कुमाऊं - पूर्वतयारी

के.के.'s picture
के.के. in भटकंती
15 Sep 2015 - 4:51 pm

नमस्का मित्रहो,
मिपावर (किंवा कुठेही) लिहिण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. काही चूका असल्यास गोड मानुन घ्या आणि काही सूचना असल्यास अवश्य करा.

========================
भाग १ - भाग २ - भाग ३ - भाग ४ - भाग ५ - भाग ६
========================

कुमाऊं - पूर्वतयारी

यंदा उन्हाळ्याच्या सुट्टीमधे कुठे जायचे ह्याची चर्चा नविन वर्ष सुरु झाल्यावर लगेच सुरु झाली. एप्रिलमधे साधारण एक आठवड्याची ट्रीप करावी असा विचार होता. उन्हाळा जोरदार असणार म्हणुन एखाद्या थंड हवेच्या ठिकाणाचा शोध घेत होतो. पूर्वी एकदा दिल्लीच्या मित्राबरोबर बोलत असताना त्याने “कुमाऊं परिसर बघ” असा सल्ला दिला होता. तो अजुन डोक्यात घुटमळत होता. म्हणुन तोच भाग बघायचे ठरवले. बायकोचीही कुठली ठरविकच ट्रीप करायची अशी मागणी नव्हती त्यामुळे ही जरा वेगळी ट्रीप करायचे ठरले. अर्थात, हा परिसर पुणे-मुंबईकरांसाठी वेगळा असला तरी दिल्ली/NCRवाल्यांसाठी मात्र महाबळेश्वर सारखाच जवळचा आहे.

एप्रिलमधे कुमाऊंचे हवामान आल्हाददायक असते. थंडी नुकतीच संपलेली असते आणि उन्हाळ्याची तीव्रता फारशी नसते. साधारण महाराष्ट्रात जसे वातावरण थंडीत असते तसेच काहीसे तिथे एप्रिलमधे असते. पर्यटनाचा मुख्य काळ हा मे व जून असा असल्याने एप्रिलमधे पर्यटकांची फारशी वर्दळ नसते. उत्तरेत शाळांच्या सुट्ट्यादेखिल उशीराच असतात ते देखिल एप्रिलमध्ये पर्यटक कमी असण्याचे कारण असू शकते. ह्या सगळ्या कारणास्तव आम्ही एप्रिलमध्येच जायचे ठरवले.

हा परिसर खुणावण्याचे अजुन एक कारण म्हणजे साक्षात ‘हिमालय’ पहायला मिळणार होता!!

आता एकदा कुठे जायचे हे ठरले की पुढचे नियोजन करणे सोपे पडते. त्या परिसरात काय काय पहायला आहे ह्याची कल्पना मित्राने दिलेलीच होती. तरी मी माहिती गोळा करायचे काम सुरु केले. त्यासाठी मला नेहमी ऊपयोगी पडणारे साधन म्हणजे Tripadvisor चा वापर सुरु केला. उत्तराखंडच्या फोरमवर ८ दिवसांच्या ट्रीपमधे काय काय पहाता येईल ह्याची चौकशी केली. यथावकाश मला त्यावर योग्य प्रतिसाद मिळाले. Google Maps तर सोबतीला होताच. मग साधारणपणे काय बघायचे आणि त्याचा काय मार्गक्रम असेल हे निश्चित झाले.

पुढचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे प्रवासाचे आरक्षण. प्रवास लांबचा असल्यामुळे दिल्लीपर्यंत विमान आणि पुढे रेल्वेने प्रवास करायचे ठरवले. रेल्वेने दिल्लीपासुन काठगोदामपर्यंत जाता येते. तिथुन पुढे अर्थात टॅक्सी/बस शिवाय पर्याय नाही. रेल्वे आरक्षण मिळायला काहीच अडचण आली नाही. (हे सर्वात महत्त्वाचे... IRCTCचा काहीच भरवसा नसतो). अणि रेल्वे आरक्षण झाल्यावर मगच विमान तिकिट बुक केले.

कुमाऊंमधे पहायला बरेच काही आहे. Tripadvisor वर मिळणारे पर्याय, मित्र सुचवत असलेले पर्याय, मला बघायची असलेली ठिकाणे ह्यावरुन मी बरेच वेगवेगळे प्लॅन बनवत होतो आणि बायकोला “मेरे नये पिलॅन के मुताबिक...” सांगत होतो. तरी आम्ही उपलब्ध दिवस, प्रवासाला लागणारा वेळ आणि बरोबर असलेला ५ वर्षाचा मुलगा ह्या सगळ्याचा विचार करून खालील प्लॅन बनवला.

काठगोदाम --> बिन्सर (१रात्र) --> चौकोरी (१रात्र) --> मुन्स्यारी (२रात्र) --> कौसानी (१रात्र) --> रानीखेत (१रात्र) --> नैनिताल (२रात्र) --> काठगोदाम.

Kumaon Route Map

आता वेळ आली होती हॉटेल शोधायची. इथेदेखिल अर्थात Tripadvisor चीच मदत घेतली. आम्हा दोघांच्या हॉटेलच्या बाबतीत फार अवास्तव अपेक्षा नसतात. ४/५ चांदण्यावालेच पाहिजे असे काही नाही. पण मूलभूत सुविधा व्यवस्थित असायलाच हव्या हा आग्रह मात्र नक्कीच असतो. आता कुमाऊं परिसरात काही प्रसिद्ध ठिकाणे आहेत तर काही ह्या सगळ्या कोलाहलापासुन मैलोन् मैल दूर असलेली. त्यामुळे हॉटेलपण ठिकाणाप्रमाणे वेगवेगळी होती.

अशातच एके दिवशी कार सर्व्हिसिंगला द्यायला गेलो असताना सहज सर्व्हिस स्टेशनच्या समोर पाहिले असता ‘कुमाऊं मंडल विकास निगम' (KMVN) चे ऑफिस दिसले! म्हटले अरे वा! ज्याचा शोध घेत आहे ते तर समोरच आहे. ऑफिसमधे जाउन सरकारी हॉटेलची चौकशी केली. KMVNनी जवळपास सर्वच पर्यटन स्थळांपाशी त्यांची रेस्ट हाउस (TRH) उभारलेली आहेत. मुख्य म्हणजे आपल्या MTDC सारखे त्यांची पण सर्व हॉटेल मोक्याच्या ठिकाणीच आहेत. Tripadvisorवर सुद्धा लोकांनी बरेच बरे रिव्ह्यू लिहिलेले होते. म्हणुन सरतेशेवटी बिन्सर, चौकोरी, मुन्स्यारी व कौसानी येथे KMVNची हॉटेल बुक केली. रानीखेत आणि नैनितालला मात्र दुसरे पर्याय शोधले.

कुमाऊं मधल्या संपुर्ण प्रवासासाठी एक कार बुक केली जी आम्हाला पहिल्या दिवशी काठगोदामला उचलुन सगळे कुमाऊं दाखवुन शेवटच्या दिवशी परत काठगोदामलाच सोडणार होती.

अशा प्रकारे सर्व बुकींग्ज करुन आम्ही ट्रीपसाठी सज्ज झालो.

क्रमश:...
========================
भाग १ - भाग २ - भाग ३ - भाग ४ - भाग ५ - भाग ६
========================

प्रतिक्रिया

द-बाहुबली's picture

15 Sep 2015 - 4:57 pm | द-बाहुबली

कुमाउंचा नरभक्षक म्हणून पुस्तक वाचले होते...

अजून पण असतात का म्हणे हे नरभक्षक?

याबाबत पुस्तके उपलब्ध्द नाहीत म्हणे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Sep 2015 - 6:18 pm | डॉ सुहास म्हात्रे

लोकहो, "मॅन इटर्स ऑफ कुमाऊं" हे जिम कॉर्बेट (तोच, कॉर्बेट नॅशनल पार्क वाला :) ) याने कुमाऊंमधील वाघांवर लिहीलेले पुस्तक आहे :)

नरभक्षक मानवांशी त्याचा काहीही संबंध नाही.... =))

द-बाहुबली's picture

15 Sep 2015 - 6:21 pm | द-बाहुबली

मी पुस्तके वाचली असल्याने नक्किच ते विधान कुमाउंच्या झोम्बींबाबत केलेले न्हवते... पण... गोंधळेकर भाउंचा हिशोबच वेगळा असल्याने...

असंका's picture

16 Sep 2015 - 7:25 am | असंका

हे लिहितायत ना काय काय. त्यांचं लिहून झालं की नवीन हिशेब मांडूया...कसं?

द-बाहुबली's picture

16 Sep 2015 - 6:36 pm | द-बाहुबली

आम्ही हिशोब मांडत. ते मिपाच्या ध्येयधोरणात बसत नाही असं स्पष्ट लिवलं आहे, नव्या करारामधे...

प्रचेतस's picture

15 Sep 2015 - 5:23 pm | प्रचेतस

झक्कास.

कुमाऊं म्हटलं की कॉर्बेटची मॅनइटर्स ऑफ कुमाउ, टेम्पल टायगर अ‍ॅण्ड मोअर मॅनइटर्स ऑफ कुमाउ, मॅन इटिंग लेपर्ड ऑफ रूद्रप्रयाग ही पुस्तके चटकन डोळ्यांसमोर येतात.

पुभाप्र.

नीलमोहर's picture

15 Sep 2015 - 5:30 pm | नीलमोहर

उत्सुकता वाढली आहे,
पुभाप्र.

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Sep 2015 - 6:25 pm | डॉ सुहास म्हात्रे

हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड म्हणजे प्रचंड सौंदर्याने ओतप्रोत भरलेला प्रदेश आहे. त्यात कुमाऊं म्हणजे मुकुटमणी.

पुढील सचित्र वर्णनाची प्रतिक्षा आहे.

पीके's picture

16 Sep 2015 - 9:55 am | पीके

भरपुर फोटो टाका ब्वा!

आदूबाळ's picture

16 Sep 2015 - 11:28 am | आदूबाळ

झक्कास सुरुवात!

अजया's picture

16 Sep 2015 - 11:54 am | अजया

छान सुरूवात. पुभाप्र

सुरवात तर चांगली झालीये. भरपूर फोटो टाका. तिथल्या हॉटेल्सचे सुद्धा फोटो टाका. (रूमच्या किमती पण कळल्या तर बरे होईल) मी पण पुढच्या वर्षी मे मध्ये नैनिताल-मसुरीला जायचा प्लान करतोय. हळू हळू माहिती गोळा करायला सुरुवात केलीये. तुमच्या लेखांचा नक्कीच फायदा होईल.

दिपक.कुवेत's picture

16 Sep 2015 - 6:29 pm | दिपक.कुवेत

वेगळ्या वाटेवरच्या सफरीसाठि सज्ज आहे...पटापट पुढिल भाग टाका...फोटोसहित.

पैसा's picture

7 Oct 2015 - 11:07 pm | पैसा

छान लिहिलंय.