साहित्य अकादमी पुरस्कार विजेते रघुवीर सहाय यांची ही कविता.
आज हसा, हसा लवकर हसा
हसा तुमच्यावर लक्ष ठेवून आहेत
हसा स्वतःवर नका हसू कारण त्यातला कडवटपणा पकडला जाइल
आणि तुम्ही फुकट मराल
असं हसा की खूप जास्त आनंदी आहात असं वाटायला नको
नाहीतर संशय घेतील का ह्या माणसाला लाजलज्जा बिल्कूल नाही
आणि फुकट मराल
हसता हसता कुणाला जाणवू देऊ नका कोणावर हसताय ते
सगळ्यांना वाटू देत की तुम्ही सर्वांसारखेच पराभूत होऊन
एक आपुलकीचे हास्य करत आहात
जसे सगळे करतात बोलण्याऐवजी
जेवढा वेळ उंच गोल गाभारा प्रतिध्वनींनी भरुन राहील, तितका वेळ
तुम्ही तुमचं काय ते बोलून घेऊ शकता
प्रतिध्वनी ओसरता ओसरता परत हसा
कारण तुम्ही गप्प आढळले तर प्रतिवादाच्या गुन्ह्यात फसाल
शेवटी हसलात तर सगळे तुमच्यावर हसतील व तुम्ही सुटाल
हसा पण थट्टा-मस्करी टाळा
त्यात शब्द आहेत
उगाच त्यात असे अर्थ नसू देत जे कोणी शंभर वर्षाआधी दिले असतील
उत्तम तर तेच आहे की जेव्हा काही बोलाल तेव्हा हसा
म्हणजे कसल्याच बोलण्याला काही अर्थच राहणार नाही
आणि अशा वेळी हसा
जेव्हा बंधनकारक असेल
जशी दुर्बल बाहुबलींचा मार खातांना'ची
जिथे कोणी काही करु शकत नाही
त्या दुर्बल इसमाशिवाय
आणि तो ही बर्याचदा हसतच असतो
हसा हसा लवकर हसा
याआधी की ते निघून जातील
त्यांच्याशी हस्तांदोलन करतांना
नजर झुकवून
त्यांना आठवण करुन देत हसा
की तुम्ही कालही हसला होतात.
_____________________
_____________________
मूळ काव्य
आज हंसो हंसो जल्दी हंसो
-रघुवीर सहाय
हंसो तुम पर निगाह रखी जा रही जा रही है
हंसो अपने पर न हंसना क्योंकि उसकी कड़वाहट पकड़ ली जाएगी
और तुम मारे जाओगे
ऐसे हंसो कि बहुत खुश न मालूम हो
वरना शक होगा कि यह शख़्स शर्म में शामिल नहीं
और मारे जाओगे
हंसते हंसते किसी को जानने मत दो किस पर हंसते हो
सब को मानने दो कि तुम सब की तरह परास्त होकर
एक अपनापे की हंसी हंसते हो
जैसे सब हंसते हैं बोलने के बजाए
जितनी देर ऊंचा गोल गुंबद गूंजता रहे, उतनी देर
तुम बोल सकते हो अपने से
गूंज थमते थमते फिर हंसना
क्योंकि तुम चुप मिले तो प्रतिवाद के जुर्म में फंसे
अंत में हंसे तो तुम पर सब हंसेंगे और तुम बच जाओगे
हंसो पर चुटकलों से बचो
उनमें शब्द हैं
कहीं उनमें अर्थ न हो जो किसी ने सौ साल साल पहले दिए हों
बेहतर है कि जब कोई बात करो तब हंसो
ताकि किसी बात का कोई मतलब न रहे
और ऐसे मौकों पर हंसो
जो कि अनिवार्य हों
जैसे ग़रीब पर किसी ताक़तवर की मार
जहाँ कोई कुछ कर नहीं सकता
उस ग़रीब के सिवाय
और वह भी अकसर हंसता है
हंसो हंसो जल्दी हंसो
इसके पहले कि वह चले जाएँ
उनसे हाथ मिलाते हुए
नज़रें नीची किए
उसको याद दिलाते हुए हंसो
कि तुम कल भी हंसे थे!
प्रतिक्रिया
1 Apr 2016 - 3:59 pm | पुंबा
खूप आवडलिये हि कविता.. रशियन लोक हे भयान वास्तव जगले आहेत..