मलेशियातील माझ्या घरचा गणेशोत्सव

वैशाली हसमनीस's picture
वैशाली हसमनीस in जनातलं, मनातलं
9 Sep 2008 - 9:28 pm

भारतातून मलेशियात येताना लवकर परत न येण्याची खात्री असल्यामुळे,टिटवाळ्याला जाऊन फायबरची सुबक,सुंदर गणेशमूर्ति विकत घेऊनच(गणपतिची किंमत पैश्यात करणे अशक्य म्हणून सांगत नाही) विमानांत बसलो.मलेशिया मुस्लिम देश असल्यामुळे थोडी भीती वाटत होतीच.पण त्या गणेशानेच सारे कांही निभावून नेले.कस्टम अधिकार्‍याने आमच्याकडे लक्षसुध्दा दिले नाही.उलट टॅ़क्सी मिळवून दिली.गणेशकॄपा ! त्यामुळे भाद्रपद शुध्द चतुर्थीला भारतीय शुभ वेळेनुसार सकाळी १०.३० वाजता आम्ही श्रीगणरायांची प्राणप्रतिष्ठा यथाविधि शास्रोक्तरित्या केली.पूजेचे पौरोहित्य मी व यजमानत्व मुलाने केले.दुपारी एकवीस उकडीच्या मोदकांचा नैवेद्यही दाखविला.

आमच्या कँपसमध्ये फक्त आमच्याकडेच गणपति असल्यामुळे खूप लोक दर्शनाला येऊन गेले.येथे गणपतिबद्दल लोकंमध्ये कमालीचे औत्सुक्य आहे.आमच्या टॅक्सीचालकापासून सर्वांनी दर्शन घेतले.दुसर्‍या दिवशी आम्हा 'सेमिलिंग सिस्टर्स"क्लबच्या महिलांचे भजन होते.त्यात सर्व देशवासी भगिनींनी आनंदाने भाग घेतला.प्रत्येकीने आपापल्या धर्मानुसार व प्रथेनुसार भजन/प्रार्थना म्हटल्या.त्यात इराणी,ब्रिटीश,मुस्लिम व विविध प्रांतीय भारतीय महिला होत्या.त्यांनी ह्या "एलिफंट हेडेड गॉड"विषयी अनेक प्रश्न विचारले.मी यथामति उत्तरे दिली.

शनिवारी सकाळी दरवर्षीप्रमाणे श्रीसत्यनारायणाची पूजा केली.मी पूजा सांगितली व माझ्या सूनेने ती केली.

संध्याकाळी गौरी बसविल्या.

रविवारी गौरीपूजन व भोजनाचा कार्यक्रम झाला.गौरीच्या सवाष्णी म्हणून विविध प्रांतीय महिलांना आमंत्रित केले होते.पुरणपोळीचा फक्कड बेत जमला होता.त्या महिलाही अत्यंत खुश झाल्या.सोमवार दि.८रोजी सायंकाळी श्रीगणपती व गौरींचे विसर्जन केले.पहिल्या दिवशी सोडलेल्या संकल्पानुसार दररोज अथर्वशीर्षाची १०० आवर्तने करुन अनंत चतुर्दशीपर्यंत सहस्त्रावर्तने एकट्याने पूर्ण करणार आहे.
सर्व पूजासाहित्य येथिल एका इंडियन स्टोअरमध्ये मिळाले.

योगायोगाने गणपतिचे आवडते जास्वंदीचे फूल हे येथिल राष्ट्रीय फूल मानले जात असल्यामुळे येथे जास्वंदीच्या बागाच बागा आहेत.
आमच्याकडुन आपली सेवा यथासांग करवून घेणार्‍या श्रीगणरायांच्या कृपेनेच हा सुयोग आमच्या जीवनात प्राप्त झाला.

गणपति बाप्पा मोरया!पुढल्या वर्षी लवकर या!!!
हा सण परदेशात भारतीय पध्दतीने साजरा करताना मला व माझ्या कुटुंबियांना जो अविस्मरणीय आनंद झाला तो मि.पा.च्या चोखंदळ आणि जिज्ञासू वाचकांमध्ये वाटावा ह्या आणि फक्त ह्याच हेतूने हा माहितीवजा लेख लिहिण्याचा हा माझा एक प्रयत्न!!

संस्कृतीधर्मलेखमाहितीआस्वाद

प्रतिक्रिया

सखाराम_गटणे™'s picture

9 Sep 2008 - 9:49 pm | सखाराम_गटणे™

वाह वाह,
अतिशय सुरेख असे फोटो आहेत.
आमच्याशी आंनद वाटुन घेतल्याने आम्हालापण आंनद झाला आहे.

प्राजु's picture

9 Sep 2008 - 10:02 pm | प्राजु

तुमचा हा अनुभव शब्दातीत आहेत..
सुंदर. परदेशात गणेशपूजन करता आले.. त्या श्री गणरायची कृपा.
अभिनंदन.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

यशोधरा's picture

9 Sep 2008 - 10:07 pm | यशोधरा

छान आहेत फोटो, आवडले. परदेशातही इतक्या उत्तम रीतीने गणेशपूजन केलेत! अभिनंदन!

रामदास's picture

9 Sep 2008 - 10:28 pm | रामदास

सुंदर सजावट. मनोमय पूजा.फलशृतीत दिलेली सर्व फळे आपणास मिळोत.
नवरात्रीच्या फोटोंची वाट बघतो आहे.

http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.

संदीप चित्रे's picture

9 Sep 2008 - 10:34 pm | संदीप चित्रे

खूपच सुरेख फोटो आणि परदेशातील गणपती उत्सव.

स्नेहश्री's picture

10 Sep 2008 - 9:29 am | स्नेहश्री

फोटो पण छान आणि बाप्पाचा उत्सव ही छान...आनंद झाला बघुन...

--@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@--
आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी
दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी
पण खुप काही देउन जातात हे
आयुष्यात पुढे जाण्यासाठी

मिंटी's picture

10 Sep 2008 - 10:41 am | मिंटी

वा वा !!!!!

परदेशातही इतक्या सुंदर रितीने तुम्ही केलेला गणेशोत्सव बघुन फार आनंद झाला....

आणि इतके सुंदर फोटो बघुन मन पण प्रसन्न झालं.....

धन्यवाद !! :)

llपुण्याचे पेशवेll's picture

10 Sep 2008 - 11:42 am | llपुण्याचे पेशवेll

वैशालीताई गणपतीं सारखे उत्सव मलेशियात देखील चालू ठेवणार्‍या तुमचे हार्दिक अभिनंदन. कधी जमले तर येईन गणपतीला तुमच्याकडे...
पुण्याचे पेशवे

वैशाली हसमनीस's picture

10 Sep 2008 - 12:17 pm | वैशाली हसमनीस

जरूर या.वाट पहात आहोत.

स्वाती दिनेश's picture

10 Sep 2008 - 12:01 pm | स्वाती दिनेश

मलेशियामध्ये बसविलेला गणपती आवडला.फोटो फारच छान.उकडीचे मोदक आणि जास्वंदींच्या ताज्या,टप्पोर्‍या फुलांनी भरलेल्या परडीने तर गणेशाचेही मन प्रसन्न झाले असेल.
स्वाती

वैशाली हसमनीस's picture

10 Sep 2008 - 12:24 pm | वैशाली हसमनीस

स्वाती,गणेशाचे मन प्रसन्न झाले की नाही ते माहीत नाही.पण आम्हा सर्वांची मात्र झाली.मन प्रसन्न झाले की सगळे जगच प्रसन्न वाटू लागते.''मन करा रे प्रसन्न सर्व सिध्दींचे कारण''
हे खरे ना?

वैशाली हसमनीस's picture

10 Sep 2008 - 12:13 pm | वैशाली हसमनीस

नमस्कार,बकासुर_सचिन,
लेख व फोटो पाहिले कां? चांगलीच जिरली ना? प्रतिक्रिया द्या.वाट पहात आहे.आपण व्य. नि.पाठ्वायचे व स्वत: मात्र स्वीकारायचे नाहीत,ही कुठ्ली पध्दत?

विसोबा खेचर's picture

11 Sep 2008 - 12:26 pm | विसोबा खेचर

अतिशय सुरेख आणि प्रसन्न चित्र आणि लेख!

आपली परवानगी गृहीत धरून लवकरच यातली दोन चित्र मिपाच्या डाव्या रकान्यात टाकत आहे...! :)

तात्या.

जैनाचं कार्ट's picture

11 Sep 2008 - 12:34 pm | जैनाचं कार्ट (not verified)

परदेशातही इतक्या सुंदर रितीने तुम्ही केलेला गणेशोत्सव बघुन फार आनंद झाला....

आणि इतके सुंदर फोटो बघुन मन पण प्रसन्न झालं.....

हेच म्हणतो !

राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

मदनबाण's picture

12 Sep 2008 - 9:46 am | मदनबाण

हेच म्हणतो..

मदनबाण.....

"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

वैशाली हसमनीस's picture

11 Sep 2008 - 1:21 pm | वैशाली हसमनीस

तात्या,परवानगी मागण्याची आवश्यकताच नाही.खुशाल टाकावेत.

एकलव्य's picture

12 Sep 2008 - 8:26 am | एकलव्य

सुबक गणेश, सुंदर आरास आणि सहज वर्णन... सारेच आवडले!

गणपति बाप्पा मोरया!!

सहज's picture

12 Sep 2008 - 8:28 am | सहज

..सारेच आवडले.

गणपतीबाप्पा मोरया..!

प्रभाकर पेठकर's picture

12 Sep 2008 - 10:03 am | प्रभाकर पेठकर

श्रीगणेशाच्या सुबक मुर्तीची सुरेख छायाचित्रे पाहायला आनंद झाला.
अभिनंदन.

नाटक्या's picture

12 Sep 2008 - 9:19 pm | नाटक्या

वा छानच आले आहेत फोटो.

वैशालीताई तुमचे मनापासुन अभिनंदन आणि आभार. परदेशात राहून या सगळ्या गोष्टी करायच्या म्हणजे काय यातायात असते हे आम्हाला पुरते ठावूक आहे.

>> योगायोगाने गणपतिचे आवडते जास्वंदीचे फूल हे येथिल राष्ट्रीय फूल मानले जात असल्यामुळे येथे जास्वंदीच्या बागाच बागा आहेत.
हे फारच छान..

> हा सण परदेशात भारतीय पध्दतीने साजरा करताना मला व माझ्या कुटुंबियांना जो अविस्मरणीय आनंद झाला तो मि.पा.च्या चोखंदळ आणि जिज्ञासू वाचकांमध्ये वाटावा ह्या आणि फक्त ह्याच हेतूने हा माहितीवजा लेख लिहिण्याचा हा माझा एक प्रयत्न!!

अगदी असाच आनंद आम्हालाही आमच्या गौरींच्या निमीत्ताने झाला/होत असतो.. असं म्हणतात आनंद वाटल्याने वाढतो आणि दु:ख वाटल्याने कमी होते.

यंदा मिपाने आमचा आनंद लोकांपर्यंत पोहोचवून शतगुणीत केला त्या बद्दल मिपाचे आभार.

- नाटक्या

वैशाली हसमनीस's picture

13 Sep 2008 - 12:28 pm | वैशाली हसमनीस

आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार. परदेशात ही सगळी जमवाजमव करणे किती अवघड असते ह्याचा आपल्याला अनुभव आहेच.पण शेवटी 'इच्छा तेथे मार्ग'हेच खरे ना? गणपति,गौरी इकडे आणताना आम्हाला आमचे इतर बरेचसे सामान (कपडे,भांडी इ.) आणता आले नाही.पण आता त्याचे कांहीच दु;ख होत नाही.आजचे मानसिक समाधान महत्त्वाचे !