मितवा... प्रेम या भावनेचा अर्थ नव्यानं कळेल .... सावर रे ए मना....

किरण८८७७'s picture
किरण८८७७ in जनातलं, मनातलं
1 Mar 2015 - 3:03 pm

मितवा…मला खरेच कळेना की या चित्रपटाला कौतुक कशा-कशासाठी करावे.
वेगळ्या धाटणीची प्रेमकथा, उच्चकोटीचा अभिनय, ओठांवर अलगद येउन बसणारे संगीत अन सर्वात महत्वाचे दिलखेच "संवाद"
प्रेम माणसात किती बदल घडवते, किती सहजतेने अन अलगदपणे तुमचे जीवन बदलवते याचे भावूक चित्रीकरण. तर संवाद म्हणजे आपल्यालासमोरnसहजतेने उलगडलेले माणसी विचारसरणीचे विविध पैलूं.
थोडी वेगळी प्रेमकहाणी. चित्रपट पाहता-पाहता पुढच्या कथेचा अंदाज येतो, पण असे असले तरीही मितवा कधीच निराश करत नाही. कारण सर्वांचा अप्रतिम अभिनय अन सहज निघणारे पण खूप मतीतार्थ असणारे अप्रतिम संवाद, अन ते हि इतके की काही विचारू नका. एरव्ही एका चित्रपटा नंतर एक दोन डायलॉग फ़ेमस होतात, पण मितवा तुम्हाला असे कित्येक डायलॉग देतो. अगदी "वापुर्झा"च म्हणा न, कुठेही चालू करा दर ५ मिनिटात दिलखेच डायलॉग.
संगीत म्हणाल तर शंकर-एहसान-लॉय, शंकर महादेवन,स्वप्नील बांदोडकर सर्व एकत्र आल्यावर "सावर रे", "मितवा", "दूर दूर" ओठांवर न रुळले तरच नवल.
अभिनयाला दिलखेच संवादांची साथ पुरवत मितवा आपल्या मनावर राज्य करतो. बर्याच काळाने एक भावूक चित्रपट पाहताना छान वाटले. जरूर पहा.
प्रेम या भावनेचा अर्थ नव्यानं कळेल ... अन जगणं सोपं होऊन जाईल.
सावल्या क्षणाचे भरुन आल्या घनांचे.. थेंब ओले झेलताना.....सावर रे..सावर रे़

-किरण

कलाचित्रपटप्रकटनप्रतिसादप्रतिक्रियामत

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

1 Mar 2015 - 3:06 pm | टवाळ कार्टा

द-वन-ईय???

कपिलमुनी's picture

2 Mar 2015 - 9:39 am | कपिलमुनी

नवलेखकांना प्रोत्साहन द्या.

टवाळ कार्टा's picture

2 Mar 2015 - 11:00 am | टवाळ कार्टा

खिक्क...डिकोड केले वाट्टे ;)

गाणी छान आहेत. पण पिक्चर नाही आवडला.

शब्दानुज's picture

2 Mar 2015 - 3:24 pm | शब्दानुज

सगळे मुद्दे मान्य..पण मुळ कथेतच चित्रपट कमी पडतो असे वाटते..मध्यांतरापर्यंत कथानक खुपच हळुहळु सरकते..
सारखे अपघात करण्यात मराठी
चित्रपटकारांना कसली मजा येते कोणास टाऊक..
त्यांचे आणि दवाखान्याचे लागोबंध असतात का?

सानिकास्वप्निल's picture

2 Mar 2015 - 4:13 pm | सानिकास्वप्निल

नाही आवडला सिनेमा
खूपच हळू सरकतं कथानक आणि गाणी ही फार आवडली नाही.