मुळात माझे आणि देवाचे नाते फारच घट्ट.
मी मागावे, हट्ट करावा आणि त्याने द्यावे, हा आमच्या दोघां मधला अलिखित नियम.देवाच्या दरबारात मध्यस्थाची गरज नसते, हा माझा अनुभव आणि आमच्यापेक्षा आमच्या बायकोचे देव जास्त ऐकतो, हा दुसरा अनुभव.
आमच्या वडीलांचे आणि आईचे मात्र देवाशी फार काही पटत नाही.तसे दोघेही फिरायला वगैरे जातात, पण मुद्दाम जेजुरी किंवा आंबिजोगाईला जात नाहीत.
आमचे लग्न झाले आणि लग्नाच्या वेळी समजले की, आमची बायको फार धार्मिक.(तसे लग्ना आधीच थोडी-फार कल्पना आली होती.पण लग्ना नंतर शिक्का-मोर्तब झाले.)
आमचे कुलदैवत म्हणजे जेजूरी.लग्ना आधी एकदा जावून आलो होतो.पण तिथला बाजार बघून मला परत तिथे पावूल ठेवू नये, असेच वाटत होते.
लग्ना नंतर परत एकदा जेजूरीला भेट द्यावी लागणार होती.बायकोचा तसा हट्ट पण होताच.लग्ना नंतर वेळ-काळ बघून मी आणि बायको, जावून आलो.तिला पण माझ्या सारखाच अनुभव (पुजार्यांचे पैसे काढणे) आल्याने, ती म्हणाली, "हे नक्की देवस्थान आहे की, पुजार्यांसाठी टांकसाळ?"
असो,
पुढे नौकरी बदलल्याने, चिपळूणला गेलो.सहज म्हणून गुहागरला गेलो.छान समुद्र-किनारा आणि बाजूलाच मंदिर.का कुणास ठावूक, पण मंदिरात अभिषेक करायची, मनापासून इच्छा झाली.सकाळ असल्याने मंदिरात चौकशी केली.
भटजी म्हणाले,"बसा.करू या अभिषेक.आता ही बॅच संपली, की नंतर तुमचाच नंबर."
मी, " अहो, पण माझ्या कडे पुजेचे सामान किंवा पीतांबर तर सोडाच.जानवे पण नाही."
गुरुजी,"ते होईल हो.तुम्ही बसा तर खरे."
जेजूरीचा अनुभव असल्याने, हा भटजी आता किमान ५०१/- रु. तरी काढणार्,ह्यांत शंका न्हवती.
एक अर्ध्या तासातच आधीच्या मंडळींचा अभिषेक झाला, आणि आमचा नंबर लागला.
गुरुजींनी मस्त पीतांबर नेसवले आणि आत गाभार्यात गेलो.
जानवे घातले आणि मस्त साग्रसंगीत पुजा झाली.
दक्षिणा विचारली.
भटजी,"अभिषेक करून तुम्हाला समाधान वाटले का?"
मी,"हो."
भटजी,"मग तुम्हाला योग्य वाटेल ती दक्षिणा द्या.मला ५/- दिलेत तरी चालतील."
योग्य ती दक्षिणा दिली आणि एकच ठरवले, परत जर कधी अभिषेक करावासा वाटला तर गुहागरलाच जायचे.
डिस्क्लेमर : देव देवालयांत नसून आपल्याच मनांत असतो, ह्यावर माझा ठाम विश्र्वास असल्याने, मी शक्यतो घरच्या कुठल्याच कार्याला भटजी बोलवत नाही.आमच्या घरी सुपारीचाच गणपती असतो आणि आमच्या सत्यनारायणाला भटजीची आवश्यकता नसते."
प्रतिक्रिया
28 Jan 2015 - 2:51 pm | बॅटमॅन
वा वा वा. इतरांनी गाय मारली म्हणून भटजीही वासरू मारूदे तर. ते मारूनच्या मारून वर बाजारूपणा मिरवायला मोकळे. मान गये.
28 Jan 2015 - 3:58 pm | विटेकर
गोमांस खाणार्या लोकांसाठी ही तर आनंदाची बातमी आहे ना ! आता गायी बरोबर वासरुपण खायला मिळणार ना ?
आणि तुम्हाला भटजी लोक अक्षता देऊन घरी बोलावायला येतात का ? की या बाबांनो आमच्या तीर्थक्शेत्री?
आणि आले तरी तुमची सदसदविवेक बुद्धी जागृत ठेवा ना !
28 Jan 2015 - 7:57 pm | अत्रुप्त आत्मा
अत्यंत चुकिचे विधान! आणि मनोमन असहमती!
भ्रष्टाचार आणि अश्या प्रकारची वरकमाई अथवा गैरवर्तन याचं समर्थन होऊच शकत नाही! हे पोटापाण्याच्या कमाईच्या कितीतरी पुढे गेलेले लोक असतात. मग ते तिर्थक्षेत्रांसारख्या ठिकाणी असोत्,अथवा सर्वसामान्य समाजात पौरोहित्य करणारे माझ्यासारखे असोत. यजमानाला यथायोग्य दक्षिणा सांगून झाल्यावरंही अनेक प्रकारची मोहजालं निर्माण करून ,भावनिक फसवाफसवी करून केल्याजाणार्या कचकून कमाईला तुंम्ही काय म्हणाल??? बंगले/गाड्या/विदेशातले प्रवास झाले. अप्रामाणिक वजनदार मंडळींशी ओळखि वाढवून झाल्या. मनोविकृत धार्मिक संस्थांशी संबंध प्रस्थापित करून तिकडेही भरपूर शेती-करून झाली. तरिही ही घाणेरडी भूक शमत नाही..अशीही मंडळी पुरोहितांमधे आहेत. तोंडामधे धार्मिक परिभाषेचा चाळा,मनात फक्त नोटांचा-गाळा..वेशभूषाही अगदी साध्या सत्शील दिसण्यापासून ते भपकेबाजपणा पर्यंतची सगळी! आणि हे सर्व धार्मिक साजशृंगारफक्त आणि फक्त पैशासाठी करणारी मंडळी आमच्यात आहेत. यांनाही तुंम्ही सोडून देणार का??????
समांतरः- माझ्यासारखा माणूसंही या कामात धंदेवाइकपणा वापरतो,पण ते फक्त स्वतःची कुठल्याही प्रकारची फसवणूक होऊ नये म्हणून! (यापूर्वी ती भरपूर झालेलिही आहे,म्हणून सध्याच्या काळात हे न अवडणारं पाऊल मलाही उचलावं लागत आहे.तरिही मी त्याला मर्यादा घालून घेतलेल्या आहेतच!)
28 Jan 2015 - 8:08 pm | अवतार
प्रतिसाद आणि त्यातील प्रामाणिकपणा मनापासून आवडला.
28 Jan 2015 - 8:47 pm | बॅटमॅन
फक्त _/\_
28 Jan 2015 - 9:41 pm | अजया
_/\_गुर्जी.
28 Jan 2015 - 11:11 pm | डॉ सुहास म्हात्रे
प्रामाणिक आणि मोलाचा प्रतिसाद !
केवळ स्वतःची फसवणूक न होण्यासाठी खबरदारी घेण्यात काहीच अनैतीक किंवा अधार्मिक नाही. उलट तसे न करणे अयोग्य आहे... कारण अश्या परिस्थितीचा उपयोग धूर्त लोक अनैतीक फायदा घेण्यासाठी करतात.
29 Jan 2015 - 5:05 pm | नाखु
ग्रुरुजी माझे स्नेही आहेत हे भाग्य!!
30 Jan 2015 - 9:23 am | विटेकर
एखादा व्यवसाय व्यवसाय म्हणून स्वीकारल्यानंतर , व्यवसाय म्हणून येणार्या आव्हानाना सामोरे जावेच लागते.
पौराहित्य व्यवसाय म्हणून करत असू तर त्या व्यवसायाचे प्रचलित नियम पाळावेच लागतील. कारण व्यवसाय आहे म्हणजे स्पर्धा आहे आणि त्यातील व्यवहार म्हणून चालणारी लांडी - लबाडी देखील आली.
जर तुम्ही तसे करत नसाल तर तुम्ही "व्यवसाय" करत नाही ! जसे धर्मादाय दवाखाने असतात तसेच धर्मादाय पौराहित्य !
आणि ज्याला भक्ति / उपासना/ साधना करायची आहे त्याने पौराहित्य कशाला करायला हवे ?
माझा मुद्दा इतकाच की , जगभराची पापे आम्ही करून येणार आणि एखादी पूजा / अभिषेक द्वारे त्यातून मुक्त होण्याचा प्रयत्न करणार, या देवाण घेवाणी मध्ये पुरोहीताने मात्र पैसा कमावता कामा नये , ही अपेक्षा गैर आहे !
बहुतांशी पूजा - अर्चा या सकाम उपासना स्वरुपातच असतात, हा साधा व्यवहार आहे , तुम्ही मला पैसे द्या , त्याबदल्यात मी तुमच्या पापाचे परिमार्जन करतो/ झाले आहे असे जाहीर करतो, तुमच्या डॉन स्कूल टाईप शाळा भरमसाठ फी घेऊन मुलाला शिक्षण दिले असे जाहीर करतात , तेव्हा तुम्ही करतात त्याचे व्याल्यु ऑडीट?
मग पुरोहितांसाठीच का ? व्हाय धिस डबल स्टंन्डर्ड ?
30 Jan 2015 - 9:31 am | विटेकर
घरोघरी जसे फ्यामिली डोक्टर असतात तसे घरोघरी पुरोहित / ज्योतिषी/ महन्त / महाराज असतात , तुमच्या सम्यसेवर त्यांचा तोडगा असतो... ते मग कालसर्पयोग शांती महाअभिषेक / गोदाने - सवर्णदाने सांगतात / खडे - रत्ने सांगतात . या उपासना कुठे पूर्ण करुन घ्यायच्या ते सांगतात.. तसे त्यांचे लागे - बांधे असतात.. कदाचित कमिशन ही असेल.
आत्मूस गुरुजी ,
ही काळाची गरज आहे !!! मागणी तशी पुरवठा हा व्यवहराचा साधा नियम आहे !
आम्ही अनीतीने पैसा मिळवणार मग त्याचे परिमार्जन काय ? किती सोपा उपाय आहे हा ? आम्ही कसा ही पैसा कमावू पण पुरिहितांनी मात्र नीतीनेच वागले पाहीजे ही अपेक्षा गैर आहे.
एकेका धंद्याचे दिवस असतात हो ! एकेकाळी वकिलांचे होते आता पुरिहितांचे आणि आय टी हमालांचे आहेत .
चालायचेच, कालाय तस्मै नमः !
30 Jan 2015 - 9:37 am | विटेकर
तीर्थे धोण्डा पाणी ! असे आमच्या संतानी ठ्णाणा करून सांगितले , वारीला चालत जाऊन शिखराचे दर्श्न घेऊन परतायचे असे साम्गितले आहे , त्याचा कोण सारासार विचार करते ?
व्यर्थ भार रामावरी घालू नये ! असे समर्थांनी सांगितले पण देव म्हणजे देव (Give) हे काही आमच्या डो़kयातून जात नाही ! उलट फलश्रुती देणार्या सत्यनारायणाच्या पूजा आणि संतोषीमातेची व्रते प्रचंड लोकप्रिय ! कारण सिम्पल ! गिव अन्ड टेक !
30 Jan 2015 - 10:08 am | अर्धवटराव
:)
30 Jan 2015 - 11:57 am | डॉ सुहास म्हात्रे
हे खूप आवडले ! कानाखाली की काय म्हणतात ना तसे ;) :)
माझा मुद्दा इतकाच की , जगभराची पापे आम्ही करून येणार आणि एखादी पूजा / अभिषेक द्वारे त्यातून मुक्त होण्याचा प्रयत्न करणार, या देवाण घेवाणी मध्ये पुरोहीताने मात्र पैसा कमावता कामा नये , ही अपेक्षा गैर आहे !
बहुतांशी पूजा - अर्चा या सकाम उपासना स्वरुपातच असतात, हा साधा व्यवहार आहे , तुम्ही मला पैसे द्या , त्याबदल्यात मी तुमच्या पापाचे परिमार्जन करतो/ झाले आहे असे जाहीर करतो, तुमच्या डॉन स्कूल टाईप शाळा भरमसाठ फी घेऊन मुलाला शिक्षण दिले असे जाहीर करतात , तेव्हा तुम्ही करतात त्याचे व्याल्यु ऑडीट?
मग पुरोहितांसाठीच का ? व्हाय धिस डबल स्टंन्डर्ड ?
30 Jan 2015 - 12:33 pm | बॅटमॅन
मुद्दा तर बिनतोड आहे.
जर हा मुद्दा अजून ताणायचा तर देवस्थानांनी अजून चांगल्या सोयीसुविधा पुरवल्या पाहिजेत. हा व्यवसाय पूर्ण ग्राहककेंद्री करण्याचे पोटेन्शिअलही आहे यात.
30 Jan 2015 - 12:40 pm | विटेकर
शेगांवकरांनी सकारात्मक पावले उचलली ! व
केव्हडी गर्दी होते तिथे ? कधी पैसे कमी पडतात त्यांना ? उलट अन्य तीर्थांच्या ठिकाणी त्यांचीच सोय चांगली असते!
अध्यात्माचा उत्तम व्यवसाय करता येतो ! आणि सुखनैव पैसे ही कमावता येता, किती उदाहरणे सांगू?
पुढच्या काही वर्षात भारत एक अध्यात्मिक पर्यट्न केन्द्र म्हणून उदयाला येईल,
30 Jan 2015 - 12:56 pm | बॅटमॅन
आध्यात्मिक पर्यटन केंद्रासाठीचे इंटर्नल मार्केट हजारो वर्षे जुने आहे भारतात. एकही फॉरेनर आला नाही असे मानले तरी त्यामुळे या मार्केटात वट्ट फरक पडत नाही. प्रश्न इतकाच आहे की एरवी धर्माच्या नावे गळे काढणार्यांनी किमान स्वच्छता आणि बेसिक सोयी जरा चांगल्या पुरवल्या तर त्यांना सगळेच दुवे देतील. चार पैशे जास्त घेतले तरी चालेल, पण सोयींत हयगय नको. हिंदूंना या बाबतीत ख्रिश्चन आणि मुसलमानांपासून शिकण्यासारखे बरेच आहे.
30 Jan 2015 - 6:11 pm | अत्रुप्त आत्मा
तुमच्या या सकारात्मकतेला मी ही ना म्हणत नाही.. पण टेबलाखालच्या कमाईचे आणि आरेरावी गुंडगिरी भ्रष्टाचार लांड्यालबाड्या श्टाइलची एजंट गणिका सर्व्हिस सेवा...मला कदापिही मान्य होणार नाही.. तुमच्या पहिल्या समर्थनाचा सर्व रोख तसा होता,म्हणून आक्षेप नोंदविला. :)
28 Jan 2015 - 12:15 am | संदीप डांगे
त्र्यंबकेश्वरच्या गर्दीत, भर गाभाऱ्यात माझ्या सात महिन्याच्या गर्भवती पत्नीस बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिस महिलेकडून धक्काबुक्की झाली. आम्ही जाम राडा केला. पण त्या लोकांना (विश्वस्त, बंदोबस्तावरील वरिष्ठ आणि रांगेतले लोक) यांना काही म्हणजे काहीच वाटले नाही.
वरील तिघांवर तर कधीच विश्वास नव्हता पण त्या क्षणापासून देव आणि देवळे यांच्यावरून कायमचा विश्वास उडाला. जो देव भक्तांची अशी हेळसांड डोळ्यांदेखत बघतो आणि काही करत नाही तो देवच नाही. तेंव्हापासून त्र्यंबकेश्वर आम्हास दुरावला तो कायमचा.
मंदिरातल्या पिढीजात पुजाऱ्यापैकी कोणीतरी आमचे अगदी जवळचे नातेवाईक आहेत. त्यांची कुबडी न वापरता एक सामान्य भाविक म्हणून स्वच्छ मानाने दर्शनास गेलो. चांगलाच दृष्टांत मिळाला. आयुष्याचे सार्थक झाले.
मंदिरात सोने, द्रव्य दानकर्त्या भाविकांबद्दल, ते यथेच्छ उधळणाऱ्या पुजारी विश्वस्त वैगेरे लोकांबद्दल, उगाच रांगा लावून गर्दी करणाऱ्या सुजन सुशिक्षित भाविकांबद्दल, मंदिर आणि भोवतालच्या व्यवस्थेच्या उडालेल्या बोजवाऱ्या बद्दल आम्हांस काहीही खंत खेद नाही. जे चालले आहे ते उत्तमच आहे. जशी प्रजा तशी व्यवस्था त्यामुळे जिथे आपल्याला पटत नाही तिथे आम्ही जात नाही आणि उगाच आजकाल त्रागा करून घेत नाही.
मंदिरांबद्दल ज्या कुणी मिपा सदस्यांनी हळहळ किंवा चिंता व्यक्त केली ती त्यांच्या मंदिर व त्यातल्या देवतांशी असलेल्या हृदयस्थ बंधनातून, हे देव आपले होते आहेत ह्या भावनेतून. पण आज खरच देव आपले राहिले नाहीत.
देवाने खरच अशी परिस्थिती आणून खरे भक्त कोण आणि ढोंगी कोण याची ओळख पटावी याची चांगली व्यवस्था केली. बायबल मध्ये जसे जजमेंट डे ला खऱ्या आणि खोट्या अनुयायांची ओळख देव करेल असे सांगितले ते काही अगदीच खोटे नाही म्हणा. त्याची प्रचीती येत आहे.
अध्यात्माच्या माझ्या अभ्यासावर मला इतकाच कळले कि प्रत्येक जण वेगवेगळ्या पायरीवर आहे. देवपूजा, कर्मकांडे, नवस सायास, बुवाबाजी ह्या सगळ्या पायऱ्या आपल्या ओलांडून झाल्यात आता आत्मज्ञानाच्या दिशेने पुढच्या पायऱ्यांवर आगेकूच सुरु आहे. कालांतराने त्याही पायऱ्या थोतांड वाटू लागतील आणि कुठल्यातरी जन्मात मोक्ष मिळेल.
त्यामुळेच इतर पायऱ्यांवर असलेल्या देवभोळ्या प्रजेबद्दल काही सुख दु:ख वाटत नाही. त्यांचाही प्रवास चाचपडत चालू आहे, आपलाही प्रवास चाचपडत चालू आहे.
28 Jan 2015 - 2:47 pm | विटेकर
पण कम्युनिस्ट लोक देवळात जातातच कशाला ?
28 Jan 2015 - 3:08 pm | पिलीयन रायडर
कशाला देवळात जातात लोक? एवढं सगळं करुन देव पावणार आणि नाही गेलात तर कोपणार वगैरे वाटुच कसं शकतं? एवढा बिनडोकपणा उघड उघड डोळ्याला दिसत नाही का?
28 Jan 2015 - 3:12 pm | बॅटमॅन
वायझेडपणा हेही एक महत्त्वाचे कारण असू शकते.
28 Jan 2015 - 3:41 pm | पैसा
मी तर देवळावरची शिल्पे आणि आतली रचना बघण्यासाठी जाते. त्र्यंबकेश्वरला ते सुद्धा बघायला दिलं नाही दळभद्री लोकांनी.
28 Jan 2015 - 10:53 pm | अर्धवटराव
पब्लीकने तेव्हढा कॉमनसेन्स वापरला असता तर त्यातल्या "कॉमन" शब्दावर किती उपकार झाले असते.
30 Jan 2015 - 11:59 am | डॉ सुहास म्हात्रे
व्यवहारात कॉमन नसतो कॉमन सेन्स :)