झब्बूशाहची पोरगी - खलील जिब्रान
सिंहासनावर झोपलेल्या म्हातार्या राणीच्या आजूबाजूस चार गुलाम पंखा हलवत होते. ती घोरत होती आणि तिच्या कुशीत बसलेली मनिमाऊं म्यांव म्यांव करत अर्धोन्मिलित डोळ्यांतून गुलामांकडे टक लावून बघत बसलेली.
पहिला गुलाम बोलला, "झोपलेली असते तेव्हा ही म्हातारी किती किळसवाणी वाटते, हिचा लटकलेला जबडा बघा; आणि श्वास तर असा घेते आहे जणू सैतानाने हिचा गळा दाबून धरला आहे."
मनिमाउं म्यांव करत म्हणाली, "उघड्या डोळ्याने हिची गुलामी करतांना जितके कुरूप तुम्ही दिसता, झोपलेली असतांना ही त्याच्या अर्धीपण भयंकर दिसत नाही."
दुसरा गुलाम म्हणाला, "झोपेत हिच्या सुरकुत्या दाट होण्याऐवजी सपाट होऊन जातात. नक्कीच कसल्यातरी कटकारस्थानाचं स्वप्न बघत असेल."
मनिमाऊंने म्यांव केल, "तुम्ही पण अशीच झोप काढली पाहिजे आणि स्वातंत्र्याचे स्वप्न बघितले पाहिजे."
तीसरा गुलाम म्हणाला, "हिने मारलेले लोक झुंडी झुंडीने हिच्या स्वप्नात येत असतील."
आणी मनिमाउंने म्यांव केलं, "ए, ही फक्त तुमच्या पुर्वजांच्याच झुंडी नाही तर तुमच्या येणार्या पिढ्यांच्याही झुंडी बघत आहे."
चौथ्या गुलामाने म्हटल, "ह्याबाबतीत गप्पा मारायला छान वाटतं, पण त्यामुळे इथं उभं राहून पंखा हलवत जो थकलोय त्यावर काय फरक नाही पडणार."
मनिमाउंने म्यांव केलं, "तुमच्यासारख्या लोकांनी अनंतकाळापर्यंत पंखा हलवत राहिले पाहिजे, फक्त पृथ्वीवरच नाही, स्वर्गातही."
राणीची मान एकाएकी खाली कलंडली आणि तिचा मुकूट जमीनीवर पडला.
गुलामांपैकी एक उद्गारला, " हा तर अपशकुन आहे."
मनिमाऊं म्हणाली, "एकाचा अपशकुन दुसर्याचा शकुन असतो."
दुसरा गुलाम म्हणाला, "उठल्यावर जर हिला आपल्या डोक्यावर मुकूट दिसला नाही तर आपलं डोकं उडवेल."
मनिमाउंने म्हटले, "तुम्हाला माहीती नाही की जेव्हापासून तुमचा जन्म झालाय, ही रोज तुमचे डोके उडवते आहे."
तिसर्या गुलामाने म्हटले, "बरोबर आहे तुझे, देवांना बळी देण्याच्या नावाखाली ही आमचा खून करुन टाकेन."
मनिमाउंने म्हटले, "देवांना फक्त दुर्बळांचा बळी दिला जातो."
तेव्हाच चौथ्या गुलामाने सर्वांना गप्प राहण्याची खूण केली. त्याने मुकूट उचलला आणि अशा सफाईने राणीच्या डोक्यावर बसवला की तीची झोपमोड होऊ नये.
मनिमाउंने म्हटले, "एक गुलामच खाली पडलेल्या मुकूटाला उचलून परत राजाच्या डोक्यावर ठेवतो."
काही क्षणच गेले असतील की म्हातारी राणी उठली. इकडे तिकडे बघत तिने जांभई दिली आणि म्हणाली, "मला वाटतं मी स्वप्न पाहिलं - मी पाहिलं की एक विंचू चार किड्यांना एका खुप जुन्या ओकवृक्षाच्या खोडाभोवती पळवत आहे. हे स्वप्न मला आवडले नाही."
एवढंच बोलून तिने डोळे मिटले आणि परत झोपून गेली. घोरणं परत सुरु झालं आणि चारी गुलाम परत पंखा हलवू लागले.
आणि मनिमाऊं गुरगुरली, "हलवत राहा, मुर्खांनो फक्त हलवतच राहा. तुम्हाला ठावूक नाही की तुम्ही त्या आगीला हवा घालताय जी तुम्हाला जाळून तुमची राख करते."
मूळ कथा: The Lion's Daughter
मूळ लेखक: Khalil Jibran
पुस्तकाचे नाव:The Forerunner
प्रथम प्रकाशन: 1920
प्रतिक्रिया
7 Apr 2016 - 11:54 am | खेडूत
मस्त खलील जिब्रान कथा..!
आवडली.
7 Apr 2016 - 11:59 am | मृत्युन्जय
मस्त कथा आहे. आवडली
7 Apr 2016 - 12:04 pm | मन१
गोष्ट आवडली!
.
.
------जाहिरात मोड ऑन------
स्वातंत्र्य आणि बंधन ह्या संकल्पनांबद्दल मी इलुसं, दोन-चार परिच्छेदांचं काहीतरी लिहिलय.ते हे --
स्वातंत्र्यदिन(एक लघुकथा)
भयमुक्त -बंधानुरक्त (एक छोटीशी गोष्ट)
------जाहिरात मोड ऑफ------
7 Apr 2016 - 12:04 pm | ब़जरबट्टू
"एक गुलामच खाली पडलेल्या मुकूटाला उचलून परत राजाच्या डोक्यावर ठेवतो."
हे विशेष !
7 Apr 2016 - 12:50 pm | सिरुसेरि
"रुमीच्या नीतीकथा" याही अशाच उपरोधीक आहेत .
7 Apr 2016 - 12:51 pm | नाना स्कॉच
एकच नंबर!!! खलील जिब्रान!! काय माणुस आहे राव!!.
असेच एक आवडते व्यक्तिमत्व म्हणजे जलालुद्दीन मोहम्मद रूमी !
आपापले कोष, कम्फर्ट झोन तोडून प्रगती करा ह्या आशयाचा रुमीचा खालील कोट लैच आवडतो
“Run from what's comfortable. Forget safety. Live where you fear to live. Destroy your reputation. Be notorious. I have tried prudent planning long enough. From now on I'll be mad."
7 Apr 2016 - 11:11 pm | उगा काहितरीच
हे अतिशय आवडले आहे. पण खेदाने म्हणावेसे वाटतेय की नॉर्मल लोकांना शक्य नाही.
8 Apr 2016 - 12:55 am | अर्धवटराव
त्यात खेद अॅज सच काहि नाहि. बरेच लोक्स सामान्य आहेत म्हणुन काहिंना असं नटॉरिअस वगैरे जगायची इच्छा करण्याची चैन परवडते. शिवाय, आपल्याकडे जे नाहि त्याकडे मनाचा कल असतो. जीवन चांगलं चाललय ना, मग घाला त्यात काड्या.
ता.क. : हे तुम्हाला पर्सनली उद्देशुन नाहि हो.
9 Apr 2016 - 11:35 am | मराठी_माणूस
१००% खरे
7 Apr 2016 - 6:27 pm | जव्हेरगंज
शेवट कळला नाही ब्वॉ!
पण तरीही आवडली !!
7 Apr 2016 - 6:34 pm | विजय पुरोहित
खलिल जिब्रानचा अख्खा ठोकळा वाचलाय. मला अतिशय आवडलेलं पुस्तक. यासारख्या अनेक सुंदर कथा आहेत.
असो. आवडले भाषांतर
7 Apr 2016 - 10:54 pm | चांदणे संदीप
खलील जिब्रान रॉक्स सो ॲज तजो!
अजून येऊ द्या!
Sandy
7 Apr 2016 - 11:14 pm | पैसा
उत्तम भावानुवाद!
7 Apr 2016 - 11:33 pm | श्रीरंग_जोशी
खूप आवडलं.
8 Apr 2016 - 12:57 am | अर्धवटराव
हे कथेचं भाषांतर वाटतय, स्मार्टकथेचा बाज नाहि आला.
8 Apr 2016 - 1:02 am | तर्राट जोकर
हो भाषांतरच आहे. कथा चांगली वाटली ती इथवर पोचवण्यासाठी भाषांतर. आम्ही जयंत कुलकर्णी ह्यांच्या लेवलवर नाही जाउ शकत. आमची गरिबाची शब्द टू शब्द भाषांतरीत कथा गोड मानून घ्या गडेहो. :)
8 Apr 2016 - 1:14 am | अर्धवटराव
तुमचा एकुण मिपा रेकॉर्ड तर भारी आहे :)
8 Apr 2016 - 1:02 am | अभ्या..
च्यायला हे खलील जिब्रानच्या कथा वाचायच्यात राव सगळ्या. चांगले भाषांतर सुच्वा नायतर करा यार कुणीतरी.
आमचं इन्ग्लिश लैच नॉटोन्लीबटाल्सो हाय. :(
8 Apr 2016 - 11:35 pm | शिव कन्या
अभ्या , हे घ्या.... एवढं करून ठेवलंय!
http://www.misalpav.com/node/30812
http://www.misalpav.com/node/30831
http://www.misalpav.com/node/30860
http://www.misalpav.com/node/30885
http://www.misalpav.com/node/30905
http://www.misalpav.com/node/30939
8 Apr 2016 - 1:15 am | तर्राट जोकर
रसिक वाचकांचे आभार. धन्यवाद.
8 Apr 2016 - 1:17 am | तर्राट जोकर
एक राहिलंच.
ही सगळी कृपा त्या खलील रायाची
आमची भूमिका पालखीच्या भोयाची.
धन्स! :-)
8 Apr 2016 - 10:42 am | बोका-ए-आझम
कथाही सुंदर आहे!
8 Apr 2016 - 10:53 am | विशाखा पाटील
अनुवाद छान! कथेत किती अर्थ दडलाये! खलील जिब्रानचे मराठीत 'द प्रोफेट' व्यतिरिक्त अजून काही अनुवादित झालेय का?
8 Apr 2016 - 1:02 pm | गामा पैलवान
तजो,
क्या बात है. कथा जबरदस्त आहे. रूपक नेहमीचंच आहे पण वेगळ्या रूपात भेटलंय. :-)
गुलाम = इंद्रिये
थेरडी = वासना
मांजर = बुद्धी
स्वप्न = वासनेचा सद्वासनेत परिवर्तित व्हायचा प्रयत्न
स्वप्नार्थ = उपरोक्त प्रयत्नांतील अपयश
प्रत्येक पात्र जडस्थ (=status quo) बदलायची क्षमता दुसऱ्यांत आहे असं धरून चाललंय. यातून काय बोध घ्यायचा ते उघड आहे.
आ.न.,
-गा.पै.
9 Apr 2016 - 8:56 am | lakhu risbud
छान रूपक कथा.गा पै यांनी दिलेले अर्थ घेऊन कथा पुन्हा वाचली,नवीन भावार्थ ध्यानात आला,
12 Apr 2016 - 3:47 pm | नाखु
छान रूपक कथा.
गा पैंनी जो आयाम दिला तो जास्ती रोचक आणि साक्षात्कारी वाटला... सुटसुटीत तरी बंदा रुपया अनुभव.
त.जो.
धन्य्वाद, धुराळा/धुराडे/धगी/धुमाकुळ धागे धडक्मुक्त धाडला !
दूर देशी, देणे दु:खाइतांचे ,दाखवा दैव अन दैन्य दुरीतांचे !
8 Apr 2016 - 1:29 pm | पिलीयन रायडर
मस्तच!
8 Apr 2016 - 2:22 pm | राही
कथा आवडली. अनुवादही आवडला.
खलिल जिब्रान आवडतोच.
8 Apr 2016 - 2:59 pm | lgodbole
छान
8 Apr 2016 - 11:22 pm | शिव कन्या
जमलेय. पण मूळ कथेचे नाव, पुस्तकाचे नाव दिले असते तर उत्तम! भाषांतर करताना तो उल्लेख जरूर असावा!
8 Apr 2016 - 11:27 pm | तर्राट जोकर
ओके. नक्की टाकतो.
8 Apr 2016 - 11:53 pm | रेवती
कथा आवडली.
9 Apr 2016 - 8:08 am | भंकस बाबा
कथा आवडली. असच काहीतरी हलकफुलक टाकत जा.
ही विनंती आहे साहेब, धमकी नाही!
9 Apr 2016 - 11:22 am | तर्राट जोकर
=))
9 Apr 2016 - 1:02 pm | सविता००१
खूप आवडली कथा
9 Apr 2016 - 3:13 pm | नीलमोहर
कथेत बरेच छुपे अर्थ लपलेत असं वाटतंय.
12 Apr 2016 - 1:51 pm | तर्राट जोकर
माननीय साहित्य संपादक, खाली माहिती मूळ लेखात जोडावी ही विनंती.
मूळ कथा: The Lion's Daughter
मूळ लेखक : Khalil Jibran
पुस्तकाचे नाव:The Forerunner
प्रथम प्रकाशन: 1920