलं?
18 Sep 2008 - 7:35 pm | चतुरंग
स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदीची फुलं
तेल कसलं ओतता, जिवावर बेतलं! :S
चतुरंग
18 Sep 2008 - 7:37 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदीची फुलं
ते खनिज तेलच लोकांच्या जिवावर बेतलं!
18 Sep 2008 - 7:38 pm | मनीषा
स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं!
दिसं सांगे रातीला, मला चांदण्याची भुल |
18 Sep 2008 - 7:54 pm | मनीषा
स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं!
L. H. C. देई जगबुडीची हूल |
18 Sep 2008 - 8:08 pm | दत्ता काळे
स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं
फुलांच्या जोडीन फुलपाखरु डुलं
18 Sep 2008 - 8:15 pm | मीनल
स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं
फुलांच्या जोडीन फुलपाखरु डुलं
हे मला सर्वात आवडलं
मीनल.
18 Sep 2008 - 8:10 pm | अनामिक
स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं!
जास्वंदाच्या झाडावर मग काय नाय उरलं!
18 Sep 2008 - 8:16 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं!
मग जास्वंदाचं झाड दारी का लावलं?
18 Sep 2008 - 8:46 pm | अनामिक
स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं!
मंगळ - शनी युतीमुळेच असं झालं
18 Sep 2008 - 8:48 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
>> मंगळ - शनी युतीमुळेच असं झालं
=))
18 Sep 2008 - 8:49 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं!
त्यामुळेच स्वस्तिकाचं "झाड" असतं हे कळलं!
18 Sep 2008 - 9:01 pm | अनामिक
स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं!
कुणीतरी सांगा म्हणजे नकी काय झालं?
18 Sep 2008 - 10:47 pm | लक्ष्मीकान्त
स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं!
खर खर सान्गा कधी कलम केल.
18 Sep 2008 - 10:59 pm | विसोबा खेचर
एका उखाण्याचा प्रयत्न करतो..!
स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं!
आणि वसंतरावांना आहेत बिनलग्नाची मुलं!
:)
तात्या.
18 Sep 2008 - 11:06 pm | प्रभाकर पेठकर
उखाणा मस्त आहे. पण जरा इकडचा शब्द तिकडे झाला आहे, असा माझा अंदाज.
आणि वसंतरावांना आहेत बिनलग्नाची मुलं!
बिनलग्नाची (लग्न न झालेली, केलेली) मुलं अनेकांना असतात.
मलातरी असे वाटते की वाक्य असावे,
'आणि बिनलग्नाच्या वसंतरावांना आहेत चार - चार मुलं.'
18 Sep 2008 - 11:14 pm | विसोबा खेचर
'आणि बिनलग्नाच्या वसंतरावांना आहेत चार - चार मुलं.'
येस्स! वरील ओळ अधिक चपखल आहे! :)
(बिनलग्नाचा) तात्या.
19 Sep 2008 - 11:13 am | राघव
असेच म्हणतो.
तुम्ही दोघंही महान आहात! दंडवत!! :D
18 Sep 2008 - 11:12 pm | प्राजु
एकेक भलतेच उखाणे तयार होताहेत..
माझाही हा प्रयत्न..
स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदीची फुलं
रंग गेला उडून असं झाड घुमू लागलं..
स्वस्तीकाच्या झाडावर जास्वंदीची फुलं
भुंगा होता त्यावर अन आता झाला गुलं..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
18 Sep 2008 - 11:17 pm | अनामिक
स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं!
अन क्रिकेटच मैदान फुटबॉलसाठी खुलं!
19 Sep 2008 - 10:58 am | राघव
वाह!
काय चाललीयेत डोकी.. झक्कास!
सगळेच एक से बढकर एक आहेत!!
अर्थात् काही रचनांत थोडी गफलत झालीये. वरच्या ओळीला निगडीत अशीच दुसरी ओळ अपेक्षीत होती. पण काही हरकत नाही. मस्त आहेत सगळ्यांच्या कल्पना. शुभेच्छा!
(हसरा)मुमुक्षु
19 Sep 2008 - 11:47 am | रामदास
पण जास्वंदीवरून एका कवितेच्या ओळी आठवल्या,
बहुतेक बोरकरांच्या आहेत,
जास्वंदीच्या पाच फुलातून
मरण एकदा मला म्हणाले
पहा कसे मी या झाडातून
भरले कोमल रसार्द्र पेले
येशुच्या मज स्मरल्या जखमा.......
तसं पाह्यलं तर कालपासून स्वस्तीकाच्या झाडाकडे बघायची भिती वाटतेय.
न्युजमध्ये आतंकवाद्यांनी मारलेल्या माणसांची प्रेतं दाखवतात तेव्हा ती पांढरी चादर आणि त्यावर लाल जास्वंदीची फुलं असल्यासारखं दिसतं.
कोणाला काय आठवेल काय सांगता येत नाही.
http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.
19 Sep 2008 - 12:16 pm | योगी९००
स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं!
लोक आहे मरत पण ग्रुहमन्त्री आरशासमोर डुलं !
19 Sep 2008 - 12:44 pm | चटोरी वैशू
स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं!
*****च्या खांद्यावर *****ची मुलं!....
19 Sep 2008 - 10:35 pm | चंबा मुतनाळ
स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं!
रमली किल्वरच्या मांडीवर इस्पिकची मुलं
18 Mar 2010 - 6:51 pm | डावखुरा
स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं!
समोर पोरी दिसताच पोरान्चे भान डळमळ
स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं!
पोरीन्च्या भोवती पिन्गा घालती मुलं.....
स्वस्तिकाच्या झाडावर जास्वंदाची फुलं!
कुत्र चाले पुढ,पण मान्जर पायाशी घुटमळ..
"राजे!"