नमस्कार,
कवी धूमिल ह्यांची शहर का व्याकरण ही कविता वाचली, फार दुर्बोध वाटते. तरी अनुवाद करावीशी वाटली. काही चुकलं असेल तर दुरुस्ती सुचवावी. काही बदल आवश्यक असतील तर करुयात.
शहराचे व्याकरण
–
शहराचे व्याकरण नीट करायला
एक सरकारीगाडी
गस्त घालत आहे
निवडणूकीच्या पोश्टरातून निघून
एक माणूस रस्त्यावर आला आहे
आसमंत शांततेने भरलेला आहे.
संध्याकाळचे सात वाजलेत
भाषेच्या चौथ्या प्रहराला
"मी नियंता आहे" चा मु़खवटा उतरवुन
तो विदूषक
त्या शो-केससमोर उभा आहे
ज्यात बूट
मसाला पानांच्या रांगांसारखे रचून ठेवलेत
आणि एक भांडकुदळ माणूस विदेशी पर्यटकाचा
पाठलाग करतोय
त्याच्या तोंडी आपल्याकडे गायल्या जाणार्या
अरण्यगीताचा मधुर छंद आहे
(पुढे रस्ता बंद आहे)
लाल दिवा जळतोय
फर्माईशी गीतांच्या ओळखीच्या आवाजात
सीमेवरील तैनात सैनिकांचे धैर्य
प्रचंड आहे.
आज प्रत्येक वस्तूला एक नाव आहे
लोकांच्या सुविधेसाठी
बाजार - सत्य आहे
ही महागाईच आहे
तिने बाजाराला खुबीने टाळले आहे
लोक येत आहेत, जात आहेत
आणि आनंदात आहेत की खूप सुख मिळवत आहेत
पण ऐकाहो! तुम्ही तुमच्या कुत्र्याला
भरदिवसा असे मोकळे का सोडले
त्याला पकडून घेऊन जाण्याआधी
आणि शस्त्रक्रियेच्या
कसल्याशा विचारधारेला सिद्ध करतांना
हॉस्पीटलमधे बळी जाण्याआधी
तुम्हाला जर त्याला नगरपालिकेच्या पंजापासून
वाचवायचं असेल तर
त्याच्या गळ्यात एक पट्टा घालून टाका हो
खरंच ही अगतिकता आहे
पण जीवंत राहण्यासाठी
पाळीव असणे गरजेचे आहे.
मूळ हिंदी काव्य
शहर का व्याकरण
शहर का व्याकरण ठीक करने के लिए
एक हल्लागाड़ी
गश्त कर रही है
चुनाव के इश्तहार से निकलकर
एक आदमी सड़क पर आ गया है
आसमान में सन्नाटा छा गया है
शाम के सात बजे हैं
भाषा के चौथे पहर में
‘मैं प्रभु हूँ’ का चेहरा उतार कर
वह विदूषक
उस शो-केस के सामने खड़ा है
जिसमें जूते –
पान की गिलौरियों की तरह सजे हैं
और एक रर्रा विदेशी पर्यटक का
पीछा कर रहा है
उसकी ज़ुबान पर अपने यहाँ गाये जानेवाले
जंगल-गीत का प्यारा-सा छन्द है
(आगे सड़क बन्द है)
लाल बत्ती जल रही है
फर्माइशी गीतों की परिचित आवाज़ में
सीमा पर तैनात जवानों का हौसला
बुलन्द है
आज हर चीज़ एक नाम है
लोगों की सुविधा के लिए
बनिया – सच्चाई है
यह महँगाई है
जिसने बाज़ार को चकमा दिया है
लोग आ रहे हैं – जा रहे हैं
और ख़ुश हैं कि भीड़ सुख पा रहे हैं
मगर सुनो ! तुमने अपने कुत्ते को
दिन में क्यों खोल दिया है
इसके पहले कि वह पकड़ लिया जाय
और चीड़-फाड़ की
किसी धारणा को साबित करते हुए
अस्पताल में हलाल हो
अगर तुम उसे नगरपालिका की नज़र से
बचाना चाहते हो –
उसके गले में एक पट्टा डाल दो
सचमुच मज़बूरी है
मगर ज़िन्दा रहने के लिए
पालतू होना ज़रूरी है।
प्रतिक्रिया
30 Mar 2016 - 8:39 pm | शिव कन्या
विचार करण्यास प्रवृत्त करणारी कविता!
अनुवाद चांगला जमलाय.
'कसल्याशा विचारधारेला सिद्ध करण्यासाठी'असे जास्त मार्मिक होईल!
अर्थात हे व्यक्तिगत interpretation!!
30 Mar 2016 - 9:16 pm | तर्राट जोकर
धन्यवाद. तुम्ही सुचवलेले जास्त चांगले आहे.
30 Mar 2016 - 9:33 pm | श्रीरंग_जोशी
हेच म्हणतो.
30 Mar 2016 - 10:17 pm | दमामि
वा!!!!
31 Mar 2016 - 3:29 pm | जव्हेरगंज
वा!!!!