लालबागच्या राजाचा विजय असो...!

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
3 Sep 2008 - 11:51 am

राम राम मंडळी,

मुंबईचा मानाचा बिंदू, मुंबईचं वैभव असणारा लालबागचा राजा या वर्षी अमृतमहोत्सवी वर्षात पदर्पण करत आहे. त्याकरता मी आमच्या "लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा"चे समस्त मिपा परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो...!

एकेकाळी राजाचं दर्शन अगदी सहज मिळायचं, परंतु आता आमचा राजा सेलिब्रिटी झाला आहे! :)

मराठी माणसाला ज्यांचा अभिमान वाटावा असे हिंदी रजतपटावरील सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितिन देसाई यांनी या वर्षी लालबागच्या राजाच्या सजावटीची संपूर्ण जबाबदारी घेतली आहे. मुंबईचा लालबाग परिसर हा माझा कामधंद्यानिमित्त अनेकदा जायचा-यायचा रस्ता असल्यामुळे नितिन देसाई घेत असलेली मेहनत मी गेले दोन-अडीच महिने खूप जवळून पाहात आहे.

त्यांच्या सजावटीबद्दल बोलायचं झालं तर शब्द अपुरे पडतील इतकी सुरेख सजावट त्यांनी केली आहे. राजाच्या दर्शनाला प्रत्यक्ष जाऊनच ती बघावी लागेल! :)

असो, अम्रुतमहोत्सवानिमित्त मंडळाचे पुन्हा एकदा अभिनंदन व देसाईसाहेबांचेदेखील अनेक आभार व अभिनंदन...!

लालबागच्या राजाचा विजय असो....! :)

मागच्या वर्षी राजा विसर्जनास निघाला ते काही क्षण! (चित्र सौजन्य : राजाचे संकेतस्थळ!)

आपला,
(लालबागच्या राजाचा भक्त) तात्या.

संस्कृतीधर्मसमाजसद्भावनाशुभेच्छाअभिनंदन

प्रतिक्रिया

जैनाचं कार्ट's picture

3 Sep 2008 - 12:21 pm | जैनाचं कार्ट (not verified)

लालबागच्या राजाचा विजय असो....!

राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!