आपल्या रोजच्या धावपळीचा कळत नकळत आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. सद्ध्या एक वारंवार ऐकू येणारी तक्रार म्हणजे 'मला बॅकचा प्रॉब्लेम आहे रे' 'लोवर बॅकचा प्रॉब्लेम आहे'. आपल्या संपूर्ण शरीराला नियंत्रित करणारा हा अतिशय महत्वाचा अवयव अनेकदा आपल्याकडून दुर्लक्षित राहतो, आणि त्याचे परिणाम या अशा दुखण्यात दिसतात.
पाठीवर किंवा कण्याला अपाय करणा-या अनेक गोष्टींपैकी एक नेहमी होणारी गोष्ट इथे नमूद करू इच्छितो. आपण रोजच्या व्यवहारात अनेकदा कमी अधिक वजन उचलतो. उचलून वर ठेवतो, वरून काढून खाली ठेवतो, सरकवतो, ढकलतो इत्यादी. या सगळ्या हालचाली करताना आपल्या पाठीची कमालीची इन्व्हॉल्व्हमेंट असते. त्याकडे नीट लक्ष दिलं नाही, कुठेतरी कसकसतं आणि मग त्या आयोडेक्स च्या जाहिरातीसारखा पाठीकडे हात जातो. तर, यासाठी लिफ्टिंग टेकनिक व्यवस्थित असलं पाहिजे. काही रॉकेट सायन्स नाही आहे; फक्त स्वतःला.सवय लावण्याची गरज आहे.
कुठलीही गोष्ट उचलताना
१) पाठ सरळ्/ताठ असावी.
२) कमरेतून पुढे न वाकता, गुढघ्यातून खाली वाकावे.
३) टाचा (हील्स) वर जोर देऊन वर उठावे. उठतानाही पाठ सरळ असावी.
४) वजन उचलून नेताना शरीराचा भार पुढे नसावा.
५) वजन शरीरालगत असावं.
६) वळताना पायातून वळावे, कमरेतून नव्हे. ट्विस्ट करू नये.
७) वजन खूप असल्यास मदत घ्यावी किंवा सोयीच्या उपकरणाचा आधार घ्यावा.
बाकी समजायला खालील चित्रे आंतरजालावरून देत आहे.
पाठीची काळजी घ्या.
प्रतिक्रिया
25 Mar 2015 - 2:36 pm | कैलासवासी सोन्याबापु
स्क्वॉट लिफ्ट्स उत्तम असतात व्यायाम असो का काम शक्यतो डेडलिफ्ट्स टाळावेत डेडलिफ्ट्स मुळे लोवर बॅक चा चुराडा होऊ शकतो
(एक्सीडेंट मुळे अनुभवाचे कुबड़ आलेला) बाप्या
25 Mar 2015 - 3:02 pm | स्पा
काय नाय होत
मी दणकून मारतो डेड लिफ्ट्स
मजा येते
25 Mar 2015 - 3:06 pm | सूड
झायरात!!
25 Mar 2015 - 3:14 pm | टवाळ कार्टा
अर्रे तुझे वजन किती तु उचलणार किती...बाकी झैरात आहेच :D
25 Mar 2015 - 3:20 pm | स्पा
या एकदा यायाम करायला :)
बाकी तुमचे स्वतचे वजनही तुम्हाला पेलवत नाही अशी अवस्था आहे तिकडे बघा :D
25 Mar 2015 - 3:40 pm | सूड
टक्या, जो खुद पुल अप्स के चार रीपीटेशन्स का एक सेट मारके ढेर हो जाते है वो बीस-बीस रिपीटेशन्स के तीन-तीन सेट मारनेवालो को डिवचा नही करते.
25 Mar 2015 - 4:23 pm | टवाळ कार्टा
तेच म्हणत होतो तुझा "दोस्ताना" अजून कसा चाळवला नै गेला :P
25 Mar 2015 - 4:47 pm | सूड
आँ अच्च जालं तल!!
25 Mar 2015 - 3:14 pm | टवाळ कार्टा
अर्रे तुझे वजन किती तु उचलणार किती...बाकी झैरात आहेच :D
25 Mar 2015 - 3:14 pm | वेल्लाभट
ऑ.... अच्चं कलतोश का तू........
25 Mar 2015 - 4:43 pm | कैलासवासी सोन्याबापु
मी बी आधी असेच म्हणयचो स्पा, अश्याच एका रगेल मस्ती च्या क्षणी बिना वेस्ट बेल्ट चा ६५ कीग्रॅ चा डेड लिफ्ट घेतला!! पाठीतुन अक्षरशः कड़कड़ण्याचा आवाज आला होता !! तीन मिनट्स उताणा पडलो होतो पुढची पंधरा मिनिटे सेंसेस परत यायला गेली!!! जिम सुटली !! पाषास्ट किलो ची ढेरी घेऊन फिरतोय :(
25 Mar 2015 - 4:57 pm | वेल्लाभट
हे वाचून वाईट वाटलं.
पण काहीतरी नक्कीच चुकलं तिथे. बेल्ट लावला नाहीत हे सांगितलंतच तुम्ही. फॉर्मही अत्यंत महत्वाचा ठरतो. असो.
धिस वॉज बॅड.
25 Mar 2015 - 5:04 pm | सूड
:(
25 Mar 2015 - 5:09 pm | स्पा
लय बेक्कार झालं राव
पण पुढे डॉक्टर काय म्हणाले , हळू हळू योग करून पोश्चर सुधारता येईल
25 Mar 2015 - 6:56 pm | कैलासवासी सोन्याबापु
हो वेल्लाभट् वेळच चुकीची होती साली बहुतेक
स्पा , त्यानंतर ताबडतोब ट्रैक्शन लावले होते ३ दिवस नंतर फिजियोथेरेपी अन व्यायाम करुन आता पोस्चर करेक्शन बर्यापैकी झाले आहे पण त्या सहा महिन्यात जी वाकुन चालयची सवय जडली ती जडलीच!!! असो!! सद्ध्या फ़क्त फ्रीहैण्ड अन बॉडीवेट ची परमिशन आहे!!! देवादयेने नोकरी ला गरजेचे ट्रेनिंग अन परेड करू शकलो हेच भरपूर झाले
25 Mar 2015 - 5:18 pm | अनिरुद्ध.वैद्य
नशीब जास्त त्रास नाही झाला :(
25 Mar 2015 - 6:03 pm | कपिलमुनी
पाषास्ट किलो ची ढेरी ?
फक्त ढेरीचेच वजन पासष्ट किलो आहे का ?
की एकूण ६५ ?
25 Mar 2015 - 6:49 pm | कैलासवासी सोन्याबापु
फ़क्त ढेरी!!! हाता पायाच्या काड्या धरून मुंडके धरून ८२
26 Mar 2015 - 3:01 pm | बॅटमॅन
बापरे!!!!!!!!
25 Mar 2015 - 7:20 pm | मोहनराव
लई भाली ले... पण अच्च कच्चं?
25 Mar 2015 - 7:32 pm | कैलासवासी सोन्याबापु
अहो चेष्टेत लिवले हाय ते मोहनराव!!!! अशी का ढेरी हात पाय (माणसाचे!!) वेगळे कापुन वजन करता येते काय!!
25 Mar 2015 - 8:42 pm | मोहनराव
तुमाला नाय वो.. महाराष्ट्र केसरी स्पावड्याला प्रतिसाद हाय त्यो!!
25 Mar 2015 - 8:55 pm | कैलासवासी सोन्याबापु
सॉरी!! _/\_
25 Mar 2015 - 2:54 pm | टवाळ कार्टा
उत्तम लेख
25 Mar 2015 - 3:06 pm | अत्रुप्त आत्मा
उपयुक्त!
25 Mar 2015 - 3:17 pm | बॅटमॅन
साधारण ५० किलोपर्यंत वजन तुलनेने "कमी" श्रमात उचलता येण्यासारख्या फिटनेसकरिता ट्रेनिंग रेजिमेन कुणी सांगू शकेल का? धन्यवाद.
25 Mar 2015 - 3:20 pm | अनुप ढेरे
लग्नाची तयारी का?
25 Mar 2015 - 3:22 pm | वेल्लाभट
ळॉळ
26 Mar 2015 - 3:01 pm | बॅटमॅन
=))
त्या तयारीत रोजरोज वजन उचलणं अंतर्भूत नसतं बहुधा, नै ;)
26 Mar 2015 - 3:48 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
लग्नानंतर शॉपिंगच्या ब्यागा उचलायला ताकद लागते मिष्टर, काय समजलांसं!! =))
26 Mar 2015 - 4:00 pm | बॅटमॅन
हो पण तेही रोजरोज नसावं- होपफुली =))
26 Mar 2015 - 4:02 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
डिपेंड्स ऑन नशिब....!!! =))
25 Mar 2015 - 3:21 pm | वेल्लाभट
वर स्पा' ने आपली झैरात केलेलीच आहे. तो नक्की सांगेल. हे भस्साभस डेडलिफ्ट करा म्हणेल भौदा... हाय काय नाय काय.
25 Mar 2015 - 4:02 pm | कहर
इथे संदीप खरेच्या 'अजून उजाडत नाही गं … ' च्या धर्तीवर 'अजूनही उचलत नाही गं … ' म्हणावेसे वाटतय
*dance4* *DANCE* :dance:
बादवे कुठेतरी जोक वाचला होता. १४ किलोचे सिलेंडर न उचलू शकणाऱ्याला ५०-५५ किलोची मुलगी आरामात उचलता येते ( इथे सिलेंडर 'गरज असताना' आणि मुलगी 'गरज नसतानाही' असा संदर्भ धरावा ) *help* *HELP*
25 Mar 2015 - 4:14 pm | टवाळ कार्टा
पोरगी गळ्यात हात टाकते हो...बाकी जरा भविष्यातला विचार केल्यास काय जास्त फायद्याचे हे तुम्हीच ठरवा ;)
25 Mar 2015 - 4:46 pm | कहर
गळ्यात हात टाकल्याने ४-५ पट वजन कमी होते का ? भौतिकी भाषेत याला उर्ध्वबल (upthrust) म्हणतात पण ते द्रव किंवा वायू पदार्थांमुळे होते असे शिकवले गेलेले (मास्तर मुलगी या पदार्थाबद्दल इसरला कि जाणून बुजून बोल्ला नाय काय ठाऊक )
25 Mar 2015 - 5:07 pm | अनिरुद्ध.वैद्य
… वेरी पेशल केस ऑफ रिलेटीवीटी! भौतिकशास्त्राचे नियम मोडतात तिथे ;-)
25 Mar 2015 - 6:10 pm | कपिलमुनी
अणुभवाचे बोल दिसात आहेत कार्ट्याचे !
25 Mar 2015 - 5:53 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर माहितीपूर्ण आणि रोजच्या जीवनात उपयोगी लेख.
======
काय नाय होत
मी दणकून मारतो डेड लिफ्ट्स
मजा येते
हे कोणी, कोणत्या पूर्वतयारीने, किती वजन उचलायचे आहे त्यावर अवलंबून आहे. तरीही सावधगिरीच्या सूचना...
१. खूप ताकदवान माणसानेही चुकीच्या पद्धतीने वजन उचलण्याची "मजा" कधी "सजा" बनेल हे सांगता येत नाही. तेव्हा ते न केलेले केव्हाही चांगले.
२. चुकीच्या पद्धतीने आणि / अथवा प्रमाणापेक्षा जास्त वजन उचलल्याने व्यावसायिक वेटलिफ्टर्समध्येही पाठीच्या तक्रारी निर्माण होणे विरळ नाही.
३. जिला आपण सर्वसामान्य भाषेत पाठ म्हणतो ती एक मोठ्या संख्येने असलेली हाडे, सांधे, स्नायू, संधिबंधने (लिगामेंट्स), इ ची गुंतागुंतीची संरचना आहे. या संरचनेमध्ये मज्जारज्जू सुरक्षित ठेवलेला असतो व त्यापासून निघालेले मज्जातंतू त्या संरचनेमध्ये असलेल्या अरुंद छेदांतून बाहेर पडतात. अर्थातच, या संरचनेला मध्यम ते मोठा धोका पोहोचला तर ती पूर्णपणे (स्ट्रक्चरली अँड फंक्शनली) मूळस्थितीत आणणे बहुतेक वेळा अशक्य असते.
४. पाठ शरीररचनेच्या केंद्रभागी असल्याने तिचा मानवाच्या बहुतेक सर्व महत्वाच्या हालचालीत सहभाग असतो. त्यामुळे, पाठीला झालेली अगदी छोटी पण कायमस्वरूपी इजा माणसाला लहानसहान कृतीतही त्याने उत्साहाच्या (काहीजण याला जास्त कडक आणि जास्त योग्य शब्द वापरतात) भरात केलेल्या चुकीची सतत जन्मभर आठवण देत राहते.
वर उधृत केलेला प्रतिसाद वाचून गैरसमज झाल्याने कोणाचे नुकसान होऊ नये, केवळ याच कारणासाठी हा प्रतिसाद आहे. बाकी प्रत्येकजण आपापल्या जबाबदारीवर स्वतःचे निर्णय घेण्यास मोकळा आहेच.
26 Mar 2015 - 6:58 pm | सुबोध खरे
एक्का साहेबांच्या उत्तम प्रतिसादाला एक पुरवणी
माझे असे वैयक्तिक मत आहे कि व्यायाम या प्रकारासाठी जमिनीवरून वजन उचलुच नये. ५० % तरी तरुणांना ( < ३० वर्षे) या व्यायामानी पाठदुखी होते. आणि चाळीशीनंतर तर नाहीच नाही. त्याला पर्यायी असे सर्व व्यायाम प्रकार वापरावेत.
बाकी सिलिंडर उचलायचे प्रसंग ३० च्या आत येऊ नयेत. (आणी मुलगी उचलायचे तिशी नंतर)
25 Mar 2015 - 6:58 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
पाठीच्या मणक्याशी खेळु नये हे स्वानुभवानी सांगतो. मणक्याला तीन फ्रॅक्चर्स झालेली टी-१२ ला. अजुन किमान ५ पहिने व्यायाम करता येणार नाही. पुर्वीएवढा व्यायाम आता परत कधी करता येईल का हीच शंका वाटते. :'(
25 Mar 2015 - 8:59 pm | आयुर्हित
वेल्लाभट व इए सर, दोघांचेही मनापासून धन्यवाद.
25 Mar 2015 - 11:02 pm | पॉइंट ब्लँक
चांगली माहिती दिली आहे. अजून एक. दुचाकी वरून फार लांबचे प्रवास वारंवार करू नका.
26 Mar 2015 - 7:01 am | आयुर्हित
दुचाकी वरून फार लांबचे प्रवास करतांना सुरक्षितता महत्त्वाची आहेच, त्याशिवाय बसण्याची पध्दत/आसन (posture) बरोबर हवे.
अन्यथा थोड्याशा प्रवासानेही त्रास होवू शकतो.
किंवा काहीच प्रवास न करणाऱ्या व कार्यालयात/घरात काम करणाऱ्या व्यक्तीलाही पाठीचा त्रास होवू शकतो.
26 Mar 2015 - 3:36 am | अभिजीत अवलिया
छान माहिती दिली आहे.
26 Mar 2015 - 7:19 pm | वेल्लाभट
धन्यवाद. एकदा मुद्दाम उचलून बघा एखादी गोष्ट अशी; फरक लगेच कळतो.