गणेशभक्त सलमान!

सर्वसाक्षी's picture
सर्वसाक्षी in जनातलं, मनातलं
14 Sep 2008 - 10:41 am

बेफाम गाडी चालवुन केलेला अपघात, केलेले तमाशे वगैरेसाठी कुप्रसिद्ध झालेल्या सलमानने घरात गणपती बाप्पांना आणले, त्यांची सहकुटुंब पूजा अर्चा केली. या कृत्यामुळे मुल्ला मौलवी व धर्मांध संघटनांनी त्याच्याविरुद्ध फतवा काढला आहे. यावर प्रतिक्रिया देताना सलमानने 'या धर्मगुरुंनी दहशतवाद व दहशतवादी यांच्याविरूद्ध फतवा का बरे काढला नाही?' आणि "या सर्वधर्मसमभावी देशात कुणाही धर्मीयास कोणत्याही धर्माचे पालन करण्याची पूर्ण मुभा आहे' असे म्हटले आहे.

हिंदु संघटनांनी केलेल्या आवाहनांवर आगपाखड करुन या संघटनांना अतिरेकी, प्रतिगामी, समाजघातकी, मूलतत्ववादी, धर्मांध वगैरे विशेषणे बहाल करुन त्यांचा धिक्कार करणारे व आवाहन करणार्‍या संघटनांवर बंदी घालण्याची मागणी करणारे 'समाजवंत व विचारवंत' या फतव्याविरोधात मात्र अद्याप मूग गिळुन आहेत. चालायचेच.

हिंदु संघटनांनी वा संस्थांनी एखाद्या नाटकाला/ चित्रपटाला हरकत घेत त्याचे प्रयोग बंद पाडायचा प्रयत्न करताच 'कलेच्या स्वातंत्र्याची गळचेपी' सहन न झालेले सप्तस्वातंत्र्याचे तमाम उद्गाते जेव्हा हुसेन निर्मित चित्रपटातील काही भागाला मुस्लिम संघटनांनी आक्षेप घेतला व हुसेन साहेबांनी तो भाग विनाशर्त काढुन टाकला तेव्हाही असेच गपचूप बसलेले होते.

संस्कृतीधर्मसमाजजीवनमानसद्भावनाबातमी

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

14 Sep 2008 - 10:59 am | विसोबा खेचर

या कृत्यामुळे मुल्ला मौलवी व धर्मांध संघटनांनी त्याच्याविरुद्ध फतवा काढला आहे. यावर प्रतिक्रिया देताना सलमानने 'या धर्मगुरुंनी दहशतवाद व दहशतवादी यांच्याविरूद्ध फतवा का बरे काढला नाही?'

सलमानचा हा प्रश्न रास्त वाटतो...!

व आवाहन करणार्‍या संघटनांवर बंदी घालण्याची मागणी करणारे 'समाजवंत व विचारवंत' या फतव्याविरोधात मात्र अद्याप मूग गिळुन आहेत.

खरं आहे!

हिंदु संघटनांनी वा संस्थांनी एखाद्या नाटकाला/ चित्रपटाला हरकत घेत त्याचे प्रयोग बंद पाडायचा प्रयत्न करताच 'कलेच्या स्वातंत्र्याची गळचेपी' सहन न झालेले सप्तस्वातंत्र्याचे तमाम उद्गाते जेव्हा हुसेन निर्मित चित्रपटातील काही भागाला मुस्लिम संघटनांनी आक्षेप घेतला व हुसेन साहेबांनी तो भाग विनाशर्त काढुन टाकला तेव्हाही असेच गपचूप बसलेले होते.

सहमत आहे!

ठाण्याच्या गडकरी रंगायतनात "मी नथुराम गोडसे बोलतोय!" या नाटकावर युवा काँग्रेसने घातलेली बंदी आजही तशीच अबाधित आहे याची एक कलाप्रेमी ठाणेकर नागरीक म्हणून मला शरम वाटते!

असो...

तात्या.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Sep 2008 - 12:03 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

सलीम खान, सलमान खानचे वडील, शोले वगैरे हिट चित्रपटांचे सहपटकथाकार यांच्या "मटा"मधल्या एका लेखातला छोटासा भागः

मला कुणीतरी विचारलं, 'अखेर तुम्हा लोकांचा धर्म कोणता?' मी म्हणालो, 'जेव्हा आमच्या गाडीचा अचानक करकचून ब्रेक लागतो आणि आम्ही एखाद्या अपघातातून बचावल्याचं जाणवतं, तेव्हा माझ्या तोंडून नकळत उद्गार निघतो, 'अल्लाह खैर', माझ्या पत्नीच्या तोंडून निघतं, 'अरे देवा' आणि माझी मुलं एकत्रित उद्गारतात 'ओह शिट्'. आमच्या कुटुंबातील नॅशनल इंटिग्रेशनचा हा एक छोटासा फॉर्म्युला आहे.

सलीम खान यांचा संपूर्ण लेख इथेसापडेल.

सलमान खान या माणसाबद्दल काय मत बनवायचं मला अजूनही कळत नाही. जो माणूस बेफाम गाडी हाकून काही जीव घेतो, चिंकाय्रांची शिकार करतो त्याच्याचबद्दल वर्तमानपत्रात गरीबांना मदत केल्याचे किस्सेही वाचले आहेत.
आणि जो म्हणे समाजसेवकांच्या घरात जन्माला आला, त्याच्या घरात बंदूका सापडतात, त्याला सहा वर्षांची शिक्षाही होते.

भडकमकर मास्तर's picture

14 Sep 2008 - 12:09 pm | भडकमकर मास्तर

सलमान खान या माणसाबद्दल काय मत बनवायचं मला अजूनही कळत नाही.

आम्ही वैतागून या माणसावर / अशा प्रवृत्तीवर एक नाटक सुद्धा लिहिले आणि फायदा इतकाच झाला की त्यानंतर या माणसावरची स्वतःची चिडचिड कमी झाली ...
... आपल्याला न आवडणार्‍या माणसाने चांगले काही केले की हा सारा प्रसिद्धीचा स्टंट आहे असे म्हणायची पद्धत मीही बराच काळ अवलंबली :) ....त्यालाही काही अर्थ नाही... प्रत्येक माणूस प्रत्येक वेळेला वेगळा हेच खरे... लेबल लावणे अवघड...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Sep 2008 - 4:12 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रत्येक माणूस प्रत्येक वेळेला वेगळा हेच खरे... लेबल लावणे अवघड...

अगदी सहमत, १००%.

शैलेन्द्र's picture

14 Sep 2008 - 3:18 pm | शैलेन्द्र

"प्रत्येक माणूस प्रत्येक वेळेला वेगळा हेच खरे... लेबल लावणे अवघड..."

अगदी खर...........