११ जुलै रोजी मुंबईत रेल्वेमध्ये जे स्फोट होऊन २०० पेक्षा जास्त माणसं मारली गेली होती त्या नंतर दोन दिवसांनी मला ही कविता सुचली आहे. शक्य तितकं वास्तव मांडण्याचा प्रयत्न केलाय. दुर्दैवाने गेल्या २०-२५ दिवसांत अश्या घटाना घडात आहेत कि सुभाषबाबुंचे ३रे कडवे आपण खरच खुप सिरीअसली घ्यायला हवे.
-----------------------------------------------
परवाच एका स्फोटात मेलो,
पहिल्याच झटक्यात स्वर्गात गेलो,
स्वर्गात जाण्याचा एकच कायदा होता,
सरळ जगण्याचा हाच एक फायदा होता. - १
स्वर्गात जाताच टिळक भेटले,
नमस्कार म्हणताच प्रसन्न हसले,
- टिळकांनी विचारले.......
काय रे, स्वातंत्र्या नंतर बदलय का काही?
म्हंटल, छे हो, सरकारच डोक ठिकाणावर नाही,
तिथुन लगबगीने सुभाषबाबु आले,
विचारु लागले खाली नेमके काय झाले? - २
मी म्हणालो,
नेताजी काय काय म्हणुन घड्तय हल्ली?
फक्त आमदारच म्हणतात चलो दिल्ली!
नेताजी! आजही स्वातंत्र्यासाठी आम्ही रक्तच देतो
फक्त 'खुन' आमच असतं आणि आझाद कश्मीर होतो! - ३
तितक्यात....
दुरवर सावरकर दिसले म्हणुन धावलो,
म्हंटल 'तात्या', उभ्या जन्माचं पुण्य पावलो,
म्हणाले, सध्या तरी सगळं कसा निवांत आहे,
इथे congressवाला नाही तर सगळं कस शांत आहे - ४
त्यांनाच विचारल....
तात्या, इथे सध्या शिवराय कुठे हो राहतात?
म्हणाले, ते पहा सौ्धातुन आपल्याकडेच पाहतात!
छत्रपतिंचा विजय असो, म्हणुन चटकन हात जोडले,
पण घडल भलतच, ते माझ्यावरच ओरडले,
- काय रे? कोण्या जेम्स लेनने म्हणे बत्तमिजी केली
तुमची अक्कल, तेंव्हा सांगा कोठे चरायला गेली? - ५
मान वर करायची माझी हिंमत होत नव्हती,
आणि महाराजांची नजर माझ्या वरुन ढळत नव्हती!
कबुल आहे महाराज, आम्हाला तुमची स्वप्न कळलीच नाही,
पैसा सोडुन आमची नजर, दुसरीकडे वळलीच नाही.
पण रक्षणकर्तेच लांडग्यांसारखे नेमके सावाज हेरतात,
आणि ब्र म्हणायचा अवकाश, गाढवाचे नांगर फिरतात. - ६
सगळे ऐकुन महाराजांच्या गालचे कल्ले थरारले,
आमचं केविलवाणं जगणं बघुन डोळ्यात पाणी तरारले,
क्षणभर राजेपण विसरुन ते दु:खावेगाने थरथरले,
आणि मग आमचं असं वागणं बघुन रागाने बिथरले - ७
पाय लटपटले....
वाटल आता, कंबख्ति भरलिच म्हणुन समज,
चुकिची शिक्षा, गर्दन मारलीच म्हणुन समज,
पण न्याय-कठोर असले तरि हृदय त्यांचे 'रीते' नव्हते,
अन मेलेल्यांनाच मारायला ते 'खुर्चीतले' नेते नव्हते. - ८
म्हणाले, फक्त नाव सांग, खाली जाउन समाचार घेतो,
म्हणालो राहुद्या 'लोकशाहीत' प्रत्येकाचा विचार होतो,
खाली आता न्याय बरेचदा विकत मिळतो,
आणि पैसेवाला दुसर्यांच्या जिवाशी खेळतो. - ९
फक्त एकच काळवीट मारले!म्हणत आपले माजोरडे नाक मुरडतो,
कोणीही आपल्या गाडीखाली गरिबांना चिरडतो
महाराजांनी मोठ्या मुश्किलीने, डोळ्यातलं पाणी अडवल,
कळलं मला हेच पातक आम्ही आयुष्यभर घडवल - १०
मान खाली घालुन तसाच पुढे गेलो............
अहो आश्चर्यम?? स्वर्गात मला औरंग्या भेटला
म्हणे काफरांना मारुन तर स्वर्ग गाठला
जिन्हा सुध्दा होता तिथेच,
म्हणाला, लवकरच आमची संख्या इथे लाखांवर जाईल
आणि मग स्वर्गाची सुद्धा फाळणी होईल - ११
- सौरभ वैशंपायन(मुंबई).
प्रतिक्रिया
25 Aug 2008 - 10:28 pm | कोलबेर
मला तरी ही कविता जरा जास्तच भडक वाटली. अर्थात हे माझे वैयक्तिक मत.
26 Aug 2008 - 8:31 am | सहज
शेवटचे कडवे वगैरे... चालायचेच.
एवढच म्हणू इच्छीतो की नाव पाहून मोठ्या आशेने वाचायला आलो होतो.
25 Aug 2008 - 11:25 pm | भाग्यश्री
थोडी भडक आहे, पण बाँबस्फोटांनंतर लगेच केली असल्यामुळे तसं होण्याची शक्यता नाकारता येत नाही..
कविता, त्यातला आशय आवडला, भिडला.. हे सगळं कधी बदलणार कोण जाणे..
26 Aug 2008 - 12:09 am | प्राजु
छान कविता.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
26 Aug 2008 - 6:29 am | विसोबा खेचर
सुंदर कविता...!
तात्या.
26 Aug 2008 - 6:32 am | शितल
ही कविता आम्ही पहिल्यांदा वाचली होती तेव्हा ही आवडली होती
आता ही आवडली.
मस्तच आहे.:)
26 Aug 2008 - 11:18 am | सुचेल तसं
प्रखर वास्तवाची जाणीव करुन देणारी कविता..
(लोक बिनधास्त दुसर्याचा लेख, कविता copy-paste करुन forward करतात आणि त्याहुन वाईट म्हणजे मुळ लेखक/कवीचं नाव बिनदिक्कत काढुन टाकतात. "जाने तू..." आणि "फाळणी" हे दोन्ही आधी forward आले होते. सौरभ खुपच छान लिखाण...)
Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
26 Aug 2008 - 12:16 pm | राघव१
ही कविता मीही आधी वाचलेली आहे.
नाव तर नव्हतेच पण सोबत १-२ कडवीही नव्हती त्यात.
कविता खूप मस्त. कमी शब्दांत प्रखर भाष्य केलंय.
आपल्यास एकदम पट्या आणि आवड्या. शुभेच्छा.
राघव
26 Aug 2008 - 5:40 pm | प्रभाकर पेठकर
आवडली कविता. छान लिहीली आहे. तुमच्या संवेदनशीलतेला प्रणाम.