मिपावरची रहदारी जोरात आहे सध्या, भरपूर नवीन सदस्य येत आहेत...
तर नवनवीन सदस्यांना असलेली माहिती तपासून पाहण्यासाठी आणि आपल्याला काय माहिती असलं पाहिजे हे समजण्यासाठी ही एक प्रश्नपत्रिका.
( अर्थात अभ्यासक्रम व्यापक आहे, आणि प्रश्नपत्रिका अतिशय छोटी आहे..ती सर्वसमावेशक आहे असा अजिबात दावा नाही... खूप महत्त्वाचे उल्लेख राहिले असणार... आपण आपापले प्रश्न प्रतिसादात लिहू शकता..)
संदर्भासहित स्पष्टीकरण करा.
१. झेपेल तितका वेळ चालवेन नाहीतर बंद करून टाकेन.
२.शुभे़च्छा आहेतच पण लोकशाही आली तर बरं होईल.
३.मी आंतरजालीय शरद पवार आहे.
४.शुद्धलेखनाची व्यर्थ ट्यॊंवट्यॊंव चालणार नाही.
थोडक्यात उत्तरे लिहा.
१.दक्षिणेकडे पाय करून झोपले तर काय घडेल?
२.प्रतिसादात्मक पाठ खाजवाखाजवी म्हणजे काय ? दोन उदाहरणे द्या.
३.इनो या भुकटीची आंतरजालीय लोकप्रियता यावर काही वाक्ये लिहा.
४.फ़ेक आय्ड्यांचा वापर तोलून मापून कसा करावा ?
५.विशिष्ट सेवा पुरवणार्या स्त्रियांच्या पाठीला साबण चोळणे म्हणजे काय?
६.स्वत:च्या प्रतिभेच्या नकारात्मक वापराची काही उदाहरणे द्या.
७.पवित्र स्थळांचे पावित्र्य कसे राखावे हे सिंहगडाचे उदाहरण घेऊन स्पष्ट करा..
८.स्वत:च्या धाग्यांना प्रतिसाद वाढवायच्या उपायांपैकी कोणतेही पाच उपाय लिहा.
सविस्तर टीपा लिहा
१.अनिवासी भारतीयांवरील नेहमीचे आरोप आणि त्यांचे खंडन
२.सिंगल माल्टची दीक्षा
३.मामलेदार मिसळ
४.द्राक्षासवाचा अंमल
५.सात्विक कट्ट्यांची गरज
६.अष्टविनायकांचा महिमा
७. राक्षसी मीटरतरंग दुर्बिणीचे सामाजिक उपयोग.
८.धुक्यात हरवलेला "पिंजरा"
९.क्रमश: लेखनाची आवश्यकता
१०.ज्योतिष : शास्त्र,गरज आणि दिलासा
११. मराठी संस्थळांचा तौलनिक अभ्यास
१२. निरर्थक कौल : प्रवृत्ती आणि टाळण्याचे उपाय
१३. शंभर धाग्याSरंभांचा आनंद
१४.प्रेमकूजनातील उसाच्या कांडक्याचे महत्त्व
१५.एप्रिल महिन्यातील फ़ळाचा व्यापार.
१६.न झालेली खोडदची सहल
१७.शमसुद्दिन ग्यासुद्दिन
१८. विलासी जीवनातील व्यायामाचे महत्त्व.
दीर्घोत्तरी प्रश्न.
१.प्रचंड प्रतिसाद म्हणजेच उच्च दर्जा नव्हे... हे वाक्य सोदाहरण स्पष्ट करा.
२”संगीतातले व्याकरण चालेल’ पण ”पद्यातले छंदवृत्ताचे व्याकरण त्याज्य’ असे का ?
३.मराठी आंतरजाल हे एक डबके आहे काय? असल्यास का? नसल्यास का?
४"राजकारणाप्रमाणेच आंतरजालातही कोणाशी कायमचे शत्रुत्त्व नसते " हे वाक्य सोदाहरण स्पष्ट करा.
५."अहंकार डिवचला गेल्यास नवनिर्मिती होते" हे सोदाहरण स्पष्ट करा.
६.फ़रक स्पष्ट करा... " आणीबाणी" आणि " प्रशासकीय अनुमती"
७. "आंतरजालीय शांतताभंग" अर्थात "शांत वातावरणात अचानक धुरळा कसा उडवावा" हे स्पष्ट करा.
८.मराठी जनांमधील प्रांतिक भेदाभेदाची कारणे पुढील उदाहरणे घेऊन स्पष्ट करा.
पुणेकर / मुंबईकर , अनिवासी / निवासी , ईष्ट कोष्ट / वेष्ट कोष्ट ...
९.बे एरियातल्या साहित्य संमेलनाविषयी दोन्ही बाजू स्पष्ट करा.
प्रतिक्रिया
14 Sep 2008 - 3:45 pm | ब्रिटिश टिंग्या
साडेसहाशे ओळीत उत्तरे द्या.
१. कंपुबाजी म्हणजे काय व ती कशी चालवतात?
२. साताजन्माचा मित्र असुनही पाठीत खंजीर कसा खुपसावा?
३. खरडफळ्यावर निरर्थक विषय वारंवार कसे चावावेत?
४. खरडवहीचे फायदे-तोटे विषद करा.
(बि.क्र. ३६७) टिंग्या
14 Sep 2008 - 3:56 pm | शैलेन्द्र
"फाट्यावर मारणे" हींसक की अहींसक? स्पष्ट करा....
14 Sep 2008 - 4:45 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
संदर्भासहित स्पष्टीकरण द्या.
१. "मुझसे दोस्ती करोगी" व्हायरसपासून सुटका मिळवण्याचे कमीतकमी चार उपाय सांगा.
२. जुन्या सदस्यांचं नवीन सदस्यांनी स्वागत केलं तर जुन्या सदस्यांच्या मित्र-मैत्रिणींनी आपल्या संबंधित मित्रांचं स्वागत करावं का?
३. "आ बैल मुझे मार" असं वारंवार सुचवणाय्रा सदस्यांची चारचौघात खेचावी का?
४. आपल्या आयुष्यात शनि-मंगळ युती आली हे कसे समजावे?
५. पाऊस बघून कोरडे रहाण्यास कारणीभूत कोण, शनि-मंगळ युती का इजाभौ?
६. सदस्यनामात बदल झाल्यास वारंवार चौकश्या कराव्यात का?
15 Sep 2008 - 12:46 am | मेघना भुस्कुटे
जबरा मास्तर! आता उत्तरपत्रिकापण येऊ द्या की!
15 Sep 2008 - 1:07 am | आनंदयात्री
=)) =)) =)) =))
मास्तरsssssss (घ्या नाव पण पिंजर्यातलच ;) )
जिंकल जिंकलं तुम्ही !!
सविस्तर प्रतिसाद .. अजुन २० तासांनी टाकतो .. अर्थात शक्य झाल्यास ;)
15 Sep 2008 - 1:09 am | पक्या
कोण ते ओळखा ?
पावसाची परी नक्की कोण ? विजूभाऊ, सखाराम गटणे की अजून कोणी ?
15 Sep 2008 - 1:16 am | ब्रिटिश टिंग्या
जबरा प्रश्न!
15 Sep 2008 - 1:41 am | टारझन
प्रश्नपत्रिका अवघड आहे. एटीकेटी किंवा जयकरची सोय आहे का ?
३. "आ बैल मुझे मार" असं वारंवार सुचवणाय्रा सदस्यांची चारचौघात खेचावी का?
आज्जे ... "त्या पेक्षा बोळा काढण्याचे उपाय " यावर ५०० ओळी निबंध्/प्रबंध लिहावा.
पावसाची परी नक्की कोण ? विजूभाऊ, सखाराम गटणे की अजून कोणी ?
पक्या मरतय आता.. ती परी आता ४ चौघात राडा करणार आता. (परी ही परीच आहे, याची खात्री गटणे आणि विजाभौंना आहे, यावर अधिक भाष्य नाही.)
योग्य जोड्या लावा .. असा ही कॉलम हवाय मास्तर .... ख.फ. काय अभ्यासक्रमातुन वगळला की काय ?
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
15 Sep 2008 - 2:21 am | भडकमकर मास्तर
ख.फ. काय अभ्यासक्रमातुन वगळला की काय ?
तिथला आमचा अभ्यास कमी पडतो...
तिथली जबाबदारी घ्या की तुम्ही...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
15 Sep 2008 - 2:23 pm | सखाराम_गटणे™
>>(परी ही परीच आहे, याची खात्री गटणे आणि विजाभौंना आहे, यावर अधिक भाष्य नाही.)
हे मला माहीत नाही,
विजुभौ आणि परी एकत्र साहीत्य साधना करतात असे मला समजले आहे.
15 Sep 2008 - 6:39 pm | अवलिया
विजुभौ आणि परी एकत्र साहीत्य साधना करतात असे मला समजले आहे.
साहित्य की साहिल त्या
अस बघा
विजुभौ आणि परी एकत्र साहील त्या साधना करतात असे मला समजले आहे.
15 Sep 2008 - 1:13 am | नंदन
अजून एक प्रश्न - बनी सध्या कुठल्या शहरात आहे?
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
15 Sep 2008 - 5:56 am | मदनबाण
मास्तर एकदम झ्याक प्रश्न पत्रिका ..
सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे का ? ऑपशनला काहीच टाकता येणार नाही का ?
ही प्रश्न पत्रिका किती मार्कांची आहे?
**** गाळलेल्या जागा भरा हा प्रश्न दिसला नाही !!
काही सदस्य एका पेक्षा जास्त आयडी बाळगुन असतात !! कारणे ध्या..
निबंध :-- विषय :-- पोळा.
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
15 Sep 2008 - 2:37 pm | भडकमकर मास्तर
बाणासाठी काही सायको प्रश्न काढून ठेवले पाहिजेत....
१.विद्यार्थ्यांवर खुन्नस ठेवून त्यांना त्रास देणार्या क्रूर प्राध्यापकांशी कसे वागावे?
२.तर तुम्ही काय कराल?
समजा तुम्ही व्यावसायिक अभ्यासक्रम शिकवणार्या महाविद्यालयाचे प्राचार्य आहात आणि "एका खुनशी प्राध्यापकाला एके रात्री काही अज्ञात व्यक्तींनी घोंगडी टाकून बडवले" अशा अर्थाची तक्रार तुमच्याकडे आली...
सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे का ? ऑपशनला काहीच टाकता येणार नाही का ?
ही प्रश्न पत्रिका किती मार्कांची आहे?
सर्व प्रश्न सोडवलेच पाहिजेत... नाहीतर सबमिशनवर सही मिळणार नाही....
चूक आढळल्यास उत्तरपत्रिका फाडून टाकल्या जातील आणि पुन्हा लिहून आणाव्या लागतील.
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
15 Sep 2008 - 2:40 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
सर्व प्रश्न सोडवलेच पाहिजेत... नाहीतर सबमिशनवर सही मिळणार नाही....
चूक आढळल्यास उत्तरपत्रिका फाडून टाकल्या जातील आणि पुन्हा लिहून आणाव्या लागतील.
मास्तरांनी होमवर्क केलाय तर! ;-)
15 Sep 2008 - 6:14 am | रामदास
एक नविन धागा सुरु केलेला दिसतोय.
आता गाईड पण लिहावी लागतील. २१ अपेक्षीत प्रश्नांची उत्तरे .
काही प्रश्नांची उत्तरं मला पण सुचत नाही आहेत.
नापास होणार आम्ही.किंवा केटी लागणार.
http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.
15 Sep 2008 - 2:24 pm | भडकमकर मास्तर
एक मल्टिपल चॉइस प्रश्न
रामदास या आय्डीने इथे वावरणार्या व्यक्तीचा पोटापाण्याचा नक्की व्यवसाय काय असावा?
अ.पोलीस अधिकारी
ब.शेअर दलाल
क.बँक ऑफिसर
ड. न्यायदान खात्यात अधिकारी
इ. सर्जन / फिजिशिअन
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
15 Sep 2008 - 2:27 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
यात "इतर" असा पर्याय नाही का? ;-)
15 Sep 2008 - 2:31 pm | सहज
ऑल द अबॉव्ह एन्ड मोअर
:-)
15 Sep 2008 - 9:17 am | ऋचा
संदर्भासहित स्पष्टीकरण द्या.
१. "मुझसे दोस्ती करोगी" व्हायरसपासून सुटका मिळवण्याचे कमीतकमी चार उपाय सांगा.
२. जुन्या सदस्यांचं नवीन सदस्यांनी स्वागत केलं तर जुन्या सदस्यांच्या मित्र-मैत्रिणींनी आपल्या संबंधित मित्रांचं स्वागत करावं का?
३. "आ बैल मुझे मार" असं वारंवार सुचवणाय्रा सदस्यांची चारचौघात खेचावी का?
हेच प्रश्न मलाही आहेत.
मस्त धागा सुरु केलाय मास्तर!!! :)
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
15 Sep 2008 - 12:57 pm | विजुभाऊ
१४.प्रेमकूजनातील उसाच्या कांडक्याचे महत्त्व
=))
१५.एप्रिल महिन्यातील फ़ळाचा व्यापार. =)) मास्तर आता थांबा भाजीचे दुकानच टाकतो शेपु पडवळ वांगी तोंडली यावर तीस भागाची क्रमशः मल्लीका टाकतो :)
तुमच्या प्रश्नाना सर्वानी प्रश्नच सुचवले आहेत
मी तुमच्या एका प्रश्नाचे सर्रळ उत्तर देतो
.दक्षिणेकडे पाय करून झोपले तर काय घडेल?
डोके उत्तरेकडे होईल.
(या एका उत्तरावर पास कराल का? टीपः उत्तरपत्रिकेत प्रत्येक पानावर मी एक एक आकडी क्रमांक लिहीला आहे. सर्व पानांवरचे क्रमांक एकापुढे एक मांडा . येणारा क्रमांक माझा भ्रमणध्वनी असेल )
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
15 Sep 2008 - 2:40 pm | अभिज्ञ
आमचे हि काहि प्रश्न.
योग्य पर्याय निवडा.
भडकमकर मास्तर पोटापाण्याकरिता ह्या पैकी कुठले उद्योग करतात?
१.भडकमकर करियर गायडन्स ऍकॅडेमी चालवतात.
२.रेखाचित्रे काढतात.
३.शिल्पकला करतात..
४.नाटक कंपनीत कामाला आहेत.
५.जुन्या व परत कधीहि रंगमंचावर न येणा-या नाटकांचे परिक्षण लिहितात.
६.क्रिकेट अम्पायरिंग करतात.
७.ह्या सर्वातुन वेळ उरलाच तर दंतवैद्यकी करतात.
अभिज्ञ.
15 Sep 2008 - 2:46 pm | विजुभाऊ
योग्य पर्याय निवडा.
भडकमकर मास्तर पोटापाण्याकरिता ह्या पैकी कुठले उद्योग करतात?
ते दात कोरुन पोट भरतात
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
15 Sep 2008 - 2:53 pm | विसोबा खेचर
१. झेपेल तितका वेळ चालवेन नाहीतर बंद करून टाकेन.
खरं आहे! :)
२.शुभे़च्छा आहेतच पण लोकशाही आली तर बरं होईल.
बघू! :)
३.मी आंतरजालीय शरद पवार आहे.
असं काही संस्थळांचे लोक म्हणतात! :)
४.शुद्धलेखनाची व्यर्थ ट्यॊंवट्यॊंव चालणार नाही.
नक्कीच चालणार नाही! :)
३.इनो या भुकटीची आंतरजालीय लोकप्रियता यावर काही वाक्ये लिहा.
काही सभासदांची नावे व्य नि ने पाठवीन, त्या सभासदांना विचारा! ही मंडळी मिपाचे सभासद आहेत परंतु कट्टर मिपाकर नव्हेत!
५.विशिष्ट सेवा पुरवणार्या स्त्रियांच्या पाठीला साबण चोळणे म्हणजे काय?
मास्तर, त्याकरता दुनिया बघावी लागते! :)
२.सिंगल माल्टची दीक्षा
सवडीने भेटा, नक्की देईन.. :)
३.मामलेदार मिसळ
कधीही या, प्रेमाने खायला घालीन! :)
४.द्राक्षासवाचा अंमल
त्याबद्दल येथील काही काकांना विचारा! :)
५.सात्विक कट्ट्यांची गरज
पुरे झाले ते सात्विक कट्टे! आता पुण्यात एक खर्या अर्थाने सात्विक कट्टा होत आहे, ज्यात आपल्याला खर्या अर्थाने सत्व सापडेल! :)
८.धुक्यात हरवलेला "पिंजरा"
ह्याबाबत वरचेवर पोटदुखी झाल्यामुळे इनो वापरणारी मंडळी अधिक बोलू शकतील. तसेच मिपाच्या आणि मिपाकरांच्या जिवावर जगणारे काही ब्लॉगकर्तेही यावर बोलू शकतील! :)
९.क्रमश: लेखनाची आवश्यकता
रौशनी संपेपर्यंत तरी आहे! रौशनी आम्ही दिवाळीत प्रसिद्ध करू!
११. मराठी संस्थळांचा तौलनिक अभ्यास
ह्या बाबत अन्य काही संस्थळावरच्या काही स्त्री सदस्या मिपावर येऊन येथील सभासदांना "दिवाळी अंकाकरता एखादा ललित लेख, निदान एखादी कविता तरी द्या हो प्लीज!" असं विचारताहेत, त्या अधिक सांगू शकतील! :)
१४.प्रेमकूजनातील उसाच्या कांडक्याचे महत्त्व
हे पाहा म्हणजे लक्षात येईल.. :)
२”संगीतातले व्याकरण चालेल’ पण ”पद्यातले छंदवृत्ताचे व्याकरण त्याज्य’ असे का ?
याचे उत्तर होऊ घातलेल्या सत्विक कट्ट्यावर मिळेल! :)
३.मराठी आंतरजाल हे एक डबके आहे काय?
कोण म्हणतं असं? आम्ही त्याला फाट्यावर मारतो...! :)
४"राजकारणाप्रमाणेच आंतरजालातही कोणाशी कायमचे शत्रुत्त्व नसते " हे वाक्य सोदाहरण स्पष्ट करा.
हल्ली माझं आणि सर्किटचं बरं आहे! :)
परंतु कायमचं शत्रूत्वही असतं! कुपुत्र-कुमातेची नको तिथे गरळ ओकणार्यांशी आमच कायमचं शत्रूत्व आहे!
असो...
मास्तर, धम्माल प्रश्नपत्रिका! काही प्रश्नांची उत्तरे द्यायचा प्रयत्न केला आहे. :)
तात्या.
15 Sep 2008 - 4:23 pm | जैनाचं कार्ट (not verified)
१०० पैकी १०० मार्क.... पुर्ण समाधान झालं.... उत्तरे वाचून :)
राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग
15 Sep 2008 - 2:53 pm | मन
प्रश्न!
मस्त हाणल्यात टपल्या...
आपलाच,
मनोबा
15 Sep 2008 - 6:33 pm | विनायक प्रभू
http://vipravani.wordpress.com/
आपण खरे दंतवैद्य आहात हे खरोखर पट्ले.
वि.प्र.
15 Sep 2008 - 10:29 pm | सर्किट (not verified)
मास्तर !
मस्त प्रश्नपत्रिका !
पण शेवटी, ह्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिल्यास, तुमच्या डोक्याची शंभर शकले होऊन तुमच्याच पायावर लोळू लागतील, वगैरे फलश्रुती नाही लिहिलीत ??
-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
15 Sep 2008 - 10:37 pm | यशोधरा
एटीकेटीची सोय आहे का??
16 Sep 2008 - 1:09 pm | आंबोळी
२.शुभे़च्छा आहेतच पण लोकशाही आली तर बरं होईल. =))
३.मी आंतरजालीय शरद पवार आहे. =))
२.प्रतिसादात्मक पाठ खाजवाखाजवी म्हणजे काय ? दोन उदाहरणे द्या. =))
६.स्वत:च्या प्रतिभेच्या नकारात्मक वापराची काही उदाहरणे द्या. =))
७.पवित्र स्थळांचे पावित्र्य कसे राखावे हे सिंहगडाचे उदाहरण घेऊन स्पष्ट करा.. =)) =))
१३. शंभर धाग्याSरंभांचा आनंद =)) =)) =))
१५.एप्रिल महिन्यातील फ़ळाचा व्यापार. =)) =))
आंबोळी
19 Mar 2009 - 6:36 pm | अभिज्ञ
मास्तर,
प्रश्नपत्रिकेत नवीन काहि ऍडिशन कधी करणार?
अभिज्ञ.
19 Mar 2009 - 6:56 pm | अनंता
प्रतिसादांना वेगळे वळण कसे द्याल ?
|| जय-गणेश ||
19 Mar 2009 - 7:17 pm | परिकथेतील राजकुमार
डुप्लिकेट आय.डी कसे ओळखाल हा महत्वाचा प्रश्न इथे कोणीच विचारलेला दिसत नाही B)
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य